मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

गुंफता कवन हे

वेल्लाभट ·

पैसा 25/08/2014 - 15:38
मस्त प्रयोग! सर्व कवींना मनापासून शुभेच्छा! सहज सुचलेल्या माझ्या २ ओळी.
मनात अधुरे स्वप्न जागते कधी अचानक जाता जाता क्षणी पापणी भिजून जाते कधी अचानक जाता जाता
(मी फक्त सुरुवात करून दिलीय. बाकीच्यांकडून अजून येऊ द्या!)

अजय जोशी 25/08/2014 - 19:21
आपणांस गझलेतील रदीफ-काफियाबद्दल फारशी माहिती नाही असे दिसते. आपण ज्याला काफिया म्हटलेले आहे तो उपरोक्त मतल्यामध्ये रदीफ म्हणून वापरला गेला आहे. उदाहरणादाखल माझी गझल पहा... वारे जरासे गातील काही येतील काही, जातील काही यामध्ये, 'काही' हा रदीफ असून, जातील, गातील, आणि पुढे.. हातील वगैरे... हे काफिये आहेत. त्यामध्ये, आतील हे यमक आहे आणि आ ही अलामत किंवा स्वरचिन्ह आहे. आपण दिलेल्या... तोच चेहरा आठवतो मज, कधी अचानक जाता जाता पाय असा हा अडखळतो मग, कधी अचानक जाता जाता या ओळींत, ''कधी अचानक जाता जाता'' हा रदीफ आहे. कारण, त्यातील कोणतेही अक्षर न बदलता तो जसाच्या तसा दोनही ओळींत शेवटी आला आहे. आता राहिला काफिया. तुम्ही सादर केलेल्या मतल्यात काफिया शब्दरूपी नसून त्याला स्वरकाफिया म्हणतात. ''मज'', ''मग'' हे काफियाचे शब्द आहेत. मात्र, प्रत्येक शब्दाच्या शेवटी ''अ'' हा स्वरकाफिया म्हणून घेतला आहे. म्हणजे, मतल्यातील ''मज'' आणि ''मग'' हे काफियाचे शब्द म्हणून मान्य केल्यास... पुढे "बघ", "तर", "फट" असा कोणताही शब्द वापरता येईल, जे गझलच्या तंत्रात तंतोतंत बसत नाही. म्हणून, "अ" हा स्वरकाफिया बहुतेक लोकांना अमान्य आहे. तुमच्या दुसर्‍या मतल्यात, रडतो कुणी भुकेला, त्याचे कुणास काय अपुला असो की परका, त्याचे कुणास काय ''त्याचे कुणास काय" हासुद्धा काफिया नसून रदीफ आहे. तसेच याही मतल्यात काफियासाठी... भुकेला, परका असे शब्द वापरल्याने "आ" हा स्वरकाफिया आहे. मात्र, तो सर्वमान्य आहे. त्यामुळे तो घेता येईल. आणखी एक, अपुला असो की परका यातील "की" हा ह्रस्व "कि" हवा. तरच ते व्रुत्तात बसेल. पैसा यांनी दिलेली द्विपदी तंत्रशुद्ध नाही. कारण काफिया चुकला आहे. असो. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..! मी नुसत्या शुभेच्छा देणार नाही. तर पुढील प्रतिसादात आपल्या दुसर्‍या मतल्यावर शेरही देत आहे...

In reply to by अजय जोशी

वेल्लाभट 25/08/2014 - 21:05
माझी माहिती तुटपुंजी/चुकीची असण्याच्या शक्यतेला पूर्णपणे मान्य करून आपल्या सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार करीत आहे. तुमच्यासारख्या जाणकार, विद्वान लोकांशी होणा-या संवादातूनच ज्ञानवृद्धी होते यात तिळमात्र शंका नाही. आभार.

