साहित्य संपादक - नवीन रचना

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
10 Jun 2015 - 7:25 am

नमस्कार,

उत्तम साहित्य हा मिसळपावचा प्राण आहे. मिपावर नवनवीन सदस्यं येत असतात. त्यांना लिहायला सुरूवातीच्या काळात खुप अडचणी येतात असे एकंदरीत अभिप्रायांवरून दिसते. त्यामुळे त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरीता नवीन साहित्य संपादक नावाची रचना मिसळपाव व्यवस्थापन सुरू करतंय.

कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही या साहित्य संपादकांना मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडीओ जोडण्याबाबत काही अडचण असेल तरी हे साहित्य संपादक मदत करतील.

तुम्ही लिहीते व्हावे आणि तुमचा लिहीण्याचा अनुभव सुखद व्हावा यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा.

मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदी बाबत साहित्यसंपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक आदीच्या निर्मीती मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल. अश्या साहित्य संपादकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. सोबत खाली त्यांची नावे देत आहे.

मधुरा देशपांडे
स्रुजा
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
आदूबाळ
विशाखा पाटील

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2015 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रतिसाद आवडला नाही.

बिका सर माझा प्रतिसाद आवडला नाही का? कुठल्या प्रतिसादाखाली आलाय ते समजत नाहीये म्हणून विचारलं.

मुळात प्रतिसाद देताना एक सल्ला म्हणून प्रतिसाद दिला आहे. यात आवडणं अथवा न आवडणं किंवा दोन्ही किंवा काहीच न घडणं असंही होऊ शकतं. खाली बाहुबलींना माझा प्रतिसाद आगाऊ वाटला. तसंही मानायला काही हरकत नाही. ज्येष्ठ मित्र swaps यांनी सासं अथवा सं नसताना प्रतिसाद दिला तसाच मी सुद्धा दिला आहे. बाकी आवड आपली आपली आहे.
कळावे लोभ असावा.

द-बाहुबली's picture

18 Sep 2015 - 5:47 pm | द-बाहुबली

प्यारे तुम्ही त्यांच्या प्रश्नाला अजिबात उत्तर दिले नाहीये. व संपादक त्या प्रश्नाला उत्तर देतिल असे म्हटले आहे. पण एक सामान्य मिपासदस्य म्हणून तुमच्या त्यांच्याकडुन असलेल्या अपेक्षा मात्र आपण व्यवस्थित पोचत्या केल्या आहेत ते वाचुन समाधान वाटले.

मिपावर शिष्ठ, जेष्ठ आणी मंद या ३ प्रकारात मोडणारे लोक व्यवस्थीत सदस्यत्व घेउनही लिखाण (प्रतिसाद अथवा लेख) तुलनेने अतिशय कमी करतात असे बर्‍यापैकी निरीक्षण आहे. लेखिकेला त्वरीत जेश्ठात सामाविश्ट व्हायचे असेल तर नक्किच कसलाही आक्षेप नाही. उलटपक्षी संपादक त्यांना (उत्तर देउन) मद्त करतीलच.

प्यारेंनी जरा आगाउ प्रतिसाद दिलाय की जणू लेखन थांबवुन प्रतिसादक वा वाचक बना. तरीही माझेही नवसदस्य प्रज्ञाताइंना मनःपुर्वक हेच मागणे आहे... फक्त संवेदनशील लेखक नवे तर प्रतिसादकही बना. पुलेशु.

द-बाहुबली's picture

18 Sep 2015 - 5:48 pm | द-बाहुबली

वरील प्रतिसाद प्यारेंच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून लिहला आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

maachis

श्रीगणेश लेखमालेमध्ये किती लेख घेता येतील ह्यावर बंधनआहे (अकरा दिवसांसाठी प्रत्येकी एक ह्या हिशेबाने अकरा लेख.) त्यामुळे या लेखमालेकरिता सर्वांनाच 'लेखन पाठवा' असे आवाहन करता येत नाही. मोजून अकराच लेख कुणाकुणाचे निवडायचे हा प्रश्न पडतो, आणि निवड होऊ न शकलेल्या लेखांच्या लेखकांपैकी कोणी नाराज होऊ शकते. त्यामुळेच या लेखमालेकरिता आपण काही सदस्यांना आमंत्रित करीत असतो. त्यातही ऐन वेळेला अनेक अडचणी उभ्या राहू शकतात, उदा. लेख वेळेत देता न येणे, तो लेखमालेच्या 'थीम' ला साजेसा नसणे, किंवा इतरही अनेक. या सगळ्यांतून एक वाचनीय लेखमाला वेळेत सर्व सदस्यांपर्यंत आणण्यात संमं, सासंमं वगैरेंची चांगलीच धावपळ उडते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता, श्रीगणेश लेखमालेकरिता सर्वांकडून लेखन मागवणे व्यावहारिकदृष्ट्या अवघड आहे.

मिपावर सर्वांच्याच उत्तमोत्तम लेखनाचे आवर्जून स्वागत केले जाते. आपणांसही लिहावयाचे असल्यास दिवाळी अंकासाठी नक्कीच लिहू शकता. दिवाळी अंकासाठी अशी काटेकोर लेखसंख्यामर्यादा नसते. तेव्हा तिथे जरूर लेखन पाठवा.

(मी संपादक वा साहित्य संपादक नाही! ;-) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2015 - 5:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपामध्ये लेख प्रसिद्ध करण्यासाठी अमुक एक काळ सभासद असायला पाहिजे अशी अट नाही. पहिल्या दिवशीही लेख प्रसिद्ध करता येतो.

नेहमीचे साहित्य सभासद स्वतःच्या सोईने केव्हाही (२४ X ७) उजवीकडच्या कॉलममधील "आवागमन" या शीर्शकाखालील "लेखन करा" या दुव्यावरून स्वतःच प्रसिद्ध करू शकतो.

मात्र श्रीगणेशमालेसारख्या उपक्रमातील लेखांचे खास संपादन/प्रसिद्धीकरण करावे लागत असल्याने ते सुपुर्द करण्यास तारखेची अट असते.

येत्या मिपा दिवाळी २०१५ अंकासाठी साहित्य १५ ऑक्टोबरच्या आत सुपुर्द करायचे आहे. त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. अधिक माहिती दिवाळी अंक २०१५: आवाहन या लेखात सापडेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Sep 2015 - 5:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहा आणि मला किंवा पैसा ह्या आयडींना व्यनि करा. आत्ता उशिर झाला असल्याने सहभागाची खात्री तर देउ शकत नाही पण देउन ठेवा.

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन

चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू's picture

4 Oct 2015 - 1:44 pm | चिमणराव वरवंटे ...

मी येथे नवीन आहे. साहित्य कसे पोस्ट करावे या बद्दल मार्गदर्शन अपेक्षित.

बाजीगर's picture

19 Oct 2015 - 5:31 am | बाजीगर

1.टोपणनाव राजे द्या.
2.मूळ लेखात संपादन कसे करायचे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2015 - 5:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा किंवा प्रचेतस ह्या आयडींना हवा असलेला आयडी व्यनि करा. साहित्य संपादक मंडळींपैकी कोणालाही व्यनि करुन लेखात कुठे आणि काय बदल करायचे आहेत हे कळवा करुन देउ.

'राजे' हा आयडी मिपावर आधीपासून आहे. दुसरा एखादा आयडी शोधा. आपल्याला हवे असलेले सदस्यनाम आधीपासूनच मिपावर इतर कुणी घेतले आहे की नाही हे शोधण्यासाठी एक नवीन व्यक्तिगत संदेश लिहा आणि त्यातील 'टू' या चौकोनात तो आयडी टंकून पहा. आधीच अस्तित्त्वात असल्यास ते सदस्यनाम तिथे आपोआप येईल.

स्वतःचे सदस्यनाम बदलायचे असल्यास 'नीलकांत' किंवा 'प्रशांत' ह्यांना व्यनि करा.

