अर्थक्षेत्र : ट्रेडिंग फंडा (२)

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
17 Aug 2016 - 3:01 pm

मागील भागात खरेदी करताना आणि विक्री करताना दरवेळी तयार होणारे हाय किंवा लो ह्या कडे लक्ष दिले असता तसेच ATP हा एक महत्त्वाचा घटक ध्यानात घेतला असता ट्रेंड बदलाची आगाऊ सूचना मिळू शकते. असे म्हंटले होते. तर

  • खरेदी केव्हा करावी ?

खालील चित्राचे अवलोकन केले तर एक छोटा ट्रेड कसा करावा ते समजून घेता येईल.

Axis Bank Weekly Chart

वरिल चित्रात लाल म्हणजे मंदी, हिरवा म्हणजे तेजी आणि करडा म्हणजे अनिर्णीत किंवा होल्ड किंवा शांत राहा असे सुचवितो. मार्केट असे रंग उधळवून आपल्याला बुचकळ्यात टाकत असते. इथे मला एक थ्रीडी चित्र आठवते जे बऱ्याच गुजराती बांधवांकडे मी पहिले आहे प्रथम दर्शनी ते एक चकाकणारे शेंदरी किंवा तत्सम शेडचे प्लेन प्लास्टिक फ्रेम सारखे दिसते पण जर एक टक पहिले तर त्यात ओम किंवा महावीर दिसतात. (त्याला नक्की काय शब्द आहे तो माहित नाही.) ते ज्याला जेव्हढे लवकर दिसतील तेव्हढा तो पुण्यवान असे एक ठिगळ हि गुजू लोक चिकटवत असतात. तर इथे निरीक्षणं केले तर काय जाणवते?

जेव्हा चालू आठवड्याचा क्लोज (जो शेवटच्या शुक्रवारी ३.४० ते ४.०० ह्या कालावधीत झाला आहे.)आदल्या आठवड्याचा लो पेक्षा खालील पातळीवर होतो तेव्हा मंदीची तयारी सुरु होते.

उदाहरणार्थ वरील चित्रात क्रमांक एकच्या ७/८/२०१५ रोजी संपलेल्या आठवड्याचा लो ५७१.६५ आहे आणि क्रमांक दोनच्या म्हणजेच १४/०८/२०१५ रोजी संपलेला क्लोज ५७० हा आदल्या आठवड्याचा (७/०८/२०१५)खाली आहे. इथे आपण खरेदी करावी का ? हा मंदी ओळखण्याचा पहिला नियम पण कृती करण्यासाठी ह्या नियमाला भक्कम पाठींबा देणारी घटना घडायला हवी.

क्रमांक तीन २१/०८/२०१५ रोजी संपलेल्या आठवड्याचा क्लोज पहिल्या (७/०८/२०१५) आणि दुसऱ्या (१४/०८/२०१५) रोजी संपलेल्या आठवड्याच्या लो (अनुक्रमे ५७१.६५ आणि ५५४.८५)पेक्षाही खूपच खाली आहे त्यामुळे इथे मंदीची पुष्टी झाली

क्रमांक चार (२८/०८/२०१५) आणि पाच (०४/०९/२०१५)ह्या आठवड्यात वरील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पण क्रमांक तीन आणि पाचचा आठवड्यात पडझड ३% पेक्षा जास्त आहे. सावज टप्प्यात आलय.

क्रमांक सहा (११/०९/२०१५) हा आठवडा संपताना क्लोजने एकदम उसळी मारून क्रमांक ४ च्या आठवड्याच्या लो पेक्षा वर क्लोज दिलेला आहे ४८१.२५ इथे मार्केट संपता संपता खरेदी झाली. कारण ४४६ ते ४८१ हा ३५ रुपयांचा प्रवास शेवटच्या काळातला आहे म्हणजे खरेदीदार यायला लागले आहेत.चला आपण पण प्रवाहपतित होऊ या आणि ४८१.२५ ला खरेदी करू या.

क्रमांक सात (१८/०९/२०१५)अत्यंत महत्वाचा आठवडा कारण एखादा ट्रेडर ह्याच आठवड्यात ५०० ते ५२० ह्या प्रवासात सर्व शेअर्स विकून टाकेल किंवा जर क्लोज ATP पेक्षा वर आला तर दुसर्या दिवशी ५२० पेक्षा भाव नक्कीच वर जाणार हा विचार करून दुसर्या दिवशी ५२० ते ५३४ ह्या प्रवासात (जो मागील भागात सांगितल्या प्रमाणे +३% आहे) विकून टाकेल. ५३०-४८१.२५ = ४८.७५ -६ रुपये कमाल खर्च = ४२.७५/- नक्त नफा.

