ए पावसा !

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जे न देखे रवी...
12 Jun 2018 - 7:54 pm

ए पावसा !
थोडं थांबना .. मला जे सांगायचय
ते तुला कळतय का सांगना !

सारखच काय ते बरसायचं
सारखं आपलं भरायचं ,
आणि इथे येऊन सांडायचं

तुला नाहि का वाटत ,
थोडा आराम करावासा,?
आरामशीर ढगात बसुन
खालचा हिरवा गालिचा पहावासा ?

ए पावसा !
बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना
तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना !

ऐकलीस का कुजबुज कधी ,
“ साला किचाट करतो पाऊस
ह्याला कधीपण ढासळायची
कसली ती भारी हौस ?? “

मला तु आवडतोस
माझं काहिहि म्हणणं नै
पण मला नै आवडत ब्वॉ
तुला बोललेलं काइबाइ !

म्हणुन सांगते .. ऐकना
थोडसं रिप रिप कर आणि
थोडिशी विश्रांती घेना !

कळतो मला तुझा प्रॉब्लेम
तु भरलेल्या ढगांमध्ये कितीवेळ राहणार
मुंबैतल्या गर्दीसारखं तुलाहि तिथे
दाटिवाटित रहायला लागत असणार

अरे पण वेड्या
म्हणुन का तिथुन निसटुन तु
इथे जागा करणार ??
आधीच घामाचा वास त्यात
तु सगळं ओलं ओलं करणार !

तु बघतोस ना किती पाणि साचतं रस्त्यावर
ट्रेन सुद्धा वेळेवर येत नाहि फलाटावर
संध्याकाळ झाली कि तुला भारी चेव येतो
तु थोडीना घरी परतनार्‍यांची काळजी करतोस

ए पावसा !
खरच थोडसं थांबना .. तो अजुन घरी नाहि आलाय ,
निदान त्याच्यासाठी तरी .. माझं ऐकना !

प्लिझ !

मांडणी

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

13 Jun 2018 - 1:58 pm | सिरुसेरि

वर्षम आठवला

श्वेता२४'s picture

13 Jun 2018 - 2:36 pm | श्वेता२४

नाही पडला तरी चालेल पण तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या शेतात मात्र पडला पाहिजे

खिलजि's picture

14 Jun 2018 - 12:34 pm | खिलजि

चल हॅट , मी न्हाय पडणार

शिमेंटच जंगल मला काय अडवणार

उंचच उंच डोंगर मला नेहेमी विनवयाचे

झाडांचे हात पसरुनि गुदगुल्या करायचे

गेली झाडे, डोंगर गेले, आता कोण खेळणार ?

चल हॅट , मी न्हाय थांबणार

ह्ये शिमेंटच जंगल मला काय अडवणार

तंत्रज्ञान विज्ञान सारे खिशात घेऊन फिरतो

पोटापुरते खातात जिथे, तिथेच म्या थांबतो

भस्म्या झालाय साऱ्याना , खात सुटलेत सारे

इथेच थांबुनी सोडतोय म्या फक्त मॉन्सूनाचे वारे

उपग्रह देतात संदेश फक्त मॉन्सून आला रे आला

बळीराजा अजूनही वाट पाहतोय , पाऊस कुठे बरं गेला ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर