चालू घडामोडी - जानेवारी २०१९

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Jan 2019 - 8:18 pm
गाभा: 

सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका

“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.

पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”

मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?

संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?

नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Jan 2019 - 8:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुलाखत बघत आहोत. चांगली आहे. एकच खटकले- मुलाखतीत केंद्रिय मंत्री कुठेच दिसत नाहीत.(म्हणजे त्यांचा उल्लेख नाही) म्हणजे सर्जिकल हल्यावेळेस मनोहर परीकर, नोटाबंदीच्यावेळेस जेटले होते.

Blackcat's picture

2 Jan 2019 - 7:36 am | Blackcat (not verified)

भाजपात मोदी हा एकच चेहरा आहे , इतर वारस नाहीत , ह्यावर एक धागा आहे , विसरलीस ?

(संपादित)

https://www.bbc.com/marathi/india-46592150

गब्रिएल's picture

2 Jan 2019 - 1:21 pm | गब्रिएल

पैले तर काळी मांजर गल्ली चुकलिया. आनी त्येच्या येड्चाप धाग्यांना कोनीबी भीक घालत नाय ह्ये बगून चिडून स्वबावाला धरून एकदम खालच्या लेवलवर आली. उगी उगी ! =)) =)) =))

Blackcat's picture

1 Jan 2019 - 9:44 pm | Blackcat (not verified)

प्रकाश आंबेडकर बोलले होते की अध्यादेश कशासाठी काढता येतो , त्याची यादी आहे.

त्यात मंदिर नाही म्हणे

रमेश आठवले's picture

2 Jan 2019 - 7:18 am | रमेश आठवले

अलाहाबाद उच्च न्यायालयाने, २०१० साली, सध्या जेथे रामलाला ची मूर्ती स्थापित आहे ती जागा व त्या सभोवतीची जागा हिंदूंना दिली आहे. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय फिरवेल असे वाटत नाही. तेंव्हा श्रद्धा आणि सबुरी हा पर्याय चांगला वाटतो.

माणसाला माणुसकीची वागणूक द्यायची सोडून देव आणि चिलिम फुकणाऱ्या साधु संताच्या नादी लागणारी जमात सर्व धर्मात असते , ह्याच जमातीने राम मंदिर प्रश्न वाढविला आहे .

हिंदू धर्मियांची भावना , श्रद्धा असलेली रामजन्मभुमीची जागा मुस्लिमसमजाने कोर्ट कचेरी न करता उदारअंतकरणाने दिली असती तर पुढचे कित्तेक वर्ष दोन्ही समुदाय या देशात सुखाने नांदले असते . कोण कुठला बाबर ? त्याची मस्जिद जाणीवपूर्वक 1527 साली रामजन्म भूमिवर बांधून दोन्ही समाजात दूरी निर्माण करण्यासाठी पाचर ठोकण्या चे काम केले गेले , ती दूरी कमी करण्याची संधी आताच्या मुस्लिम समाजाने घालवली हे निश्चित . बाबरा च्या मस्जिद ऐवजी अल्ल्ला चा हजारो वर्षा पूर्वीचा दर्गा असता तर मुस्लिम समाजाने त्यासाठी हिंदू बरोबर वाद घालने योग्य होते पण बाबरा साठी चुकीचे आहे ,आणि ही बाब मुस्लिमसमाजाला माहित असूनही ते कर्मठ असल्या मुळे वाद घालत बसले आहेत .

Blackcat's picture

2 Jan 2019 - 12:46 pm | Blackcat (not verified)

स्तुपांची मंदिरे झाली , अशीही उदाहरणे आहेत म्हणे,
मग त्यांचे काय करायचे ?

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 1:07 pm | सुबोध खरे

म्हणे,
कोण म्हणतं?

आपले कवीराज केंद्रीय मंत्री !

आपले कवीराज केंद्रीय मंत्री !

त्यांच्या कडे काय लक्ष देताय?

ते चालले होते ट्रम्प साहेबाना भेटायला "री"पब्लिकन पार्टी निवडून आली अमेरिकेत म्हणून व्यक्तीश: अभिनंदन करायला.

Blackcat's picture

2 Jan 2019 - 1:42 pm | Blackcat (not verified)

समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jan 2019 - 2:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपण लगेच फुसकुली सोडून द्यायची की स्तुपांच्या खाली गुरुद्वारा होते.
आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे

समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ?

हाय काय अन नाय काय

पैजारबुवा,

नाखु's picture

2 Jan 2019 - 6:25 pm | नाखु

उत्खनन!!

स्तुपांच्या खाली गुरुद्वारा होते.
आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे

समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे

गुरुद्वारा खाली कबरी होत्या,आणि कबरींच्या खाली शिवलिंग,त्या शिवलिंगाच्या खाली पवित्र क्रॉस आणि क्रॉसचे खाली पवित्र केस,आणि केसांच्या डबीखाली त्रिशूळ (डमरू सहित) होते.
आणि जो पुरावे मागेल त्यालाच परत विचारायचे

समजा , तसे झाले सिद्ध , मग काय करायचे ?

पुराव्यानिशी साबित झालेल्या मिपाकर मांदियाळीतील वारकरी वाचकांची पत्रेवाला नाखु

तेजस आठवले's picture

2 Jan 2019 - 6:43 pm | तेजस आठवले

आणि ह्या सगळ्यांखाली एका हातात घड्याळासदृश वस्तू आणि दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात निळ्या रंगाचे काहीतरी आणि चौथा हात नुसताच पाची बोटे जोडलेला आणि पायाखाली वाघ अशी एक प्राचीन मूर्ती सापडल्यास काय?

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 7:09 pm | सुबोध खरे

समजा , तसे झाले सिद्ध ,

तुम्ही "सिद्ध "करून दाखवा बरं .

नुसत्या फुसकुल्या सोडताय.

थापा माराय्ला पुरावा लागत नाय आनी आक्कलबी =))

फूटाणे खायचे कमी करा राव !!!
अशा फेक प्रतिसादा मुळे तुमची गांभीर्यपूर्ण प्रतिमा खुजी होईल !!!

किमान एक तरी उदाहरण द्या हो फुटाणे मास्टर =)

डँबिस००७'s picture

2 Jan 2019 - 2:54 pm | डँबिस००७

ट्रम्प

मुस्लिमसमाजाला माहित असूनही ते कर्मठ असल्या मुळे वाद घालत बसले आहेत .

खरी परीस्थिती वेगळी आहे. कारण मु स्लिम समाजाला हे माहीती होत की ईथे राम मंदिर होत आणि ही जागा रामजन्म भुमीला द्यावी लागेल. १९७० च्या दरम्यान मुस्लिम वफ्त बोर्डाच्या मुख्य अधिकार्यांनी जवळ जवळ हे नक्की केल होत की ते भारत सरकारला आपली भुमिका सांगणार होते. त्यांच्या मते बाबरी मस्जिद ची जागा सरकार तर्फे राम मंदिराला देण्यात यावी.

पण त्याच वेळेला भारतातले एरवी निधर्मी असल्याचे ढोंग करणारे डावे विचारवंत ईरफान हबिब यांनी मुस्लिम वफ्त बोर्डाच्या मुख्य
अधिकार्यांचे कान भरले व सांगीतले की हिंदुना ही जमिन द्यायची काही ही गरज नाही. ही माहीती के के मोहम्म्द (आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ ईंडीया चे चीफ ) यांनी सांगीत ली. के के मोहम्म्द हे तेच ज्याम्नी बाबरी मस्जिदच्या खाली हिंदु मंदिर असल्याची माहीती सु कोर्टाला दिली होती. के के मोहम्म्द ह्यांच्या पुर्वी बीके लाल हे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ ईंडीया चे चीफ होते. त्यांनी सरकारच्या निर्देशावर बाबरी मस्जिदच्या खाली हिंदु मंदिर असल्या चा निर्वाळा दिलेला होता. पण ते हिंदु असल्याने डाव्यांना ते पचले नाही म्हणुन त्यांच्या नंतर के के मोहम्म्द यांना कामाला लावल.

हिंदु धर्माच ह्या डाव्यांनी ईतक नुकसान केल आहे ईतक ईतर कोणीही केलल नाही. पण त्याच बरोबर के के मोहम्म्द सारखे लोकही ह्या देशात आहेत. एक मुसल मान असुन सुद्धा ते ईतके अस्खलिखित संस्कृत श्लोक बोलतात की लोकांनी तोंडात बोटे घालावी.

https://www.youtube.com/watch?v=57wklQCTd-Q केके मोहम्मद यांची मुलाखत

https://www.youtube.com/watch?v=WzgR7yTQNzY राममंदिर केस वर खुप मेहनत करुन माहिती मिळवलेल्या श्रीमती जैन ह्यांची मुलाखत.

ट्रम्प's picture

2 Jan 2019 - 5:01 pm | ट्रम्प

बरोबर आहे .
हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झालेच पण मुस्लिमसमाजाची विश्वासहर्ता सुद्धा लयाला गेली . मुस्लिमसमाज वक्फ बोर्डा विरोधात जावून राम जन्मभूमि हिंदुना प्रेमाने देतील याची बिलकुल आशा नाही .

Blackcat's picture

2 Jan 2019 - 2:04 pm | Blackcat (not verified)

अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असं वातावरण आहे. इथं गंगा नदीपासून अवघ्या १०० मीटरवर पन्नास एकरांमध्ये १००० भव्य लक्झरी व्हिलाजही उभारण्यात येत असून त्यांच्या उभारणीसाठी बॉलीवूडमधले आर्ट डायरेक्ट ज्यांनी संजय लीला भन्साळीसाठी काम केलं आहे असे अनंत बाबुराव शिंदे काम करत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार तीन प्रकारचे लक्झरी व्हिला किंवा तंबू याठिकाणी असून सगळ्यात महागडा तंबू ३५,००० रुपये प्रति रात्र या दराचा आहे. तर डिलक्स व लक्झरी अशा उर्वरीत प्रकारांसाठी प्रति रात्र अनुक्रमे १३,००० रुपये व १८,००० रुपये आकारण्यात येत आहेत. या एकूण व्हिलांपैकी ८० टक्के तंबू आधीच बुक झाल्याचे हितकरी प्रॉडक्शनच्या सत्येंद्र कुमार यांनी सांगितलं. प्रत्येक व्हिला ९०० चौरस फुटांचा असून दोन बेडरूम्सनी सज्ज आहे. तसेच टिव्ही, सोफा आदी सुविधाही देण्यात येणार आहे. लक्झरी व्हिला बुक करणाऱ्यांमध्ये ३० टक्के अनिवासी भारतीय आहेत

गामा पैलवान's picture

2 Jan 2019 - 7:01 pm | गामा पैलवान

काळीमाऊ,

हे कुंभमेळ्याचं सरळसरळ व्यापारीकरण आहे. हजयात्रेचंही अगदी असंच व्यापारीकरण झालेलं आहे. मक्केत महमंद पैगम्बरांशी निगडीत प्राचीन वास्तू भुईसपाट केली गेली. तिथेही असेच वातानुकुलित तंबू लावले जातात.

जरा गुगालल्यावर दोन लेख सापडले :

https://www.independent.co.uk/news/world/middle-east/mecca-for-the-rich-...

https://www.independent.co.uk/voices/hajj-saudi-arabia-mecca-pilgrimage-...

अर्थ उघड आहे. दोन्हीही ठिकाणी व्यापारीकरण आणणारी शक्ती एकंच आहे. मक्केच्या अनुभवावरून आपण हिंदूंनी शहाणं व्हायला हवं. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 7:06 pm | सुबोध खरे

गामा साहेब

कुठे त्या मोगाच्या नादाला लागलाय?

नुसतं भंपक काड्या टाकणार ते.

अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असं वातावरण आहे>>>>>>
धन्यवाद बरं का.. अशी अनपेक्षित पणे स्तुती सुमने उदळल्याबद्दल

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jan 2019 - 6:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राफेल प्रकरणातील एक ऑडियो क्लिप काल काँग्रेसने मिडियाला ऐकवली.
https://www.youtube.com/watch?v=A73advKAjn8
मंत्री विश्वजीत राणे एका व्यक्तीला फोनवर सांगतात- "मनोहर परीकरांकडे राफेल प्रकरणाच्या सर्व फाईल्स आहेत असे स्वतः पर्रेकर म्हणाले आहेत"
पडलेले प्रश्न- ही ऑडियो क्लिप खरी की खोटी ? काँग्रेसने काही पत्ते आपल्या हातात ठेवले आहेत. म्हणजे दुसर्या व्यक्तीचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. दुसरे म्हणजे नुसत्या फाईल्स आहेत ह्यावरून काय सिद्ध होते?

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 7:05 pm | सुबोध खरे

एवढे मोठे दिग्गज वकील काँग्रेसकडे आहेत (कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, पी चिदंबरम, के टी तुलसी ) तर या सर्व "फडतूस फुसकुल्या" सर्वोच्च न्यायालयात का नेल्या नाहीत?

त्यांना माहिती आहे कि या फडतूस गोष्टी सत्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत.

इथे मिपावर लोक अशा भंपक गोष्टी वर काथ्याकूट करत आहेत.

नुसता भंपकपणा आणि हवेत वायबार काढणं.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Jan 2019 - 7:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोधा, अशा 'फडतुस फुसकुल्या' सगळेच पक्ष सोडतात. सहा महिन्यांपुर्वी भाजपाने मायवतींवद्दल अशीच कथित भ्रष्टाचाराची सी.डी. दाखवली होती-
https://www.indiatvnews.com/politics/national/bjp-releases-cd-on-alleged...

२००५ मधील संघाचे गुजरात्मधील नेते संजय जोशी ह्यांची 'सेक्स सी.डी.' कोणाच्या आदेशावरून बनवली गेली होती हे सर्वश्रुत आहे.
https://www.rediff.com/news/2005/dec/28bjpspec.htm
हल्लीच्या राजकारणात हे चालायचेच.

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 8:25 pm | सुबोध खरे

माई
या दोन्ही फालतू प्रकरणात मामला सर्वोच्च न्यायालयात गेलेला नव्हता आणि त्यातील सत्य असत्यतेचा देशाच्या संरक्षणाच्या गंभीर प्रश्नाशी कोणताही संबंध नव्हता.

आता हे रफालच्या भ्रष्टाचाराचे गुऱ्हाळ चालू ठेवण्यामुळे पुढच्या ९० किंवा ११८ किंवा १५३ ( १२६नंतर अधिक ६३ विमाने घेण्याचा पर्याय खुला होता) विमाने घेण्याच्या निर्णयावर थंड पाणी ओतले गेले आहे.

कोणताही बाबू किंवा राजकारणी आता निवडणूक होईस्तोवर याला हात घालणार नाही.

मुळात २००२ पासून वायुसेनेने मागणी केलेल्या लढाऊ विमानांची प्रक्रिया २००७ साली चालू झाली होती ती ७ वर्षात काँग्रेसला पूर्ण करता आली नव्हती.

मग आता नवीन सरकार ती पूर्ण करते आहे आणि त्याचा राजकीय फायदा मिळतो आहे हे पाहून हे सर्व काँग्रेसने रचलेले कुभांड आहे.

त्यात एकही गोष्ट त्यांना सिद्ध करता आली नाही.

पण या ३६ विमानांनंतरची मागणी पूर्ण होण्यासाठी अजून उशीर होतो आहे याचे त्यांना काहीही घेणे देणे नाही.

तेंव्हा त्या दोन फालतू गोष्टी आणि रफाल कंत्राट यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2019 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरसाहेब,

दगडफेक करून पळून जाणार्‍या आणि त्यामध्ये आपण किती चलाख आहोत असे समजून स्वतःवरच खूष होण्यार्‍या जमातीला अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. कारण, खोटे किंवा मुद्दाम विकृत केलेले सत्य बोलण्याचा धडा आता त्यांचे सर्वोच्च मालकच त्यांना देत आहेत. अश्यांना प्रतिसाद देणे म्हणजे उगाचच त्यांचे नसलेले महत्व वाढविण्यासारखे होते आहे.

सुज्ञ वाचक त्यांचे लेखन वाचून त्यांची (नसलेली) किंमत ओळखून आहेतच. (हल्ली सूज्ञ वाचक त्यांचे नाव पाहिल्यावर वाचण्याचा त्रासही घेत नसतील हीच जास्त शक्यता आहे.) :)

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 7:39 pm | सुबोध खरे

युवराज काल काय म्हणत होते
https://www.rediff.com/news/report/modi-changed-rafale-contract-while-pr...
"The defence minister was in Goa buying fish from a fish shop ... he did not even know that Modiji had changed the contract of the Rafale deal," Rahul alleged.
आणि आज काय म्हणताहेत

The Congress claimed that Manohar Parrikar had said at a meeting of the Goa cabinet that no one could remove him as "all the Rafale papers are in my flat, in my bedroom".

https://www.ndtv.com/india-news/manohar-parrikar-and-rafale-deal-congres...

कुठेतरी काही ताळमेळ हवा कि नाही?

सगळा सावळा गोंधळ.
पण मी जे "म्हणाले" तेच "खरं"
बाकी सर्व मूर्ख

बाप्पू's picture

2 Jan 2019 - 8:22 pm | बाप्पू

राम मंदिराबद्दल ची माझी भूमिका -

एखादी गोष्ट जी स्वतःची आहे ती भीक मागून घेण्याची वेळ भारतातील हिंदूंची यावी ही खूप मोठी शोकांतिका आहे. " स्वतः ची " हा शब्द मी एवढ्यासाठी वापरला कारण हिंदू तसेच इतर धर्मियांच्या धर्मस्थळांवर हल्ला करून ती जमीनदोस्त करून तिथे मस्जिद उभारण्याचे धर्मकार्य हे जवळपास प्रत्येक इस्लामी राजवटी मध्ये झाले आहे. त्यामुळे अयोध्या च नव्हे तर भारतातील शेकडो किंबहुना हजारो ठिकाणी अश्याच पद्धतीने नवीन संस्कृती जबरदस्तीने लादण्यात आली आहे. आता प्रत्येक मशिद पाडून खाली काय होते ते पाहत बसायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही पण सत्य मान्य करून बाबर ने आक्रमक आणि असहिष्णू पणे उभी केलेली इन मीन 400-500 वर्ष्यापुर्वीची मशिद आणि जागा भारतातील मुस्लिम लोकांनी सहिष्णू पणा दाखवून स्वतः हुन हिंदू मंदिरासाठी द्यायला हवी होती. इस्लाम जेव्हा अगदी पहिल्या टप्प्यात होता त्यावेळी केरळ मध्ये एका हिंदू
(कि बौद्ध? प्लीज करेक्ट मी इफ रॉंग ) राजा ने मशिदी साठी जमीन दिली होती. तीच भारतातील पहिली मस्जिद. अश्या प्रकारची सहिष्णू वृत्ती एकीकडे आणि या लोकांची अत्याचारी आणि जबरदस्ती ची अतेरिकी वृत्ती एकीकडे.

इतके सगळे खाच खळगे खाऊन सुद्धा हिंदू समाज अजून देखील बहुसंख्य आहे तरीही इतर धर्मीय (फक्त मुस्लिम नाही ) लोकांच्या भावना आणि त्यांच्या संस्कृती बद्दल खूप सहिष्णू आहे.

पण एक दिवस हिंदूंची ही अति -सहिष्णू वृत्ती त्यांचे स्वतःचे अस्तित्व संपवेल. ज्या प्रमाणे पर्शिया चा इराण झाला त्याच प्रमाणे या देशाचे च दुसऱ्या कशात तरी रूपांतर होईल. भारताचे शेजारी राष्ट्र मालदीव चा देखील इतिहास वाचू शकता.

स्लो पॉयझनिंग चा प्रकार चालू आहे. आणि त्याला सर्वाला तथाकथित फेक्युलर आणि डाव्या विचार सरणीतील लोकांचा खूप मोठा हातभार आहे. नाहीतर कोण्या सोम्या गोम्याने 15 मिनिटात 80% लोकांना संपवण्याची भाषा केली नसती.

माझा प्रतिसाद अगदी टोकाचा किंवा अतिरंजित वाटेल कदाचित पण ज्या पद्धतीने घडामोडी चालू आहेत त्यावरून आज तरी असेच वाटतेय..

उगा काहितरीच's picture

2 Jan 2019 - 8:42 pm | उगा काहितरीच

आपल्या प्रतिसादाला counter argument करणे अवघड आहे. इतिहास पहाता असं झालंय खरं हिंदूंचे नुकसान अहिंदू पेक्षा हिंदू लोकांनीच जास्त केले. धर्म (संस्कृती म्हणा हवेतर) जेव्हा जेव्हा लयाला जात आहे असे वाटते तेव्हा कुणी ना कुणी जन्म घेऊन हिंदू संस्कृतीचे रक्षण केले मग ते आद्य शंकराचार्य असो की शिवाजी महाराज , राणा प्रताप वगैरे असो. पण आता असं कुणी येऊन आपली सहिष्णु संस्कृती टिकवेल अशी भाबडी अपेक्षा न करणेच योग्य . रच्याकने एक प्रश्न पडतो की डावे विचारवंत हे बव्हंशी हिंदूद्वेष्टेच का बरं असतात ?

ट्रेड मार्क's picture

3 Jan 2019 - 9:26 am | ट्रेड मार्क

अगदी सत्य परिस्थिती बोललात. पण इथे कोणाला पडलीये. देश पूर्ण धर्मांतरित झाला तरी आपल्याला काय फरक पडणार आहे अश्या मनोवृत्तीची लोक बहुसंख्य आहेत. मला काय आत्ता फायदा हे महत्वाचं!

त्यातून शिक्षणाचे पण इस्लामीकरण झाल्याने नवीन पिढीला तर बाबर, अकबर, जहांगीर, औरंगझेब, तैमूर ईई यांच्याबद्दल भरपूर माहिती आहे पण ५ हिंदू राजांची नाव सांगा म्हणलं तर सांगता येणार नाहीत. नशिबाने शिवाजी महाराजांना अजून टाकाऊ ठरवलं नाहीये, नाहीतर संभाजी महाराज कवीच्या मागे लागलेले आणि बाजीराव स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध झालेलेच आहेत. अजून काही वर्षाने शिवाजी महाराज कपटी होते आणि त्यांनी बिचाऱ्या औरंगजेबाला उगाच सळो की पळो करून सोडलं होतं असं शाळेत शिकवलं जाईल. कालांतराने समस्त हिंदू राजे काफीर म्हणून निंदनीय आहेत असं शाळेतच शिकवलं जाईल.

सर्वच देशात काही प्रश्न न सोडवण्यात च जास्त फायदा राजकारणी लोकांचं असतो .
काश्मीर प्रश्न सुटणे हे दोन्ही देशातील राजकारणी लोकांच्या हिताचा नाही ह्याची त्यांना जाणीव आहे .
राम मंदिराचा प्रश्न न सुटणे हे देशातील दोन्ही धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांच्या हिताचं आहे प्रश्न जर सुटला तर बेकारी येईल .
गरीबी ,शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्व प्रश्न सोडवायचा कोणाचीच इच्या नसते

गब्रिएल's picture

2 Jan 2019 - 8:32 pm | गब्रिएल

तिकडं लोकसबेत युव्राज फुसकुल्या सोड्तात आनि तुमचा पुरावा ऑथेंटिकेट करा म्हनलं की पाय लाऊन पळत्यात.

