Skip to main content

विडंबन

..ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा..ई-डंबन

लेखक बेचवसुमार यांनी बुधवार, 06/08/2008 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
.....स्व.सुरेश भटांची माफी मागुन.....त्यांच्या "रंग माझा वेगळा" ह्या रचनेचे ई-डंबन ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी ह्या बाटल्या येता पुढे
मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा
राहती माझ्यासवे हे बेवडे भूतांपरी कोणते हे मद्य ज्याचा लागला आम्हा लळा
कोणत्या काळी कळेना मी उठाया लागतो
लुडकणारा मी कुठेही ठार ऐसा वेंधळा
सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा बेवडा मी फाटका मी अस्थि

(चाहूल)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 06/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी अनिरुद्ध अभ्यंकरांची हळुवार'चाहूल' आम्हालाही लागत होती आणि त्या प्रणयधुंद काळानंतरची वास्तवाची चाहूल आम्हाला लागली ती अशी! आमच्यापाशी मूल सोडून काही कामानिमित्त गावाला गेलेली बायको दूरध्वनीवरुन विचारते आहे सगळे ठीक आहे ना? किरकिरे तुझे ते मूल मला चाहूल सतत कानाशी होईल पहाट बदलतो कूस पुन्हा जराशी चालीत कसा मी मंद गात्रात कुंद दिवसाचा हा असाच चाले दिवस मास उत्सव रडण्याचा आकंठ रडे ते झोळीत मुते खोलीत तिथे ओल तो स्पर्श नको मज नको बोबडे बोल हे स्वप्ना परी वाटे पण नसे खोटे बोलू कुणाशी थोपटले निजून मी मूल लवंडलेले उशाशी चतुरंग
Taxonomy upgrade extras

मी डेटिंग केले नाही..!

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 06/08/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही. मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही. भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना, कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना. मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा. मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही. मी डेटिंग केले नाही.. बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी. सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो. मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. मी डेटिंग केले नाही अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
Taxonomy upgrade extras

मालवुन टाक दीप... ई -डंबन

लेखक बेचवसुमार यांनी मंगळवार, 05/08/2008 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
ती "मूड" मध्ये असताना आणि तो मूड मध्ये नसताना"मालवुन टाक दीप"..आणि ती "मूड"मध्ये नसेल तर... (स्व.सुरेश भटांची माफी मागुन...) ---------------------------------------------------------------- मालवू नकोस दीप..चेतवू नकोस अंग.. बंद ठेव राजसा..तुझे "पिसाट" रंगढंग..
होऊनि जरा निवांत..बैस आज धूळखात..
टाक मोडुनी उद्या..रे खुशाल तू पलंग..
दूर दूर तारकांत..दातओठ खातखात.. पछाडतोय चांदण्यांस..दुष्ट चंद्र जंगजंग..
ते तुला बरे कळेल..फक्त तुझेच रे जळेल..
स्व

जत्रा..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 05/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
अविनाश ओगले यांच्या "जत्रा" या सुंदर गझलेचे विडंबन... ओगले साहेब क्षमा असावी..! ("वधूवर मेळावा" नावाच्या जत्रेला) उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा. दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा. नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या, वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा. झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे. चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा. वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर, प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा. आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा. स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ? -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(जत्रा)

लेखक केशवटुकार यांनी मंगळवार, 05/08/2008 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजची टुकारी ओगल्यांची जत्रा. टुकारी करायच्या आधी सर्किटरावांच्या या इनिशिएटिव्ह ने प्रभावित झालो (जत्रा) जाल कविकिरडुंच्या करतात येथ जत्रा पडतात विडंबने तरी भरतात येथ जत्रा ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा ती कला का दयाळू झाली अशी कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा आल्या भरुन संत्रा, देशी आणि विदेशी मारुन फक्त गप्पा सरतात येथ जत्रा आता पुढील शहरी पुन्हा नवीन ठाल्या चंद्रावरी कधीतर भरतील येथ जत्रा. -केशवटुकार

(एक पेग संपून गेला..)

लेखक केसुरंगा यांनी सोमवार, 04/08/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती फडणीस यांचा 'एक क्षण निसटू गेला..' वाचून एक निसटलेला क्षण आम्हालाही आठवला! ;) हिरव्यागार बाटलीच्या तोंडाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र बर्फावर.. ओतलेल्या पिंटभर सोड्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. ग्लासात आणि मनात! एकाच वेळी!! चिअर्स!!! डोके हलके करणारी अजून एक मैफल लगोलग आत गेलो.. वाट बघत बसलेले काजू गोंजारले.. हळूच शर्टची बटणे मोकळी केली.. आणि गेलो.. तोंड ओले करण्यापुरतं पेग आणायला.. तो पेग तो क्षण!!! येव्हड्यात पिऊन झाला.. छ्या!!! जाऊदे! मूड आहे आज! म्हणताच ग्लास मोकळा झाला... अजून एक पेग संपून गेला.. केसुरंगा
Taxonomy upgrade extras

((नेहेमीच...तुझ्यामुळे))

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
'नेहेमीच ... तुझ्यामुळे' ही बेसनलाडवाची कैफियत वाचून अगदी भरुन आले, ऊर्मी बराचवेळ दाबून ठेवली पण मळमळ थांबेना तेव्हा शेवटी इथे आलोच! आदतसे मजबूर दुसरे काय?! ;) वृत्तात 'भांग' अर्थास 'टांग' नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेत घोळ घालावी खोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कमरेत खूर डोळ्यात पूर नेहमीच ... तुझ्यामुळे सगळे कसे (फसले असे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांची लाच शब्दांना लाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिलाच 'बार' पहिलीच 'धार' नेहमीच ... तुझ्यामुळे वाचून झीट विडंबन धीट नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेची भेट 'चतुरंग' थेट नेहमीच ... तुझ्यामुळे चतुरंग
Taxonomy upgrade extras

)) नेहमीच ... तुझ्यामुळे ((

लेखक बिनडोक बनी यांनी सोमवार, 04/08/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ घेतो चिकार नेहमीच ... तुझ्यामुळे घालतो घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कानांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे गाली ठसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिली धार चढते फार नेहमीच ... तुझ्यामुळे सोड्याचा वीट घेतोय नीट नेहमीच ... तुझ्यामुळे बनीची भेट विडंबन रेट नेहमीच ... तुझ्यामुळे - बिनडोक बनी
Taxonomy upgrade extras