थोडे किचकट आहे पण सरावाने जमू शकेल असे वाटते. सामान्यतः असे निरीक्षण आहे कि -३% ते +३% (किंवा अधिक +-)हि शेअरची गती असते. म्हणजे जेव्हा -३% किंवा अधिकने मंदी होते त्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी केली असता शेअर पुन्हा +३% ने वर उसळतो आणि एक छोटा ट्रेड करणे शक्य होते. जो पर्यंत क्लोज हा, ATP आणि लो पेक्षा न्यूनतम पातळीवर क्लोज होतो तो पर्यंत मंदी सुरु असते. थोडक्यात आपणास डाऊन ट्रेंड समजतो तो समजल्यावर कोणत्या भावाला खरेदी करावी ते समजावे म्हणून वरील लेखाचा प्रपंच. ह्या पद्धतीला आणि मागील भागातील लेखाला एकत्र केल्यास दोन्ही म्हणजे ट्रेंड आणि खरेदी विक्रीची किंमत समजण्यास मदत होते.

पण ह्या पद्धतीला काही शेअर्स जुमानत नाहीत ते का आणि कोणते ? ते परत केव्हातरी.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

17 Aug 2016 - 7:17 pm | शाम भागवत

पण ह्या पद्धतीला काही शेअर्स जुमानत नाहीत ते का आणि कोणते ? ते परत केव्हातरी

लवकर येऊद्या. केव्हातरी नको.
;-)

शाम भागवत's picture

19 Aug 2016 - 11:19 pm | शाम भागवत

तुमचा डाटा असा आहे.
abc

मला NSC वरून असा डाऊनलोड करून मिळाला. फक्त बंद चे आकडे १००% बरोबर येताहेत. काय करावे कळत नाहीय्ये.

दिनांक
Open Price
High Price
Low Price
Close Price

07-Aug-15
584.90
584.90
576.00
580.30

14-Aug-15
565.15
574.25
554.85
570.00

21-Aug-15
527.00
528.90
514.30
525.30

28-Aug-15
516.00
528.90
502.25
508.15

04-Sep-15
483.10
483.40
462.50
468.00

11-Sep-15
488.00
493.70
474.60
481.25

18-Sep-15
500.00
520.40
500.00
517.45

24-Sep-15
510.00
518.20
506.20
513.95

ज्ञानव's picture

20 Aug 2016 - 11:47 am | ज्ञानव

श्याम राव,
तुम्ही फक्त ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट.....२४ सप्टेंबर१५ ह्या शुक्रवारचेच फक्त ओपन हाय लो क्लोज डाऊन लोड केले आहेत. संपूर्ण आठवड्याचे नाही.
सोमवारी ३/०८/२०१५ रोजी सुरु झालेला आठवडा सकाळी ९.१५ वाजताचा ओपन ५७६ आहे हा आठवडा ७ ऑगस्ट २०१५ संपला तेव्हाचा क्लोज ५८०.३० आहे (क्लोज हा ३.४० ते ४.०० ह्या काळात रोज ठरतो.) त्याच आठवड्याचा लो ४ ऑगस्ट २०१५ रोजी रु.५७१.६५ इतका आहे आणि हाय रु. ५८९.५० ५ ऑगस्ट २०१५ रोजीचा आहे. असे सर्व मिळून विकली डेटा तयार होतो.

इथे प्रयत्न करा.

माझ्याकडे स्वतः डेव्हलप केलेला डाऊनलोडर असल्याने मी साईट वर जात नाही.

शाम भागवत's picture

20 Aug 2016 - 12:59 pm | शाम भागवत

मी चांगलाच घोळ घातला म्हणायचा :-))
बघतो आता मॉक ड्रील करून.
वरची लिंक उघडत नाहीय्ये. पेज नॉट फाऊंड असे येतेय.
पण मुद्दा नीट कळलाय त्यामुळे काही प्रश्न नाही.
दोन वर्षाचे डाऊनलोड करून घेतलाय. थोडेसे एक्सेल मधे ५-१० मिनीटे काम केले की होऊन जाईल.

शंका निरसनाबद्दल धन्यवाद.