मंग त्येंच्या बालपनापासून त्येंचे पाय धरून बस्लेले मोगाभायसारखे हुजरे त्येंच्यासार्केच फुसकुल्या सोडनार नाय बेचारे तर बाकी काय कर्नार म्हना? न्येता तसा च्येला.
=)) =)) =))

बाप्पू , अगदी मनातले बोललात !!
पण प्रोब्लेम असा आहे की राममंदिरा बद्दल जितक्या ज्वलंत भावना ब्राह्मण , क्षत्रिय आणि वैश्य च्या आहेत त्याच्या अगदी उलट दलितांच्या आहेत . दलित समाजातील नेते डाव्या विचारसरणी च्या लोकासारखे रामजन्म भुमीच्या ठिकाणी सुपर स्पेशल हॉस्पिटल , कॉलेज व्हावेसे वाटत . बर डावे आणि दलित नेते जन्माने हिंदुच असतात पण उच्च शिक्षणामुळे त्यांना रामजन्म भूमी च्या बाजूने बोलायला लाज वाटत असेल .

Blackcat's picture

2 Jan 2019 - 10:11 pm | Blackcat (not verified)

त्या काळात सर्वाना देवळात प्रवेश नव्हता , कदाचित म्हणूनच त्या काळात त्या वास्तू परकीयांनी सुलभतेने पाडल्या असणार , कारण समाजाचा तो भाग अलिप्त राहिला असेल.

डँबिस००७'s picture

2 Jan 2019 - 9:13 pm | डँबिस००७

Accidental Prime Minister च्या पाठोपाठ आता Tashkent Files नावाचा नविन सिनेमा येऊ घातलाय. लाल बहादुर शास्त्री यांच्या ताश्कंद मधल्या रहस्यमय मृत्युवर हा सिनेमा बेतलेला आहे. पल्लवी जोशी, नसरुद्दीन शहा, मिथुन चक्रवर्ती सारख्या कलाकारां बरोबर बनवलेल्या ह्या सिनेमा मुळे काँग्रेस च्या पाया खालची जमिन सरकल्या शिवाय रहाणार नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ह्या सिनेमा रिलिज होणार आहे.

Blackcat's picture

2 Jan 2019 - 10:08 pm | Blackcat (not verified)

नेताजींच्या फाईलबाबतही असेच बोलत होते , काय झाले ?

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 9:32 am | सुबोध खरे

कोण बोलत होते?

Blackcat's picture

23 Jan 2019 - 1:31 pm | Blackcat (not verified)

नेताजींवर गुमनामी म्हणून सिनेमा येतोय

बाप्पू's picture

3 Jan 2019 - 1:06 pm | बाप्पू

@ ट्रेड मार्क

तुमचा मुद्दा बरोबर आहे. सध्याच्या घडीला सर्वाना बाबर, हुमायू, औरंग झेब यांच्याबद्दल सर्व माहिती आहे पण कित्येक लोकांना शिवाजी महाराज कोण होते ते माहिती नाही. या निमित्ताने एक प्रसंग सांगतो. एकदा मी कॉम्पुटर च्या वॉलपेपर ला शिवाजी महाराजांचे वॉलपेपर लावले होते. माझ्या शेजारी एक उडिया (ओडिसा मधला )कलीग होता. त्याने विचारले शिवाजी महाराज कौन से भगवान के अवतार है???
च्या मायाला म्हणजे त्याला शिवाजी नावाचा कोणी राजा होता हेच माहिती नाही...

आता ही परिस्तिथी का आली? याचे कारण हिंदूंच्या अति सहिष्णू पणा मध्ये दडलेले आहे. कारण आपण जो इतिहास नावाचा विषय शिकतो त्यामध्ये आपली नेमकी आयडेंटिटी काय आहे किंवा आपण कोणत्या संस्कृती चे पाईक आहोत हे सांगितले जात नाही. समाजातील संभाव्य तेढ रोखण्यासाठी किंवा एखाद्या समाजाला खुश ठेवण्यासाठी इतिहासातील ठराविक गोष्ट उचलून तेच सर्व काही आहे असे भासवण्यात येते. त्यामुळेच बाबर औरंगझेब अशी कॅरॅक्टर एका हिरो प्रमाणे डोक्यात भरवण्यात आली पण पृथ्वीराज चौहान, शिवाजी, बाजीराव यांना सोयीस्कर रित्या दुर्लक्षित ठेवले किंवा त्याच्यावर वादविवाद वाढवले गेले. याला हिंदू लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण फक्त एक - नजीकच्या काळातील फायदा बघण्याची वृत्ती किंवा सर्व माहित असून फक्त सहिष्णू पणा दाखवण्यासाठी सोयीस्कर रित्या केलेले दुर्लक्ष.

@ट्रम्प
दलित सुशिक्षित लोकांचा प्रॉब्लेम हा आहे कि त्यांना हिंदू म्हणून जन्माला आल्याची लाज वाटते ( सरसकटीकरण करत नाहीये. पण ही टक्केवारी मोठी आहे. )
हिंदू धर्मातील काही चुकीच्या परंपरानां विरोध करता करता आपण संपूर्ण हिंदू धर्म आणि संस्कृती लाच कधीपासून विरोध करायला लागलो हे त्यांचे त्यांना समजेना. आणि हे करायला भाग पडणारे त्यांचे म्होरके आणि डाव्या विचारसारनी ची लोक आहेत. हे सर्व मते, पैसा, आणि राजकारण यासाठी होतेय पण याचे लॉन्ग टर्म इफेक्ट काय होतील याचा विचार आजघडीला कोणीच करत नाहीये. फक्त मतपेटीच्या राजकारणासाठी हे लोक आज अवेसी आणि इतर जहाल मुस्लिम संघटना यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. यामध्ये दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर जे कि बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज म्हणवतात ते सर्वात पुढे आहेत. कदाचित त्यांनी बाबासाहेंबाचे मुस्लिम धर्मा बद्दल चे विचार आणि लेखन आणि दलित- मुस्लिम संबंध यावरचं भाष्य कधीच समजून घेतले नाही. किंवा फक्त राजकारण करून आपले उपद्रव मूल्य वाढवण्याचा हेतू दिसतो.

@काळे मांजर

आपले म्हणणे म्हणजे काहींच्या काही तर्क आहे. एखाद्या धर्मस्थळावर हल्ला करून तोडफोड करून त्यावर मस्जिद उभी करणे ही मुस्लिम राजवटी मध्ये अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना ते धर्मकार्य आहे. आणि हे फक्त इतिहासातच झाले असे नाही. अगदी आजकाल सुद्धा या घटना होतात. जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे तर ही अगदी कॉमन गोष्ट आहे. पाकिस्तानातील किंवा बांग्लादेशातली दिवसागणिक कमी होणारी इतर धर्मियांची धर्मस्थळ संख्या काय सूचित करते? अगदी काही वर्षा पूर्वी झालेले बिहार बौद्ध स्थळी झालेले हल्ले किंवा अफगाणिस्तान मध्ये 2001 साली फोडण्यात आलेली जवळपास 1500 वर्ष्यापुर्वीची बौद्ध मूर्ती अशी हजारो उदाहरणं जगाच्या इतिहासात आहेत.

एखाद्या ठिकाणी मस्जिद उभारणे या गोष्टी ला विरोध नाहीये पण दुसऱ्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून जमीनदोस्त करणे व त्याठिकाणी मशिद उभी करणे या असुरी प्रवृत्ती ला माझा विरोध आहे.
परंतु इस्लाम मध्ये हेच कार्य पवित्र समजले जाते. बहुतांश भारतीय मुस्लिम देखील हेच पवित्र कार्य समजून असे करणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानतात म्हणून तर बाबर, औरंगझेब, तैमूर इ बाबत त्यांना आपुलकी वाटते. आणि नेमक्या अश्याच धर्मवेड्या समाजाची मते मिळवण्यासाठी डावे आणि तथाकथित सेकुलर लोक हे आपले राजकारण चालू ठेवतात. बराचसा हिंदू समाज देखील सहिष्णू पणा व सर्व धर्म समभाव अश्या गोंडस नावाखाली अश्या लोकांना सपोर्ट करतो. किंवा आपल्याला काय करायचेय म्हणून दुर्लक्ष करतो.
पण मी आधी म्हणल्याप्रमाणे हा स्लो पॉयझनिंग चा प्रकार आहे आणि या अतिसहिष्णू पणाचे दुष्परिणाम काही वर्षानंतर प्रकर्षाने जाणवतील आणि ते इर्रीवर्सिबल असतील.

हजारो शीख बांधवांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आणि दंगलीतील आरोपींना मुख्यमंत्रिपदाची बक्षिसी देणाऱ्यांपासून केवळ पंजाबच नाही तर संपूर्ण देशवासीयांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला.

------------

गुजरात दंगलीत ह्यांच्या भाजपाचे व सम्बमधीत संघटनांचे लोक होते ना ?

काँग्रेसपासून सावध रहा म्हणे,
कितीतरी काँग्रेसवाले भाजपात घेतले , भ्रष्टयाचाराचे आरोप केले , पण एकही आत गेला नाही,

मग का सावध रहायचे , हे म्हणतात म्हणून ?

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 8:52 pm | सुबोध खरे

सज्जन कुमार यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे.
गुजरात दंगलीत असे कोणत्या बड्या नेत्याचे झालेले नाही.
फरक समजून घ्या

Blackcat's picture

3 Jan 2019 - 9:27 pm | Blackcat (not verified)

पण मोदींचे काँग्रेसबद्दलचे मत फारच बदलले आहे,
हे महत्वाचे.

4 वर्षे बोलत होते - काँग्रेसमुक्त भारत,
आता चार महिने बोलतील - काँग्रेसपासून सावध रहा.

म्हणजे मोदिंच्या शापाने काँग्रेस मरत नाही, ह्याची मोदीना खात्री पटलेली आहे.

Blackcat's picture

4 Jan 2019 - 7:52 am | Blackcat (not verified)

फरक तुम्हीच समजून घ्या,

शीख दंगलीबद्दल शिक्षा झाली ,

गुजरात दंगलीत भाजपाच्या लोकांना कोर्टाने आधी शिक्षा दिली, नन्तर आता त्यांना सोडून दिले ,
मग गुजरात दंगल भुतांनी घडवली होती की काय ?

काँग्रेसच्याच काळात कसाब , अफझलला शिक्षा मिळाली,

भाजपाच्या सरकारात सलमान ,2 जी आणि आता तेलगीवाले उर्वरित लोक सुटले .

तेलगीचे बाइज्जत बरी सरटफिकेट कुरियरने स्वर्गास पाठवणार असतील.

गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस मधील ५९ लोकांनी आत्महत्या केली होती का?

तेलगीला AIDS सरकारने दिला का?

बनावट स्टॅम्प पेपर आपोआप प्रेसमधून बाहेर आले का?

काँग्रेने ६० वर्षे सत्ता उपभोगली त्यात कसाब आणि अफझलला शिक्षा झाली यात कोणते शौर्य?

काळविटाने आत्महत्या का केली?

सलमान ,2 जी आणि आता तेलगीवाले या केसची "काँग्रेसच्या काळातच" पोलीस/ सी बी आय तपासणी झाली. ती अशी ढिसाळ कशी झाली,

किती राजकारणी (शरद पवार पासून इतर सर्व) त्यातून कसे आणि का सुटले? त्यांची नार्को टेस्ट का घेतली गेली नाही?

उगाच काड्या टाकण्यापेक्षा याची उत्तरे द्या पाहू.

