प्रकरण ५: गुणपदार्थनिरूपणम् - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय (Introduction to Properties of Material and Non-Material Substances)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
11 Mar 2019 - 12:53 am

(टीप: पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण ऋषी कणादांच्या वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्व, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा, शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकता/नियमितता , अधर्म/विनाशगामी/अनियमितता व शब्द/तरंग या प्रशस्तपादांनी यात जोडलेल्या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते. हे वर्णन ४थ्या शतकातले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. मूळ संस्कृत श्लोक मूळ पुस्तकातील, इंग्रजी भाषांतर काशीचे महामहोपाध्याय कै. पंडित गंगानाथ झा यांनी १९१४ मध्ये केलेले आहे. मराठी भाषांतराचा प्रयत्न मी केलेला आहे. वाचकांना सर्व संदर्भ मिळावेत म्हणून हा तिन्ही भाषेत देण्याचा खटाटोप. असो. )

७.०: ९४.५अथगुणपदार्थनिरूपणम् ।
About the qualities.
गुणांविषयी विवेचन.

७.०: ९४.६-रूपादीनाम्गुणानाम्सर्वेषाम्गुणत्वाभिसम्बन्धोद्रव्याश्रितत्वम्निर्गुणत्वम्निष्क्रियत्वम् ॥
Color and the rest belong to the common character of belonging to the class Quality, of inhering in the substance, of being devoid of qualities and of being devoid of actions.
रंग इत्यादि गोष्टी या पदार्थांच्या 'गुण' या बाबीत मोडतात. ते एकूण २४ आहेत. ते स्वत: त्या पदार्थांवर अवलंबून असतात व त्या गुणांना स्वत:चे काहीही गुण आणि हालचाली नसतात. सारं काही त्या पदार्थावर अवलंबून असतं.

७.०: ९५.३-रूपरसगन्धस्पर्शपरत्वापरत्वगुरुत्वद्रवत्वस्नेहवेगामूर्तगुणाः ॥
Color, Taste, Smell, Touch, Priority, Posteriority, Gravity, Fluidity, Viscidity and Application of Force are qualities that belong to the corporeal objects.
रंग, चव, वास, स्पर्श किंवा तापमान, आधी येणे, नंतर येणे, जड असणे, प्रवाही असणे, चिकट असणे आणि बळामुळे हालचाल होणे व घडवणे हे मूर्त किंवा पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या पदार्थांचे गुण आहेत.

७.०: ९५.९-बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मभावनाशब्दाअमूर्तगुणाः ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Virtue, Vice, Faculty, and Sound belong to immaterial things.
बुध्दी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, संरचना नियमितता आणि अनियमितता, भावना, शब्द हे अमूर्त गुण आहेत.

७.०: ९५.१३संख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागाउभयगुणाः ॥
Number, Dimension, Separateness, Conjunction and Disjunction belong to both.
संख्या, परिमाण, वेगळे असणे, जुळणे आणि वेगळे होणे यात मूर्त आणि अमूर्त दोन्ही येतात.

७.०: ९५.१५सम्योगविभागद्वित्वद्विपृथक्त्वादयोऽनेकाश्रिताः ॥
Conjunction, Disjunction, Duality, Dual Separateness and the rest belong to more than one object.
जुळणे, वेगळे होणे, दुहेरीपणा, विभागलेपणा आणि इतर गुण असण्यासाठी तेथे दोन पदार्थ असणे आवश्यक आहे.

७.०: ९५.२१शेषास्त्वेकैकद्रव्यवृत्तयः ॥
The rest inhere in single substances.
बाकीचे गुण हे एकाच पदार्थात असतात.

रूपरसगन्धस्पर्शस्नेहसांसिद्धिकद्रवत्वबुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मभावनाशब्दावैशेषिकगुणाः ॥
Color, Taste, Smell, Touch or Temperature, Viscosity, Natural Fluidity, Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Virtue and Vice, Feeling, Sound are the Vaisheshik (specific) properties.
रंग, चव, वास, स्पर्श किंवा तापमान, प्रवाहवरोध किंवा चिकटपणा, नैसर्गिक प्रवाहीपणा, बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म आणि अधर्म, भावना, शब्द हे वैशेषिक गुण आहेत.

संख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वगुरुत्वनैमितिकद्रवत्ववेगाःसामान्यगुणाः ॥
Number, Dimesion, Separateness, Conjunction, Disjunction, Largeness, Smallness, Gravity, Caused Fluidity, Force are the Generic or Samanya properties.
संख्या, परिमाण, वेगळे असणे, जुळणे, तुटणे, मोठं असणे, लहान असणे, जड असणे, ढकलून आलेला प्रवाहीपणा व बळ हे सामान्य गुण आहेत.

७.०: ९६.११-शब्दस्पर्शरूपरसगन्धाबाह्यैकैकेन्द्रियग्राह्याः ॥
Sound, Temperature, Color, Taste, Smell are perceptible primarily by one sense-organ each.
शब्द किंवा आवाज, तापमान, रंग, चव आणि वास यांची जाणीव होण्यासाठी एक मुख्य इंद्रिय गरजेचे असते.

संख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वद्रवत्वस्नेहवेगाद्वीन्द्रियग्राह्याः ॥
Number, Dimension, Separateness, Conjunction, Disjunction, Largeness, Smallness, Fluidity, Viscosity and Force are perceptible by two sense organs.
संख्या, परिमाण, वेगळे असणे, जुळणे, तुटणे, मोठे असणे, लहान असणे,प्रवाहीपणा, प्रवाहावरोध आणि बळ यांची जाणीव होण्यासाठी दोन इंद्रिये गरजेची असतात.

७.०: ९६.१९-बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नास्त्वन्तह्करणग्राह्याः ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, aversion, effort are perceptible by the Internal Organ.
बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न जाणवण्यासाठी अंतर्गत इंद्रिय गरजेचे असते.

७.०: ९८.४गुरुत्वधर्माधर्मभावनाह्यतीन्द्रियाः ॥
Gravity, Virtue, Vice and Faculty are beyond the sense organs.
गुरुत्व, धर्म, अधर्म आणि भावना या इंद्रियांना कळणाऱ्या नाहीत.

अपाकजरूपरसगन्धस्पर्शपरिमाणैकत्वैकपृथक्त्वगुरुत्वद्रवत्वस्नेहवेगाःकारणगुणपूर्वकाः ॥
The Apakaja color, Taste, Smell, Temperature, Dimension, Singleness, Single Separateness, Gravity, Fluidity, Viscosity and Force are preceded (or originated) by (like) qualities in the cause (of the thing to which they belong).
तात्पुरता रंग, चव, वास, तापमान, माप, एक असणे, एक असून स्वतंत्र असणे, गुरुत्व, प्रवाहीपणा, प्रवाहावरोध किंवा चिकटपणा आणि बळ यांची निर्मिती ते ज्या पदार्थापासून निर्माण होतात त्यांच्यावर अवलंबून असते.

७.०: ९८.२०-बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मभावनाशब्दाअकारणगुणपूर्वकाः ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Virtue, Vice and Sound are not preceded (or originated) by (like) qualities in the cause (of the thing to which they belong).
बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म आणि आवाज यांची निर्मिती ते ज्यांपासून किंवा ज्यांच्यामुळे निर्माण होतात त्यांच्या गुणांवर अवलंबून नसते.

बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मभावनाशब्दतूलपरिमाणोत्तरसम्योगनैमित्तिकद्रवत्वपरत्वापरत्वापाकजाःसम्योगजाः ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Virtue, Vice, Faculty, Sound, Aggregate Dimension, Secondary Conjunction, Caused Fluidity, Largeness, Smallness are not produced by cooking (chemical reaction); they are produced by conjunction.
बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, नियमितता, अनियमितता, भावना, शब्द, एकूण माप, नंतरची जुळणी, नैमित्तिक प्रवाहीपणा, मोठे असणे, लहान असणे ह्या गोष्टी पाकक्रीये (रासायनिक बदल) मुळे होत नाहीत, तर संयोगामुळे निर्माण होतात.

७.०: ९९.६सम्योगविभागवेगाःकर्मजाः ॥
Conjunction, Disjunction and Speed are produced by action/movements.
जुळणे, विभाग होणे, आणि वेग या गोष्टी हालचालींमुळे निर्माण होतात.

