लाड

वन's picture
वन in जे न देखे रवी...
27 Nov 2018 - 9:42 am

गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस
वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच
चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती
देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी

पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण
मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन
बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम
खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम

धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण
कमीच पडतंय की लावायला चांगले वळण
केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली
शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली

गडगंज विपुलतेतून अंगात आलेला माज
करू नाही शकत बौद्धिक दुबळेपणावर मात
आणि अखेर प्रश्न पडतो मनाच्या कवाडात
की खरंच करायला हवेत का नको इतके लाड ?
........................................................

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

27 Nov 2018 - 10:47 am | श्वेता२४

लाड केवळ श्रीमंत लोकच करतात असे नव्हे मुलगा असेल तर मुलींच्या तुलनेत सर्वच आर्थिक स्तरात अतीलाड केले जाता (तुलनात्मक म्हणायचे आहे. सरसकट नव्हे). तसेच लाडामुळे मूल बिघडत असेल तर केवळ पालकच दोषी कसे असू शकतात. ते मूलही किंबहूना जास्त जबाबदार असते. श्रीमंतांच्या घरातही सुसंस्कृत मुले जन्माला येतात. मग काय सगळेच बिघडतात किंवा त्यांचे लाड केले जात नाहीत? मला हे व्यक्तिश: पटत नाही.

प्रांजळ प्रतिसादाबद्दल आभार.
या विषयाला दुसरी बाजू असणार हे मान्य.