Blackcat's picture

3 Jan 2019 - 9:39 pm | Blackcat (not verified)

छान
K

डँबिस००७'s picture

3 Jan 2019 - 9:41 pm | डँबिस००७

काही लोक संध्याकाळ नंतर उडत असतात ! पण काळा बोका रात्रंदिवस हवेत असतो !! रा गा च्या अमृृृत तुल्यचा
परीणाम दिसतोय !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

SC asks Ahmed Patel to face trial on plea by rival BJP candidate over Rajya Sabha election

बापरे, आता सर्वोच्च न्यायालयाच्या सद्य मुख्य न्यायाधिशांविरुद्धही महाअभियोगाची तयारी होणार की काय ?! ;) :)

डँबिस००७'s picture

3 Jan 2019 - 11:14 pm | डँबिस००७

केरळ कम्युनिस्ट पार्टीने शेवटी अय्यप्पा स्वामी मंदिराची शेकडो वर्षाची परंपरा मोडलीच . बिंदु नावाच्या CPI Activist व दुसर्या एका महीले बरोबर मंदीर बंद असलेल्या रात्रीच्या वेळेत मागच्या बाजुने मंदीरात प्रवेश करवला . तिथल्या मंदिर प्रशासनाला ह्या महिला नसुन त्रितिय पंथिय आहेत अशी बतावणी केली . ह्या महीलांबरोबर आलेले पोलिस नसुन CPI चे गुंड असल्याच व्हिडीयो मध्ये समोर आलेल आहे ! हिंदु धर्मा विरुद्ध देशातले कम्युनिस्ट किती विष पेरत आहेत हे समोर येत आहे . येणार्या काळात केरळ मध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे , ह्याची सुरुवात एव्हाना झालेली आहे ! कोच्चीमध्ये एका अय्यप्पा भक्ताचा डोक्यात दगड घालुन CPI च्या गुंडांनी खुन केला व मुख्यमंत्री म्हणताहेत की तो र्‍हदय विकाराने मरण पावला ! पोस्ट मॉरटेम मध्ये मात्र मृृृृत्युच कारण डोक्याला दुखापत असच आलेल आहे !
कम्युनिस्ट चळवळी च्या शेवटाची सुरुवात सुरु झालेली आहे !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना आणि राजकारण्यांना अश्या बातम्यांसाठी वेळ नसतो. मात्र, लष्कराविरुद्ध सत्याची मोडतोड करणार्‍या बातम्यांसाठी आठवडा-दोन आठवडे ब्रेकिंग न्यू आणि चर्चेसाठी भरपूर तास खर्च केले जातात...

जैतापुरला जगातला सर्वात मोठा १० गिगॅ वॅट चा Nuclear Power Plant फ्रांसच्या Technical मदतीने उभारला जात आहे !

श्रीमती सुषमा स्वराज राज्यसभे ह्या प्रश्नावर उत्तर देत असताना !
https://youtu.be/6prIUrBCjDw

डँबिस००७'s picture

4 Jan 2019 - 3:51 pm | डँबिस००७

रफालवर उत्तर देताना निर्मला सितारामन यांनी कॉंग्रेस व राहुल गांधीची पुर्ण वाट लावली !!
timesofindia.indiatimes.com/india/live-updates-parliaments-winter-session/liveblog/67377981.cms#_ga=2.141512560.394405417.1545929209-2110506319.1494518410

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

PNB scam: ED attaches Thailand factory of Mehul Choksi's group company

भारतात गुन्हेगारी करून परदेशात पळून जाणार्‍या लोकांच्या परदेशातील संपत्तीवर टाच आणण्याची सुरुवात झाल्याने, आता ती मंदळी केवळ कोर्टात केसचे घोडे नाचवत वेळकाढूपणा करू शकत नाही. ही कृती पळून गेलेल्यांना वठणीवर आणायला मदत तर करेलच, पण भविष्यात पळून जाण्याचा विचार करणार्‍यांनाही पायबंद लावायला मदत करेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jan 2019 - 7:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मल्ल्या/मेहूल्/नीरव ह्यांना भारतात परत आणण्यात सरकारला यश मिळाले तर २०१९ च्या निवडणूका जवळपास भाजपाने जिंकल्याच समजा... असे ह्यांचे मत.

Blackcat's picture

4 Jan 2019 - 7:58 pm | Blackcat (not verified)

त्यांनी तर तिथे गुंतवणूक केली आहे ना ?

कुठला देश स्वतःचे नुकसान सोसून दुसर्याचे भले करेल ?

Blackcat's picture

4 Jan 2019 - 8:00 pm | Blackcat (not verified)

इंग्लडची राणी तर खदाखदा हसत असेल.

पूर्वी नावे जहाजात बसून भारतात जायचे , राजकारण लढाया करुन मग मिळेल ते घेऊन यायचे,

त्यापेक्षा हे बरे आहे , फ्रॉड करून आमच्या देशात या , गुंतवणूक करा व नागरिकत्व घ्या .

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

डोळे उघडा, मायकेल ख्रिस्तियन, मल्ल्या, निरव, मेहुल चोकसी, यांच्याबद्दलच्या रोज येणार्‍या नवनवीन बातम्या वाचा (एक तर इथेच वर आहे), जगाला सत्य समजू लागले आहे. मिपाभाषेत, अभ्यास वाढवा ! =))

सतत खोटे बोलल्यामुळे रागांचे, लोकसभेत धिंडवडे उडत आहेत, लोकांतही नाचक्की होत आहे. पण त्यांचे पाठिराखे डोळे गच्च मिटून आहेत... नाईलाज असावा, बहुदा वरून डोळे उघडण्याचा आदेश आलेला दिसत नाही. ;) :)

सुबोध खरे's picture

4 Jan 2019 - 9:29 pm | सुबोध खरे

नागरिकत्व घ्या .

कुणाला मिळालं?

उगाच फुसकुली?

Blackcat's picture

4 Jan 2019 - 9:11 pm | Blackcat (not verified)

काँग्रेसला कमिशन न मिळाल्याने त्यांनी राफेल डील केले नाही - सीतारामन

------

मग ह्यांनी डील का केले ?
ते ह्यांना मिळाले म्हणून ?

सुबोध खरे's picture

4 Jan 2019 - 9:28 pm | सुबोध खरे

कशावरून?

पुड्या सोडण्याची वृत्ती जात नाही.

भाबडा प्रश्न !

लोळ

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरून डोळे उघडण्याचे आदेश आल्याशिवाय, त्यांना डोळे गच्च मिटून असे काहीबाही बरळणे (पक्षी : तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसणे) भाग आहे. =))

Blackcat's picture

4 Jan 2019 - 9:35 pm | Blackcat (not verified)

मग त्या सीतारमनना स्वप्नात दृष्टांत झाला का ?

दादा कोंडके's picture

4 Jan 2019 - 9:35 pm | दादा कोंडके

रागाला कुठपर्यंत ताणायचं हे कळत नाही. (बाकी काय कळतं हा प्रश्नच आहे.*). जर २०१९ मध्ये काँग्रेस जिकलच तर मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेउन एकही काम होउच देणार नाही. काँग्रेसचा सगळा वेळ आणि श्रम उत्तरं देण्यात जाईल.

*रागाला शिव्या देतोय म्हणून माझा काँग्रेसवर राग नाही. आय हेट रागा अँड मोदी इक्वली. :)

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे - If you cant convince them, confuse them.
राहुल नेमके हेच करत आहे. राफेल कराराबद्दल काहीबाहि बरळून सातत्याने हा विषय मीडिया मध्ये जाणीवपूर्वक पेटता ठेवला जातोय. ज्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार होऊन कमी अभ्यासू किंवा उतावळे लोक लगेच रागा च्या पोपटपंची वर विश्वास ठेवतात.

4 राज्यामध्ये काँग्रेस च्या मतात झालेल्या वाढीमागे हे एक महत्वाचे कारण आहे.

अभ्या..'s picture

4 Jan 2019 - 10:58 pm | अभ्या..

3 महिन्यात सर्वानाच सखोल अभ्यासू आणि सहनशील बनवायचे मोठेच आव्हान मोदीकाकांसमोर आहे म्हणाना.
करतील म्हणा ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

टीप्पणीची गरज नाही...

सुबोध खरे's picture

4 Jan 2019 - 11:16 pm | सुबोध खरे

कर्नाटकात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या.
हे म्हणजे आपण शेण खायचं
आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं.

Blackcat's picture

4 Jan 2019 - 11:20 pm | Blackcat (not verified)

राफेल करार आणि मा. निर्मलाजींची मानसिक मलिनता!

युपीए काळात कॉग्रेसला 'कमिशन' मिऴत नसल्यामुळेच त्यांनी राफेल डील पुर्ण केले नाही असा मलीन आरोप आज संसदेत सरंक्षण मंत्री मा.निर्मलाजी सितारामन यांनी केला. अर्थात हा आरोप करताना त्या एकदम झांसीच्या रानीच्या अविर्भावात होत्या. परंतु त्यांच्या पाठी कोणतेही बाळ नव्हते. मा.मोदीजी कुठेतरी प्रचार सभेत होते.

युपीए काळात करार पुर्ण का झाला नाही हे पाहताना, मुळात लढावू विमान खरेदी किंवा कोणत्याही शस्त्रास्त्राची खरेदी ही एका दिवसांत पुर्ण होणारी प्रक्रिया नसते. 'तापवलं तेल आणि तळले पकोडे' किंवा 'उकळले पाणी आणि बनवला चहा' एवढा सोपा हा प्रकार नव्हे! हे संरक्षण मंत्री पदावर असणा-या मा. निर्मालाजींना माहीत असणार परंतु ईतर कोणत्याच मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ ठरल्यामुळे आणि मा. चौकीदाराची चोरी झाकण्याच्या नादात मा.निर्मलाजींनी उथळ आरोप करायला सुरूवात केली आहे.

राफेल विमानाच्या गुणवत्तेबद्दल अथवा आपला देश संरक्षकदृष्ट्या प्रबळ असावा व आपली वायुसेना आधुनिक शस्त्र व अस्त्र विमाने आणि इतर उपकरणांनी सुसज्ज असावी, अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. सरकारची चोरी उघडी केली म्हणून, प्रश्न विचारणा-या देशनिष्ठेवर शंका घेण्याची जी परंपरा सन्मान्य मोदीभक्तांनी सुरू केली त्याचीच री ओढताना आज मा. निर्मलाजी दिसून आल्या!

कॉग्रेसला कमिशन मिळाले नाही म्हणून युपीए काळात दहा वर्ष राफेल विमानांची खरेदी झाली असा आरोप करताना मा. निर्मलाजींनी अनाहुतपणे हे कबुल केले की, वंदनिय चौकीदाराला कमीशन मिळाले म्हणून आम्ही ही खरेदी प्रक्रिया पुर्ण केली! मा. निर्मलाजींच्या मुखातून अचानकपणे आलेले सत्य हे असत्याची पाठराखण करता करता निर्नाण झालेल्या त्रागातून बाहेर पडले आहे.

भारतीय वायुसेनेस लढावू विमानांची आवश्यकता असल्या बाबतचा प्रस्ताव कारगील युद्धानंतर दिला गेला होता व हा प्रस्ताव मंजूर करून श्री. वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात लढावू विमानाच्या खरेदीची प्रक्रिया सन 1998 पासून सुरू झाली आणि जुन 2001 मधे मा. जॉर्ज फर्नांडीस यांनी त्यास मंजूरी दिली. आज संसदेत पंतप्रधान मोदीजींच्या रक्षणमंत्री होऊन लढणा-या निर्मलाजींनी केलेल्या आरोपाचा असाही अर्थ निघतो की सन 2001 ते 2004 या तीन वर्षाच्या काळात मा. वाजपेयीजींना कमिशन मिळाले नसल्यामुळेच त्यांनीही हा करार पुर्ण केला नाही.

भाजपाच्या 'अमितशहावमोदी' प्रणित नवआवृत्तीत मांडीवर घेऊन साखर तोंडात घातलेल्या नवनेत्यांना मा. वाजपेयींबद्दल तसा आदर कधीही नव्हताच पण तो पुन्हा अधोरेखीत झाला.अर्थात हा मा. वाजपेयींबद्दल आदर हा त्यांच्या घरातील मामला आहे, पण जीथे जनतेच्या पैशाचा विषय आहे, त्याचे उत्तर सरकारला द्यावेच लागणार!