अजय जोशी 25/08/2014 - 19:47
मी, ललगा लगा लगागा गागा लगाल गाल असे वृत्त घेतले आहे... बरसून पावसाचा आला निरोप काल अन आज तो रुसावा, त्याचे कुणास काय

नमस्कार मंडळी, एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे. गुंफता कवन हे उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल. याकरिता, दोन काफ़िये दिले जात आहेत.

मढे मोजण्याला

गंगाधर मुटे ·

एस 29/07/2014 - 15:21
आवडली कविता. पण सर्वच कडव्यांचा अर्थाच्या दृष्टीने मेळ बसत नाही. अर्धी कविता वेगळी आणि उरलेली अर्धी वेगळी वाटतेय. असोत. पुढील कवितेस शुभेच्छा.

In reply to by एस

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:26
ही कविता नसून गझल आहे. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. एका शेराचा दुसर्‍या शेराशी अर्थाचे दृष्टीने काहीही संबंध नसतो.

म्हैस 31/07/2014 - 17:32
आवडली .
जवानीत होता उतावीळ श्रावण अता फ़ागही ना विचारीत त्याला
फ़ाग म्हणजे ?

गंगाधर मुटे 01/08/2014 - 15:19
इथे देवळाच्या चिखल भोवताली स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला हा शेर कळत नाहीये किंवा उलगडत नाहीये म्हणून हा शेर चुकला आहे, असे काहिंनी मत व्यक्त केले आहे. त्या निमित्ताने या शेराविषयी थोडासा उहापोह. (खरं तर कवीला आपल्या काव्याचा उलगडा करण्याची वेळ येऊच नये.) कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे. शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते. भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यासारख्या शहरांना आणि शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... "इंडिया"ला शासकीय "अभय" आहे म्हणून "तिथे" स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून "इथे" सारं काही बकाल आहे. असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

प्रबंध

वेल्लाभट ·

आयुर्हित 01/08/2014 - 22:06
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.

काव्यरस
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक

अस्थी कृषीवलांच्या

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 12/06/2014 - 03:59
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे. - गंगाधर मुटे ----------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ... एकी कडे तुम्ही म्हणता की
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
आणि दुसरी कडे म्हणता की
बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 12/06/2014 - 23:15
मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 09:16
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज
देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 11:08
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

In reply to by गंगाधर मुटे

सुनील 13/06/2014 - 11:35
अर्थातच नाही! पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही. परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:30
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.
अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.

In reply to by गंगाधर मुटे

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.
आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 13/06/2014 - 12:58
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 15/06/2014 - 21:04
कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे 12/06/2014 - 04:02
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.. विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ... पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,....... - देश हादरून जावा, किंवा - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात, किंवा - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी, किंवा - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत...... अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है? चलो, इस बहाने आबादी तो घट रही है! . . है ना दोस्तो?????????? -----------------------------------------------------------------------------

आयुर्हित 12/06/2014 - 11:57
सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो. खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे. बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे. "4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

आयुर्हित 12/06/2014 - 12:42
नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः -'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी - महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे - शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य - ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे - रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे - महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू - शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा - गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज - रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज - सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. -आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे -पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday. Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce. Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check. Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said. "We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use. He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise. Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 12/06/2014 - 22:57
प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे. मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे. मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे 13/06/2014 - 00:00
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 13/06/2014 - 09:32
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण... Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB. संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list { Updated: July 9, 2012 00:23 IST } जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ? एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे 13/06/2014 - 21:11
Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे. ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला. ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 14/06/2014 - 11:56
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे 14/06/2014 - 22:50
ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात .... ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी... .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण 28/08/2014 - 21:50
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो. मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो... दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

माहितगार 15/06/2014 - 17:05
गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे. देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल. आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन. अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे 15/06/2014 - 17:41
माहितगारजी, तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही. मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे. कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. असो. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार 15/06/2014 - 18:32
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.
अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

