परसाकडून पॉटीकडे
मल, मलविसर्जन ही संकल्पना आपल्याकडे एकंदर थेट उल्लेख न करण्याजोगी मानली जात असावी. त्यामुळे विष्ठा किंवा मल या शब्दांशी संबंधित जे बोलींतले शब्द आहेत त्यांचा प्रयोग असभ्य मानला जाऊन सभ्य लोकांत, चारचौघांत, भद्र भाषेत त्यासंदर्भात सांगायचे झाले तर ती क्रिया जिथे केली जाते त्या स्थानाचा उल्लेख करण्याची पद्धत पडली असावी. कालांतराने त्या जागेला दिलेले नावच विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ झाले. पण गंमत अशी की एकदा तो शब्द जनमानसात रूढ झाला की त्याला अशिष्ट समजले जाऊन त्या जागी नवा शब्द वापरण्यात येऊ लागला.
परसाकडं हा शब्द ग्रामीण भागात भरपूर वापरण्यात येतो. डॉक्टर पेशंटला 'परसाकडं कशी होते?' असा प्रश्न विचारतात, तेव्हा तो शब्द विष्ठेला समानार्थी असतो. पण या शब्दाकडे पाहिले तर सहज लक्षात येते, आपल्याला परसाकडे( घरामागे, वाडीत) जायचे आहे म्हणजे मलविसर्जन करून यायचे आहे असे हा शब्द सुचवतो. पूर्वी घरामागे वाडीत किंवा शेतात जाऊन यायचे त्यामुळे परसाकडे जाणे म्हणजे मलविसर्जन करायला जाणे हा प्रयोग प्रचलित झाला. हळूहळू परसाकडं हा शब्द विष्ठेला समानार्थी झाला. 'परसाकडं लागली', 'परसाकडं होत नाही', असे बोलण्याचालण्यात येऊ लागले.
याचप्रमाणे तुलनेने जरा सभ्य वा सोज्वळ समजला जाणारा संडास हा शब्दही आता विष्ठेला समानार्थी समजला जात असला तरी त्याचाही मूळ अर्थ मलविसर्जन करण्याची जागा, शौचकूप, असाच होत होता. संडासाचाही मूळ अर्थ लोपला जाऊन नवा अर्थ रूढ झाला.
हिंदीत वापरण्यात येणाऱ्या टट्टी या शब्दाची कथापण अगदी अशीच आहे. टट्टी म्हणजे तागाच्या जाड्याभरड्या कापडापासून बनलेली ताटी! 'टट्टी की आड में शिकार खेलना' म्हणजेच ताटीआडून शिकार करणे(- लपूनछपून काम करणे) या म्हणीत टट्टी चा हा अर्थ दिसून येतो, तसेच 'धोखे की टट्टी' म्हणजे छद्म आवरण इथेही टट्टी म्हणजे ताटी. तर पूर्वी सर्वत्र ताटीचा आडोसा मलविसर्जनास वापरला जायचा. ( आडोशावरून आठवले, मराठीतही 'आडोशाला जाणे' हा प्रयोग मी ऐकलाय.) त्यावरून कालांतराने टट्टी हा शब्द विष्ठेसाठी वापरण्यात येऊ लागला.' अबे तेरा मुंह है या टट्टी?' वगैरे प्रयोगात टट्टी शब्द शौचकूप या अर्थाने येतो आणि ' हर काम में टट्टी कर के आ जाता है!' इथे विष्ठा या अर्थाने येतो.
उर्दूचा प्रभाव असलेल्या भागात पाखाना हा शब्दही असाच विष्ठेला समानार्थी होऊन गेलाय. पाखाना हा शब्द मूलतः टॉयलेट, वॉशरूम या अर्थाने होता(फारसी 'पा' म्हणजे पाय.). पाखाना आणि त्याचा अपभ्रंश होऊन तयार झालेले इतर शब्द म्हणजे पैखाना, पखाना, पायखाना हे सगळे शब्द आता नुसतेच वॉशरूम या अर्थाने वापरण्यात येत नाहीत तर विष्ठा या अर्थानेसुद्धा वापरण्यात येतात.
टट्टी, पैखाना, परसाकडं या शब्दांवर गावंढळ, ग्राम्य चा शिक्का बसल्यावर नव्यानेच आलेल्या 'संडास' चा स्वीकार आपण केला. शहरांतून हा शब्द ग्रामीण भागातसुद्धा झिरपला. नंतर इंग्रजीची तोंडओळख झाल्यानंतर 'लॅटरिन' हा शब्द सुशिक्षित जनता वापरू लागली. इंग्रजी लॅटरिन चा खरा अर्थ आहे शौचकूप पूर्वी 'संडास लागली, लॅटरिन जातो' अशी वाक्यरचना केली जायची ती कालांतराने 'लॅटरिन लागली' अशी होऊ लागली. 'लॅटरिन'सुद्धा विष्ठेला समानार्थी झाला.