डॉ. मनमोहन सिंग यांचे युपीए सरकार 26 मे 2004 ला स्थापन झाले. एकूण 7 स्वाड्रन म्हणजे 126 विमानांची खरेदी हा आजपर्यंत जगातील एखाद्या देशाने लढावू विमानांचा खरेदीचा सर्वात मोठा व महागडा प्रस्ताव होता. देशाच्या संरक्षण सिद्धतेला महत्व देऊन हा प्रस्ताव संपुर्ण तपासाअंती व अभ्यासाअंती पुर्ण करण्याचा मनोदय युपीए सरकारने केला व त्या दिशेने पाऊले उचलली. ही प्रक्रिया पुर्ण करण्यात वर्षभराचा कालावधी गेल्यानंतर प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया 2006 ला सुरू साली. त्यानंतर 29 जूून 2007 ला DAC म्हणजे Defence Aquisition Counil ने विमानांची गरज असल्याचा निर्वाळा देणारा अहवाल दाखल केला. त्यानंतर 28 ऑगस्ट 2007 रोजी request for proposal तयार होऊन 28 एप्रिल 2008 रोजी, सहा विक्रेत्याचीं नावे अंतिम झाली. त्यानंतर जून 2009 मधे technical evaluation report आणि जुलै 2009 ते मे 2010 या कालावधीत field evaluation report सादर झाला.

हा खूप महत्वाचा भाग असतो कारण लढावू विमानांची खरेदी करण्यापुर्वी ती विमाने प्रत्यक्ष चालवून पहावी लागतात आणि त्यासाठी ती विमाने चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. शिवाय विमानांचे प्रशिक्षण व त्यांची चाचणी, निव्वळ वैमाणिकांसारखा गणवेश घातला तरी सरंक्षणमंत्री करू शकत नाहीत तर ती चाचणी वैमाणिकच घेत असतात. शिवाय ही विमाने भारतीय हवामानात कशी उड्डाण करतात, चावताना काय अडचणी येतात. भारतीय वातावरणातील थंड प्रदेशात, वाळवंटी प्रदेशात अथवा जास्त पावसाळी प्रदेशात कशी चालतात हे ही पहावे लागते. म्हणून त्यांची देशाच्या विविध भागात चाचणी घ्यावी लागते. ही अतिशय वेळखाऊ व किचकट प्रक्रिया असते. अशा चाचण्या देशात लेह, लडाख, बेंगलोर, जैसलमेर आदी ठिकाणी घेण्यात आल्या. या सर्व बाबी या field evaluation report मधे सादर केल्या गेल्या. मंदीरात फोडायला नारळ खरेदी करताना चारवेळा कानापाशी हलवून घेतला जातो मग देशाच्या सरंक्षण सिद्धतेच्या महत्वपुर्ण खरेदीबाबत तर विचार करताना वेळ हा लागणारच, एवढी साधी बाब निर्मलाजींना माहित नसेल असे नव्हे!

वायुसेनेतील निष्णात वैमाणिकांकडून सर्वच विमानांचा field evaluation report आल्यानंतर Staff evaluatiin Report
एप्रिल 2011 मधे मागविण्यात आला आणि त्यानंतर technical
Oversight commitee report दाखल होऊन त्यास मंजुरी दिली. त्यानंतर नोव्हेंबर 2011 मधे प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू झाली आणि या लिलावाची प्रक्रिया पुर्ण होऊन सर्वात कमी किंमतीत आपल्याला हवे तसे विमान देणारा विक्रेता म्हणून दसाल्टचे नाव अंतिम होऊन यास आतापर्यंत लढावू विमान खरेदी असे नांव असणा-या व्यवहारास राफेल विमान खरेदी व्यवहार असे नांव प्राप्त झाले.

दसाल्टच्या राफेल या लढाऊ विमानाचे नाव अंतिम झाल्यावर फेब्रवारी 2012 मधे Contract Negotition Commitee गठीत होऊन तीने काम सुरू केले. त्यामंतर कांही कालावधी नंतर Hindustan Aeronotics Ltd या भारत सरकारच्या कंपमीस ऑफसेट पार्टनर म्हणून मंजूरी देऊन 13 मार्च 2014 रोजी HAL आणि दसाल्ट यांच्यात Work Share agreement झाले आणि कांही दिवसांतच मा. मोदीजींचे अच्छे दिन अवतिर्ण झाले. अच्छे दिनातल्या 56 इंची सरकारच्या Contract Negotition Commitee ने सुमारे 74 बैठका घेऊन राफेल कराराला अंतिम रूप देऊन AA ला 30 हजार करोडचा घास भरवला तोही जनतेच्या पैशातून!

झांशाीच्या राणी प्रमाणे मा. निर्मलाजी आज लढल्या पण आई होऊन हा घास त्या बाळाला भरवताना, 'एक पोळी करपली, दुुधासंगे वरपली! दुध लागले कडू, बाळाला आले रडू' अशी अवस्था झाल्यामुळे सतत रडक्या बाळाची बाजू मांडण्यासाठी त्या प्रयत्नरत असतात याचे करावे तेवढे कौतुक कमीच!

© राज कुलकर्णी.

सुबोध खरे's picture

4 Jan 2019 - 11:27 pm | सुबोध खरे

वाटलंच
ही अक्कल दुसऱ्याची आहे. पण तो बेअक्कल आहे हेही समजू नये?
ढकलतांना त्यात सत्य किती तेवढं तरी तपासायला हवं होतं.
पण तुमच्या कडून अजून काय अपेक्षा करणार?
एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून पहा. त्यात सर्व डिटेलवार दिलंय. मग हे असं कुठल्यातरी भंपक माणसाचं ढकल पत्र पाठववसं वाटणार नाही

टीपीके's picture

5 Jan 2019 - 11:06 am | टीपीके

अजून कळत नाही की हा AAला 30000 कोटी हा आकडा आला कुठुन. आत्तापर्यत जे वाचण्यात आले आहे त्यानुसार सुमारे ७५ते १०० कंपन्या ऑफसेट पार्टनर्स आहेत त्यात AA मधे पुढील ३ ते ५ वर्षात जास्तीत जास्त ८५0 कोटिंची गुंतवणूक अपेक्षीत आहे. या सगळ्यामुळे रागा खोटे बोलतात असेच वाटते.

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2019 - 7:39 am | ट्रेड मार्क

हे राज कुलकर्णी फारसा अभ्यास करत नाहीत असं दिसतंय. HAL आणि दासूमध्ये राफेलसाठी कधीच करार झालेला नव्हता. उगाच काहीतरी तारखा टाकल्या आणि थोडेफार jargons वापरले म्हणजे अभ्यासपूर्ण प्रतिसाद नसतो.

एक प्रश्न कोणीच विचारत नाहीये. जर देशाला लढाऊ विमानांची एवढी गरज होती आणि हिंदुस्थान एरॉनॉटिक्स सुखोई तसेच इतर लढाऊ विमाने तयार करत होती तर मग हिंदुस्थान एरॉनॉटिक्सला निदान २-४ स्कॉड्रन सुखोई तयार करायचे काम काँग्रेसने का दिले नाही? १९९८ च्या आधी आणि २००४ नंतर काँग्रेसकडे भरपूर वेळ होता. आता हिंदुस्थान एरॉनॉटिक्सची एवढी चिंता वाटतीये मग तेव्हाच पुढच्या १०-१५ वर्षांची सोय करून ठेवली असती तर?

एवढे महिने आरडाओरडा करून नंतर रागावर संसदेमध्ये माझ्याकडे पुरावे नाहीत पण मला मोदींनी घोटाळा केला असं वाटतंय असे म्हणण्याची वेळ आली यातच शहाण्याने कोण किती पाण्यात आहे हे समजायला पाहिजे.

SHASHANKPARAB's picture

9 Jan 2019 - 11:35 pm | SHASHANKPARAB

एक महत्वाची माहिती तुम्ही लिहायच विसरुन गेलात. एप्रिल 2015 पर्यंत डाससू आनी हाल मधिल वाटाघाटी सुरुच होत्या. करार जर यूपीए च्या काळात झाला असेल, तर तो या वाटाघाटीन्शिवाय झाला की काय?

Blackcat's picture

4 Jan 2019 - 11:47 pm | Blackcat (not verified)

नागपूर | मराठी माणसाला अटकेपार झेंडा लावण्याची परंपरा आहे, त्यामुळं देशाच्या पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस बसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.

मराठी माणूस ज्या शहरात जातो, तिथे आपली छाप उमटवतो, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांची मुलाखत आशुतोष शेवाळकर आणि रामदास फुटाणे यांनी घेतली.

मराठी ही जगातील एक प्राचीन भाषा असून ज्ञान आणि अमृताचा ठेवा मराठीनं जगाला दिलां, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते.

https://www.thodkyaat.com/man-from-maharashtra-will-pm-of-india-says-by-...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्यमंत्री असे म्हणाले...
More than one Maharashtrians would become PM by 2050 (२०५० पर्यंत एकापेक्षा जास्त मराठी व्यक्ती पंतप्रधान होतील): CM Devendra Fadnavis
तुमच्या दुव्याच्या लेखकाचे, 'इंग्लिश' आणि/किंवा 'पत्रकारितेशी निष्ठा' फारच कच्ची आहे.

उगाच टुक्कात स्त्रोतातून, शब्द फिरवणार्‍या, बातम्या उचलल्या की, असे तोंडावर पडायला होते. =)) =)) =))

हा "गडकरी/फडणवीस पंतप्रधान होऊ इच्छितात" या फुस्कुलीचा दुसरा फुसका बार आहे. ते समजण्याची बुद्धी बहुसंख्यांकडे आहे, काहींकडे नाही, इतकेच ! =))

अवांतर : दुवा (लिंक) दिली म्हणजे तो सबळ पुरावा होत नाही, त्या पुराव्यात दम असायला हवा.

Blackcat's picture

5 Jan 2019 - 4:51 pm | Blackcat (not verified)

२०५० म्हणजे लवकरच ना ?

मला तरी सावरकरांची आठवण झाली , 50 वर्षे तुमचे शासन तरी टिकेल का म्हटलेले ना ?

म्हणून मला 2050 अन 'लवकरच' ह्यात फार फरक करायची गरज वाटली नाही . विश्वास महत्वाचा!

असो , तुमच्या विचार स्वातंत्र्याबद्दल आदर आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 5:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुद्दा बदलून (पक्षी: गोलपोस्ट बदलून) पळून जायचा अयशस्वी प्रयत्न... नेहमीसारखाच !

मुद्दा असा होता की, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे विकृत करणारा दुवा देऊन कळत-नकळत (बहुदा कळतच) कॉन्प्सिरसी थियरीचे गुर्‍हाळ मांडणार्‍यांच्या कळपात सामील झालात आणि तोंडावर आपटलात (तेही नेहमीप्रमाणेच). =)) =)) =))

सुधारणेची शक्यता दिसत नसल्याने, वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ;) :)

रागा नी लोकसभेत कबुल केले की आता त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. पण खात्री आहे की मोदींनी गडबड केली आहे.

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 10:52 am | प्रसाद_१९८२

राहुल गांधी हा एक बेअक्कल व डोक्यावर पडलेला, बिनडोक मनुष्य आहे.
--
अनिल अंबानींच्या कंपनीला जे काम दिले ते काम 'हल' कडे का दिले नाही.
--
संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत दिलेल्या त्यांच्या दिड तासाच्या भाषणात राफेलचे काम एचएएल कडे का दिले नाही व सध्या एचएएलक्डे किती काम आहे ह्याची व्यवस्थित माहिती दिली. तरीही संरक्षणमंत्र्यांचे भाषण संपल्यावर ह्या बिनडोक राहुल गांधीने पुन्हा तोच प्रश्न पुन्हा त्यांना विचारला कि अनिल अंबानींच्या कंपनीला जे काम दिले ते काम हल कडे का दिले नाही.
--

लोकसभेतील कामकाजाचे कित्तेक महत्वाचे तास त्या करंटया रागा मुळे वाया गेलेत , त्याची लाज / जाणीव काँग्रेस ला आणि त्या रागा ला ( मूर्ख , दुबळ्या , बेअक्कल , मतिमंद , ) नाही .

