बोकाशेठना श्रद्धाजली !!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
29 Nov 2018 - 8:59 pm

मिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस.
पण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली.

बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!

भाषाबातमी

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

29 Nov 2018 - 9:03 pm | आनन्दा

क्काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2018 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

भावपूर्ण श्रद्धांजली !

डँबिस००७'s picture

29 Nov 2018 - 9:13 pm | डँबिस००७

भावपूर्ण श्रद्धांजली !

सस्नेह's picture

29 Nov 2018 - 9:17 pm | सस्नेह

Really shocked !
वय काय होतं त्यांचं ?
अत्यंत दु:खद घटना. सखेद श्रद्धांजली __/\__

आनन्दा's picture

29 Nov 2018 - 9:26 pm | आनन्दा

श्रद्धांजली _/\_. नि:शब्द!

फुटूवाला's picture

29 Nov 2018 - 9:28 pm | फुटूवाला

एका व्हाट्सॲप समुहात खूप गप्पा मारायचे. अभ्यासू मार्गदर्शक हरवला.
भावपूर्ण श्रद्धांजली..

कानडाऊ योगेशु's picture

29 Nov 2018 - 9:28 pm | कानडाऊ योगेशु

भावपूर्ण श्रध्दांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!

नाखु's picture

29 Nov 2018 - 9:35 pm | नाखु

अतिशय दिलखुलास संवाद करणारं व्यक्तिमत्त्व.

देव त्यांच्या कुटुंबीयांना या प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ति देवो हीच प्रार्थना.

उपयोजक's picture

29 Nov 2018 - 9:42 pm | उपयोजक

भावपूर्ण श्रद्धांजली!_/\_

पद्मावति's picture

29 Nov 2018 - 9:53 pm | पद्मावति

शब्दच खुंटले :( भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

टर्मीनेटर's picture

29 Nov 2018 - 10:01 pm | टर्मीनेटर

गेल्याच आठवड्यात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल मुविंकडून समजले होते, पण एवढी चिंताजनक परिस्थिती असेल याची कल्पना नव्हती.
मिपावरच्या उत्कृष्ठ लेखकांपैकी एक असलेल्या बोकाशेठना भावपूर्ण श्रद्धाजली !! त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना _/\_

प७९'s picture

29 Nov 2018 - 10:10 pm | प७९

_/\_

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Nov 2018 - 10:19 pm | llपुण्याचे पेशवेll

बोका अनेक कायप्पा ग्रुपवर पंगे घेणारा म्हणून प्रसिद्ध होता. पण अत्यन्त माहितीपूर्ण व व्यासंगी माणूस होता. बरं पंगा घेऊन झाला की परत त्याच माणसाशी गप्पा मारायला तो तयार. वाईट वाटलं फार.

पाषाणभेद's picture

29 Nov 2018 - 10:28 pm | पाषाणभेद

मोसादचे वाचन कित्येक वेळा केले होते.
आधी इस्त्रायलचा फॅन होतोच पण या मालीकेमुळे अधिकच आकर्षण वाढले.
ओघवती लेखनशैली, प्रसंग समोर उभा करण्याची हातोटी हि लेखनाची वैशिष्ट्ये होती ओमकार यांची होती.
त्यांचे अकाली जाणे रुखरुख लावणारे आहे.
काय असेल ते असो पण मिपावरील ओळखीच्यांपैकी जे गेले ते अकालीच गेले होते. यकू झाला, इंदूरला नोकरी करणारा कुलकर्णी अपघातात गेले. काळाच्या हातातल्या गोष्टी सगळ्या.
कुलकर्णी गेला तेव्हा त्याच्या अंतिम यात्रेला नाशकात गेलो तेव्हा ढसढसा रडायला झाले होते. राज जैन ने बातमी दिली तर विश्वासच बसत नव्हता.
आताही तसेच झाले. कोण कुठले आपण पण आवडीच्या माध्यमातून जवळ आलेलो. असे दुर जाणे मनाला लागणारे आहे.
ओमकार यांच्या आत्म्याला शांती मिळो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

Nitin Palkar's picture

29 Nov 2018 - 10:31 pm | Nitin Palkar

भावपूर्ण श्रध्दांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!

