Skip to main content

विडंबन

पुन्हा भोन्डला (भोन्डल्याची गाणी )

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 25/03/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
(सध्या चालू असलेल्या भारत - ऑस्ट्रेलीया कसोटीतल्या ताज्या घडामोडीवर हा आमचा भोन्डला ) पात्र - वात्र परिचय स्मीथा- स्टीव स्मीथ ग्लेना- ग्लेन मॅक्सवेल नाथा - नाथन लायन रेन्शा - मॅट रेन्शा केशभूषा - गणपत हज्जाम वेशभूषा - भगवान कटपीस हाऊस विशेष आभार : चप्पल गुरुजी डी आर एस घे स्मिथा घेऊ मी कशी ? ह्या स्टॅन्ड चा त्या स्टॅन्ड्चा इशारा नाही आला ठाऊक नाही मला घेऊ मी कशी ? उठ ग ग्लेना उठू मी कशी ? डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा चेन्डू अडविला खान्दा निखळिला उठू मी कशी वळव ग नाथा वळवू मी कशी ह्या बाजूने त्या बाजूने चेन्डू वळविला टर्न नाही झाला वळवू मी कशी ? थाम्ब ग रेनशा थाम्बू मी कशी ह्या गावचा त्या
काव्यरस

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/03/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे.... (म्हटलेच होते...) सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटता नयन अन खुलताही दुसरा उमटते गाली वलय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!! 'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या सासवांना मी प्रलय म्हटलेच होते! -चतुरंग २१-३-१७
काव्यरस

इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

लेखक लीना कनाटा यांनी शनिवार, 25/02/2017 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - पिरा तैं चा धागा मूळ कविता - गदिमा चला जाउ द्या पुढे हि चर्चा अजुनी नाही धागा संपला इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! आणखी थोडा व्हिजा वाढवू काही वर्षं अजून थांबू इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! नाही गर्दी नाही प्रदूषण जीवन इथले असे विलक्षण उतरा ओझी, विसरा नाती डॉलर पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! घट्ट धरूया आपली संस्कृती सण वार अन रितिभाती ढोल ताशे जोरात वाजवू हिरव्या नोटा छापू इथेच टाका तंबू ! नॉस्टलजीक कधी होऊ आंजा वरती धागे काढू हिअर ऑर टू गो असे संभ्रमु भारत प्रेमाची नशा झिंगु इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू !
काव्यरस

परग्रह जरूर जैयो ...! (बट व्हाय ?)

लेखक लीना कनाटा यांनी सोमवार, 20/02/2017 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्यााच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा तांबड्या लोकांचे तांबडे प्रश्न (अॅज इन मंगळवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं मंगळा वर जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, मंगळाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण मंगळ ओरियंटेड वगैरे नाही. एनटी (न्यूरो टेक्नॉलॉजि) मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही मंगळा वर पोहचलो. पासप्लॅनेट वर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही.

आम्ही कोण?-निवडणूक उमेदवाराचे मनोगत (कविश्रेष्ठ केशवसुता॓ची क्षमा मागून)

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 19/02/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? आम्ही असू लाडके- "श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके // सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया अस्थैर्यातिशया अशी वसंतसे जादू करा॑माजि या पोटार्थी प्रति-सूर्य पाळु पदरी - सत्तेपुढे जे फिके // सत्तेमाजि वसाहती वसविल्या गु॓डा॑च्या कोणी बरे?
काव्यरस

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 16/02/2017 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा, व्होटर होता सभापती मधोमध उभा. व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो, देवाघरची लूट..
काव्यरस

म्हादूचं घर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 06/02/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा नक्की कौलारु का छप्पर हे सांगता यायचा नाही. पण सुर्य मात्र पिल्यासारखा तिरपा उगवायचा. अडगळीला एक ठोंबा होता. त्याच्यावर ब्याटरी मारायचा. मग म्हादू उठायचा. अडगळीचा ठोंबा उचलून आईला द्यायचा. मग त्याची आई "लवकर उठलास की रे ठोंब्या" असं म्हणायची. घराच्या शेजारीच एक मोठा गोठा होता. तिथल्या म्हशीसारखी म्हैस कोणी बघितली नसावी. ती ओट्यावर येऊन पो टाकायची. त्या पो सारखा पो कोणी बघितला नसावा. पडवीत एक मोठा गणपती होता. येता जाता म्हादू त्याच्या बेंबीत हात घालायचा. गणपतीला ठेवलेला निवद सगळ्यात आधी तोच खायचा.

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!
काव्यरस