मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
10 Mar 2014 - 11:30 am
गाभा: 

वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे. जे काही लेखन होत त्यात लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत आणि स्मरण शक्तीवर अधिक अवलंबून आहे. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे, सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असतेच; शिवाय मराठी भाषेत जे काही प्रिंट मिडियात पुस्तके असतील अथवा वृत्तपत्रे असतील यातील जुन लेखन (अगदी कॉपीराईट फ्री झालेल सुद्धा) जसच्या तस पुरेशा प्रमाणात संदर्भांकरता ऑनलाईन उपलब्ध नाही. तसेच वर्तमानकालीन विषयातील तज्ञ (प्राध्यापक मंडळी वगैरे) सुद्धा अभावानीच लिहितात अथवा अभावानीच सहभागी होतात त्यामुळे मराठी संकेतस्थळांवरील उपलब्ध माहिती पुरेशी सखोल, तर्कसुसंगत, सकस दर्जेदार नाही बर्‍याचदा एकांगीपणाचाही मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. मराठी माहिती साठा कमी आहे म्हणून मराठी लोकांची मोठी अनुपस्थिती आहे आणि मराठी माणसांची अनुपस्थिती आहे म्हणून मराठी माहिती साठ्यात कमतरता आहेत हे एक दुष्ट चक्र आहे.

या विषयाबद्दल मिपा सदस्यांना काय वाटत ? आपल्या सर्वांची मत जाणून घेण्यास आवडतील.

प्रतिसादांकरता धन्यवाद