Make At Home: एक नवीन आणि उपयुक्त मोबाईल ऍप

आपला निखिल's picture
आपला निखिल in तंत्रजगत
8 Jul 2018 - 11:39 am

आपल्यापैकी बऱ्याच जणां कड़े विशेष कलगुण, छंद असतात परंतु काही मोजके जण त्यांचे कलगुण, छंद चांगल्या पद्धतीने जोपासतात तर काही जण त्या मधुन उत्पन्नाचे साधन निर्माण करतात. असे हौशी लोक प्रामुख्याने आपल्या घरा मधुन छोटे धंदे चालू करतात. आवड़ आणि कौशल्या आसल्या मुळे चांगल्या प्रतिच्या वस्तु हे लोक घरात तयार करुन विकतात. ह्या मध्ये उत्तम घरगुती खाद्यपदार्थां पासुन कपड़े, घर सजावटी च्या वस्तु, आरोग्य व सौन्दर्य प्रसधाने, घरगुती शिकवणया अशा नानाविध प्रकारच्या गोष्टी विकल्या जातात. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात हे घरा मधुन चालणारे छोटे उद्योग अभावनेच टिकतात. मोठे मोठे मॉल्स, दुकाने, ऑनलाइन कंपन्या ह्यांच्या पुढे हे छोटे उद्योग टिकणे अवघडच. अश्या घरगुती उद्योगाना प्रोत्साहन देणया करिता नुकतेच एक नवीन मोबाईल ऍप्लीकेशन सादर केले असुन ह्या ऍप च्या मदतीने आपणास घरात तयार केलेल्या उत्कृष्ट वस्तु, पदार्थ व सेवांची खरेदी तसेच विक्री करता येणे शक्य होणार आहे.

ऍप चे नाव Make At Home असुन हे तुम्ही Google च्या Play store मधुन किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून download करु शकता.

Make At Home हे हजारो प्रकारच्या घरगुती वस्तु व सेवां चे दालान आहे. ह्या द्वारे आपण आपल्या परिसरातील विक्रेत्यां कडुन विविध घरगुती वस्तु सहज खरेदी करु शकाल. दुकान, मॉल्स किंवा ऑनलाइन संकेटस्थळा वरुन महाग आणि बेभरवस्याच्या वस्तु खरेदी करण्यापेक्षा घरात तयार केलेल्या उत्कृष्ट वस्तु व सेवा तुम्ही ह्या ऍप द्वारे खरेदी करु शकाल.

आपल्या पैकी देखील कोणी घरा मधुन कोणत्याही प्रकारचा उद्योग करत असल्यास ह्या ऍप द्वारे आपल्या वस्तु व सेवा विकु शकता. ऍप च्या सर्व सेवा मोफत असुन तुम्ही कोणतेही शुल्क न भरता तुमच्या घरात तयार केलेल्या वस्तुंची विक्री करु शकता. अट फक्त एकच तुमचा धंदा घरगुती असणे आवश्यक. तुमच्या परिसरात, ओळखीत, society मध्ये कोणी घरा मधून धंदा करत असल्यास त्यांना ह्या ऍप बद्दल नक्की माहिती द्या

App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.ecom.makeathome

Website: www.makeathome.in

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

11 Jul 2018 - 10:52 am | श्वेता२४

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयुक्त अ‍ॅप.

गवि's picture

11 Jul 2018 - 12:54 pm | गवि

आयडिया छान.

पण टू सिम्पल आयडिया टू बिलिव्ह. ग्राहक आणि विक्रेता यांना फक्त एकत्र आणणारी शेकडो ऍप्स आणि वेबसाईट आहेत.

प्रश्न असतो तो क्वालिटी कंट्रोल, जेन्युईनिटी, कायदेशीर पूर्तता, (फूड लायसेन्स नसणे, घरगुती म्हणून कुठल्याही अनारोग्यकारक अस्वच्छ जागी पदार्थ बनवणे), जबाबदारी (माल खराब, चुकीची डिलिव्हरी, लेट डिलिव्हरी, ऑर्डर कॅन्सल, रिफंड्स, तक्रार, फसवणूक, विक्रीपश्चात सेवा, गॅरंटी वारंटी) अशा अनेक बाबतीत घरगुती उद्योगाचं सरसकटीकरण अडचणीत येऊ शकतं. ऍप, वेबसाईट किंवा मध्यस्थ कंपनीला हात वर करून चालेलच असं नाही.

आपला निखिल's picture

12 Jul 2018 - 9:08 am | आपला निखिल

होममेड business मुळातच simple असल्या मुळे आयडिया आणि अँप देखील साधे सरळ आणि सोप्पे आहे. शेकडो वेबसाईट असून देखील कोणतेही अँप असे नाही जे फक्त होम मेड business साठी आहे. सध्या असणाऱ्या वेबसाईट देखील फ़क्त दुकानदार आणि मोठया विक्रेत्यांना प्रोत्साहन देतात. Flipkart amezon paytm वर हे छोटे विक्रेते माल विकू शकत नाहीत कारण त्या साठी complex registration प्रोसेस आहे. म्हणून सध्याच्या online जगात सुद्धा हे business मागे पडतात. बाकी वेबसाईट वर 2न्ड हँड मालच जास्त दिसतो त्या मधून होम मेड प्रॉडक्ट ओळखणे अशक्य जसे कि फेसबुक. म्हणून होम मेड प्रॉडक्ट आणि सर्विसेस साठी dedicated प्लॅटफॉर्म ची गरज आहे.
राहिली गोष्ट quality ची, त्या साठी app ची रचना वेगळी आहे. अँप द्वारे तुम्ही तुमच्या विक्रेत्यांशी direct संपर्क साधू शकता त्यांचा address देखील तुम्हला अँप मध्ये दिसतो. तसेच प्रत्येक प्रॉडक्ट साठी review rating system app मध्ये आहे. Sellers ला देखील रेटिंग आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार 3km च्या आपल्या परिसरात होतात जो परिसर आपल्या चांगल्या ओळखीचा आहे. कोणताही माल विकत घेण्या आधी तुम्ही सेलर शी डायरेक्ट फोन वर बोलू शकाल, तुमच्या गरजा सांगू शकाल, तसेच तुम्ही थेट घरी भेट देऊ शकाल. म्हणूनच ह्या app मध्ये online and offline shopping चा उत्तम मेळ साधला आहे. अँप मध्ये आजून देखील बरेच काही features आहेत. काही problem आल्यास contact us feature आहेच.

तपशीलवार माहितीबद्दल धन्यवाद.

कालच एक व्हडीओ शेअर झाला होता.
स्विग्गी आणि चावलाज संदर्भात. दाखवत होते की चावलाज हे त्यांचे अन्न कसल्या झोपडपट्टीत बनवतात ते

मराठी कथालेखक's picture

13 Jul 2018 - 7:52 pm | मराठी कथालेखक

कल्पना चांगली आहे पण 'अ‍ॅप एके अ‍ॅप' हा प्रकार काहीसा डोक्यात जातो.... जे अ‍ॅपवर आहे तेच वेबसाईटवर पण देता येवू शकतं ना.. अ‍ॅप असण्याला विरोध नक्कीच नाही.. पण वेबसाईट नसणे हे मला पटत नाही.
या मुद्द्यावरुन मला swiggy बद्दल सांगावसं वाटतं.. अलिकडेच मी swiggy त्यांचं अ‍ॅप इन्स्टॉल न करता मोबाईलवर वेबसाईट उघडून खूप सहजपणे जेवण मागवलं. अगदी डिलिवरीचं ट्रॅकिंग पण वेबसाईटवरंच दिलं होतं.