त्यानंतर शब्द आला 'पॉटी'. पॉटी शब्द मला नव्वदोत्तरी जागतिकीकरणाने दिलेला शब्द वाटतो. शहरी, इंग्रजी माध्यमात बऱ्यापैकी रुळलेल्या नवमध्यमवर्गाला पॉटीने बराच आधार दिला. तर, ही पॉटी म्हणजे 'चेम्बरपॉट'चं लघुरूप!( लघु/दीर्घशंकेचे शमन करायला वापरण्यात येणारे भांडे म्हणजे चेम्बरपॉट.) मुख्यत्वे लहान मुलांना 'ट्रेन' करायला जे पॉट वापरत त्याला पॉटी म्हणण्यात येऊ लागले. भारतात हा शब्द आला तो विष्ठा या अर्थानेच. लहान मुलांचा तर पॉटी हा विशेष आवडता शब्द बनला. लॅटरिन कठीण आहे आणि पोरांना संडाससारखे 'देसी' शब्द कसे शिकवावेत या शहरी नवमध्यमवर्गात नकळत रुजलेल्या मानसिकतेतून पॉटी हा शब्द आपल्या मुलांसोबत 'कम्युनिकेट करताना' फ्रिक्वेंटली वापरण्यात येऊ लागला. मग हा शब्द 'मुलासंगे मॉमीस खास लागला' आणि तिच्याही तोंडी बसला. पॉटी म्हणत लहानाची मोठी झालेली पिढी आता मोठेपणीही इन्फॉर्मल संभाषणात लॅटरिनऐवजी पॉटी प्रिफर करते. हिंदी पट्ट्यात टट्टीपासून सुरु झालेला, पाखान्यापासून सुरु झालेला प्रवास आता पॉटीपर्यंत येऊन पोचलाय. मराठी मुलखातही परसाकडंन सुरु झालेला प्रवास पॉटीपर्यंत पोचलाय. जय जागतिकीकरण!
पण पॉटीनंतर काय? आफ्टर पॉटी, व्हॉट?
जेव्हा पॉटी शब्द अतिशय कॉमन होईल, ग्रामीण भागातही वापरला जाऊ लागेल, तेव्हा तो शब्द ग्राम्य मानला जाईल. तोपर्यंत कदाचित मलविसर्जनासाठी एखादे नवे तंत्र आलेले असेल. समजा ते तंत्र व्हॅक्युम टॉयलेट असेल तर कदाचित कालांतराने विष्ठेला व्हॅक्युम म्हणणे रूढ होईल. सुलभ संस्थेने तयार केलेली शौचालये सर्वत्र दिसू लागल्याने 'सार्वजनिक शौचालय'ला 'सुलभ' हे नाव रूढ होताना आपण बघत आहोतच. त्यामुळे उद्या घरोघरी व्हॅक्युम शौचालय आलीत आणि आबालवृद्ध ती वापरू लागलीत तर व्हॅक्युम हा शब्द विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ होणे फार अवघड नाही. किंवा समजा उद्या मंडारीन चिनी भाषा जागतिक भाषा बनली तर मंडारीनमध्ये असलेला शब्द आपल्याकडे लोकप्रिय होऊन तो लॅटरिन किंवा पॉटीची जागा घेईल. विष्ठेच्या समानार्थी शब्दांचा प्रवास पॉटीनंतरही सुरूच राहील, थांबणार नाही. लोकांसाठी ही हवीहवीशी हगवण आहे.
- स्वामी संकेतानंद
तळटीप:- लेखाचा मुख्य विषय नव्हता म्हणून उल्लेख केला नाही, पण 'एक/दोन नंबर ला जाणे' असा प्रयोग सुरुवातीला व्हायचा. आता त्याबरोबरीनेच 'दोन नंबर लागली' 'एक नंबर लागली' असा प्रयोग केला जातो. म्हणजेच इथेही दोन नंबर विष्ठेला समानार्थी शब्द बनलाय. झालाय. हा प्रवासही पॉटीप्रमाणे प्रवेगात झालाय.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण 'संडास' हा शब्द मुळात आलाच
'संडास' हा शब्द मुळात आलाच
विमानतळांवर संडासला (टॉयलेट)
SAND AS*
उगाच आपलं...
पण
नाही. जे टी मोल्सवर्थ ब्रिट
माहीत नव्हता
छान माहिती !
हायला.. असं आहे काय? माझ्या
ही एक नवी माहिती. पण 'लेंडी'
शिरडी
आम्हाला बार्शीत पण लेंडी हाच
अर्र लेंडीबाग, पार वाट लावून
चांगला विषय घेतलास! लहानपणी
छान प्रतिपादन !
मलमूत्र हे शब्द तर संस्कृत
मला लहानपणी परसाकडं म्हणजे
उलट लॅटरीन म्हणजे शी आणि
एक नंबर लेख, या विषयावर
पण परदेशी संडांसात जेट असते
नसते.
पॉटी म्हणजे तर ....
अहाहा!
गोदरी हा आमच्या अकोला
बरोबर. आमच्याकडेही गोदरी याच
मग ते गोदरेज शब्द कुठून आला
=)) =))
एका बुडभुत प्रश्नावर हग्रलेख
एका बुडभुत प्रश्नावर हग्रलेख
एका बुडभुत प्रश्नावर हग्रलेख पाडल्याबद्दल अभिनंदन=)) =)) =)) लेख मात्र एक नंबर ! समाजाला अनावश्यक सोवळेपणा सोडायलाही शिकवायला लागतेच. हा लेख त्याबाबतीत मोलाची भर घालत आहे.=))
टट्टी उघडा संकेश्वरा
=)) आवडलं
मुक्त मोकळे
हो. शेतखाना पण ऐकलाय.
परसाकडून पॉटीकडे
राईट टू पी मधे पी शब्दाचा
एक कायप्पा फॉरवर्ड
सर्वात सभ्य उल्लेख
'हलका होऊन आलो' हे एकण्यात
हलका होऊन आलो
छान..
गावाकडे शौचाला जाणे यासाठी
गावाकडे शौचाला जाणे यासाठी
झाड्याला जाणेची उत्पत्ती ...
निसर्गाच्या हाकेला
मुळात शौच म्हणजेच शुद्ध किंवा
वैद्यकीय दृष्ट्या आपली विष्ठा
जंत किंवा जंतू जे प्राण्यांना
माहितीबद्दल धन्यवाद.