उगा काहितरीच's picture

29 Nov 2018 - 10:52 pm | उगा काहितरीच

श्रद्धांजली ! :'(

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना !

When I buy a new book, I always read the last page first, that way in case I die before I finish, I know how it ends.

-Nora Ephron.

कधी भेटू शकलो नाही.
पण त्यांच्या लिखाणाचा फॅन आहे.

रातराणी's picture

30 Nov 2018 - 2:16 am | रातराणी

:( फार वाईट बातमी. श्रद्धांजली.. स्केअर क्रो ही अनुवाद केलेलं काही वाचायची पहिलीच वेळ होती आणि इतका सुंदर अनुवाद करता येऊ शकतो यावर विश्वास बसला नव्हता..

चित्रगुप्त's picture

30 Nov 2018 - 5:19 am | चित्रगुप्त

श्रद्धांजली.

त्यांचे लेखन फारसे वाचले नाही पण आयडी परिचित होता.
वाईट वाटले. श्रद्धांजली...

मुक्त विहारि's picture

30 Nov 2018 - 7:42 am | मुक्त विहारि

भावपूर्ण श्रध्दांजली.

संजय पाटिल's picture

30 Nov 2018 - 11:22 am | संजय पाटिल

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_

नया है वह's picture

30 Nov 2018 - 12:49 pm | नया है वह

_/\_

वामन देशमुख's picture

30 Nov 2018 - 12:53 pm | वामन देशमुख

बोकाशेठ यांना श्रद्धांजली. _/\_

अभिजित - १'s picture

30 Nov 2018 - 1:18 pm | अभिजित - १

May his soul Rest in Peace

रागो's picture

30 Nov 2018 - 1:19 pm | रागो

भावपूर्ण श्रध्दांजली

बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देओ आणि त्यांच्या आप्तजनांस दु:खातून सावरण्यास बळ देओ.

_/\_

अनिरुद्ध प's picture

30 Nov 2018 - 2:13 pm | अनिरुद्ध प

भावपूर्ण श्रद्धांजली

सोनल परब's picture

30 Nov 2018 - 2:34 pm | सोनल परब

भावपूर्ण श्रद्धांजली

बबन ताम्बे's picture

30 Nov 2018 - 2:58 pm | बबन ताम्बे

मिपावरील एक उत्कृष्ट लेखक हरपला.

dhananjay.khadilkar's picture

1 Dec 2018 - 9:37 pm | dhananjay.khadilkar

बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2018 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका ए आझमची धक्कादायक बातमी वाट्सअ‍ॅपवर किसनानेच दिली. बाप रे...! इतकंच उचारलं. शांत राहीलो. बोका ए आझमच्या आजाराबद्दल वाचूनच कळलं. अतिशय वाईट वाटलं.

बोका ए आझमशी मिपावर अनेकदा वाद झाले. वाट्सपॅच्या विविध चर्चात अनेकदा वाद होत असत, आणि ते गृप मधून रागाने बाहेर पडत. असं अनेकदा व्हायचं. बोका ए आझमचा पहिल्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा आश्चर्य वाटलं, पण, मग गप्पा रंगल्या. आम्ही सर्व विसरुन ख्याली खुशाली विचारल्या आणि बराच वेळ बोललो. असे दोन चार वेळी असे बोलणे झाले. पण असं काही होईल असे कधी वाटलेच नाही. बोका ए आझम विसरता येणे शक्य नाही. लेखन आठवत राहील, व्यक्तिमत्व आठवत राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2018 - 8:07 am | स्वाती दिनेश

फार वाईट बातमी ,
श्रध्दांजली...
स्वाती

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2018 - 9:39 am | चौथा कोनाडा

धक्कादायक वृत्त !

बोका शेठना भावपुर्ण श्रद्धांजली

स्वधर्म's picture

7 Dec 2018 - 2:19 pm | स्वधर्म

बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजलीं