काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in पुस्तक पान
22 Feb 2011 - 4:53 pm

प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल?
उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.

प्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी?
उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा.

प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ?
उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा.

प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो.
उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो.

प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही.

खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.

प्रतिक्रिया

तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता. >> कशा??

आता नाही काढता येत स्वतःला. पूर्वी खरड डिलीट करता येत असे.

खरडवही बंदपण करता येत नाहीय :-|

चुकून दोन वेळा लेखन पोस्ट झाल्यास काय करावे?
एक लेखन काढून कसे टाकायचे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2018 - 1:38 am | डॉ सुहास म्हात्रे

तेच लेखन चुकून दोनदा प्रसिद्ध केले गेल्यास संपादकांना त्यातील एक काढून टाकण्याची विनंती करता येते. हे व्यनीने किंवा लेखाला दिलेल्या एका प्रतिसादात केले तरी चालते.

Post var दिली जाणारी नवीन कमेंट ही सर्वात शेवटी दिसायला हवी म्हणजे जास्त शोध घ्यावा लागणार नाही

स्मिता दत्ता's picture

19 Aug 2019 - 4:53 pm | स्मिता दत्ता

मी ब्लॉग ची व अन्य लिंक जोडू शकते का ?