पक्ष्यांच्या संगतीत…

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
1 Jun 2017 - 1:02 pm

(हळू हळू इतर पक्ष्यांचेही फोटो द्यायचेत म्हणून हे शीर्षक निवडले आहे.)

आमच्या पाठच्या कुंपणापलीकडे एक मोठे करंजाचे झाड आहे. त्या झाडावर गेले दोन-तीन वर्षे रातबगळे (नाईट हेरॉन) घरटी करून स्थिरावले आहेत. ह्याला कारण कदाचित पावसात शेतात साचून राहणारे पाणी व त्यामुळे त्यात मिळणारा मांसाहार असावा. शेतात साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात पाणी असतं.

काही दिवसांपूर्वी स्वयंपाकघराच्या खिडकीतून वर पाहिले तर रातबगळ्याची मादी नारळाच्या झावळीवर आरामात उभी होती. तिची हालचाल संथ होती, त्यामुळे ती काही लगेच उडणार नाही हे पाहून लगेच कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागले. हे काढताना मला असं वाटलं की जणू स्वतःची स्वच्छता आणि व्यायाम चालू आहे ह्या पक्ष्याचा. निरीक्षण करताना टिपलेले खालील काही फोटो :

१) कसा शांत दिसतो आहे बघा. गरीब गाय.

२) आता थोडी चमक आली आहे डोळ्यांत.

३) ही इतकी मोठी मान होऊ शकते हे वरच्या फोटोवरून वाटतही नाही ना?

४)

५) स्वच्छतेसोबत योगा.

६) मान खाली

७)

८)

९) जरा जवळून पिसे पहा.

१०) पूर्ववत.

११) एक क्लोजअप

प्रतिक्रिया

"पक्ष्यांच्या संगतीत" असा बदल करता का..? (का तुम्ही दिलेलेच बरोबर आहे..?)

आणि फोटो दिसत नाहीयेत.

फोटो क्रोमातून दिसतील.

इथर मेरेकू एडीट करना नही आता. प्लिज करून द्या.

शीर्षक दुरुस्त केले आहे. काही छोट्याछोट्या शुद्धलेखनाच्या दुरुस्त्या केल्या आहेत. फोटोंची रुंदी 640 इतकी ठेवली आहे जेणेकरून मोबाईलवरूनही फोटो व्यवस्थित दिसावेत. बादवे, काही फोटोंची पुनरुक्ती झाली आहे का? उदा ३ आणि ४, ५ आणि ६?

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 3:51 pm | धर्मराजमुटके

मस्त लिहिलय ! अजुन लिहा !