सीट नको पण स्त्री आवर

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
14 Apr 2015 - 11:54 am
गाभा: 

प्रसंग १:
स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस
'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी.

प्रसंग २:
स्थळः प्रचंड गर्दी असलेली एक बस
बस खचाखच भरलेली आहे. उभं रहायलाही पुरेशी जागा नाही. लोकं लोंबकळत आहेत. एक स्त्री (मध्यमवयीन) कशीबशी उभी आहे. एक सज्जन व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो व 'मॅडम आप बैठिये' म्हणत तिला बसायला जागा देतो. ती आभार मानत नाहीच. वर 'हं! कसा धाक आहे बघ!' असे भाव चेह-यावर आणत धप्पकन त्या सीटवर बसते.

प्रसंग ३:
स्थळः कमी गर्दी असलेली एक बस.
बसण्याची आसने बहुतेक भरलेली आहेत. बाकी बस रिकामी. स्त्रीयांसाठी असलेल्या आसनांपैकी दोन आसनं रिकामी आहेत. बाकी जनरल आसनांवर तीन स्त्रीया बसलेल्या आहेत. एक पुरुष बसमधे चढतो. जागा शोधत नजर फिरवतो. जनरल आसन रिकामं नाही हे बघून नाईलाजाने उभा रहातो.

तीनही प्रसंगात स्त्री आपल्या सवलतीचा गैरवापर करताना दिसते. (या वाक्यावर युद्ध अपेक्षित) पूर्वी काही आसनं राखीव असायची. आता चालकामागची अर्ध्याहून जास्त आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतात. डाव्या बाजूला अपंग, वृद्ध, सैनिक इत्यादी. उरलेली आसनंही 'पुरुषांसाठी' राखीव नसतात. ती जनरल असतात. जिथे प्रसंग २ प्रमाणे पुरुषच अनेकदा जागा देतात. असो.

तर. ही सवलत किंवा हे प्रिविलेज जे दिलंय त्यामधे आणि हक्क किंवा राईट मधे फरक आहे. दुर्दैवाने तो अनेकांना कळत नाही. कुठलंही जनरलायझेशन न करता काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो, काही मतं मांडू इच्छितो.

१) खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करणा-या स्त्रीया, राखीव आसनांचा उपयोग किंवा समर्थन करतात, हा दुटप्पीपणा नाही का?

२) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं.

३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा.

४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको.

५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?
असो.

प्रसंग ४:
स्थळ: प्रचंड गर्दी असलेली एक बस
एक सभ्य पुरुष स्वतःला सांभाळत एका सीटला टेकून उभा आहे. एक स्त्री उतरण्यासाठी पुढे जात असते. तोंडाने काही बोलत नाही बाजूला व्हा सांगत नाही आणि खबदाडीतून पुढे सरकत असते. असं होत असताना त्या पुरुषाला तिचा/तिला पुरुषाचा धक्का लागतो. आणि ही आधीच तडकलेली; अजून तडकते. 'गर्दीत मुद्दाम उभे राहता काय? लावू का एक कानशिलात?' काहीबाही बोलायला लागते. शिव्याही देते दोन. (स्त्रीने शिव्या देऊ नयेत / द्याव्यात किंवा स्त्रीयांसाठी राखीव शिव्या असाव्यात का हा एक विषय होऊ शकतो). तो सुरुवातीची चार वाक्य शांतपणे बोलतो. सॉरीही म्हणतो. पण शिवी दिल्यावर, 'मुद्दाम', 'चान्स' असे शब्द वापरले गेल्यावर तोही आवाज चढवतो. घरचे राग समोर येईल त्यावर काढायचं काम नाही मॅडम. ऐकून घेतोय म्हणून वाट्टेल ते बोलू नका. इत्यादी शाब्दिक चकमक घडते.

आसनांचा एक वेगळा मुद्दा झाला. पण सर्वसाधारणपणे पुरुषाकडे खुनशी नजरेनेच बहुतेक स्त्रीया बघताना दिसतात. याला आजूबाजूला घडणा-या गोष्टी जरी काही अंशी कारणीभूत असल्या तरीही हे अती होतं अनेकदा. म्हणजे प्रत्येक पुरुष हा वाईटच आहे आणि तो आपल्याला काहीतरी करणारच आहे असा भाव घेऊन वावरण्याची गरज नाही.

६) सभ्य पुरुष हे बस, ट्रेन इत्यादी सर्वच ठिकाणी सभ्यपणा दाखवतात. परंतु सगळ्यांना एकाच चश्म्यातून बघितलं जात असल्याने, प्रसंग २ प्रमाणे त्यांच्या नशिबी साधं थँक्यू सुधा येत नाही.

७) प्रिव्हिलेज आणि राईट यात गल्लत होते आणि मग माणुसकीलाही त्या राखीव जागेवर जागा मिळत नाही. प्रसंग १ प्रमाणे एखाद्या व्यक्तीला खरोखर उभं राहता येत नसेल तरीही उठवलं जातं, तेही उद्दामपणे.

८) आमचं ते आमचंच पण तुमचं तेही आमचं या तत्वानुसार स्त्रीया कुठल्याही आसनावर बसू शकतात, रेल्वेत कुठल्याही डब्यात चढू शकतात. पण पुरुषांना तो हक्क नाही. कॉमन डब्यात (बघा हं, तो ही जेंट्स डबा नसतो टेक्निकली) प्रेमी युगुलं, किंवा गर्दीत सेफ वाटणा-या महिला प्रवेश करतात आणि ती अदरवाइज कम्फर्टेबल असणारी गर्दी उगीच अनकम्फर्टेबल करून टाकतात. चुकून धक्का लागला तर आपणच मार खाऊ या भीतीने पुरुषच अंग चोरून उभे राहतात.

धागा नीट मांडता आला नाही याची कल्पना आहे. पण ठीक आहे काथ्याच कुटायचा आहे मग तो आधीच थोडा कुटल्यासारखा असला म्हणून काय बिघडलं? असं म्हणून धागा टाकत आहे.

वरील तीनही प्रसंग अनेकदा बघितलेले आहेत. बाकी पुढे तुम्ही बघितलेले अनुभवलेले प्रसंग सांगायला आमंत्रण देण्याची गरज नाही.

जाता जाता; जिकडे तिकडे स्त्रीयांना प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट, रिझर्वेशन असतं. मिपा वरही अनाहिता फक्त स्त्रीयांसाठी आहे. तर मिपावर फक्त पुरुषांसाठी एक्स्क्लूजिव एक सेगमेंट असावं असं मी सुचवू इच्छितो.

वाट्टेल ते झालं तरी लेडीज सीट वर न बसणारा.
वेल्लाभट

नवीन म्हण - सीट नको पण स्त्री आवर.

प्रतिक्रिया

अर्रा रा

विवेकपटाईत's picture

14 Jul 2015 - 8:44 pm | विवेकपटाईत

मी काय म्हणणार आज संध्याकाळी मेट्रोनी (दिल्लीची मेट्रो), एका तरुण मुलीने आपली सीट मला दिली. तरुण मुले एखाद्या पांढरेशुभ्र केस वाल्याला पाहताच डोळे बंद करून झोपण्याचे नाटक करतात. असो.

बाकी सर्व पांढरे केस वाले हरामखोर नसतात (९०%) तरी नसतात.

होबासराव's picture

14 Jul 2015 - 9:14 pm | होबासराव

वोक्के माय मिस्टेक "झापण्याचे" असे वाचले गेले

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jul 2015 - 10:36 am | पुण्याचे वटवाघूळ

परवाच फेसबुकावर पुण्यातील एक अनुभव शेअर केलेला वाचला. तो अनुभव https://www.facebook.com/storypick/photos/a.641942945851396.1073741828.6... वर वाचता येईल.

त्या अनुभवात लिहिले होते की बस सगळी भरलेली होती. पुण्यात बसमधील डावीकडील सगळ्या सीटा स्त्रीयांसाठी राखीव असतात.त्या सगळ्या सीटाही भरलेल्या होत्या. अशा वेळी काही कॉलेज कन्यांचा ग्रुप बसमध्ये चढला. त्यांच्या हातात बरेच सामान होते.तेव्हा एका मुलाने स्त्री दाक्षिण्य म्हणून एका मुलीला आपली सीट देऊ केली.त्यावर ती मुलगी उलटी-- काय रे लाईन मारतो का म्हणून उलटली.त्या मुलीली बसमधल्या इतर स्त्रीयांनीही पाठिंबा दिला. शेवटी त्याची परिणिती त्या मुलाला विनाकारण थोबाडीत खायला लागली.

ते वाचल्यानंतर मी तर अगदी कानाला खडा लावल आहे.पुण्यात मी कधी बसने प्रवास करत नाही. मुंबईत गेलो की बेस्टने प्रवास करतोच.अशा वेळी काहीही झाले तरी स्त्रीयांसाठी राखीव सीटांवर बसायचे नाही आणि कोणत्याही परिस्थितीत आपली सीट कुठल्याही स्त्रीला मोकळी करून द्यायची नाही. च्यायला उगीच थोबाडात खायची हौस नाही आम्हाला.

स्त्रीयांना सन्मानाने वागवले पाहिजे, त्यांच्याबरोबर जे प्रकार चालतात त्यांच्याविरूध्द मी माझ्याच गुवाहाटी आणि बागपत या चर्चाधाग्यात ३ वर्षांपूर्वी लिहिले होते.पण असे करणे म्हणजे स्त्री असल्याचा गैरफायदा घेण्यासारखे आहे आणि त्याला कायमच विरोध आहे. अशा करणार्‍या स्त्रीया किती असतात असल्या फालतूच्या आकडेवारीत मला पडायचे नाही. 'मी तसली नाही' असा शिक्का कोणाच्या कपाळावर नसतो.त्यामुळे कुणाला बघून ती तशीच आहे की नाही हे कळायचे नाही.तेव्हा शंभर हात दूर राहिलेले कधीही चांगले.