७.०: ९९.८शब्दोत्तरविभागौविभागजौ ॥
Sound and Secondary Conjunction are produced by Disjunction.
शब्द आणि नंतरचा विभाग या गोष्टी वियोगामुळे निर्माण होतात.

७.०: ९९.११परत्वापरत्वद्वित्वद्विपृथक्त्वादयोबुद्ध्यपेक्षाः ॥
Largeness, Smallness, duality, Dual Separateness etc. are dependent on Intellect.
लहान असणे, मोठे असणे, दोनरूपात असणे, दोन गोष्टी भिन्न असलेल्या जाणवणे या गोष्टी बुद्धीमुळेच जाणवतात.

७.०: ९९.१४-रूपरसगन्धानुष्णस्पर्शशब्दपरिमाणैकत्वैकपृथक्त्वस्नेहाःसमानजात्यारम्भकाः ॥
Color, Taste, Smell, non-hot touch, Sound,Dimension, Singleness, Single Separateness and Viciousness are produced by their likes.
रंग, चव, वास, उष्ण नसलेले तापमान, शब्द, माप, एकेरी अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व आणि चिकटपणा यातून त्याच म्हणजे रंग इत्यादि गुणच निर्माण होतात.

७.०: ९९.२२सुखदूह्खेच्छाद्वेषप्रयत्नाश्चासमानजात्यारम्भकाः ॥
Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort are produced by their unlikes.
सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न हे त्यांच्या सारख्यांनाच निर्माण करत नाहीत. उदा. सुखामुळे सुख निर्माण होत नाही इत्यादि.

सम्योगविभागसंख्यागुरुत्वद्रवत्वोष्णस्पर्शज्ञानधर्माधर्मसंस्काराःसमानासमानजात्यारम्भकाः ॥
Conjunction, Disjunction, Number, Gravity, Fluidity, Hot Touch, Knowledge, Virtue, Vice and Faculty are productive of their likes as well as unlikes.
संयोग, विभाग, संख्या, गुरुत्व, प्रवाहीपणा, उष्ण स्पर्श, ज्ञान, नियमितता, अनियमितता आणि  बलप्रयोग हे त्यांच्या सारखेच गुण निर्माण करतीलही किंवा करणारही नाहीत. उदा. संयोगामुळे संयोग निर्माण होइल किंवा वियोग-विभागही निर्माण होइल.

७.०: १००.११-बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषभावनाशब्दाःस्वाश्रयसमवेतारम्भकाः ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Feelings and Sound are produced of things where they originate.
बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, भावना, शब्द हे त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या मूर्त द्रव्यांमधून निर्माण होतात.

७.०: १००.१६रूपरसगन्धस्पर्शपरिमाणस्नेहप्रयत्नाःपरत्रारम्भकाः ॥
Color, Taste, Smell, Temperature, Dimension, Viscosity and Effort are productive (of qualities) in other things.
रंग, चव, वास, तापमान, माप, चिकटपणा आणि प्रयत्न हे संबंधित मूळ पदार्थापासून निर्माण होत नाहीत. ते वेगळ्याच द्रव्यांमुळे निर्माण होतात.

सम्योगविभागसंख्यैकपृथक्त्वगुरुत्वद्रवत्ववेगधर्माधर्मास्तूभयत्रारम्भकाः ॥
Conjuction, Disjunction, Number, Single Separateness, Gravity, Fluidity, Speed, Virtue and Vice are productive of qualities in both.
संयोग, विभाग, संख्या, स्वतंत्र एकेरी अस्तित्व, गुरुत्व, प्रवाहीपणा, वेग, नियमितता, अनियमितता हे त्या पदार्थांशी संबंधित असणाऱ्या मूळ पदार्थांपासून आणि इतर पदार्थांपासून निर्माण होतात.

७.०: १०१.३-गुरुत्वद्रवत्ववेगप्रयत्नधर्माधर्मसम्योगविशेषाःक्रियाहेतवः ॥
Gravity, Fluidity, Speed, Effort, Orderliness, Unordeliness and specific Conjunctions are the causes of actions.
गुरुत्व, प्रवाहीपणा, बळ, प्रयत्न, नियमितता आणि अनियमितता आणि विशिष्ट प्रकारचे संयोग यांमुळे हालचाली निर्माण होतात.