आयुर्हित 15/06/2014 - 23:35
कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल" "जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

आयुर्हित 31/07/2014 - 14:23
''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली. कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले.. *हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा. *पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे. *भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत. *शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

गंगाधर मुटे ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:45
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

In reply to by माहितगार

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन 14/04/2014 - 17:11
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

In reply to by धन्या

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 00:56
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 01:49
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:31
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:23
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:28
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:02
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:08
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by drsunilahirrao

गंगाधर मुटे 16/04/2014 - 12:04
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 18/04/2014 - 18:16
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 18/04/2014 - 20:16
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

In reply to by गंगाधर मुटे

मृगनयनी 18/04/2014 - 23:05
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 11:57
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:33
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 18:47
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 19/04/2014 - 18:51
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 19:11
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 19:39
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:16
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2014 - 08:12
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 12:01
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

In reply to by धन्या

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 13:00
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:36

तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

In reply to by माहितगार

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 20/04/2014 - 08:01
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

पोटे 18/04/2014 - 09:06
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

आयुर्हित 18/04/2014 - 20:53
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 19/04/2014 - 20:15
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत

ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 19/04/2014 - 20:28
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:56
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:42
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

शुचि 18/04/2014 - 23:54
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

In reply to by शुचि

मृगनयनी 19/04/2014 - 19:16
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

पैसा 19/04/2014 - 19:38
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

In reply to by पैसा

मृगनयनी 19/04/2014 - 20:21
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

पैसा 19/04/2014 - 22:01
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

In reply to by पैसा

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

गंगाधर मुटे 20/04/2014 - 12:55
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

In reply to by गंगाधर मुटे

बालगंधर्व 20/04/2014 - 14:21
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बालगंधर्व 20/04/2014 - 17:58
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

किसन शिंदे 20/04/2014 - 22:58
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 20/04/2014 - 23:38
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

प्यारे१ 20/04/2014 - 20:04
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर

रंग आणखी मळतो आहे

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 23/03/2014 - 00:46
मुळात आपल्या राज्यात स्वतंत्र हवामान खातेच अस्तित्वात नाही. ज्या हवामानावर संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याबाबत राज्यात स्वतंत्र खाते असू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हवामान अंदाज आणि त्यासाठी आवश्यक असणा-या तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण फार मागे आहोत. हवामानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे कोणाला महत्त्वच वाटत नाही, ही शोकांतिकाच आहे. गारपीट, वादळ, दुष्काळ यांसारखी एखादी आपत्ती ओढावली की, तात्पुरते उपाय केले जातात. परंतु नंतर पुन्हा त्याबाबत काही बोलले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही आणि पुढे अशी स्थिती आली तर काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. या आधीही महाराष्ट्राला वादळी पाऊस, अतिवृष्टी याचा फटका बसलेला आहे. पण तरीही आपण यातून धडा घेत नाही. संकट आले की, तात्पुरते बोलायचे आणि वेळ गेली की, चुप बसायचे, अशी आपल्याकडची अवस्था आहे. मुळात अशी नसíगक आपत्ती आली तर काय उपाय करायचे किंवा या आपत्तींची माहिती आगाऊ मिळण्यासाठी काय उपाय करायचे, याबाबतची यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याकडे आíथक तरतूदही खूपच कमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. तरीही हवामानासारखा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकारचे हवामान खातेहेदेखील ब्रिटिशांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याचे आधुनिकीकरण करणे हे आपले काम आहे. त्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या-राज्यात हवामान खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्या राज्याने आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पण आपल्याकडे तसे काहीच होत नाही. २०१२मध्ये महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवली होती. प्यायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण पावसाळा सुरू झाला आणि हा प्रश्न मागे पडला. परिणामी, अजूनही या समस्येवर ठोस असा कोणताही उपाय केलेला दिसून येत नाही. साभार:हवामान विभागाचे सक्षमीकरण आवश्यक

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

टिकले तुफान काही

गंगाधर मुटे ·

अनुप ढेरे 28/12/2013 - 09:49
भाषेत गर्जनेच्या आवेश मांडला पण; किरकोळ आमिषाला फसले तुफान काही
हे वाचून मनसेच्या टोल वाल्या आंदोलनाची आठवण झाली

गंगाधर मुटे 19/07/2016 - 22:57
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. गंगाधर मुटे तोच आहे मात्र २०१३ आणि २०१६ मध्ये मिसळपावच्या स्वभावात किती फरक पडला आहे ते स्पष्ट होईल. @इथे मिसळपावचा अर्थ मिसळपावरिल एक कंपू/एक झुंड असा घ्यावा. एक कंपू/एक झुंड म्हणजे मिसळपाव नव्हे हेही लक्षात घ्यावे.

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

चीन विश्वासपात्र नाही

गंगाधर मुटे ·

अर्धवटराव 21/07/2013 - 10:03
कवितेची धार दिवसेंदिवस अधिक अभय होत चालली आहे. जे काहि स्थित्यंतर तुमच्यातल्या कविला दिसतय आणि पुढील संघर्षाची दिशा काय असेल याबद्दल एखादा लेख टाका साहेब. कवितेला समर्थ समीक्षेची जोड हवी. पण तुमच्या शिवाय इतर कोणि वास्तववादी समीक्षा देखील करु शकणार नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

गंगाधर मुटे 21/07/2013 - 22:56
अर्धवटराव, सध्या संघर्ष देखील दिशाहीन आणि पोरका झाला, असे काहीसे चित्र आहे. बघुयात भविश्यात काय वाढून ठेवले आहे ते.

कविता कळली मजला, अगम्य त्यांत काही नाही, 'त्यांच्या' सारखा शब्दांचा, उगीचच खेळ नाही. चांगली आहे, आवडली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

गंगाधर मुटे 21/07/2013 - 23:03
आपले नाणे..बद्द बद्द बद्द आहे म्हणून तर कोणीतरी विश्वासार्ह असावे, अशी आशा आपण बाळगतो. नाही तर जशास तसे नसतो का वागलो? :)

In reply to by निवांत पोपट

गवि 22/07/2013 - 14:41
निपोंशी सहमत.. मुटेकाका, तुम्हीदेखील मिकाप्रमाणे एक स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहे. त्यामुळे ही कविता कुच जम्या नही अशी भासली. मुख्य म्हणजे गझलेसारखा फॉर्मॅट घेऊन ओळी पूर्ण करताना चवैतुहि फार आले आहेत. पण त्याचवेळी मुटेकाकांशीही सहमत. कारण प्रत्येक रचना ही प्रत्येक वाचकाच्या मनाला एकसारखीच अपील होणारी असेलच असं नाही. पुढील कवितेच्या प्रतीक्षेत.

गंगाधर मुटे 22/07/2013 - 13:53
आज सकाळ मधली बातमी "चीनची पुन्हा कुरापत - ५० चीनी सैन्य लडाकमध्ये घुसले!" (स्वगत : या चायन्यांनो या! आपले स्वागत आहे. तिथेच का बरे थांबलात? आणखी पुढे या. आम्हाला कश्याच्चा म्हणून प्रॉब्ल्रेम नाही. आम्ही आमच्या दिनचर्येत मस्त मशगूल आहोत. ;) )

मदनबाण 25/07/2013 - 17:06
चीन विश्वासपात्र नाही हॅहॅहॅ... च्यामारी मला आत्ता पर्यंत आपले राजकारणीच विश्वासपात्र नाही असे वाटत होते,त्यात आता चीनी भाई पण सामिल झाले का ? {प्रेमश्युई यक्स्परर्ट };)

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही

शब्दबेवडा

गंगाधर मुटे ·

वेल्लाभट 10/07/2013 - 16:54
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो
क्या.... बात है ! क्या बात है! खल्लास!

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो