भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)

गणेश विजय काळे's picture
गणेश विजय काळे in भटकंती
17 Aug 2018 - 11:09 pm

भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया…..

११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.

हा किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक उत्तर भागात होते.
1

पेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे.

भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
2

किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र
3

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Aug 2018 - 12:24 pm | चांदणे संदीप

भारीच!

Sandy

मी पण शनिवारीच जाऊन आलो इथे. इतिहास तुमच्याकडून समजला.

गणेश विजय काळे's picture

21 Aug 2018 - 8:13 pm | गणेश विजय काळे

इतिहास मोठा आहे पण थोडक्यात लेखन केले आहे. धन्यवाद .............

दुर्गविहारी's picture

22 Aug 2018 - 10:32 am | दुर्गविहारी

एका नवीन गडाची माहिती समजली, त्याबध्दल धन्यवाद. आणखी फोटो असतील तर धाग्यात टाका. पण आणखी थोडी सविस्तर माहिती देउ शकला असतात तर चांगले झाले असते. पु.ले.शु.

चौथा कोनाडा's picture

22 Aug 2018 - 5:32 pm | चौथा कोनाडा

छान महिती आणि झकास फोटो !
आणखी माहिती दिल्यास उत्तम !
माझा एक तरूण मित्र नुकताच अहमदाबादेत पोस्ट झालाय, त्याला हा धागा पाठवतो.