बाजीगर's picture

9 Nov 2015 - 9:07 pm | बाजीगर

मी अंकासाठी एक लेख पाठवला होता,काहीच पोच नाही,नाकारला,उशीरा मिळाला,वगैरे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Nov 2015 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखाचं नाव सांगता का? प्रत्येक लिखाणाला पोच देणं शक्य झालेलं नाही :(

निओ१'s picture

3 Sep 2016 - 9:58 pm | निओ१

जैन समाजाचा अपमान
misalpav

हे तुम्हाला मान्य आहे का ?

पोस्ट - केज्रु के गुलाम

पगला गजोधर's picture

4 Sep 2016 - 9:11 pm | पगला गजोधर

वरील प्रतिक्रियेत,कोणत्याही धर्म/पंथाचा अपमान कसा झाला ? जरा विशद कराल काय ? कोठल्याही धर्माने कोणाला आपला प्रतिनिधी नेमले आहे काय ? मान अपमानाच्या संकल्पना काय ?

जयन्त बा शिम्पि's picture

4 Sep 2016 - 12:05 am | जयन्त बा शिम्पि

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

न्यूजर्सी : अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सिक्सर लगावला आहे. न्यूजर्सीतील कार्यक्रमात ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. यावेळी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प यांनी हे कौतुकोद्गार काढले

स्नेहांकिता's picture

16 Oct 2016 - 1:48 pm | स्नेहांकिता

गल्ली चुकला काय दादा ?

कैवल्यसिंह's picture

13 Nov 2016 - 4:26 pm | कैवल्यसिंह

एखादा लेख जर अप्रकाशित ठेवुन नंतर राहीलेले लेखन पुर्ण करुन प्रकाशीत करायचा आसल्यास कसा अप्रकाशित ठेवावा?..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2016 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्यालाच स्वतःला व्यक्तिगत निरोप करणे हा एक उत्तम पर्याय असतो.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Nov 2016 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख लिहा. जेवढा पुर्ण झालाय तेवढा वर्ड फाईल मधे सेव्ह करा, स्वतःला व्यनि करुन ठेवा अथवा गुगल डॉक्युमेंट्समधे सेव्ह करुन ठेवा. ज्यावेळी जमेल त्यावेळी परत मिपामधे पेस्टवा आणि काम चालु :)

कैवल्यसिंह's picture

3 Jan 2017 - 2:59 pm | कैवल्यसिंह

माफ करा जरा उशिरा प्रतिसाद देतोय..

पन मी डेस्कटॉप किवा लेपटॉप नाही वापरत मोबाईल वापरतोय.. त्यावर गुगल डॉक्युमेंटस निट नाही चालत व मी 2G net वापरतोय.. आणि वर्ड फाईलचा तर प्रश्नच येत नाही मोबाईलमुळे.. मग अश्यावेळी काय करावे?

मोबाईलवरचं नोट्स अ‍ॅप + गूगल इंडिक कीबोर्ड वापरून तुमचा प्रश्न सुटेलसं वाटतंय. लिहून झालं की नोट्स अ‍ॅपमधून मिपावर चिकटवायचं.

मिलिंद के's picture

10 Apr 2017 - 9:11 am | मिलिंद के

आपले हार्दिक अभिनंदन आणि आभार !

कुशल द. जयकर's picture

17 Jun 2017 - 12:34 am | कुशल द. जयकर

फोटॊ अल्बम बनवण्यास टेम्प्लेट व सॉफ्टवेअर फ्री कुठे मीळेल
eshajaikar@gmal.com

अनिकेत कवठेकर's picture

2 Jul 2017 - 2:36 pm | अनिकेत कवठेकर

मी आज लेख लिहिला पण फोटो टाकता आले नाहीत .

प्रसिद्ध लेखात बदल कसे करावेत या बद्दल काही माहिती कुठे मिळेल ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Oct 2018 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

'साहित्य संपादक' अथवा 'संपादक' आयडीला लेखाच्या प्रतिसादात विनंती करा.