रूपरसगन्धानुष्णस्पर्शसंख्यापरिमाणैकपृथक्त्वसनेहशब्दानामसमवायिकारणत्वम् ॥
Color, Taste, Smell, non-hot touch, Number, Dimension, Single Separateness, Viscosity, and Sound have inseparable relationships with the causes producing them.
रंग, चव, वास, उष्ण नसलेले तापमान, संख्या, परिमाण, स्वतंत्र एकेरी अस्तित्व, चिकटपणा आणि शब्द यांचे त्यांच्याशी संबंधित कारणांशी अतूट नाते असते. (ते कारण नष्ट झाले की हे गुणही बदलतात.)

७.०: १०२.१-बुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मभावनानाम्निमित्तकारणत्वम् ॥
Intellect, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Order-lack of order, Feelings have temporary relationships with the causes producing them.
बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, नियमितता-अनियमितता, भावना यांचे त्यांच्याशी संबंधित कारणांशी नैमित्तिक नाते असते.

७.०: १०२.४-सम्योगविभागोष्णस्पर्शगुरुत्वद्रवत्ववेगानामुभयथाकारणत्वम् ॥
Conjunction, Separateness, Hot Touch, Gravity, Fluidity, Force are produced because of inseparable and temporary  relationships with the causes producing them.
संयोग, विभाग, गरम स्पर्श, गुरुत्व, प्रवाहीपणा, बळ हे त्यांच्याशी संबंधित कारणांशी अतूट आणि नैमित्तिक अशा दोन्ही कारणांनी जुळलेले असू शकतात.

७.०: १०२.१२परत्वापरत्वद्वित्वद्विपृथक्त्वादीनामकारणत्वम् ॥
Smallness, Largeness, Duality, Dual Separateness and the rest have no material and non-material causes producing them.
लहान, मोठा, दुहेरी अस्तित्व, दुहेरी वेगळेपणा आणि तिहेरीपणा इत्यादी त्यातील पुढील प्रकार यांचे त्यांच्याशी संबंधित कारणांशी नाते नसते.

७.०: १०२.१६-सम्योगविभागशब्दात्मविशेषगुणानाम्प्रदेशवृत्तित्वम् ॥
Conjunction, Disjunction, Sound and the specific qualities of the Self are limited to a specific area and not pervasive of the associated object.
जुळलेपणा, विभागलेपणा, शब्द आणि आत्म्याचे विशेष गुण यांचे संबंधित पदार्थाच्या विशिष्ट-मर्यादित भागापुरतेच अस्तित्व असते.

७.०: १०३.८शेषाणामाश्रयव्यापित्वम् ॥
Rest of the qualities extend over the whole of the associated object.
इतर गुण हे संबंधित पदार्थाला पूर्णपणे व्यापतात.

अपाकजरूपरसगन्धस्पर्शपरिमाणैकत्वैकपृथक्त्वसांसिद्धिकद्रवत्वगुरुत्वस्नेहानाम्यावद्द्रव्यभावित्वम् ॥
Color produced by baking, Taste, Smell, Touch, Dimension, Singleness, Single separateness, Natural Fluidity, Gravity and Viscosity exist as long as the associated object exists.
(भाजणे इत्यादि) रासायनिक क्रीयांमुळे निर्माण होणारा रंग, चव, वास, तापमान, एकेरीपणा, एकेरी स्वतंत्र अस्तित्व, नैसर्गिक प्रवाहीपणा, गुरुत्व आणि चिकटपणा हे संबंधित द्रव्ये अस्तित्वात असे पर्यंतच अस्तित्वात असतात.

७.०: १०३.१५शेषाणामयावद्द्रव्यभावित्वम्चेति ॥
The rest of the qualities are not dependent on the existence of the associated object.
बाकी गुण हे संबंधित द्रव्याच्या अस्तित्वाशी संबंधित नसतात.

>>मूळ पुस्तकाची अनुक्रमणिका ( Back to Table of Content): पदार्थधर्मसंग्रह : प्रशस्तपाद ऋषी
>> संबंधित गोष्ट: पिंडाचे गुणधर्म: सांगण्यासारखे आणि मोजण्यासारखे

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Mar 2019 - 2:07 pm | यशोधरा

वाचते आहे.