माऊली उत्सव

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
1 Jul 2016 - 12:14 am

|| माऊली उत्सव ||

विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं
बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं
भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं

जगी नश्वरी नाही, इथे माझा राम
देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम
तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस
मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास

देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी
कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी
मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा
मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा

सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा
चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा
नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा
वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा
मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा
तुका म्हणे तेथेचि, उत्सव 'माऊली'चा

अभंगभावकविताविठोबाविठ्ठलकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2016 - 1:51 pm | प्रसाद गोडबोले

राम कृष्ण हरी !!

विअर्ड विक्स's picture

1 Jul 2016 - 3:22 pm | विअर्ड विक्स

विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं
बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं

या ओळी जास्ती आवडल्या.