Blackcat's picture

5 Jan 2019 - 12:00 am | Blackcat (not verified)

http://www.jantakareporter.com/india/huge-relief-to-rahul-gandhi-sonia-g...

The Congress on Friday said that the clarification by the CBDT had exonerated Young Indian in the National Herald case from any tax liability. Speaking to reporters in Delhi, Congress Rajya Sabha MPs, Vivek Tankha and Ahmed Patel, said that the the clarification issued by the Income Tax department on 31 December 2018 had vindicated the Congress party’s stand.

Tankha said, “We welcome the latest circular of the Central Board of Direct Taxes, Department of Revenue, Ministry of Finance Government of India, Circular No. 10 of 2018, dated 31st December 2018… This vindicates our position that there never was an issue about issuance of such shares as a taxable event as it was being projected by way of harassment. We thank the CBDT for this clarification.”

Terming it a ‘big development,’ Tankha said that the clarification by the CBDT showed that the Congress Party and its leaders had no intention to indulge in tax evasion.

The CBDT in its circular (see below) clarified that the provisions of Section 56(2)(vii)(a) of the Income Tax Act, 1961 was not applicable in cases of receipt of shares by a specified company as a result of fresh issuance of shares by the said company.

सुबोध खरे's picture

5 Jan 2019 - 9:48 am | सुबोध खरे

छान. सुंदर. नाचा आता !

तुम्हाला त्यातलं काय कळलं?

केवळ एका कलमात सूट दिली आहे.

नाचून झालं असेल तर नीट समजून घ्या.

आणि मागे पार्श्वभाग उघडा पडतो आहे त्याची काळजी घ्या

म्हणून तर तुमच्या सिग्नेचरमध्ये pectinate line चे चित्र ठेवता ना ?

सुबोध खरे's picture

5 Jan 2019 - 10:18 am | सुबोध खरे

तुम्हाला त्यात काय कळलं ते सांगा अगोदर.
मग बाकीचं पाहू.

सुबोध खरे's picture

5 Jan 2019 - 7:27 pm | सुबोध खरे

pectinate line

हि लाईन बाहेरून दिसत नाही तर गुदद्वाराच्या आतल्या भागात असते.

एवढे मूलभूत शरीररचनाशास्त्र तुम्हाला येत नाही तर उगाच इंग्रजी शब्द वापरण्याचा हव्यास कशाला?

आणि कमरेच्या खाली जायची गरज का वाटते?

इतकी जळजळ बरी नव्हे.

आनंदाने उड्या मारण्याच्या नादात तोंडावर आपटले.
https://www.pgurus.com/a-covert-operation-in-cbdt-to-save-sonia-and-rahu...

आता कमरेच सोडुन नाचाल ईतका आनंद होईल तुम्हला

i-t-dept-slaps-rs-100-crore-tax-notice-on-rahul-sonia-over-ajl-income

Read more at:
https://m.timesofindia.com/india/i-t-dept-slaps-rs-100-crore-tax-notice-...

ट्रेड मार्क's picture

9 Jan 2019 - 6:45 am | ट्रेड मार्क

सुडाचं राजकारण खेळतात म्हणून आरडाओरडा होईलच.

असं कसं राजमाता आणि राजपुत्राला फाईन करू शकतात? देश ही तर त्यांचीच जहागिरी आहे.

Blackcat's picture

9 Jan 2019 - 12:27 pm | Blackcat (not verified)

काहीतरी निर्णय होईलच ,कर भरावा किंवा न भरावा याबाबत,

पण आमचे उमेदवार भरपूर टेक्स भरतात की ,

तुमचे झोला उठाकेवाले किती टेक्स भरतात ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

ही तुमची राजमाता, युवराज आणि त्यांचा सेवक चिद्दूने अर्थमंत्रालयातील जुन्या ओळखीचे भ्रष्ट बाबू पकडून मारलेली कोलांटी उडी फसली आहे आणि ते सगळे (आणि तुमच्यासारखे भांगडा करणारेही) तोंडावर पडले आहेत. खालचा दुवा आणि प्रतिसाद वाचा...

१. दुवा :
https://www.pgurus.com/a-covert-operation-in-cbdt-to-save-sonia-and-rahu...

२. प्रतिसाद :
https://www.misalpav.com/comment/1020467#comment-1020467

Blackcat's picture

5 Jan 2019 - 2:03 pm | Blackcat (not verified)

नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्र तसेच, राजकीय वर्तुळात 'भूकंप' घडवणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. 'मी चुकीचं काहीच केलं नाही, त्यामुळे मी भारतात परतणार नाही,' असं मोदीनं म्हटलं आहे.

Blackcat's picture

5 Jan 2019 - 2:38 pm | Blackcat (not verified)

लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी हे मित्रपक्ष एकत्र लढणार असून जागावाटप चर्चेत आतापर्यंत ४० जागांबाबत एकमत झाले आहे. असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे त्यावरही लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी म्हटलंय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Jan 2019 - 3:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"सरकारने अनिल अंबानीच्या रिलायन्सला ३०००० कोटी दिले" असे राहुल म्हणतो. अनिल अंबानीच्या कोणत्य बँकेच्या खात्यात टाकले? अरोपात बिलकुल तथ्य नाही असे आमचे मत. एकतर सरकार(कोणत्याही पक्षाचे असो) उद्योगपतींना/व्यापार्याना असे पैसे कधीच देत नाही. उलट उद्योगपती/व्यापारी खरे तर सरकारला पैसे देत असतात. लाच्/किकबॅक वगैरे कुठलेतरी कंत्राट हवे असेल तर. "अंबानीने सरकारला कंत्राट मिळवण्यासाठी पैसे दिले" असा आरोप असता तर एकवेळ त्यात अर्थ होता.

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 4:07 pm | प्रसाद_१९८२
दादा कोंडके's picture

5 Jan 2019 - 10:47 pm | दादा कोंडके

मला व्यक्तीशः रागाच्या शील रक्षक शरीर रक्षकांचं भयंकर कौतुक वाटतं. मला वाटतं यांना इंग्लीश आणि हिंदी भाषा कळत नसणार.

त्यास्नी विंग्लिशहिन्दीबिंदी भाषा आनी इतर कायबी कळन्याची आडर नाय. डोस्कं (आसलंच तर) वापरनंबी लईच मोठ्ठा गुन्ना असतोय बगा सायेब. =)) =)) =))

रागाला जे कायबाय लिहून दिलेलं असतं ते त्यो बेचारा ब्वोलतो (त्येचात्बी घोळ करून जन्तेचं मणोरंजण कर्तो त्ये येगळं). मग रागाच्या 'शलील लक्षकांनी' आपल्या माल्कापेक्षा जादा ग्य्रेट आसल्याचं दावलं तर त्येंची वाट नाय लागनार का? रागाच्ये ईनोद आणि त्येच्यावरून भाडेकरू लेखकांनी लिहिलेले कायबाय, डोळे आणि कान बंद करून तश्शेच्या तश्श्ये रिपीट करायची आडर हाये 'शलील लक्षकांन्ना' (या इनोदात जर्रा चूक झाली तर मग नाकबी बंद व्हईल आशी जंक्शन आडर आसतिया आसं म्हंत्यात). मंग काय कर्नार ब्येचारे. लई लई ब्येक्कार हालत हाये बेच्यार्‍यांची. =)) =)) =))

ट्रम्प's picture

5 Jan 2019 - 3:59 pm | ट्रम्प

आनंद गगनात मावेना !!!!

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 4:24 pm | प्रसाद_१९८२
Blackcat's picture

5 Jan 2019 - 4:44 pm | Blackcat (not verified)

मला जेटलींचे म्हणने समजले नाही.

राहुल गांधींच्या मते राफेल चा ऑफसेट 30 ते 50 % येईल तो बहुतांश राफेलच्या पार्ट बाबत असेल,

जेटली बोलले , असेच काही नाही , मग इतका ऑफसेट भारतात घालून त्यांना गोळ्या बिस्किटे किंवा कौले हवी असतात का ?
दुसर्या कोणत्या क्षेत्रात ते इतकी गुंतवणूक करणार ?

सुबोध खरे's picture

5 Jan 2019 - 7:22 pm | सुबोध खरे

मला जेटलींचे म्हणने समजले नाही.

तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत तरीही त्या नाक खुपसलंच पाहिजे हा अट्टाहास कशाला?

मी तुम्हाला वरती provisions of Section 56(2)(vii)(a) of the Income Tax Act, 1961 मधील एका कलमात सूट दिली आहे असं लिहिलं आहे ते कुठलं ते अगोदर समजून घ्या.

उगाच व्हॉट्स ऍप ची घाण इकडे कशाला आणताय? जिकडे तिकडे नुसती पचपच

Blackcat's picture

5 Jan 2019 - 7:26 pm | Blackcat (not verified)

तुम्हालाही माहीत नसावे , असे वाटते.

Blackcat's picture

5 Jan 2019 - 7:28 pm | Blackcat (not verified)

तुम्हालाही माहीत नसावे , असे वाटते.

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2019 - 7:21 am | ट्रेड मार्क

राहुल गांधींच्या मते राफेल चा ऑफसेट 30 ते 50 % येईल तो बहुतांश राफेलच्या पार्ट बाबत असेल

३६ राफेल विमाने "फ्लाय अवे" कंडिशन मध्ये भारताला देण्यात येणार आहेत. याचा अर्थ तर सगळं काम फ्रांस मधेच होणार आहे आणि संपूर्णपणे तयार विमान भारताला देण्यात येणार आहे.

ऑफसेट मधली एक कंडिशन अशी आहे की ऑफसेट पार्टनर्स डील झाल्यापासून ३ वर्षांनंतर फायनलाईझ करण्यात येतील. म्हणजे ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे पार्टनर्स फायनल करायचे आहेत.

राफेलची पहिली बॅच सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात दाखल होणार आहे. मग रिलायन्स कसे काय भारताला देण्यात येणाऱ्या राफेलचे पार्टस बनवेल? भविष्यात पाकिस्तानने राफेलबरोबर करार केला आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विमानाचे पार्टस रिलायन्सने बनवले तर तुम्हाला किंवा रागाला काय प्रॉब्लेम असेल?

पुढचा मुद्दा म्हणजे राफेलचे एकूण डील ५८००० करोडचे आहे त्यात ५०% ऑफसेट म्हणले तरी २९००० करोड होतात. यात जवळपास ७५ ऑफसेट पार्टनर्स आहेत. मग रिलायन्सला ३०००० करोडचे ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट कुठून देणार? बाकीचे काय काँट्रीब्युशन काढून १००० करोड रिलायन्सला देणार का? रिलायन्सला फक्त ३% चे काँट्रॅक्टस मिळणार आहेत. म्हणजे २९००० करोडचे ३% म्हणजेच फार तर ८७० कोटींचे काम मिळेल ते पण ऑक्टोबर २०१९ नंतर.

मला जेटलींचे म्हणने समजले नाही.

बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते म्हणतात!

Blackcat's picture

6 Jan 2019 - 7:41 am | Blackcat (not verified)

भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे!

मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ?

त्यापेक्षा तुझा ऑफसेट ठेव अन डिस्काउंट मागायचा !

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2019 - 7:59 am | ट्रेड मार्क

बदाम फार महाग आहेत का हो? परवडत नाहीत का? नसेल तर तसं सांगा आपण काहीतरी उपाय शोधू.

भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे!

तुम्हाला भारताच्या पेक्षा पाकिस्तानची जास्त चिंता दिसतेय.

मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ?

रा गा चा चेला शोभतोस !
ट्रंप ह्याला बदाम खाउन काहीही फरक पडणार नाहिय! आडात नाही मग पोहर्यात कोठुन येणार ?

भंकस बाबा's picture

6 Jan 2019 - 10:11 pm | भंकस बाबा

काहीही म्हणा,
राहुल गांधी हा एकच गाढव नाही आहे भारतात!
पाकिस्तानी विमानाना जर पार्ट पुरवायचे कंट्रात दिले तर ऐन युद्धात खाका वर करता येतील की आणि वर बोलता येईल की तुम्ही आणि दसॉल्ट बघून घ्या

Blackcat's picture

6 Jan 2019 - 10:33 pm | Blackcat (not verified)

माझ्या मते बोफोर्स आणि राफेल दोन्ही वायफळ खर्च आहेत,

3 दिवसात आरमी करून देणारी स्वयंसेवी फौज असताना , हे खर्च इनाकारणच वाढवून ठेवलेत.

गब्रिएल's picture

6 Jan 2019 - 11:14 pm | गब्रिएल

न्हाय न्हाय. त्येची काय गरज नाय. आपल्याकडं पाकिस्तान्यांच्ये पाय धरून आमाला निवडून आना आसं म्हणनार्‍या बेईमान्यांची आख्खी फौज हाय की.

MT: केरळ वादाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये
http://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/repulcations-of-sabrima... via @mataonline: http://app.mtmobile.in
विशेष म्हणजे मार्क्सवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर आहेत .
मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ? हे एक न उलगड़लेले कोड़े आहे .

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2019 - 8:57 am | ट्रेड मार्क

मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ?

केवळ मार्क्सवादी नव्हे तर हिंदू सेक्युलर सगळीकडेच अशी गडबड करताना दिसतात. एका तरी मुसलमानाला तुम्ही इस्लामविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? किंवा किरिस्ताव माणसाला ख्रिश्चन धर्माविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? पण आपले हिंदूच नुसते इतर धर्मांना चांगले म्हणत नाहीत तर त्याबरोबरच हिंदू धर्माला नावे पण ठेवतात. मला याचंच आश्चर्य वाटतंय की एवढं असूनही हिंदू धर्म कसा टिकून आहे.

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बहुतेक हिंदूंना आपल्याला असलेला धोका कळतंच नाही. लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही,काही ठराविक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही याबद्दल इतर धर्मियांनी उठलेले रान, हिंदू सणांना सतत केला जाणारा विरोध त्याचबरोबर इतर धर्मांतील प्रथा परंपरांचा उदोउदो हे कसं लोकांच्या लक्षात येत नाही?

हे एक न उलगड़लेले कोड़े आहे

याला आपले शिक्षण जबाबदार आहे. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? हेच इतर सर्व राज्यांमधील मुलांना लागू आहे. मुघल राजांची नावे मात्र क्रमवार पाठ असतात, औरंगझेब टोप्या शिवून उदरनिर्वाह करायचा हे कौतुकाने शिकवतात त्याच बरोबर संभाजी कसा कवीच्या मागे लागलेला आणि बाजीराव पेशवा कसा बाईलवेडा होता हे सांगतात. तरुण पिढीला कदाचित सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, चोला साम्राज्य वगैरे राजांबद्दल माहितीही नसेल. त्यामुळे सेक्युलॅरिझम म्हणजे नुसते इतर धर्मांना आणि त्यांना त्यांच्या प्रथांचा आदर राखणे न राहता हिंदू धर्माचा अनादर करणे म्हणजे सेक्युलॅरिझम अशी व्याख्या रूढ झाली आहे.

आपल्या नवीन पिढीच्या लक्षात हे लवकर आले नाही तर पुढील काही दशके अवघड आहेत. हिंदू मुलींना प्लॅन करून जाळ्यात ओढायचे प्रकार भरपूर आहेत.

इंग्लंड मध्ये सेक्युलॅरिझममुळे काय झालं हे जरा मुस्लिम ग्रूमिंग गँग्स म्हणून गुगलून बघा. अश्याच गँग्स भारतातही ऍक्टिव्ह आहेत, फक्त बातम्यात येत नाहीत. सेक्युलॅरिझमचा मुखवटा सांभाळता सांभाळता जर्मनीसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशात तेथील स्थानिक मुलींनाच सामूहिक अत्याचारांना बळी पडावे लागले. युरोपातील बहुतेक देशांची हीच परिस्थिती आहे. तेथील स्थानिक लोकसंख्या वाढीचा दर आणि स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर बघता संपूर्ण युरोप येत्या २-३ दशकात मुस्लिम अधिपत्याखाली येईल. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अमेरिका आणि कॅनडाची आहे. आफ्रिका तर बहुसंख्य मुस्लिम झालीच आहे.

शबरीमालामध्ये प्रवेशासाठी बुरखाधारी महिला प्रोटेस्ट करतात हे हास्यास्पद नाही का? ती तृप्ती देसाई शनी शिंगणापूरमध्ये मात्र जोरात होती पण हाजी अली मध्ये जायचं म्हणल्यावर शेपूट घालून बसली. आपल्या हिंदू सेल्युलर लोकांना हे दिसत नाही किंवा दिसूनही समजत नाही किंवा समजूनही उमजत नाही हेच दुर्दैव आहे.

लिंक १

लिंक २

लिंक ३

United Kingdom's Daughters

Blackcat's picture

6 Jan 2019 - 10:16 am | Blackcat (not verified)

हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात.

महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील?

येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो.

संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.

Blackcat's picture

6 Jan 2019 - 10:34 am | Blackcat (not verified)

हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात.

महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील?

येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो.

संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

Special court declares Vijay Mallya a 'fugitive economic offender'

Prevention of Money Laundering Act अन्वये स्थापन झालेल्या कोर्टात ऑगस्ट २०१८मध्ये पास झालेल्या Fugitive Economic Offenders Act खाली विजय मल्ल्याला "आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेला गुन्हेगार (Fugitive Economic Offender)" जाहीर केले गेले आहे. यामुळे, मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

याव्यतिरिक्त, आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेल्या अजून २० गुन्हेगारांवर "रेड कॉर्नर" नोटीस जाहीर करण्याबात इंटरपोलशी बोलणे सुरू झाले आहे.

Blackcat's picture

5 Jan 2019 - 6:58 pm | Blackcat (not verified)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी म्हणजे अखिलेख यादव आणि मायावती एकत्र येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याविषयी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये एकमत झाले आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्याने शनिवारी ही माहिती दिली.

डँबिस००७'s picture

5 Jan 2019 - 7:52 pm | डँबिस००७

उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी
त्या पुढची बातमी तुम्ही वगळलेली दिसते !!
ह्या जोडीने कॉंग्रेस नावाच्या तुमच्या लाडक्या पक्षाला दोन सिटा देउन कॉंग्रेसला त्याची जागा दाखवलेली आहे !!

Blackcat's picture

5 Jan 2019 - 9:58 pm | Blackcat (not verified)

तुमच्या भाजपणेही कुठेतरी 5 जागा सोडून दिल्या म्हणे की ,

काँग्रेसची कुठेही युती झाली की तुमचे लोक लगेच व्हाट्सअप्पवर नाचत येत होते - शेर अकेला लडता है ! हल्ली शेरोवाले मेसेजेस दिसत नाहीत.

डँबिस००७'s picture

6 Jan 2019 - 12:38 am | डँबिस००७

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
अश्या गमज्या काय बुआ भतिजा च्या जोडगोळी च्या आशे वर केल्या होत्या !!
अरेरे बराच त्रास होतोय का ? बर्नॉल हाताशी ठेवा !! तुमच्या युवराजा सकट मॉं साहेबांना लवकरच कोर्टाच बोलवण येणार आहे पण तत्पुर्वी भाजपा त्या दोघांचे धिंडवडे काढणार !!

महागठबंधन नै तुमच्या लाडक्या पक्षाचा महा पोपट केलेला आहे ! पुर्वी दोन कॉंग्रेसच्या पारंपारीक सिटा कॉंग्रेस साठी सोडणार होते तेवढ्या दोन सिटा सुद्धा सोडल्या नाहीत !!

अर्धवटराव's picture

6 Jan 2019 - 10:27 am | अर्धवटराव

हि युती झालीच तर युपीए मधे सपा, बसपा कदाचीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त पॉवरफुल होतील... आमच्या पवार साहेबांचं पंप्र होण्याचे चान्सेस तसेही क्षीण होते... आता तर अजुनच पंचाईत :(

इरसाल's picture

23 Jan 2019 - 1:49 pm | इरसाल

कलकत्त्याला स्टेजवर असलेल्या सगळ्या वक्त्यांनी केलेल्या भाषणात मा.पवार यांचे कोणीच कसे नाव घेतले नाही की साधा उल्लेखही केला नाही.
आणी मग हे महाशय स्वतःला पंप्रचा उमेदवार कसे समजतात.

वाईल्ड कार्ड एन्ट्री ची गाजरे खात असतील.
बाकी देवेगौडा साहेब कसे पंतप्रधान झाले तसे काही तरी होईल अशी अपेक्षा असावी कदाचित.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2019 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोलकाता मिटिंगमधील एका नेत्याची इतर नेत्यांबद्दलची मते...

:)

Blackcat's picture

6 Jan 2019 - 10:38 am | Blackcat (not verified)

‘आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?’ असा प्रश्न एका पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ाने विचारला असता ‘शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं.

विनोद तावडे यांनी ज्यावेळी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी एका विद्यार्थाने हे सर्व मोबाईल रेकॉर्डींग केले. तावडे यांच्या हे लक्षात आल्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही दिला. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केल्याचा दावा काही वेबसाईटने केला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2019 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

A covert operation in CBDT to save Sonia and Rahul from Income Tax case in National Herald collapses

लोकशाहीत सरकार बदलले तरी, बाबूशाही आणि अनेक संवैधानिक/असंवैधानिक संस्थांमधील अधिकारी बदलत नाहीत... त्यातले पहिल्या १० अधिकार्‍यांपैकी अनेकजण (अ) मागील सरकारातील भ्रष्ट नेत्यांच्या हातात हात घालून किंवा
(आ) त्यांच्या गुलामीत/जबरदस्तीने किंवा
(इ) भ्रष्ट नेत्यांच्या छत्राखाली लपून,
केलेल्या कुकर्मात सामील झालेले असतात.

दुकाने बंद झालेले असे अधिकारी जुन्या नेत्यांना छुपी मदत करणे जास्त सोईचे समजतात, कारण,
(अ) जुना नेता बुडाला तर त्या प्रकरणाशी संबंध असलेला अधिकारीही बुडण्याची शक्यता असते आणि
(आ) पुढच्या निवडणूकीत जर जुना नेता परत निवडून आला तर आपले जुने दुकान परत जोमाने चालू होण्याची शक्यता भ्रष्ट अधिकार्‍याला खुणवत असतेच.

सरकारी कार्यालयांतूनच, सरकारी खटल्यांना असा सुरुंग लावण्याचा, हा पहिलाच प्रयत्न नाही. यावरून, असे बरेच अधिकारी आहेत असेच दिसते आहे.

Blackcat's picture

6 Jan 2019 - 3:14 pm | Blackcat (not verified)

*पंतप्रधान उज्ज्वला योजना निष्फळ*

महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातही दारिद्र्य रेषेखालील ३१ हजार १७ लाभार्थींना गॅसजोडणी देण्यात आली होती. मात्र या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने तब्बल ७९ टक्के म्हणजेच २४ हजार ५०३ कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील उर्वरीत भागांतही हीच परिस्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/poor-in-t...

सुबोध खरे's picture

7 Jan 2019 - 12:50 pm | सुबोध खरे

योजना निष्फळ कशाला?
सर्व गॅस जोडणी धारकांना फुकट गॅस पुरवू म्हणून काँग्रेसने जाहीर करून टाकावे म्हणजे निवडणूक जिंकता येईल.

होईल गरिबाचं चांगभलं

होऊ द्या खर्च

सरकार आहे घरचं

जाता जाता -- केरोसिन फुकट मिळत होतं काय?

Blackcat's picture

6 Jan 2019 - 3:27 pm | Blackcat (not verified)

राजकीय सभा, रॅली आणि आंदोलनाची साक्ष असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांसाठी रामलीला मैदान भगवा गड आणि दिल्ली भाजपाचे कँप ऑफिस राहणार आहे. आज रविवारपासून पुढील ३ आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाने मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज रविवारपासून भाजपाने दलित समाजाला आकर्षित करण्यााठी ‘भीम महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत एकाच भांड्यात ५००० किलो खिचडी तयार केली जाणार आहे. या मार्फत सामजिक समानतेचा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार आहेत.

या खिचडीसाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन तांदूळ आणि डाळ आणली आहे. थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीद्वारे भाजप एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. सध्या ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा आता हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

मार्मिक गोडसे's picture

6 Jan 2019 - 6:02 pm | मार्मिक गोडसे

म्हणजे उमा भारती आता प्युअर होणार .

Blackcat's picture

6 Jan 2019 - 7:07 pm | Blackcat (not verified)

https://www.loksatta.com/desh-videsh-news/secretaries-of-3-up-ministers-... : लाच प्रकरणात योगींचे 3 मंत्री अडचणीत, तीन स्वीय सहायकांना अटक

Blackcat's picture

6 Jan 2019 - 8:29 pm | Blackcat (not verified)

*ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष*

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना अशा शुभेच्छा दिल्या आहेत की, त्यामुळे भाजपा अडचणीत येऊ शकते. ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवत घोष यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-bengali-became-pm-mamata-...

-----------------------------

कुणाला मराठी पंतप्रधान हवा , कुणाला बंगाली , हे सगळे बोलणारे भाजपाचेच लोक !

Rajesh188's picture

6 Jan 2019 - 9:15 pm | Rajesh188

अजुन सुधा प्रत्येक राज्या ला आपल्यावर अन्याय होतो
असेच वाटते आणि ते थोडीफार खर पण आहे .
म्हणून pm कोणत्या राज्यातलं आहे हे महाराष्ट्र सोडून बाकी
राज्यांना महत्वाचं प्रश्न वाटतो .
महाराष्ट्र नेहमीच खूप भोळा राहिला आणि हरला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jan 2019 - 1:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मराठी माणसाची विचारसरणी अशी कोत्या मनोवृत्तीची कधीच नव्हती. म्हणून १९६७ साली स.का. पाटिल ह्या मराठी ताकदवान काँग्रेस नेत्याचा पराभव ३७ वर्‍शाचा 'परप्रांतिय' जॉर्ज फर्नांडिस करू शकले. १९८४/८९ मध्ये मराठीवर प्रभुत्व असणारे नरसिंह राव रामटेक मधून निवडून येऊ शकले ते प्रांतिकतेपेक्षा वैचारिकतेला महत्व देणार्या माणसामुळे.
गेल्या २० वर्षात परिस्थिती बदलली.'आपला माणूस/ आपली जात' ह्या 'अभिमानाच्या' गोष्टी झाल्याने महाराष्ट्र ईतर राज्यांसारखेच एक झाले.

राम मंदिर हा प्रश्न मला तर वाटतं इंग्रज गेल्यानंतर निर्माण झाला अगोदर नव्हता माझ्या माहिती प्रमाणे .
पण बाबरी मशीद किती तरी शे वर्षा पासून मंदिराच्या जागेवर आहे ( बहुसंख्य हिंदू जे महाराष्ट्र सहित उत्तर आणि पश्चिम राज्यातील.साऊथ la काही देणंघेणं नाही ,()
पण देशात असंख्य अतिशय गंभीर प्रश्न असताना राम मंदिर च का आठवलं हा पहिला प्रश्न .
गरीबी जी पाचवीलाच पुजलीय,काश्मीर ( हा पण जाणूनबुजून latkavlela प्रश्न ,)
अशिक्षित पना राज्याराज्यांत खूप गंभीर आर्थिक विषमता आणि हे सर्व प्रश्न देशाचं अखंडत्व संकटात आणि शकतात .
तरी राम मनिर हाच प्रश्न पुढे केला जातो हा निर्णय कोर्टावर सोपवून नेते मंडळी देश समोर जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडवत नाहीत .
आणि कोर्ट ते पण भारतीय मानसिकतेचा ते पण मंदिर मशित वादावर निर्णय न देता आपण पण नेत्यांपेक्षा कमी नाही हेच दाखवून देत आहे .
आशा ह्या आपल्या भारत देशाला देव च ( आसेल तर ( वाचवू शकतो .
नाहीतर भविष्य पुढील पिढ्यांच ज्यांनी भारतात जन्म घेतला आहे ते .
खूप अंधारमय आहे

Blackcat's picture

6 Jan 2019 - 9:03 pm | Blackcat (not verified)

BJP sticks to JPC demand on 2G scam

https://www.thehindu.com/news/national/BJP-sticks-to-JPC-demand-on-2G-sc...

भाजपाचा भूतकाळ

सुबोध खरे's picture

7 Jan 2019 - 12:27 pm | सुबोध खरे

भाजपाचा भूतकाळ वाईट होता
आणि
विरोधकांचा भविष्यकाळ वाईट आहे

मार्मिक गोडसे's picture

7 Jan 2019 - 12:38 pm | मार्मिक गोडसे

विरोधकांचा भविष्यकाळ वाईट आहे वर्तमानातील वर्तनही वाईट आहे.

Blackcat's picture

7 Jan 2019 - 12:41 pm | Blackcat (not verified)

भाजपाच्या जाहीरनामा कमिटीत नारायण राणेंचा समावेश.

भाजपाला दुसरी तिसरी फळी तयार झाली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jan 2019 - 12:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे असे पुर्वी भाजपावाले म्हणायचे. 'समविचारी' का काय म्हणतात ते. नारायण राणेंचा पक्ष नैसर्गिक मित्र की कृत्रिम ?

Blackcat's picture

7 Jan 2019 - 6:11 pm | Blackcat (not verified)

मिपाकरांचा जीव थंडावला , हे बरे झाले ,

भाजपात दुसरी फळी , तिसरी फळी यांच्यावरून चिंतातुर होते,

आता चांगली फणसाच्या झाडाची फळी घावली !!

सुबोध खरे's picture

7 Jan 2019 - 6:29 pm | सुबोध खरे

चिंतातुर तुमच्यासारखे "बाहेरचेच" होते.

भाजपाला चिंता नव्हतीच. त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे.

बाकी दिसायला दिसतं ते निवडणुकीची/ सत्ताकारणाचा अपरिहार्यता (पोलिटिकल कंपल्शन).

कारण "राज"कारण स्वच्छ असू शकतं. "सत्ता"कारण नाही

त्यावरून विरोधक ठणाणा करत असतात. त्यांना बोंबलू द्यायचं.

हा का ना का

Blackcat's picture

7 Jan 2019 - 6:42 pm | Blackcat (not verified)

आम्हाला नाय हो चिंता,

पण मायबोलीवर कुणीतरी बोलत होते , राणे हे फळी की शेवटचा खिळा ?

म्हणून तुम्हाला सांगितले ,

गब्रिएल's picture

7 Jan 2019 - 7:14 pm | गब्रिएल

त्येची काळजी करन्याबिगर, तुमच्या मालकीन-मालकाच्या कबाटातून लईच दलालांची हाडं धडा धाडा भायेर पडू लागलीत तीकडं बगा की.
का तिकडं बगीतलं की काळजात लईच धडधड व्हतीया म्हनून दुसर्याच्या घरात डोकाऊ लागलाय? =)) =)) =))

सुबोध खरे's picture

8 Jan 2019 - 9:41 am | सुबोध खरे

आम्हाला नाय हो चिंता,

मग कशाला प्रत्येक धाग्यावर पचपच करताय?

आपलं ठेवायचं झाकून

आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून

MT: भाजप रोडरोमियोसारखा मागे लागलाय: संजय राऊत
http://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/shiv-sena-mp-sanjay-r...
महाराष्ट्रातील तथाकथित हिंदूवादी पक्ष सेना आणि भाजप पुन्हा एकदा कुत्र्यासारखे भांडायला लागले आहेत आणि यामध्ये मरण त्यांना मते देणाऱ्याचें होत आहे .
बिहार आणि ओरिसा राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील सेनेला मोठेपणा दिला असता तर भाजप चे नेते भिकेला लागले असते का ? पण नाही अमितशाह ला शतप्रतिशत भाजप च वेड लागलय आणि त्या वेडा मध्ये पाच वर्ष सेने बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून सेनेच्या शेपटा वर पाय द्यायला सुरवात केली , मग सेना भूंकनारच ना ?
बिहार मध्ये कस भांडण लवकर मिटवून एकत्र निवडणूकिला सामोर जाण्याची तयारी केली , मग महाराष्ट्रात त्यांना काय रोग आला होता ?
या दोघाच्या भांडाणा मुळे कॉ व रा कॉ चा फायदा नाही झाला म्हणजे मिळवली !!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Jan 2019 - 5:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सेना-भाजपवाले दिवसा नळावर भांडल्यासारखे भांडतात व रात्री एकत्र प्यायला बसतात.. असे ह्यांचे मत. आपापल्या कार्यकर्त्याना बरेच तापवायचे व नंतर निवडणूकीच्या आधी 'थंड' करायचे. गेले २५ वर्षे हेच चालू आहे.

तेजस आठवले's picture

7 Jan 2019 - 6:40 pm | तेजस आठवले

https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-leader-sanjay-raut-s...
मी आधीच म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा कॉपीराईट घेतल्यासारखे हे वागणे आहे.काय भाषा.
संदर्भ : https://www.misalpav.com/comment/985992#comment-९८५९९२

अर्थात जिथे दोन भांडणाऱ्यांत पहिले कानाखाली कोणी वाजवली ह्यावर मर्दूमुकी ठरते(मग पहिला काडीपैलवान असला आणि पुढे त्याने दुसर्याकडून मरेस्तोवर मार का खाल्ला असेना) तिथे दोघातला कोणता पक्ष लोकांवर प्रभाव पाडतो हे सांगणे तितकेसे कठीण नसावे.

किंबहुना काकणभर जास्तच.

Blackcat's picture

7 Jan 2019 - 6:45 pm | Blackcat (not verified)

सर्वाना आरक्षण आले ते बरे झाले ,

म्हणजे आता परदेशात जाऊन बक्कळ पैसा मिळवून , वर आम्हाला आरक्षण न दिल्याने आम्ही देश सोडला , किंवा पूल पडला तो आरक्षित माणसांमुळे पडला, असले फेसबुक्की , व्हॅटसप मेसेजेस बंद होतील,

तसेही यावर्षीच्या आंदोलनानंतर असे मेसेजेस आलमोस्ट बंदच झाले आहेत.
–-------------------–------------------

सवर्णांमध्ये कोणा-कोणाला मिळेल आरक्षण
– ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्याहून कमी
– ज्याची ५ एकर किंवा त्याहून कमी शेत जमीन
– ज्याचे १ हजार चौ.फुटापेक्षा कमी जागेवर घर
– राजपूत, भूमिहार, बनिया, जाट गुर्जर यांना या श्रेणीत आरक्षण मिळेल.
– शिक्षण (सरकारी किंवा खासगी), सावर्जनिक रोजगारात याचा फायदा मिळेल.
– यासाठी संविधानातील अनुच्छेद १५ आणि १६ मध्ये दुरूस्ती केली जाईल.
– ज्यांना अजून आरक्षणाचा फायदा मिळाती नाही, अशा आर्थिक मागास घटकातील गरिबांना आरक्षण दिले जाईल.

–-----------------------------

सरकारचे अभिनंदन