Skip to main content

विडंबन

प्रिया आज माझी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवी यशवंत देव ( आणि अर्थातच माझी प्रिया) यांची क्षमा मागून प्रिया आज माझी नसे ताप द्याया नको बंध सारे नको टोचण्या त्या नको धास्ती आता कशा घाबरू मी हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या न भिती जीवाला न प्राणास घोर कसा आज ओठात खेळेल धूर निळी चंद्रिका मित्र संगे पहाया अशा रंगविता मनी स्वप्नराती मधु मल्लिका माधुरी स्वप्नी येती कशाला उभी ’ती’ मधे भंग व्हाया
Taxonomy upgrade extras

संध्याखंत - २

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 04/02/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता झांज हा अंगठा आमचे द्रोणाचार्य केशवसुमार यांच्या चरणी अर्पण. (एकलव्य) आजानुकर्ण आम्ही परतुनी आलो झाली होती सांज बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज नाही बिलगाया कोणी मनात येती इच्छा माडीवरती जाऊनी करावयाची का पृच्छा रंगीत बाटलीतूनी वाहतील सोनेरी धारा पेल्यात तरंगे जणू जीव अमुचा सारा रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत (ह. घ्या.)
Taxonomy upgrade extras

झांज..

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 01/02/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

तीन पत्तीच्या खेळाची

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 31/01/2008 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
अविनाश ओगल्यांनी केलेले अप्रतिम विडंबन 'चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी ' वाचून आम्हाला ही स्पुरण चढले आणि मग तात्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ही चार ओळी खरडल्या.. आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता भातुकलीच्या खेळामधली तीन पत्तीच्या खेळाची ही माझी कर्म कहाणी होते नव्हते सगळे गेले , वरती झाली देणी 'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या" पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी खूप दिसांनी जमले सगळे, भरला कोरम सारा कुणी म्ह

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...
Taxonomy upgrade extras

संथ चालते मालिका ही...

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/01/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता माझ्याभोवतीचे जग बदलत आहे ! ....................................... चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे ! ....................................... आत आत खोल काही बदलत आहे ! चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे ! नवे नवे होते तेव्हा कडू लागलेले... भरदिवसा नंतर मग घडू लागलेले... थोडे उभे दिसू, थोडे पडू लागलेले... हळू हळू पिणे मजला उकलत आहे....! 'पुन्हा पुन्हा पिणे' केला हाच नारा माझा झोकांडत ठेवला मी सदा तारा माझा वाहू दिला मदिरेच्या मी जारा माझा ...मला सारे करायाची सवलत आहे ! घर

खाऊ नाही तर मरू

लेखक मीनल गद्रे. यांनी गुरुवार, 24/01/2008 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या गाण्याच्या चालीवर पुढील काव्य गावे. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू शरीराच्या त्या गरजेसाठी यज्ञकर्म ते करू खाऊ नाही तर मरू,खाल्ल नाही तर मरू खाऊ नाही तर मरू लढतिल सैनिक , लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/01/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी हातात बांधलेला, तो मोगरा असावा लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो? की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 22/01/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन. सिच्युएशन अशी.. जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन, `...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत. वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर... मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले.
Taxonomy upgrade extras