तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
30 Apr 2018 - 5:58 pm

तप्त झाली धरा सारी

दहाही दिशा त्या पेटल्या

दिनकराशी हात मिळवुनी

उग्र होऊनि परतल्या ॥

मरूत व्यस्त, घाले गस्त

थैमान चहूकडे माजले

पशु, प्राणी, झाडे, पक्षी

नद्या नाले भाजले ॥

रुक्ष झाले वृक्ष सारे

सावलीपण महाग ती

यत्र तत्र वणवा पेटला

स्वस्त झाली आग ती ॥

कोपला तो, झोपला तो

भक्ती कमी जी जाहली

मोह मायेत प्राण सारे

म्हणुनी झाली काहिली ॥

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

इशाराकविता माझीफ्री स्टाइलरौद्ररसमांडणीजीवनमानमायक्रोवेव्हभूगोलरेखाटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

1 May 2018 - 1:23 pm | पद्मावति

कविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 May 2018 - 4:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान लिहिली आहे
पैजारबुवा,

खिलजि's picture

2 May 2018 - 1:00 pm | खिलजि

आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर