साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
28 Jan 2015 - 4:15 pm
गाभा: 

मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.

अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.

सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अ‍ॅक्वा
आय वॉन लव यू - अ‍ॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अ‍ॅकॉन (अ‍ॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.

अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.

बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.

प्रतिक्रिया

कदाचित विश्वास बसणार नाही पण.. तम्मा तम्मा लोगे - बप्पीदा.

धिधा धिधा धिधा असा जो दणक्यात तीनदा ड्रम वाजतो आणि मग जे काही साउंड इफेक्ट्स येतात ते बंद हार्टलाही चालू करतील.

शिवाय बॉन जोव्ही - "इन दीज आर्म्स" हे गाणं अत्युत्कृष्ट साउंड सिस्टीमवर आवर्जून मोठ्या आवाजात ऐकण्यासारखं आहे. किती किती वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्या बॅकग्राउंडला.

बेस गिटारचा ट्रॅक पकडायचा आणि तोच फोलो करत एकदा ऐकायचं.. मग दुसरी कोणतीतरी लय पकडून..

धाग्याचा विषय आवडला.

ही गाणी तथाकथित उच्च दर्जाची, सुरेल , गोड किंवा समाजमान्य असतीलच असं नाही, पण दणदणाटी साउंड सिस्टीमला न्याय देणारी असतात.

तो बसक्या आवाजाचा लांब केसवाला मायकेल बोल्टनच ना? "कॅन आय टच यू देअर" वाला ?!! खूप वर्षं झाली. हवा भरुन फुल्ल व्हॉल्यूममधे ते गाणं ऐकल्याला. एकदम बसका आवाज बेकार. पण मस्त वाटतं ऐकताना.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jan 2015 - 1:05 am | निनाद मुक्काम प...

तम्मा तम्मा
गवी क्या बात कही
हे घ्या तम्मा चे लाइव रेकोर्डिग
त्यावर एक आख्खा लेख येऊ शकतो.
विविध वयोगटातील स्त्री पुरुषांचा कोरस
रंगात आलेले बप्पीदा
गोड गळ्याची अनुराधा

यसवायजी's picture

30 Jan 2015 - 1:12 am | यसवायजी

गाने मणातले
ऊपट्सुम्भ - Tue, 23/09/2008 - 21:15

तू प्रेमि ..... आ .......हा ....
मै प्रेमि ....... आ ~~ह्हा...
फिर कया डॅडी क्या अम्मा ...............
ईक बस तू ही ..... प्यार के काबील ...
सारा जहा है निकाम्मा ........
...
...
तम्मा तम्मा लो गे .......
.....
तम्मा तम्मा लो गे ...तम्मा
:))))

च्यायला, भारीच आहे तो प्रतिसाद आणि त्यावर आलेले उपप्रतिसाद तर आणखीन कहर. =))

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 7:19 am | वेल्लाभट

रिक्शा साँग्स/अचरट साँग्स प्रकारावर वेगळा धागा येऊ शकतो :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jan 2015 - 12:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

तम्मा तम्मा माझ्या फेवरेट गाण्यांपैकी एक.
लाईव रेकॉर्डिंग पहाताना फारच मजा वाटली.
भलतेच वेंजॉय केले.

पैजारबुवा,

"ब्रिगेडियर सबारी", "लिक इट", "बॉन जोव्ही- डेड ऑर अलाईव", "यंग गन्स - ब्लेझ ऑफ ग्लोरी", "ब्लाईंड मेलन- नो रेन" हेदेखील सुचवून पाहतो.

प्रमोद देर्देकर's picture

28 Jan 2015 - 4:30 pm | प्रमोद देर्देकर

माझी आवडती गाणी
१) वु आर द वर्ल्ड वु आर द नेशन - मायकल जॅक्सन
२) वेलकम टु दि हॉटेल कॅलिफोर्नीया- माहित नाही
३) वन मोअर टाईम - ब्रिटनी स्पीअर
४) ब्राझील - वेंगा बॉईज
५) सुझेना आय एम क्रेझी लव्ह इन यु- माहित नाही
६) मरिहा कॅरीची सगळी यॉडलींग असलेली
७) ला इसला बोनिटा - मडाना
८) हील द वर्ल्ड - मायकल जॅक्सन
९) बॅड / डेंजरस - मायकल जॅक्सन
अजुनही बरीच आहेत आठवली की अ‍ॅडवतो रे अपुर्व.

गवि's picture

28 Jan 2015 - 4:36 pm | गवि

हील द वर्ल्ड.. आहा.

माजॅची आठवण काढलीत म्हणून..

विल यू बी देअर.
दे डोंट रियली केअर अबौट अस
गिव्ह इन टु मी.

....

तुमच्या गाळलेल्या जागा:

हॉटेल कॅलिफोर्निया हे ईगल्स या ग्रुपचं गाणं आहे.

सुझॅना हे "आर्ट कंपनी" नावाच्या बँडचं गाणं आहे.

तुमची प्लेलिस्ट झकास आहे.

विजुभाऊ's picture

28 Jan 2015 - 5:01 pm | विजुभाऊ

ए आर रहमानचे "दिल है छोटासा " वाजवून पहा लो फ्रेक्वेन्सी च्या कित्येक नोट्स ची नजाकत समजून येईल तेही बास चा तोरा न मिरवता.
ए आर रहमानची काही गाणी उदा: आवारा भवरे जो होले होले गाये, इश्क बीना क्या जीना यारो आणि विशेषतः मधुबन मे जो कन्हैया किसी गोपीसे मिले, या गाण्यातील मिक्सींगची मजा अनुभवण्यासाठी जरूर ऐका.
जुन्या गाण्यापैकी "प्यार मे मे दिलपे मार दे गोली" हे गाणे ( चित्रपट :महान ) हे गाणे त्यातील गोळीचा आवाज ऐकण्यासाठी ऐका. अक्षरशः गोळी या कानातून त्या कानात आरपार जाताना अनुभवायला मिळते.
नव्यापैकी "मनाली ट्रान्स " ऐकायचे धाडस होत नाही. पण लो वॉल्यूम वर ऐकायला मजा येईल.

ए आर रेहमान च्या गाण्यामध्ये एखादा स्पेशल मुसिक पीस अस्तोच. जोधा अकबर मधला "मनमोहना " गाणं ऐकलय?? त्यातली शेवटची बासरीची धून केवळ अप्रतिम .

प्रमोद देर्देकर's picture

28 Jan 2015 - 5:02 pm | प्रमोद देर्देकर

धन्यवाद गवि साहेब.
मला कॉलेजला जाण्याच्या दिवसांत वेळातच जी काही गाणी तेव्हा एम टीव्ही वर लागायची तीच काय ती करमणुक. यात पहिले हिंदी गाणं प्रसिध्द झाले ते बाबा सैगलचं "दिल धडके". मग अक्षय खन्ना व्हीजे असताना आणखीन इंग्लीश गाण्याची आवड निर्माण झाली. त्यात मायकल जॅ. सर्वात प्रथम क्रमांकावर.
त्याच्या बरोबर गाणी गायला यावीत म्हणुन मी त्या गाण्याचं पुस्तकही आणलं होतं त्यात निवडक २५ गाणी होती. सगळी तोंडपाठ झाली.
आणि मग जॉर्ज मायकल, ब्रिटनी स्पियर, मरिहा कॅरी, वेंगा बोईज, त्यानंतर जेनिफर लोपेझचं "Ain't It Funny" ने वेड लावले. शेवटचे एकले ते रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" तेव्हा पासुन कोणतीच इंग्लीश गाणी ऐकाविशी वाटत नाहीत. इन्स्ट्रुमेंटलमध्ये एक केनीजीची (Kenny G)फ्लुट रात्रीच्या शांत वातावरणात लावावी काय मस्त फिल येतो.

अजया's picture

28 Jan 2015 - 7:45 pm | अजया

रिकी मार्टिनचे "Livin' La Vida Loca" बद्दल तीव्र सहमती.माझी पण प्ले लिस्ट टाकतेच.या गाण्याबाबत वाचुन न राहावुन कामात असताना लिहुन जातेय!

विजुभाऊ's picture

28 Jan 2015 - 5:03 pm | विजुभाऊ

अरे हो मराठीत " अप्सरा आली " ऐका स्टीरीओची मजा काय असेल ते अनुभवायला मिळेल.
आणि र्‍हदयनाथ मंगेशकरांची " चला वाही देस" अख्खी रेकॉर्ड ऐकण्यासारखी आहे.

तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा "फर्नांडो." ऐका.

फर्नांडो... नॉस्टाल्जियाचे मोहोळ फोडलेत विजुभौ.. वैट्ट आहात. कॅन यू हियर द ड्रम्स फर्नांडो..म्हणताना मागे जे ड्रम वाजतात ते..

अ‍ॅबाच्या "आय डू आय डू आय डू" ने कायतरी वेगळ्या जमान्यात पोचल्याचा भास होतो..

"निना प्रेटी बॅलेरिना"ही तसंच.

एम्पईथ्री किती केबीपीएसची आहे त्यावर आवाजाची स्पष्टता आणि बारकावे असतात ना?

हा त्या एमपीथ्रीचा फ्लो रेट किंवा इमेजच्या रिझोल्यूशनसारखा भाग असतो का? म्हणजे तितके बाईट डेटा प्रत्येक सेकंदासाठी दिलेला असतो ?

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 5:42 pm | वेल्लाभट

320 बिटरेट वाली एमपी३ पुरेशी क्लरिटी देते. १२८ वाली तितकी नाही. साभ्यस्ती हा फरक कळणारही नाही पण हाय फ्रिक्वेन्सी साउंड जसं की सिम्बल, किंवा झांज इत्यादी याकडे लक्ष दिलं तर कळू शकेल

सुखी's picture

28 Jan 2015 - 5:47 pm | सुखी

बरोबर.
flac (Free Lossless Audio Codec) या प्रकारामधे जर फाइल मिळाली तर Hi-Fi system वर आइकुन पाहा.

नाखु's picture

28 Jan 2015 - 5:14 pm | नाखु

"शान"मधील दोस्तोंसे हे गाणे आवडले होते ऐकले म्यु.सि. वर (अर्थात मित्राच्या)

सुखी's picture

28 Jan 2015 - 6:00 pm | सुखी

१. The Shruti Box मधल Nadia
२. I'm Shipping Up To Boston - Dropkick Murphy (गिटार नाद्या बाद आहे)
३. Ian Ritchie - Lonely Planet Theme (बरीच variety आहे)

अद्द्या's picture

28 Jan 2015 - 6:09 pm | अद्द्या

Poets of the fall
Lincin park
nickelback

यांच कुठलंही गाणं .
आणि मग रेहमान . . आणि किंवा मग सरळ "माझे माहेर पंढरी " लावा . तेवढेच खुश करून गेले . तर साउंड सिस्टीम साउंड आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 9:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पोएट्स ऑफ द फॉल आणि लिंकीन पार्क बद्दल सहमत. ह्यामधे सिस्टीम ऑफ अ डाऊन, फोर्ट मायनर आणि ग्रीनडे पण अ‍ॅड करा माझ्या बाजुनी :)

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 6:16 pm | वेल्लाभट

कोक स्टुडियोतील काही निवडक गाणी
पाकिस्तानमधल्या को.स्टु मधील
आबिदा - निगाह-ए-दरवाईशां
बुल्लेया
जुगनी

या तीन गाण्यांनी तुम्हाला ट्रान्स मधे 'नाय' नेलं तर सांगा.

आपल्या कोक स्टुडियोतील
ज़रिया - ए आर रेहमान (एकच कल्ला गाणं)
सुंबरान - नंदेश उमप

तूनळी सोडून दुसरी लिंक देता येईल का? हपीसात तूनळीला बूच मारलंय.

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 6:25 pm | वेल्लाभट

नाहीतर ईमेल द्या गाणी पाठवण्यात येतील :)

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2015 - 11:58 am | प्रमोद देर्देकर

@ आदुबाळः- अहो मग cooltoad1.com ला जावुन बघा नक्की चालेल ती साईट. सगळ्या भाषेतील गाणी आहेत त्या साईटवर.

आनन्दिता's picture

28 Jan 2015 - 8:34 pm | आनन्दिता

जरिया खरच कहर गाणं आहे. ऐकता ऐकता च वेड लागेल असं वाटतं.

हाडक्या's picture

28 Jan 2015 - 9:53 pm | हाडक्या

या बाबतीत अगदी बाडिस हो..
मी तर ऐकल्यावर येता जाता सगळ्यांना ऐकवत होतो. (बायको वैतागली होती ऐकून ऐकून ;) )

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 6:19 pm | वेल्लाभट

मोठ्ठ्या आवाजातच ऐकायला मस्त असं सूफी गाणं. सूफी म्हणा, उपशास्त्रीय म्हणा.... माहीत नाही. पण आबिदाचा आवाज आणि गायकी वेड लावते.

गाण्याचं नाव - रांझण (मेंडा दिल रांझण रावल मंगे) रांझा रांझा करदी ..नव्हे.

झांज कसली वाजते समेवर..... आहाहा !

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:17 pm | पगला गजोधर

१. वी विल रॉक यु ---क्वीन्स
२. हॉटेल कालीफोर्निया - इगल्स
३. इट्स बिन हार्ड डेज् नाईट - बीटल्स
४. बोहेमियन ऱ्हांप्सोडी, डा हस्त
५. पापा डोंट प्रीच, अमेरिकन लाइफ - मडोना
६. स्वे विथ मी - डीन मार्टिन
७. स्ट्रेंजर्स इन द नाईट - फ्रांक सिनात्रा
८. आय कान्ट गेट यु औट ऑफ माय हेड - कायली मिनोग
९. व्हेनेव्हर व्हेरेवर, धिस टाईम फोर आफ्रिका -- शकिरा
१०. उप्प्स आय डीड इट अगेन - ब्रिटनी स्पिअर्स
११. आय म कमिंग उप, सो बेटर गेट दिस पार्टी स्टार्तेड -- पिंक
१२. बेबी टोक टू मी - जेनिफर लोपेझ
. .
… क्रमश:

विजुभाऊ's picture

28 Jan 2015 - 7:20 pm | विजुभाऊ

गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच.
आणखी "मामा मिया ,पीपल नीड होप.." वगैरे वर लिहुया का एकदा

हाडक्या's picture

28 Jan 2015 - 9:55 pm | हाडक्या

गवि, आबाचं " द विनर टेक्स इट्स ऑल" ऐकले असेलच.

माझ्या मते, गविंचा (की वल्लींचा?) एक अख्खा लेख या गाण्यावर वाचल्याचं स्मरतंय.. :)

वल्ली? तो औरंगजेब कसला लिहितोय गाण्याविषयी!?

हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे)

प्रासचा असेल तो लेख.

हाडक्या's picture

30 Jan 2015 - 10:31 pm | हाडक्या

औरंगजेब

अस्सं नका हो बोलू. बर्‍याच जणांचा फेवरिट आगोबा आहे तो. ;)

हां वल्लीनं लिहिलंन तर एकाच गाण्याविषयी लिहील "गीत गाया पत्थरोंने" (हे गाणं नसेल तर चुभूदेघे)

हा याबद्दल सहमत.

प्रचेतस's picture

31 Jan 2015 - 9:24 am | प्रचेतस

=))

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:26 pm | पगला गजोधर

१३. व्हेन आय गेट ओल्डर …. वेव्हीन द फ्लाग ---के नान
१४. उन दोस त्रेस … मारिया -- रिकी मार्टिन . .
… क्रमश:

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:53 am | वेल्लाभट

वाव दोन्ही खलास गाणी ! वेव्हिंग फ्लॅग तर....... अर्र्र्र.... शब्द खुंटले.

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:28 pm | पगला गजोधर

१५. ऑल नाईट ऑल राईट ---पीटर आंद्रे .
… क्रमश:

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:35 pm | पगला गजोधर

१६. मस्ती की पाठशाला, चित्रलेखा (चोर चोर - ठीरुडा ठीरुडा (तमिळ)), तुमको टाडा --- ऐ आर रेहमान

… क्रमश:

चित्रलेखा नाही हो. चन्द्रलेखा. (गाण्याचे नाव कोंजम कोंजम) पिक्चर तमिळ मध्ये थिरुडा थिरुडा.
तेलुगु मध्ये दोंगा दोंगा.

आणि त्यातली डान्सर हिरवीन अनु अगरवाल. (पहिल्या आशिकीतली)

पगला गजोधर's picture

29 Jan 2015 - 8:00 pm | पगला गजोधर

चंद्रलेखा…. ड्यूली नोटेड …. भावनेच्या भरात टायाप्ताना गडबडलो … धन्स.

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:38 pm | पगला गजोधर

१७. हाय रामा ये क्या हुआ, जान में दम --- ऐ आर रेहमान
… क्रमश:

हाय रामा ये क्या हुआ गाण्यात मधे एक म्युझिक पीस आहे. वीणा, सतार, सरोद काय आहे ते सम्जत नाही, पण ए. आर रेहमान टच आहे.. निव्वळ अप्रतिम!!!

पगला गजोधर's picture

28 Jan 2015 - 7:45 pm | पगला गजोधर

तोबा तेरा जलवा, तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी )
… क्रमश:

पगला गजोधर's picture

29 Jan 2015 - 12:18 pm | पगला गजोधर

१९. धिस इज द एंड- स्कायफॉल - ऐडल
२०. टायटल सॉंग - लॉ अन्ड ओर्डर (ओरीजनल ) , लॉ अन्ड ओर्डर (क्रिमिनल इंटेन्षण )
२१. टायटल सॉंग - शेरलॉक होल्म्स (ग्रेनाडा १९८७-९२)

क्रमशः …

तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार …। तेरा इमोसनल अत्याचार --(चित्रपट: देव डी )

आर कोनतरी बोल्ला राव या गाण्यावर …. माझ्या अमेरिकन मित्रांना हे गान आईकावतो म्या…म्यारेज सॉंग म्हनून .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2015 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही घरी मस्त निवांत असलो की जरा म्हणजेच मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडतात. वर उल्लेख झालाय तसा सुफी गाणी आवडतात, (नुसरत फतेह अली तर लै म्हणजे लै भारी) ढोलकी आणि आवाज. कव्वाल्याही वाजवायला आवडतात. वादा करके न आना बहुत बुरी बात है, मैने मासुम बहारोमे तुम्हे देखा है. कैलाश खेर... असं बरेच काही.

आवडीने लिहूच... छान धागा. धन्स.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

28 Jan 2015 - 8:39 pm | सौंदाळा

कितने अरमाण माण माण माण.. जाने तेरे वास्ते सोणिये होले होले, मुझको याद सताये तेरी
झांझरीया उसकी छनक गयी

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 10:56 pm | वेल्लाभट

अवोलनेशन चं सेल
थ्रिफ्ट शॉप चं मॅकलमोअर
डेव्हिड टवारे चं कॉल मी बेबी
आर.आय.ओ चं शाईन ऑन
अ‍ॅड्रियन सिना चं एन्जल
अ‍ॅक्सेन्ट चं लव्हर्स क्राय
शॉन पॉल - शी डजन्ट माईंड

ही अप्रतिम अहेत.....

पिवळा डांबिस's picture

28 Jan 2015 - 11:12 pm | पिवळा डांबिस

बेर्लिनचं 'टेक माय ब्रेथ अवे' किंबहुना ते गाणं असलेल्या टॉप गन चित्रपटातलं सगळंच संगीत आणि पार्श्वसंगीत.
मी होम थिएटर बनवतेवेळी साउंड सिस्टम खरेदी करतांना त्या ऑडिओ स्पेशालिस्टने वेगवेगळ्या साउंड सिस्टममधील फरक दाखवतेवेळी हे म्युझिक वाजवून दाखवलं होतं आणि फरक कसा जाणायचा ते शिकवलं होतं...

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:20 am | वेल्लाभट

टॉप गन थीम अनेक वेळा माझी रिंगटोन असते

एकाच आल्बममधे सर्वच्या सर्व साउंडट्रॅक्स उत्कृष्ट असल्याची दुर्मिळ उदाहरणं असतात. टॉप गन त्यापैकी.

थ्रू द फायर.. माइटी विंग्ज .. ही तर जबरदस्त फायरी गाणी आहेतच.. टेक माय ब्रीथ अवे हे सॉफ्ट पण ताकदीचं गाणंही आहे, आणि प्लेइंग विथ द बॉईज हे वेगळ्याच मूडचं गाण.. तेही फेवरिट.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 8:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिंकिन पार्क- मेटीओरा
लिंकिन पार्क- मिनिट्स टु मिडनाईट
लिंकिन पार्क- हायब्रिड थिअरी
---

ह भ प's picture

15 Feb 2015 - 3:38 pm | ह भ प

लिन्किन पार्क सोबत मेटालिकाचं द डे दॅट नेव्हर कम्स..
कोल्डप्ले - मेसेज, अ रश ऑफ ब्लड टू द हेड, अ व्हिस्पर, क्लॉक्स , द साईंटिस्ट
एमिनेम - मॉकिंग बर्ड
ब्लॅक आईड पीज - डोंट स्टॉप द पार्टि
ग्रीन डे - बोलिवर्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्स, वेक मी अप व्हेन सप्टेंबर एन्ड्स
कॉर्न - कमिंग अनडन, समबडि समवन, फ्रीक ऑन लिश
मेटालिका - फ्रँटिक, शूट मि अगेन, आई डिसअ‍ॅपिअर
आयर्न मेडन - ब्लड ब्रदर्स
रॅमस्टेन - फ्युअर फ्रै (नीट वाचताच येत नै यान्चि नावं)
..
नुकतीच आइबॉल तरंग २.१ घेतली.. (कालच खरंतर).. निस्ता दणदणाट..

पिवळा डांबिस's picture

28 Jan 2015 - 11:15 pm | पिवळा डांबिस

भारतीय गाणं जर हवं असेल तर "आया तेरे दरपे दीवाना". सिनेमाचं नांव आता आठवत नाही पण त्यात शहारूख खान आणि प्रीटी झिंटा होते. त्या गाण्यातल्या लो आनि हाय दोन्ही फ्रीक्वेन्सीज मस्त वाजतात!!!

बहुगुणी's picture

29 Jan 2015 - 12:12 am | बहुगुणी
वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:20 am | वेल्लाभट

हे आया तेरे दर पे बरं का, जरी चित्रपटात घेतलेलं असलं तरीही अहमद हुसेन मोहम्मद हुसेन यांची ही कव्वाली ऐकून बघाच. केवळ कमाल !

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 3:07 am | पिवळा डांबिस

अ‍ॅक्च्युअली हे गाणं मी पहिल्यांदा माझ्याकडे एक सूफी गाण्यांचा सहा सीडीजचा अल्बम आहे त्यात प्रथम ऐकलं. मग ते हिन्दी चित्रपटातही पाहिलं.
पण मला त्या सूफी आल्बमचं नांव पटकन न आठवल्यामुळे मी चित्रपटाचा रेफरन्स दिला.

सिरुसेरि's picture

28 Jan 2015 - 11:17 pm | सिरुसेरि

ए र रहमान - रंगीला रे , मंगता है क्या ,उर्वसी उर्वसी , मुक्काला मुकाबला , चंद्रलेखा , दिलसे रे , जिया जले , छय्या छय्या , हम्मा हम्मा , तुहीरे , कहनाही क्या ,वंदे मातरम , ओ हमदम सुनियो रे .

मराठी - झटकून टाक ती राख , अष्टविनायका तुझा महिमा कसा , प्रथम तूला वंदितो .

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:22 am | वेल्लाभट

रहमान च्या नमूद केलेल्या गाण्यांना +१

अदि's picture

29 Jan 2015 - 10:46 am | अदि

टेलिफोन धुन मे हसने वाली..

भावना कल्लोळ's picture

29 Jan 2015 - 3:01 pm | भावना कल्लोळ

ओ भँवरे देखो इन दीवानो को- दौड़, जय हो, रिंग रिंग रिंगा - स्लमडॉग मिलेनियर ही गाणी सुद्धा साउंड सिस्टम वार भन्नाट वाटतात. हा धागा काढल्याबद्दल धन्स. खूप आवडीचा विषय.

https://soundcloud.com/au5

ब्रेकिंग बॅड ह्या टीव्ही सिरीजचे रिमीक्स
https://www.youtube.com/watch?v=nsYg1uXgdug

त्याने केलेली बाकीचीही काही रिमिक्सेस ऐकण्याजोगी आहेत.

deadMau5 ची गाणी.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2015 - 11:40 pm | मुक्त विहारि

१. जवानी जानेमन ===> नमक हलाल
२. दम मारो दम्मा ====> हरे क्रुष्ण हरे राम
३. सुरु रु सुरु रु ===> तेरे बिन
४. थोडा दारू विच प्यार मिला दे ===> तेरे बिन
५. मेहबूबा ===> शोले
६. मैं चली मई चली ====> पडो़सन
७. दिलबर ==> कारवा (मला जरी हे गाणे आवडत असले तरी त्यावर्षीचे फिल्म फेयर अवार्ड मात्र "पिया तू अब तो आजा" हे कारवातीलच ह्या गाण्याला मिळाले.

८. सजना है मुझे ====> सौदागर (तद्दम फालतू सिनेमातील एक उत्तम गाणे)

९. आप जैसा कोई ===> कुर्बानी

आणि हे सर्वोत्तम

१०. दुनिया में ====> अपना देश

१. कभी तनहाइयों में युं हमारी याद आयेगी - या गाण्याची सुरुवातच जबरद्स्त आहे
२. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है - एका कडव्यात १२ वेळा एकच आवाज रिपिट आहे बेकार लागते थेट काळजात
३. नाट्यगीतं विशेषतः ज्यात फक्त तबला आणि ऑर्गन / पेटी किंवा सारंगी आहे, -
४. निवडुंगची सगळी गाणी - वा-यानं हलते रान, तुझे सुनसान आणि (ती हिरॉईन कॉलिंग गवि).
५. रझिया सुलतान मधलं ऐ दिल ए नादान - स्रुरुवातीचा सायलेन्स, ऐकण्यासारखा सायलेंस.

अजुन बरीच आहेत..

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Feb 2015 - 10:56 am | llपुण्याचे पेशवेll

4. Nivadungachi nayika mhanje Archana Joglekar

होय रे पन्नासराव. काढलीस खपली..?! ..

..पुन्हा पुन्हा मनात खळबळ का माजवायची..? नकोतच त्या आठवणी :)

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2015 - 9:51 am | प्रमोद देर्देकर

अरे वा वेल्ला तु पण अबिदाच्या गाण्याचा दिवाना आहेस तर?
थोडी फार उपशास्त्रीय असलेली गाणी ऐकायला खुप बरी वाटतात.

मागे एकदा गुलजार यांचे सुत्रधार (Anchor) असलेला कार्यक्रम मुंबईत झालेला त्यातली अबिदा परवीनची गाणी मला मिळाली
फक्त पहिली दोन गाणी तर लाजवाब काय आवाज लागलाय
१) सोऊ तो सपने सुनु - यामध्ये संतुर जबरद्स्त याला गुलजार यांच्या प्रस्तावनेतील काही ओळी अशा आहेत
कबीर को पढते जाओ- परत खुलती जाती है. आबिदा को सुनते रहो- सूरत खुलती जाती है. ध्यान लग जाता है, इबादत शुरू हो जाती है, आँखें अपने आप बंद हो जाती है. कभी इन्हे सामने बठ के सुनें. आँखें खोलो तो बाहर मे नजर आती है, आँखे मुन्दो तो अंदर मे..'

२) मन लागो यार फकिरी मे - या मध्ये ढोलकी/तबला मस्त याला प्रस्तावना करताना ते म्हाणाले की
सूफियों का कलाम गाते गाते आबिदा परवीन खुद सूफी हो गयी. उनकी आवाज़्‍ा अब इबादत की आवाज़्‍ा लगती है. मौला को पुकारती है तो लगता है की हां, इनकी आवाज जरूर उस तक पहुचती होगी.
वो सुनता होगा- सिदक सदाकत की आवाज़्‍ा. आबिदा कबीर के मार्फत पुकारती है उसे, हम आबिदा के मार्फत उसे बुला लेते है'

आणि अजुन तिची " या अलि अलि" , "दमा दम मस्त कलंदर" ही तबला / ढोलकी साठि ऐकावीत.

दुसरी अशीच गाणी धुम मचाले मध्ये रिचा शर्मा हिने गायली होती , तर मराठीतील सारेगमप मध्ये लहान मुलांच्यात प्रथमेशा लघाटे तर मोठ्यांच्यात मुरबाडचा कोणीतरी होता त्याने " देव विठ्ठाल तिर्थ विठ्ठल" मस्त गायलं होतं.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:25 am | वेल्लाभट

हो आबीदाचा फॅन आहे. जबरदस्त गाते ती.
तिची ही गज़ल ऐकून बघा, फैज़ ने लिहिलेली

'नही निगाह में मंज़िल तो जुस्तजू ही सही
नहीं विसाल मयस्सर तो आरज़ू ही सही'

यसवायजी's picture

29 Jan 2015 - 10:11 am | यसवायजी

रेमो फ्ल्यूट किक
पटाका गुड्डी
गुरु-माहिया माहिया
नमक इश्कका
कजरा रे
फुलले रे क्षण माझे
माएरी,
कभी आना तो मेरी गली
पांडुरंग कांती
लल्लाटी भंडार लावण्या

अदि's picture

29 Jan 2015 - 10:34 am | अदि

Enrique Iglesias ला विसरुन कसे चालेल म्हणते मी.. त्याचे "हिरो" पण मी ढाण ढाण आवाजात ऐकु शकते.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:40 am | वेल्लाभट

सगळीच गाणी. तरीही विशेष आवडणारी

एस्कापार (इंग्रजी व्हर्जन नव्हे)
आलाबाओ
अ‍ॅडिक्टेड
वन नाइट स्टँड
डोन्ट टर्न ऑफ द लाईट्स
आणि रिदम डिव्हाईन

गवि's picture

29 Jan 2015 - 10:42 am | गवि

त्याचे Solo en ti ऐकलेय ना? बाकी सारे मागे पडेल..

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2015 - 12:57 pm | प्रमोद देर्देकर

वेल्ला तुला लाख धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल कारण आता धाग्यात उल्लेखलेली पण संग्रही नसलेली सगळी गाणी ऐकणारच.

@ गविसाहेबः- आत्ताच Solo en Ti' ऐकलं व्वॉव आपण तर आता त्याची सगळी गाणी डाऊन लोड करणार.
@ विजुभाऊ - तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा "फर्नांडो." ऐका.>> दोन्ही ही गाणी ऐकली मस्तच त्यातली
फर्नांडो गाण्याचे शब्द आहा काय भावार्थ सुंदर आहे.
@ वेल्ला :- अबिदा परवीन चे अजुन एक " वो हमसफर था मगर उससे हम नवाsssई नथी" ऐकच.

अजुन काही गाणी
वर बहुगुणी यांनी म्हंटल्या प्रमाणे वीरझराची सगळी ए वन क्लास,
१) साथिया साथिया - सिंघम - श्रेया घोषाल - पहिली ३० सेकंदाचा म्युझिक पीस जबरद्स्तच.
२) तुझमे रब दिखाता है - यातील सुरवातीचा संतुर आणि गिटारचा सुंदर मिलाफ ठेका धरायला लावतो.

अजुन जसजशी आठवली तर अ‍ॅडवतो नंतर.

खरेतर आबावर एक सुंदर लेख कुणीतरी टाकला तर फार उत्तम.माझा तितका अभ्यास नाही.

प्रासदादाने लिहिलाय आधीचः

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

http://www.misalpav.com/node/20040

शिवाय आवडत्या इंग्लिश गाण्यांचा हाही एक धागा आहे, थोडेसेच प्रतिसाद असलेला पण लिस्ट चांगल्या आहेत काही.

http://www.misalpav.com/node/12733

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2015 - 4:06 pm | प्रमोद देर्देकर

गवि त्या प्रासासाहेबांच्या धाग्याकरिता धन्यवाद मी आत्ताच अ‍ॅबाची सगळी गाणी डाऊनलोड करुन घेतलीत सगळ्यात जास्त आवडले ते "नोविंग मी"
अजुन आठवली
१) Bailamos " Enrique Iglesias -
२)"शो मी द मिनींग ऑफ बीईंग लोनली". - बॅकस्ट्रीट बॉईज आणि इतर सगळी. पण हे जास्त आवडले.
३) हार्टबीट हार्टबीट व्हाय डु यु फेल- -जॉर्ज मायकल
४) केअरलेस व्हिस्पर- जॉर्ज मायकल
५) हिंदी अग्निपथ मधले "अभी मुझमे कही"

हार्टबीट हार्टबीट व्हाय डु यु फेल- -जॉर्ज मायकल

याचप्रमाणे जुने "हार्टबीट, व्हाय डू यू मिस" (बडी होली) हेही पहा:

बोनीएमचं "स्टिल आय अ‍ॅम सॅड" हे सर्वोत्कृष्ट आहे, त्यांच्या नेहमीच्या बाजापेक्षा वेगळं.

हे मुळात यार्डबर्डस नावाच्या बँडचं आहे. पण बोनीएम व्हर्शनही मस्त आहे. डोळे मिटून ऐकायचं.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 4:55 pm | वेल्लाभट

एक व्हर्जन ग्रेगोरियन या बँडचंही आहे. ऐकून बघा मस्त आहे. बोनी एम सहीच. प्रश्नच नाही.

कुसुमावती's picture

29 Jan 2015 - 12:29 pm | कुसुमावती

हिरो
रिदम डिव्हाइन
रींग माय बेल्स
सम बडी
बायलांदो (एस्पॅनॉल)
बायलामोस
पिंग पाँग साँग
एस्केप

क्लास आहेत.

एडवर्ड मायाची बहुतेक सगळी गाणी - Desert rain ,Violet Light

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 11:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडं आपली आपली असते. माझी आवडती शो-ऑफ गाणी

इंग्रजीमधे

1. Daddy Yankee- Rompe (Bass is awesome)
2. Linkin Park- Points of Authority
3. Linkin Park- Breaking the Habit
4. Linkin Park- Papercut
5. Linkin Park- No more sorrow
6. System of A down- Aerials
7. System of A Down- Chop Suey
8. System of A Down- B.y.o.b.
9. Ricky Martin- The cup of Life
10. Ricky Martin- Livin Livida loca
11. Britney Spear- Ooops I did it again
12. Britney Spears- Toxic
13. Britney Spears- You drive me crazy
14. Shakira- She wolf
15. Daddy Yankee- Gasolina
16. Poet of the fall- Carnival of Rust (laiiiiiiiiiiiiiiiiiiiiich jast bhari)
17. Poet of the fall- Poet and the muse (laiiiiiiiiii bhari)

यादी बरीचं मोठी आहे. नंतर व्यनि करतो बाकी गाणी.

अदि's picture

29 Jan 2015 - 11:33 am | अदि

तर झकासच आहे. Gasoli ठिक शिक आहे.. Jason Derulo चे talk dirty to me पण चांगले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 12:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

कार्निवल ऑफ़ रस्ट ऐकत अपाचे एनएक्सटी मधे पेल लागर बियर चा पिचर अन मुर्ग मलाई कबाब मंचिंग मधे! स्वर्ग!!

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 1:25 pm | कपिलमुनी

linkin park : somewhere i belong

linkin park numb

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 12:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

मायला! हा धागा कसा सुटला असेल बरं नजरेतुन? !! असो!! काही गाणी आमची ही चॉइस आहे ती सांगतोय
१.द वर्ल्ड ऑफ़ आवर ओन - वेस्ट लाइफ
२.रॉक द पार्टी - बॉम्बे रॉकर्स
३.आफतों के परिंदे -इशकजादे
४.आरंभ - गुलाल
५.आयला रे आयला, नाना ची टांग - खट्टामीठा
६.आलू चाट - ओएसटी
७.द कॉल - बैक स्ट्रीट बॉयज
८.कार्निवाल ऑफ़ रस्ट - पोएट्स ऑफ़ द फॉल
९.कलर ब्लाइंड -दरायास
१०.दिल्ली हार्डकोर - नो वन किल्ड जेसिका
११.डू यु नो - एनरिके इग्लेशियस
१२.डोंट बी शाय माय हनी - मौलिन रुज
१३.क्रोवलींग - लिंकिन पार्क
१४.इट्स माय लाइफ - बॉन जो व्ही
१५.ग्रीन डे- बुलेवार्ड ऑफ़ ब्रोकन ड्रीम्स
१६.आय लाइक टू मूव इट- मेडागास्कर
१७.रेमेम्बेर द नेम - माइक शिनोडा
१८.सम्व्हेर आय बिलोंग - लिंकिन पार्क
१९.नथिंग एल्स मैटर्स - मेटालिका
२०.जोकर एंड द थीफ - वुल्फमदर
२१.यु स्पिन माय हेड राउंड - फ्लो रीडा
२२.गेट माय मनी राईट-फिफ्टी सेंट्स
२३.फीडर- बक रॉजर
२४.हैप्पी वैलेंटाइन्स डे- बिली बॉय ऑन पाइजन
२५.लूज योरसेल्फ- एमिनेम

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 12:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक आयला रे आयला सोडलं तर सगळी गाणी आवडतात ह्यातली.

अजुन काही गाणी

१. एमिनेम-रॅप गॉड
२. एमिनेम- विदाउट मी
३. एमिनेम- नॉट अफ्रेड
४. गु गु डॉल्स- लाँग वे डाउन
५. ग्रीन डे- वेक मी अप व्हेन सप्टेंबर एंड्स

माझ्यासारखे गेमाडपंथी असाल तर खालची काही गेममधले म्युझिक ट्रॅक्स पण आवडतील,

१. कॉन्फ्लिक्ट अ‍ॅट द एंट्रंस (प्रिन्स ऑफ पर्शिया: सँड्स ऑफ टाईम)
२. स्टेक्स आर हायर (नीड फॉर स्पीडः मोस्ट वाँटेड ब्लॅक एडिशन)
३. गोईंग डाऊन ऑन इट (नीड फॉर स्पीडः ६ हॉट परस्युट २)
४. नाईन दाउ (नीड फॉर स्पीडः मोस्ट वाँटेड ब्लॅक एडिशन)
५. रुल्स ऑफ एंगेजमेंट (डेव्हील मे क्राय ५)
६. कर्स्ड एंजल्स अँड ब्लेस्ड डीमन्स (डेव्हील मे क्राय ५) जब्राट गिटार अ‍ॅड्रेलिन रश होतो.

आठवेल तशी अजुन टाकीन.

तुषार काळभोर's picture

29 Jan 2015 - 12:42 pm | तुषार काळभोर

मोठ्ठ्या आवाजात आणि चांगल्या 'बेस'सहित ऐकावीत अशी..
मराठी: सध्या अजय-अतुल( माउली-माउली, मला जाऊ द्याना घरी, खेळ मांडला, बायगो-बायगो, मल्हारवारी, मोरया-मोरया), अवधूत गुप्ते (झेंडा)
हिन्दी: बाप्पी लहरी (देव त्यांचं भलं करो!)(यारबिना चैन कहां रे, तम्मा-तम्मा), ए आरः (ए हसीं वादियां, याई रे-रंगीला, )
अ-भारतीयः रिकी मार्टीन (लिविन दा विदा लोका, कप ऑफ लाईफ, मारिया),
आणि... मार्टिन गॅरिक्सचं अ‍ॅनिमल (हे ऐकाच!!)

तिमा's picture

14 Feb 2015 - 10:32 am | तिमा

आमचा विंग्रजी गाण्यांशी परिचय नव्हता. म्हणून आमच्या एका हिरवट म्हातार्‍या मित्राने आम्हाला, खास अमेरिकेहून टेप करुन आणलेलं, 'पुश इट पुश इट सम मोअर' हे चावट गाणं ऐकवलं होतं. हय का वो कुनाकडे ?

गवि's picture

14 Feb 2015 - 10:42 am | गवि

http://youtu.be/Dc-6-7lOJlI

.हे का बघा..

तिमा's picture

14 Feb 2015 - 2:27 pm | तिमा

तेच ते!

वेल्लाभट's picture

14 Feb 2015 - 11:11 am | वेल्लाभट

अ ला लाँग हे असावं ते....
अ ला ला ला ला लाँग
अ ला ला ला ला लाँग
अ ला ला ला ला लाँग लाँग ले लाँग लाँग लाँग

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 12:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

यूफोरिया चं समदं!!
१.धुम पिचक धुम
२.माएरी
३.कभी आना तू मेरी गली

घाटावरचे भट's picture

29 Jan 2015 - 2:33 pm | घाटावरचे भट

रेहेमानच्या 'ओ भवरे'चा उल्लेख न दिसल्याने हळहळ वाटली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 5:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

सेल्टिक म्यूजिक, बैगपाइपर चा तिखट आवाज असलेले काहीही!! आयरिश मधे डबलाइनर्स, द कोर्स (Corrs) चे "Toss the feathers" निव्वळ अप्रतिम!!!

स्वच्छंदी_मनोज's picture

29 Jan 2015 - 7:12 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच धागा... वाखू ठेवण्यासारखा..

अजून काही -
- ईगल्सच - हॉटेल कॅलिफोर्नीया, यातला गिटारचा शेवटचा एक्स्टेंडेड पीस अप्रतीम
- लुईस आर्मस्टाँग - व्हॉट अ वंडारफुल वर्ल्ड (ओरीजीनल आणी केनी जी असे दोन्ही वर्जन्स), अप्रतीम शब्द आणी भन्नाट रस्टीक आवाज.. हे गाण मादागास्कर च्या पहील्या भागात अप्रतीम सिच्युएशनला वाजत.. निव्वळ जबरदस्त..
- एमीली चा सगळा साउंडट्रॅक.. यान टीअरसेनने कमाल केलीय.
- कान्ट हेल्प फॉलींग इन लव्ह चे युबी वर्जन... भन्नाट
- शायना ट्वेनची सगळी गाणी
- एल्टन जॉन चे - फ्रेंड्स नेव्हर से गुड्बाय - अप्रतीम शब्द आणी साजेसा आवाज
- ब्रिटनीचे - आय एम नॉट अ गर्ल, नॉट येट अ वूमन - अप्रतीम शब्द
- वेनेसाचे - अ‍ॅबसोल्युटली एव्हरीबडी - कधीकाळी स्टार वर्ल्डची प्रमोशनल थीम होतं हे गाण, तेव्हा पासून य गाण्याचा फॅन
- सेलीन डायॉन चे - दॅट्स द वे इट इज - अप्रतीम inspirational शब्द आणी आवाज.

आजून बरीच आहेत प्ले लिस्ट मधली.. सवडीने टाकतो..

गवि's picture

29 Jan 2015 - 7:51 pm | गवि

..अरे या निमित्ताने अत्युत्कृष्ट साउंड सिस्टीम रेकमेंड करा की..गरज आहे.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 7:56 pm | वेल्लाभट

काही प्रश्न असा काहीसा धागा होता त्यात विषय झाला होता याबद्दल. बघा बरं मिळतो का.

मला आवडणा-या / किंवा विश लिस्ट वर असलेल्या
यामाहा, बोस, डेनॉन, फोकल, क्लिप्श, किंवा हर्मन कार्डन

कार मधे फोकल आहे. आणि तोड नाही त्याला ! आहाहा ! कार साठी हवी असेल तर फोकल चा पर्याय पारखून बघा स्वतः आणि ठरवा. एक नंबर आहे.

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 3:15 am | पिवळा डांबिस

घरासाठी नवीन 'बोस ऑकोस्टिमास १०'!
अफलातून आहे!!!
माझा ही नवीन सिस्टम घ्यायचा (काकूला गाफील पकडून!) प्लान आहे... ;)

अकॉस्टिमास प्रश्नच नाही ! एकच नंबर !
फक्त क्वालिटी का पैसा भी है बहोत. :) पण हौसेला मोल नसतं... तेंव्हा बघाच

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 9:52 am | पिवळा डांबिस

क्वालिटी चांगली हवी असेल तर पैसेही द्यायला लागतात हो, तेंव्हा त्याचं विशेष नाही.
प्रॉब्लेम काय आहे की जेंव्हा मी सध्याची सिस्टम घेतली तेंव्हा बोसचे स्पीकर्स खूप बल्की यायचे.
सराउंडींगला ते शोभणार नाहीत म्हणून मी त्यावेळी सोनीची सिस्टम घेतली. विचार असा की चार-पाच वर्षांनी ही बिघडली की नवी घेऊ!
पण साली ती मोडायला तयार नाही. आता ती तशीच रिप्लेस करायची तर काकू मोड ऑन
"अरे पण ही चालतेय ना चांगली? मग ती बदलायची कशाला? ही मोडली की बदल ना!" काकू मोड ऑफ.
आता ती मोडेपर्यंत काय वाट बघत राहू? :(
म्हणून म्हंटलं की जरा पाडवा, व्हॅलेंन्टाईन डे वगैरे असं काहीतरी शोधलं पाहिजे निमित्त!!! ;)

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 11:14 am | वेल्लाभट

म्हंटलं की जरा पाडवा, व्हॅलेंन्टाईन डे वगैरे असं काहीतरी शोधलं पाहिजे निमित्त

हे बेस्ट ! शोधा शोधा.

त्यावरून आठवलं.....
गेली .....पंधरा वर्ष मी माझ्या पीसी ला एकच तगडी सिस्टीम जोडलेली आहे. ज्यांच्या ज्यांच्या कानावर तिचा आवाज पडला त्या सगळ्यांनी 'आयला कुठले स्पीकर आहेत रे?' हे विचारलेलंच्च आहे.

एम.ई.पी.एल. म्हणजेच म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड यांची ती सिस्टीम आहे. २.१ चॅनेल. १००० वॅट. लाकडी केसिंग.
अशक्य दमदार आवाज. दु:ख याचं की आता उत्पादित होत नाही. कंपनी तरी आहे का अस्तित्वात, तेही माहीत नाही.
असो.

जेंव्हा केंव्हा पुढची सिस्टिम घ्यायची वेळ येईल तेंव्हा वर म्हटलेल्या पर्यायांचा विचार करेन.

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 12:46 pm | वेल्लाभट
पगला गजोधर's picture

29 Jan 2015 - 8:17 pm | पगला गजोधर

२२. मैं ऐसा क्यु हुं …(लक्ष )

क्रमशः

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2015 - 8:33 pm | टवाळ कार्टा

danza kuduro

मस्त नविन गाणी मिळाली.बरीचशी आवडीची पण विसरली गेलेली नव्याने मजा देऊन गेली.यु अाॅल मेड माय डे!

जिंदा हूं मै - टायटल साँग

जिस्म - चलो तुमको लेकर चले

ए आर रेह्मानने रंग दे बसंती मधे ह्या गाण्यावरून उचलेगिरी केली होती. ब्लॅक हॉक डाऊन ह्या चित्रपटात हे गाणे वापरले आहे.

मिथून आणि फक्त मिथुन

१. मौसम है गाने का (सुरक्षा)

२. देखा है मैने तुझे फिर से पलट के (वारदात)

३. कोई यहां यहा नाचे नाचे (डिस्को डान्सर)

४. जिमी, जिमी, जिमी आजा आजा आजा (डिस्को डान्सर)

५. डान्स विथ पा पा पा (डान्स डान्स)

६. ज्युली ज्युली, जॉनी का दिल तुझ पे आया ज्युली (जीते है शान से)

चिगो's picture

30 Jan 2015 - 11:35 am | चिगो

'चढ गया उपर रे, अटरीया पे लोटन कबूतर रे".. ह्यातला "गुटर, गुटर" चा कोरस म्हणजे खल्लास.. मनाला अत्यंत उल्हासित आणि प्रफुल्लित करणारी प्रेरणादायी शब्दयोजना.. आणि फुल्ल आवाजात वाजवल्यास त्रासदायक शेजार्‍यास मानसिक क्लेश देण्यासाठी हे उत्तम गाणं आहे..

तसेच "इस्पायडरमेन, इस्पायडरमेन तूने चुराया मेरे दिल का चैन" ह्यातला "ओहो ऽऽ" तर खासच.. एका ग्रामिण युवतीचं इस्पायडरमेनवरील प्रेम, तिची त्याच्याबद्दलची फँटसी आणि 'लेके आजा मारुती झेन' सारख्या शब्दातून जाणवणारी साधीसुधी स्वप्नं... प्रेम, समर्पण, प्रतिक्षा आणि कोवळी स्वप्नीलता ह्या भावना समोर मांडणारी दिलखेच पण परीणामकारक शब्दयोजना.. तेवढ्यात तोलामोलाचं संगीत. व्हिडीयोपण अत्यंत जबरदस्त.. क्या बात है ! ओहो ऽ ऽ..

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
काहीच्च्च्च्च्च्या काही गाणं आहे ते.......
अशी अनेक रत्णं भोजपुरीने संगीताला दिलेली आहेत.

हे ठाऊकच असेल....
लगाईबे जो तू लिपिश्टिक.....

जाऊदे. धाग्याला वेगळं वळण लागेल. या गाण्यात भलताच कसला शो ऑफ्फ असतो.

त्रिनिदाद, टॉबॅगो इत्यादि प्रदेशात फार पूर्वी पोचून कायमचे सेटल झालेल्या भोजपुरी आदि मोठ्या समाजाची मूळ संगीतस्टाईल तिथे पिढ्यानपिढ्या राहून काहीशी फ्युजन होऊन चटनी म्युझिक असा एक संगीतप्रकार रुढ झाला आहे असं वाचण्यात आलं.

गँग्ज ऑफ वासेपूरची संगीत दिग्दर्शिका खास या स्टाईलच्या अभ्यासासाठी या देशांमधे /बेटांवर राहिली याविषयी लेख वाचले होते. ओ वुमनिया वगैरे गाणी याच प्रकारातली आहेत.

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 12:17 pm | वेल्लाभट

हे रोचक आहे ! वाचायला/ऐकायला हवं.

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 12:12 pm | वेल्लाभट

अरे हो.
एक गाणं राहिलंच. भन्नाट गाणं आहे. हरियाणवी. हरियाणवी सगळीच चांगली असतात असं नव्हे पण अशी काही अस्सल असतात भारी.

मॅड्डम बैठ बुलेरो में... सपेशल तेरी खात्तिर ल्याया

तेरे खातिर किल्ला बेचा रोळा कर दिया घर में
शाम सवेरे जाऊं सूं मै नहा धो कर मंदिर में
हे भगवान मिला दे उससे ना चहिये धन माया

घडी बेच दी भाभी की भाई की साईकिल खाई
तेरे खातिर बाजरे की बोरी चार डिगाई
सारे घर के मारण पै गए मुश्किल से बच पाया

काय लिहू या गाण्याबद्दल !
जरूर ऐका. कल्पना करा की नवी कोरी बोलेरो तुम्ही 'मिरवत' आहात. असं मस्स्स्त वाटेल बघा !

गाडीवर क्वचितच गाणी निघतात. त्यापैकी हे एक.
यातून बोलेरो ची लोकप्रियता कळते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jan 2015 - 1:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

भलतीच जबरा लिस्ट तयार झाली आहे गाण्यांची.
धाग्याची नोंद फेवरेट लिस्ट मधे करण्यात आली आहे.
याच लिस्टमधे एक दोन अजुन

उर्वशी उर्वशी टेक ईट इझी उर्वशी
शहर की लडकी
आवारा भवरा जो होले होले गाये
सोना कितना सोना है
चुरा के दिल मेरा
ओये ओये- त्रिदेव

पैजारबुवा,

हेमन्त वाघे's picture

31 Jan 2015 - 12:46 am | हेमन्त वाघे

जे audio conessior असतात ते बोस ला विचारात नहित.
तुमचे budget काय ? आणि तुम्हाला कशा प्रकारची system पाहिजे आहे ? माझा हा छंद असल्याने ( आणि याचाच धंदा काढायचा प्रयत्न करीत असल्याने) मी सल्ला देवू शकेन. अग्नी २० हजार च्या स्य्सेम पासून ते १- १. करोड च्या स्य्तेम पर्यन्त.
बोस हि उगाच महाग आस्ते आणि बर्याचदा त्याच किमतीत चांगले वाजणारी आणि बर्याच सोयी असलेली सिस्टम येते.

आसो आणि जर special नीड्स असतील जसे कि valve tube amplifier , रेकॉर्ड प्लायेर तर जरूर साङ्ग.

असो हि बागा पुण्यात बनणारी आणि जगात बराच आदर मिळवणारी सिस्टम

http://cadenceaudio.com/productfr.html

आणि आपल्या मुंबई पुण्यात लाखां लाखां च्या सिस्टम असलेले शेकडो लोक आहेत/

हे speakers बघा . किमत US $ ६५००० -(अंदाजे रु. ४२ लाख काकत!) हे मुंबईत आहेत.

http://www.positive-feedback.com/Issue51/kawero.htm

by the way मी ऑ डी ओ चं लीक्प्रिया संकेतस्थळ hifivision.com वर पण hemantwaghe नावाने आहे

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 11:55 am | वेल्लाभट

वाघे साहेब, तुमच्याकडून अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मला या गोष्टींमधे फार जास्त रस आहे त्यामुळे तुम्हाला व्यनि करेन काही माहिती/सल्ला हवा असल्यास. हरकत नसावी असं गृहीत धरतो :)

शब्दबम्बाळ's picture

31 Jan 2015 - 2:24 am | शब्दबम्बाळ

Green Day!! माझा सगळ्यात आवडता band!! माझी विशेष आवडती गाणी-
१. Boulevard of Broken Dreams - सुपरहीट गाणं
२. American Idiot - फुल मस्ती
३. Holiday
४. Peacemaker

Good Riddance (Time of Your Life) आणि Wake Me Up When September Ends ही दोन्ही गाणी अप्रतिम आहेत!

Linkin Park ची सुद्धा मस्त आहेत गाणी विशेषकरून "In Pieces" या गाण्यात २:३६ ला जबरदस्त गिटार सोलो सुरु होतो. अंगावर काटा आलेला पहिल्यांदा ऐकताना!! :D

शब्दबम्बाळ's picture

31 Jan 2015 - 4:15 am | शब्दबम्बाळ

Michael Rosenberg म्हणजेच Passenger (स्टेज नेम) याच "Let Her Go" हे गाणं फार प्रसिद्ध झाल. ते आहे सुद्धा छान!
पण याची इतर गाणीही सुंदर आहेत. थोडासा रस्टी आवाज आणि अकोस्टिक गिटार यांची जोडी एकदम छान जमते आणि गाणी हृदयाला भिडतात.
नक्की ऐका!
१. Holes
२. All the Little Lights
३. The Wrong Direction
४. Staring at the Stars
५. Life's for the Living

बाकी म्हणाल तर
१. Afterglow - Inxs feat. Sona
२. Never Had - Oscar Isaac ("१० years" या मूवी मधली एकमेव चांगली गोष्ट!! )
३. wake me up - Avicii

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 8:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्रायन अ‍ॅडम्स- समर ऑफ ६९
ब्रायन अ‍ॅडम्स- हिअर आय एम
ब्रायन अ‍ॅडम्स- क्लाउड नंबर नाईन
ब्ल्यु- वन लव्ह
ब्ल्यु- ऑल राईझ
क्वीन्स- वुई विल वुई विल रॉक यु
पर्ल्स ऑफ म्युझिक- ट्वेंटी डॉलर्स इन माय पॉकेट
एमिनेम- २५ टु लाईफ
एमिनेम- ऑलमोस्ट फेमस
डॉन मॅक्लिन- अमेरिकन पाय
एम.एल.टी.आर.- एंजल आईज
सिस्टीम ऑफ अ डाउन- ए.टी.डब्ल्यु.ए.
एनरिक- बायलॅमोज
एनरिक- एस्केप
ब्लॅक आयेड पीस- बेबोट
ब्लॅक आयेड पीस- व्हेअर इस द लव्ह
इव्हानसिन्स- ब्रिंग मी टु लाईफ
डेरियस- कलर ब्लाईंड (ह्यातल्या बीट्स च्या प्रेमात पडायला होतं)
मार्टिना मॅकब्राईड- काँक्रीट एंजल
डी.जे. ओकावरी- फ्लॉवर डान्स
डी.जे. ओकावरी- मिस्ट्रेस ऑफ द एंपरर
सर्ज टेंकियन- स्काय इझ ओव्हर
सर्क टेंकियन- एम्प्टी वॉल्स
सर्ज टेंकिअय- द अनथिंकिंग मेजॉरिटी
सर्ज टेंकियन- लाय लाय लाय
एमिनेम- गोइंग थ्रु चेंजेस
एमिनेम- रॅप गॉड (साला ६.५ वर्ड्स पर सेकंद, ह्या माणसाला शार्क माश्याचं फुप्पुस असावं असा अंदाज आहे)
अदेमा- इम्मोर्टल्स
बॅकस्ट्रीट बॉईज- क्वीट प्लेयिंग गेम्स विथ माय हार्ट
बॅकस्ट्रीट बॉईज- शो मी द मिनींग ऑफ बिईंग लोनलीनेस
बहा मेन- हु लेट द डॉग्ज आउट
वेंगा बॉईज- शा ला ला
वेंगा बॉईज- ब्राझील
वेंगा बॉईज- वी आर गोईंग टु इबिझा
द बीटल्स- यस्टरडे
ब्रुनो मार्स- काउंट ऑन मी
ब्रुनो मार्स- जस्ट द वे यु आर
चेंतल क्रेव्हीआझक- लिव्हींग ऑन अ जेट प्लेन
फर्गी- लंडन ब्रीज
फोर्ट मायनर- रिमेंबर द नेम
द गु गु डॉल्स- लाँग वे डाउन
द गु गु डॉल्स- बुलेट प्रुफ एंजल
ग्रीन डे- अमेरिकन इडियट
ग्रीन डे- वेक मी अप व्हेन सप्टेंबर एंड्झ
ग्रीन डे- बोलुव्हार्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्स
ग्रीन डे- लव्ह
इमॅजीन ड्रॅगन्स- रेडीओअ‍ॅक्टीव्ह
इमॅजीन ड्रॅगन्स- इट्स टाईम
इमॅजीन ड्रॅगन्स- ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड
इमॅजीन ड्रॅगन्स- नथिंग लेफ्ट टु से
जेम्स ब्लंट - स्टे टुनाईट
जेस्से जे- प्राईझ टॅग
लेंका- द शो
मॅडोन- डाय अनादर डे
द मिस्फिट्स-व्हेअर इगल्स डेअर
प्लेन व्हाईट टीज- हे देअर डीलायलाह!! (प्रेमात असणार्‍या प्रत्येकानी आवर्जुन ऐकावं असं गाणं)

बाकी नंतर टाकतो =))

फिल कॉलिन्स अजून कसा नाही इथं?!?
गीतकार, संगीतकार, अॅरेंजर, बहुतेक सगळी वाद्ये स्वत:च वाजवून रेकॉर्ड करणार अाणि अतिशय छान अावाज असलेला कलाकार...
अगेंस्ट अॉल अॉड्स
सन अॉफ मॅन (टारझन)
बोथ साईड्स अॉफ स्टोरी

याच्या गाण्यातले सगळे ट्रॅक्स ऐकायचे तर म्युजिक सिस्टीमचा कस लागतो.

चिऊकाऊ's picture

31 Jan 2015 - 10:08 am | चिऊकाऊ

हिंदी :
एक हसीन निगाह का दिल पे साया है - माया मेमसाब
चोरी चोरी जब नजरे मिली : करीब
लागा चुनरी मे दाग-
होठोपे ऐसी बात : ज्वेल थीफ
इन्ही लोगोने : पाकीझा
सलाम ए इश्क़ मेरी जा : मुकद्दर का सिकंदर
छूकर मेरे मनको : याराना
आयो रे आयो रे आयो रे मारो ढोलना: (मलाईका अरोरा खान , अरबाझ खान) ?

ARR :
सुनता है मेरा खुदा - पुकार : गोड आलाप परत परत ऐकावासा वाटतो
रंग दे मुझे रंग दे - तक्षक : ड्रम्स (नक्की कोणते वाद्य आहे?) साठी
के सरा सरा : पुकार
राधा कैसे ना जले: लगान
ओ रे छोरी : लगान
घनन घन घन : लगान

मराठी:
आम्ही ठाकरं ठाकरं ठाकरं - जैत रे जैत : ड्रम
जांभूळ पिकल्या झाडाखाली - जैत रे जैत : कोरस
वाजले की बारा : नटरंग

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा : बासरीने भुंग्याचा आवाज, लताचे उंच आलाप
अरे अरे ज्ञाना झालासी पावन : लताचा उंच आवाज, टाळ - मृदंग
अजी सोनियाचा दिनु - परत लताचे आलाप
पं. भिमसेन जोशींचे अभंग

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2015 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच चांगल्या गाण्यांची यादी तयार झाली या धाग्या मुळे.
आता पर्यंत
इंग्रजी -२३८
हिंदि - १२४ (यात भोजपुरीही घेतली तर :))आणि
मराठी - २२ गाणी

म्हणजे एकुण ३८४ गाण्यांची यादी या धाग्यावर तयार झाली आहे.

यातली काही गाणी संग्रही आहेत पण आता बाकीची डाउनलोडवणे अत्यंत गरजेचे आहे.

पैजारबुवा,

सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 1:04 pm | सुहास झेले

लिस्ट व्यनि करा पैजारबुवा...

(आळशी) सुहास ;-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2015 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

या ठिकाणी क्लीकवून तुम्ही फाईल घेउ शकता.

या मधे अजुन बरेच काम करणे बाकी आहे.

जमल्यास अजुन एक व्हर्जन इकडे सेव्ह करेन.

पैजारबुवा,

सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 3:36 pm | सुहास झेले

You need permission
Your request for access has been sent. You will receive an email if, and when, the owner of this item approves your request. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2015 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 11:18 pm | सुहास झेले

वाह... It worked... धन्यवाद :)

बियर-पार्टी साठी, बॅक-ग्राउंडला, ही थीम वाजवून बघा....

https://www.youtube.com/watch?v=oUq12BRnjrI

वेल्लाभट's picture

31 Jan 2015 - 11:13 pm | वेल्लाभट

ग्रेट
मी डाउनलोड करत गेलो जसजसे प्रतिसाद येत गेले तसे. आता ही लिस्टच झालीय. सो पुढची या रेफरन्स ने डाउअन्लोड करतो. एक मस्त कलेक्शन बनेल ते गुगल ड्राईव्ह शेअर करूया.इथेच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 11:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही आयडीया मस्त आहे. ३२० ची करं शक्यतो. मलाही लिंक दे. माझ्याकडे असलेली अपलोड करीन म्हणजे.

वेल्लाभट's picture

31 Jan 2015 - 11:34 pm | वेल्लाभट

ईमेल पत्ता व्यनि करा सर

वेल्लाभट's picture

31 Jan 2015 - 11:36 pm | वेल्लाभट

हो मि शोधतोच आहे अ‍ॅज फार अ‍ॅज पॉसिबल. मिळतील तेवढी हाय्येस्ट बिटरेट वाली घेतो.

बाकी; तम्मा तम्मा तीन दिवसात १५ दा ऐकलं असेल. यड लावलंय गाण्याने. आधी माहित नव्हतं असं नाही. but it was like a rediscovery ! amazing

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Feb 2015 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकदा मदनबाणानी सुद्धा खालच्या सह्यांमधे टाकलेलं हे गाणं बहुतेक. ऐकलयं. =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Feb 2015 - 12:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

वेल्लाकाका,
गुगल ड्राईव्ह वर गाणी अपलोडवली असतील तर लिंक द्या ना.

पैजारबुवा,

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 2:43 pm | वेल्लाभट

गुगल ड्राईव्ह लिंक
https://drive.google.com/folderview?id=0B35Nl0Js8gOMU2wzS0RlNF9wX3c&usp=...

अजून प्रक्रिया चालू आहे. गाणी वेळ मिळेल तशी अपलोड करत आहे. शोधायलाही लागत आहेत काही, ३२० किंवा जास्तीत जास्त बिटरेट वाली बघतोय. कॅप्टन जॅक स्पॅरो सुद्धा गाणी अपलोड करत आहेत असं ते म्हणालेत. आणखी कुणाकडे यापैकी गाणी असतील आणि अपलोड करायची असतील तर सांगा; एडिट राईट्स देतो.

लवकरच एक छान संग्रह तयार करू !

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Feb 2015 - 5:00 pm | लॉरी टांगटूंगकर

लै लै लै धन्स वेल्लाभाई

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 5:13 pm | वेल्लाभट

स्वागत ! ! !

ब़जरबट्टू's picture

13 Feb 2015 - 9:42 am | ब़जरबट्टू

अजुन येऊ द्या...

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2015 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार

घेतली डाउनलोडवुन,
बाकीची डाउनलोडवायला लागतो.

पैजारबुवा,

केदार-मिसळपाव's picture

9 Mar 2015 - 10:55 pm | केदार-मिसळपाव

छान गाणी आहेत.

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा

तुम तो ठहरे पर्देसी...साथ क्या निभाओगे
शिरडीवाले साईबाबा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 12:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

कटोरा ;)

सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 1:02 pm | सुहास झेले

जबरदस्त धागा... पिंक फ्ल्योइड, ग्रीन डे, सिस्टीम ऑफ डाऊन, मेटालिका, लिंकीन पार्क, अद्वैता (इंडिअन फ्युजन बँड), रेहमानची सर्व गाणी विशेषतः रंगीला थीम... एक एक प्रतिसाद वाचून गाणी ऐकतोय तूनळीवर दिवस मस्त जाणार.. धन्यवाद ह्या धाग्यासाठी :)

हे काही व्हिडीओ माझ्याकडून...

१.

.
.
.
२.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लोनली डे टाकायचं राहुन गेलं माझ्या यादीत.

सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 1:08 pm | सुहास झेले
मदनबाण's picture

11 Feb 2015 - 12:20 pm | मदनबाण

@ सुहासराव
मनातले थीम दिलेत... ट्रॅक बरोबर आहे,पण इडियो मात्र हुकला ! ;)

बाकी माझ्या मनातले संध्याकाळी द्यावे म्हणतो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

या गाण्याच्या दृश्याने त्या वेळी अर्धवट वयात असणार्‍या अनेक वाईट मनांवर कोवळे संस्कार झाले.

हालहाल करण्याच्या दुष्टपणे केलाय हा डान्स त्या ऊर्मिलाने.