✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुगंधा - भाग ३ (अंतिम)

क
कविता१९७८ यांनी
गुरुवार, 04/09/2015 - 15:30  ·  लेख
लेख
अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या .. " अमोघ इतका संतापला होता की तो काय बोलतोय याचे त्याला भान राहीले नाही, पुढे ती काही बोलणार इतक्यात अमोघच तावातावाने बोलु लागला , "आधी तु माझं ऐक, असले भलते सलते विचार मनातुन काढुन टाक, मला कुठल्याही परीस्थीतीत ही गोष्ट मान्य नाही, तुला काय वाटतं , माझ्या नशीबात काय व्यंग, टाकाउ व्यक्तीच दिल्या आहेत का देवाने? प्रत्येक वेळेस माझ्या मनात नसताना बाकीच्यांनी माझ्यावर कुणा ना कुणा व्यंग व्यक्तिला लादावं का? आधी आईबाबांनी तुला माझ्यावर लादलं , हो तु नव्हतीस माझ्या मनात, मला काय कुणाला आवडशील तु तुझं हे रुप पाहुन ? सांग ना, पण तरीही तुझ्या स्वभावाने , वागण्याने तु मला जिंकलस , मी तुला स्वीकारलं पण अपंग दत्तक मुल मला स्वीकारता येणार नाही, अज्जिबात नाही, तु एन. जी. ओ. बरोबर काम करतेस, अशा मुलांबरोबर राहतेस ते सगळं ठीक, पण ते बाहेरच राहु दे , घरात आणण्याचा प्रयत्न करु नकोस, गरीब, लाचार , अपंग माणसांना मदत करावी, त्यांच्या वर दया यावी इतपर्यंत ठीकाय पण त्यांना आपल्या घरात आणावे , आपल्या जीवनाचा हिस्सा बनवावे असे विचार करु नये. आता एन. जी. ओ. मधे जायची काही एक गरज नाहीये. घरी बस, आपल्या मुलाला जन्म दे." तीला तर विश्वासच बसेना , "अमोघ??? काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या सारखा सुशिक्षित माणुस असा विचार करतो? " अपंग आणि अनाथ असणं कुणाच्या हातात असतं का? असं असतं तर कुणीच अपंग राहीलं नसतं. जन्मदाते इवल्याशा कोवळ्या जीवाला उकीरड्यावर टाकुन निघुन जातात त्यात त्या निष्पाप जीवाची काय चुक असते? समाज ही त्याची जबाबदारी झटकतो अशा मुलांनी काय करायचं, कुठे जायचं? आणि त्यांच्या अपेक्षा ही काय असतात , कुणीतरी त्यांच्या कडे प्रेमाने पहावं, त्यांना आपलं म्हणाव , त्यांनीही सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं आयुष्य जगावं तर यात बिघडलं कुठे? आणि त्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत, आपल्याला देवाने चांगली संधी दिलीये अशा मुलांना आपलेसे करण्याची, त्यांना माणुस म्हणुन स्वाभिमानाने जगु देण्याची. त्यांना गरज आहे अशा अश्वासक हातांची जे त्यांना असे वार्‍यावर सोडुन जाणार नाहीत. अनाथ आश्रमातही अपंग मुलांना कुणीच दत्तक घेत नाही, ती बिचारी आपण टाकाउ आहोत या भावनेने हताश होतात. मी जगलीये असलं असं आयुष्य, आईबाबां विना, मामाने पोटच्या पोरी प्रमाणे वाढवलं पण तरीही प्रत्येक ठीकाणी मला अनाथच समजले जायचे कारण जन्मदाते आईवडील नव्हते त्यात मला हे व्यंग, त्यामुळे माझ्याशी कुणी मैत्री करण्यास तयार नव्हते, पण मी माझं व्यंग मान्य करुन पुढे गेले, मामाने माझ्या शिक्षणासाठी योग्य ते प्रयत्न केले, पण बाहेरच्या जगात मलाच माझे स्थान निर्माण करायचे होते. मला पाहुन लोकांना हसु यायचे, कीव यायची , त्यांच्या तोंडावरुन ते दिसायचे ही, पण मी हळुहळु त्यांच्या मतानुसार स्वतः मधे बदल करत गेले आणि मग त्यांनी मला त्यांच्यात समाविष्ट केले. शारीरीक व्यंगावर मात करता येते पण मानसिक व्यंगाचं काय? माणसे फार फार तर अशांवर दया दाखवु शकतात पण त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवणारी खुप कमी माणसे असतात, पण तुम्ही मला स्वतःच्या जीवनाचा भाग बनवलंत तेव्हा जाणवलं की तुम्ही म्हणजे एक वेगळा विचार करणारी व्यक्ती आहात पण आत्ता समजतय की तुम्ही पर्यायाअभावी फक्त परीस्थीतीशी जुळवुन घेतलय. घरी पोहोचल्यावर दोघांचे चेहरे पाहुन अमोघच्या आईवडीलांन काही बिनसल्याची जाणीव झाली. अमोघने तीच्या इच्छा आईवडीलांना ऐकवल्या आणि घरात वादळ सुरु झाले. अमोघच्या आईने थैमान घातले, "१०० एकर जमीन दान करायची ? वेड लागलंय का? आपली लक्ष्मी अशी दुसर्‍याना देउन टाकायची? अगं त्या १०० एकरच्या जमीनी मुळेच तर तुला माझ्या मुलासाठी आणलं इथे नाहीतर होतं काय तुझ्यात? ना रंग ना रुप आणि हे व्यंग , लायकी काय होती की तुझी या माझ्या राजकुमारासमोर? तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आणि शिकलेल्या मुली सांगुन आल्या होत्या माझ्या मुलाला पण पानसे भाउंनी तुझी थोडी स्तुती केली आणि आम्ही बळी पडलो हो , म्ह्ंटल तुला आईवडील नाहीत आणि आम्हाला ही मुलगी नाही त्यामुळे तुलाही आईवडीलांचं प्रेम मिळेल आणि तु आमच्याशी मुलीप्रमाणे वागशील आणि काय गं माझ्या मुलामधे काही कमी आहे का? त्याच्यात आहे धम्मक स्वतःचं मुल जन्माला घालण्याची, का म्हणुन त्याने दुसर्‍याच्या मुलाला आपलं मुल मानावं , ही असली थेरं कशी सुचतात गं तुला??" तीला काय बोलावे ते कळेना, " अहो आई, असे बोलु नका, मला तुमच्या शिवाय कोण आहे , मी तुम्हाला माझ्या आईवडीलांच्या जागीच मानते हो, पैशाचं काय आहे आज आहे उद्या नाही, त्या १०० एकर जमिनीमधुन अनाथांना , अपंगाना आधार मिळु शकतो. आणि मुला दत्तक घेण्याविषयी म्हणाल तर स्वतःच मुल नसेल तरच अनाथ मुलाला दत्तक घ्यावं असं काही नाही." त्यावर अमोघची आई उसळली, " काय गं सारखं सारखं मुल दत्तक घेउ , मुल दत्तक घेउ, काय आहे नक्की तुझ्या मनात ? हे तुझंच अनौरस मुल तर नाही ज्याला तु अधिकृत रित्या आपलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेस? लग्नाआधीही जात होतीस की एका एन.जी. ओ. मधे, भलतीच दया दाखवलेली दिसते." अमोघच्या वडीलांनी त्याच्या आईला आवरले, "बास झालं, आता हा विषय इथेच बंद करा" त्यामुळे घरात शांतता पसरली . तिला मानसिक धक्काच बसला. प्रकरण या थराला जाईल याची तीला कल्पनाही नव्हती, काय होईल फार फार तर सर्व नकार देतील पण असं घालुन पाडुन बोलतील असं तीला वाटलंही नव्हतं आज घरच्यांचे असली चेहरे तिच्या समोर आले होते, आपल्या विरुद्ध इतकं विष या लोकांच्या मनात आहे , आज पर्यंत ही लोकं मुखवटे घालुन आपल्या समोर वावरत होती आणि आपण त्याला प्रेम आणि वात्सल्य समजलो? आपलीच चुक म्हणा आपणच माणसं ओळखण्यात चुकलो. इथे आपल्याला नाही तर आपल्या पैशाला किंमत आहे हे समजल्यावर ती खुप कळवळली, खर्‍या प्रेमाच्या शोधात निघालेल्या तीला नियतीने असा दगा दिला होता. आजपर्यंत आपण फक्त प्रेमच दिले आणि त्याबद्द्ल फक्त प्रेमाचीच अपेक्षा केली. आपला नवरा ज्याला आपण पुर्णपणे ओळखलेच नाही, त्याने आपल्याला स्वीकारले पण आपल्या विचारांना त्याच्या विश्वात काहीच कींमत नाही. आज यांनी आपल्या चारीत्र्यावर संशय घेतला ? विचार करता करता तिला गरगरु लागले, डोकं खुप दुखु लागलं आणि तोंडातुन फेस येउ लागला, काही कळायच्या आत ती धाडकन जमिनीवर पडली आणि तिची शुद्ध हरपली. अमोघ धावतच रुम मधे आला आणि त्याने तिला उचलुन पलंगावर ठेवले , डोक्याला जबरदस्त मार लागुन रक्त वाहत होते, अमोघच्या वडीलांनी तातडीने अ‍ॅम्बुलन्स बोलावली व तीला इस्पितळात नेण्यात आले. मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचे सुचवले व आम्ही आमचे प्रयत्न करतोय पण आता सर्व काही देवाच्या हातात असेही सांगितले. तिला वेंटीलेटर वर ठेवण्यात आले होते, अमोघ तिचा हात आपल्या हातात घेउन बसला होता तेवढ्यात दुरुन त्याला गाणे ऐकु आले, "तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघचा कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. खरंच माझे चुकले, मी तुला वाट्टेल ते बोलायला नको होते, तु निस्वार्थ पणे आपले नाते जोपासत गेलीस आणि मी मात्र तुला समजुनच घेतले नाही . मी न विचार करता तुझ्यावर संतापलो, धीराने , सामोपचाराने यातुन काही मार्ग निघालाच असता. तुझ्या नसण्याने मला फरक पडतोय, मला तुझी सवय लागलीये. लवकर शुद्धीवर ये, बरी हो , तुझ्या वात्सल्याचा अन प्रेमाचा सुगंध तु माझ्या आयुष्यात पुन्हा दरवळव, हो सुगंधा , परत ये.

Book traversal links for सुगंधा - भाग ३ (अंतिम)

  • ‹ सुगंधा - भाग २
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3954 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

एकंदर अक्कल ठिकाण्यावर यायला

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 04/09/2015 - 15:37 नवीन
एकंदर अक्कल ठिकाण्यावर यायला कुणाच्या तरी जीवावर बेतावं लागत. बाकी कथा छान.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/09/2015 - 16:52 नवीन
आवडली कथा......... खरच फार प्रभावी मांडलय.......हे एकाकीपण पुढिल लेखणास मनापासून शुभेच्छा
  • Log in or register to post comments

पटलं नाही

सुबोध खरे
गुरुवार, 04/09/2015 - 18:39 नवीन
पटलं नाही फारच उदात्त विचारसरणी. मदर तेरेसा इतकी. पण मग तिनं लग्न कशाला केलं? स्वताला व्यंग असताना राजबिंडा नवरा मिळाला तो तिच्या पैशासाठी हे न कळण्याइतकी ती दुधखुळी नसावी. त्यातून समाजसेवा म्हणून १०० एकर शेती अपंग मुलांसाठी देण्याइतका उदात्त विचार तिला काही लग्नानंतर आला नसावा. स्वतःचं मुल होण्याची अजिबात शक्यता नसेल तरीही मुल दत्तक घेणे त्यातून अपंग, सहज कुणालाही पटणार नाही. बाकी तिचे डोकं खूप जोरात दुखू लागलं तोंडाला फेस येऊ लागला आणि मेंदूत रक्तस्त्राव झाला हे सर्वाना उपरती होण्यासाठी केल्यासारखे वाटते. त्यामुळे शेवट फारच फिल्मी/ सनसनाटी वाटतो. म्हणून पटलं नाही असो.
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
गुरुवार, 04/09/2015 - 22:37 नवीन
कथाबीज सशक्त होतं, छान फुलवता आलं असतं, पण केलेला शेवट अजिबात पटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१९७८ च्या चित्रपटातल्यासारखा

सूड
गुरुवार, 04/09/2015 - 23:21 नवीन
१९७८ च्या चित्रपटातल्यासारखा कथेचा शेवट वाटला.
  • Log in or register to post comments

कथेची सुरवात छान झाली!

जुइ
Fri, 04/10/2015 - 01:56 नवीन
मात्र शेवट पटला नाही. खूप फिल्मी वाटले. पुलेशु!
  • Log in or register to post comments

आत्ताच तिन्ही भाग वाचले.

रुपी
Fri, 04/10/2015 - 02:22 नवीन
मलाही सुरुवात खूप आवडली, पण उत्तरार्धात बर्याच गोष्टी टोकाच्या वाटल्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

कविता१९७८
Fri, 04/10/2015 - 10:26 नवीन
कथा लिहिण्याची ही माझी पहीलीच वेळ होती, आजपर्यंत मी पदयात्रेचे अनुभव, दोन मनोगते आणि एक व्यक्तिचित्रण इतके लिखाण केले होते त्यामुळे कथा लिहीणे मला जमेल की नाही याबाबत शंका होती. तुम्ही सर्वांनी कथा वाचली आणि त्यावर प्रतिसाद दिले याबद्द्ल आभार. पुढील लिखाणात मी नक्कीच सुधार आणण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

पुलेशु

शुभांगी कुलकर्णी
Fri, 04/10/2015 - 10:49 नवीन
केपी, छान सुरवात झाली कथेची पण नंतर उरकल्यासारखी वाटली. असो पुढीललेखनासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा