पाककृती
मधातील मेवा फळं
'भुकेला कोंडा नि नीजेला धोंडा' असे म्हणतात. मला भूक लागल्यावर शोध लावलेला 'कोंडा' हा बघा!
आंब्याचा बदामी हलवा
नमस्कार मंडळी,
मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.
साहित्यः
आंबा इडली
मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती.
सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी.
खड्डा कोंबडी! (बेगर्स चिकन व्हेरिएशन)
चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला.
भुजणं/भुजणे
ही रेसिपी एका मिपा मैत्रिणीला हवी होती. मग इथेच दिली म्हणजे इतरांना पण उपयोग होईल.
भुजणं अनेक प्रकारे बनवतात. ते जाडसर असतं. मुख्य घटक कांदा, आलं, लसूण, ओले खोबरे, कोथिंबीर आणि ओल्या हिरव्या मिरच्या हे हवेतच. मी ज्या प्रकारे बनवते ती कृती इथे देते आहे. मी फक्त बोंबलाचे भुजणे बनवते. परंतु बटाटा, वांगे, पापलेट, कोलंबी ह्याचे पण बनवता येते.
तर बोंबलाचं भुजणं अशा प्रकारे...
आंब्याचे सासम/सासव
सध्या मिपावर आंबा पाकृचा पाऊस पडतोच आहे तर आपण पण थोडे भिजवुया या प्रांजळ विचाराने प्रेरित होउन ही पाकृ देते आहे. ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.
आंब्याचा शिरा
आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!
साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.
(आंब्याचे भरीत )
प्रस्तावना : खरे तर आम्ही आमची ही सीक्रेट रेसीपी येथे शेयर न करण्याचा निश्चय केला होता. पण श्रीश्री.
आंब्याची कढी
साहित्यः
पाऊण लिटर ताक,
दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस,
जिरं,
मोहरी,
कडीपत्ता,
हिंग,
दोन मिरच्या बारीक चिरून,
साखर मीठ आवडीनुसार
कृती:
ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा.
साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची.
थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं.
आंबा कलाकंद
साहित्यः १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या.
माझे सत्तुचे प्रयोग (छायाचित्र दिलेली नाहीत)
आंब्याची भजी"
कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते...
पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते...
"आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल...
रातांब्याचं (कोकम) पन्हं
साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.
चला बनवुया मट्ण खिमा
साहित्य :
१. मटण खिमा १/२ किलो
२. ४ मोठे कांदे बारीक चिरुन
३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन
४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे)
५. २ तमालपत्र
६. ५-६ मिरी दाणे
७. तेल
८. हळद
९. लाल तिखट
१०. गरम मसाला
११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला)
१२. मीठ
१३. बारीक चिरलेली कोथिंबिर
चला तर मग करुया सुरुवात.
ब्राह्मणी मटन मसाला
ब्राह्मणी मटण मसाला.....
असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शेअर करत आहे
.................
साहित्य...
मटण १/२ किलो
एक मोठा कांदा चिरलेला
तेल
दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र
लवंगा आदी खडा मसाला.
गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो
तिखट मिठ
मॅरिनेट साठी........
बचकभर कोथिंबीर
- ‹ previous
- 24 of 122
- next ›