साहित्य संपादक - नवीन रचना

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
10 Jun 2015 - 7:25 am

नमस्कार,

उत्तम साहित्य हा मिसळपावचा प्राण आहे. मिपावर नवनवीन सदस्यं येत असतात. त्यांना लिहायला सुरूवातीच्या काळात खुप अडचणी येतात असे एकंदरीत अभिप्रायांवरून दिसते. त्यामुळे त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरीता नवीन साहित्य संपादक नावाची रचना मिसळपाव व्यवस्थापन सुरू करतंय.

कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही या साहित्य संपादकांना मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडीओ जोडण्याबाबत काही अडचण असेल तरी हे साहित्य संपादक मदत करतील.

तुम्ही लिहीते व्हावे आणि तुमचा लिहीण्याचा अनुभव सुखद व्हावा यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा.

मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदी बाबत साहित्यसंपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक आदीच्या निर्मीती मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल. अश्या साहित्य संपादकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. सोबत खाली त्यांची नावे देत आहे.

मधुरा देशपांडे
स्रुजा
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
आदूबाळ
विशाखा पाटील

प्रतिक्रिया

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jun 2015 - 2:29 pm | मार्कस ऑरेलियस

सर्व नवीन साहित्यसंपादकांचे अभिनंदन !

एक अवांतर शंका

नवीन लोकांना पुरेसा ब्रिदींग पिरीएड न देता त्यांचे वर कुणी उगाच टारगटपणा केला तर संपादक अधिक सक्रियतेने लक्ष देतील. सर्वच सदस्यांकडून नवीन सदस्यांना स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ द्यावा अशी अपेक्षा आहे. आपण सर्वच कधीतरी मराठी आणि एकूनच आंतरजालावर नवीन होतोच ना? तेव्हा वाचून किंवा इतरांच्या मदतीने इथवर आलोय हे न विसरता. नवीन लोकांना प्रोत्साहित करण्याचा विचार करावा.

>>> काही जुन्या आय डीं नी जुन्या काळी अनेक नवीन नवोदित कवींची कचकुन टर उडवली होती , त्यांच्या साध्या साध्या कवितांचीही अस्त्यंत अश्लाघ्य विडंबने केली होती , आता मात्र ते आयडी साळसुदपणाचा आव आणुन संपादक मंडळामागे लपत असतील आणि स्वतःची जराशीही केलीली चेष्टा सहन करत नसतील आणि स्वतःवर टीका करणारे लेखन / प्रतिसाद लगेच संपादित करवुन घेत असतील त्यांच्याविषयी काय धोरण स्विकारावे ?

बॅटमॅन's picture

10 Jun 2015 - 3:09 pm | बॅटमॅन

अगदी असाच प्रश्न मलाही पडला आहे. अशा दुटप्पी लोकांबद्दल काय धोरण आहे?

स्पा's picture

10 Jun 2015 - 3:12 pm | स्पा

प्रगो शी टोटल सहमत

त्यांच्या साध्या साध्या कवितांचीही अस्त्यंत अश्लाघ्य विडंबने केली होती , आता मात्र ते आयडी साळसुदपणाचा आव आणुन संपादक मंडळामागे लपत असतील आणि स्वतःची जराशीही केलीली चेष्टा सहन करत नसतील आणि स्वतःवर टीका करणारे लेखन / प्रतिसाद लगेच संपादित करवुन घेत असतील

'सैंया भये कोतवाल, अब डर काहे का' टाईप अ‍ॅटिट्युडवाली मंडळीच असं करु शकतात. असो, ह्या धाग्यावर नुस्तंच अभिनंदन करुन रजा घेतो.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:15 pm | कपिलमुनी

All ID are equal, but some IDs are more equal :)

नाखु's picture

10 Jun 2015 - 4:08 pm | नाखु

किमान साहीत्य टाकून आमचे कमाल सहकार्य राहील.

नाखु भड्भुंजे पाटील

वॉल्टर व्हाईट's picture

10 Jun 2015 - 10:55 pm | वॉल्टर व्हाईट

मुद्दा अगदी बरोबर आहे. मागच्या वर्षभरात आलेल्या अनुभवावरुन असा कयास आहे की "प्रतिसाद संपादन करणे" ही गोष्ट अ‍ॅडमिन्सचा "अधिकार" म्हणुन उल्लेखली जाते, ती खरे तर निकडीच्या वेळेस वापरली जाणारी "सुविधा" म्हणून उल्लेखली/वापरली जावी. उदाहरणार्थ दोन प्रतिसादकात चालु असलेल्या चर्चेत जर सदस्यांची भाषा असांसदीय असेल तर सो कॉल्ड कात्री चालवली जावी पण चर्चा विषयाला धरुन नसेल तर मात्र तसे करणे योग्य ठरणार नाही. सारखे सारखे विषयाला सोडुन चर्चा करणारे सदस्य आपोआप मुख्य प्रवाहातुन बाजुला होतील, अ‍ॅडमिन्सने त्यावर उर्जा खर्च करुन लोकांना दुखावु नये असे वाटते.

मध्यंतरी मी एक थ्रेड सुरु केला होता 'तुम्हाला खळखळवुन हसवणारे विनोद', त्यावर चर्चा सुरु होतेच तो अप्रकाशित झाला. बर का झाला, कोणी केला माहिती नाही, कुणी कळवले तर नाहीच. मीच शोधाशोध करुन मॉडरेटर शोधले आणि त्यांना मॅसेज केले, कशाचे कोण उत्तर देतोय. आय मिन कमॉन - तुम्ही पब्लिक फोरम चालवता, सदस्य ही तुमची सगळ्यात मोठी अर्निंग आहे, त्यांच्याशी असे डिल करुन कसे चालेल ? उगाच मला वाटले, मला अधिकार आहेत, म्हणुन मी विनोदांचे धागे नाही चालु देणार, मला वाटले म्हणुन मी लोकांना नाही भांडु देणार, असेच जर होणार असेल तर मग सुधारणेला भरपुर वाव आहे.

कंपुबाजीबद्दल मला अजुन वैयक्तिकरित्या त्रास झाला नाही, पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. अनाहिता असे वेगळे का चालवले जाते समजले नाही. लोक जसे सुशिक्षित होतायेत तश्या, फेमिनिझम, रिझर्वेशन अश्या गोश्टी मागे पडतायेत, आणि मिसळ्पाव वर चक्क त्यचे समर्थन होतेय ?

(हा प्रतिसाद डिलीट केला तर किमान पोच द्यावी ही भाबडी आशा)

बॅटमॅन's picture

11 Jun 2015 - 3:23 am | बॅटमॅन

मध्यंतरी मी एक थ्रेड सुरु केला होता 'तुम्हाला खळखळवुन हसवणारे विनोद', त्यावर चर्चा सुरु होतेच तो अप्रकाशित झाला. बर का झाला, कोणी केला माहिती नाही, कुणी कळवले तर नाहीच. मीच शोधाशोध करुन मॉडरेटर शोधले आणि त्यांना मॅसेज केले, कशाचे कोण उत्तर देतोय. आय मिन कमॉन - तुम्ही पब्लिक फोरम चालवता, सदस्य ही तुमची सगळ्यात मोठी अर्निंग आहे, त्यांच्याशी असे डिल करुन कसे चालेल ? उगाच मला वाटले, मला अधिकार आहेत, म्हणुन मी विनोदांचे धागे नाही चालु देणार, मला वाटले म्हणुन मी लोकांना नाही भांडु देणार, असेच जर होणार असेल तर मग सुधारणेला भरपुर वाव आहे.

हे सुधारणे नाही. हे असेच चालायचे. सदस्य? कोण, काय असतं ते?

नीलकांत's picture

11 Jun 2015 - 1:55 pm | नीलकांत

नमस्कार वॉल्टर व्हाईट,
तुम्ही नवीन दिसता तरी तुम्ही सक्रियतेने मुद्दे मांडलेत त्याबद्दल आभार. तुमच्या मुद्द्यांवर सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय.

मुद्दा अगदी बरोबर आहे. मागच्या वर्षभरात आलेल्या अनुभवावरुन असा कयास आहे की "प्रतिसाद संपादन करणे" ही गोष्ट अ‍ॅडमिन्सचा "अधिकार" म्हणुन उल्लेखली जाते, ती खरे तर निकडीच्या वेळेस वापरली जाणारी "सुविधा" म्हणून उल्लेखली/वापरली जावी. उदाहरणार्थ दोन प्रतिसादकात चालु असलेल्या चर्चेत जर सदस्यांची भाषा असांसदीय असेल तर सो कॉल्ड कात्री चालवली जावी पण चर्चा विषयाला धरुन नसेल तर मात्र तसे करणे योग्य ठरणार नाही.

- 'अधिकार' आणि 'सुविधा' शब्दशः सहमत आहे. संपादन असेच असावे असे अपेक्षीत आहे व संपादक मंडळ तसेच काम करते. मात्र अनेकदा आपला प्रतिसाद संपादित झाला हे धरून ठेवल्या जातं आणि मग संपादकांचा राग येतो असे दिसते. कित्येक चर्चांत भाषा केवळ असांसदीय नाही म्हणून प्रतिसाद ठेवलेत व चर्चा भरकटत गेलीये असे दिसते. त्यावर काही उपाय सुचवता येईल का?

सारखे सारखे विषयाला सोडुन चर्चा करणारे सदस्य आपोआप मुख्य प्रवाहातुन बाजुला होतील, अ‍ॅडमिन्सने त्यावर उर्जा खर्च करुन लोकांना दुखावु नये असे वाटते.

- सुरूवातीला मलासुध्दा असेच वाटत होते. मात्र असे नाहीये. काही लोक अन्य वेळेस वाचनमात्र असतात. किमाण एखादा लेख चांगला झाला तर चांगला आहे , किंवा उत्तम लेखन एवढा प्रतिसादसुध्दा देववत नाही. आणि मिपाव्यवस्थापनावर चर्चेचा रोख आला कि यांच्या प्रतिभा बहरू लागते. हे तत्कालीक असते तर महिना दोन महिन्यात बदलले असते. मात्र काही लोक वर्षानुवर्षे बदललेलेच नाहीत. ते मुख्य प्रवाहात नसतीलही मात्र त्यांचे प्रतिसाद प्रवाहात अडथळा निर्माण करतात. अश्या वेळी व्यवस्थापनाने हस्तक्षेप केलाच पाहिजे. हीच बाब नवीन लोकांना लिहीते करण्याबाबत. जून्या लोकांना सर्वांकडून कायमच ठराविक दर्जेदार लेखन पाहिजे असते. त्यामुळे नवीन लोक चुकले की हे लागलीच तेथे टिंगल करायला हजर होतात. हे कायम विसरल्या जातं की आपण लिहीलेली पहिली प्रतिक्रिया आजच्या आपल्या लेखापेक्षा जास्त मोठी वाटली होती. आहो माझ्या सुरूवातीच्या काळात मीसुध्दा हे सहन केलंय. म्हणून मी आता येणार्‍या लोकांना मुद्दाम टिंगल होताना बघत राहू असं तुम्हाला म्हणायचं आहे का? काही लोकांना सकारात्मक उर्जा नाहीच आणि नकारात्मक ऊर्जा संपता संपत नाही असे दिसते त्यावर काय उपाय? तुम्हाला संपादकीय हस्तक्षेप नसलेले आणि उत्तम चाललेले सामाजिक संकेतस्थळ माहिती आहे का?

मध्यंतरी मी एक थ्रेड सुरु केला होता 'तुम्हाला खळखळवुन हसवणारे विनोद', त्यावर चर्चा सुरु होतेच तो अप्रकाशित झाला. बर का झाला, कोणी केला माहिती नाही, कुणी कळवले तर नाहीच. मीच शोधाशोध करुन मॉडरेटर शोधले आणि त्यांना मॅसेज केले, कशाचे कोण उत्तर देतोय.

- मिसळपाववर लेखन करण्याआधी मिसळपावचे धोरण वाचून घ्यावे असे मी कायम म्हणतो. त्यामुळे कश्यावर संपादकीय कारवाई होईल याचा सहज अंदाज येईल. तुमचे लेखन जर मूळात तुमचे नसेल तर अशी कारवाई होऊ शकते. आदर्शवादी जगात असे होणे शक्य आहे की कारवाईचे उत्तर दिले जावे. मात्र प्रत्यक्ष अनुभव असा आहे की कामाच्या व्यस्ततेत ते शक्य होत नाही. त्यामुळेच संपादकांच्या कामाचे विभाजन केले आहे. ते तसे करताना नवीन रचना अधिकाधीक लोकाभिमुख व्हावी असाच हेतू आहे. तुम्हा दोन चार लोकांचा (तुमचा प्रतिसाद ज्यांच्या प्रतिसादाला उप आहे ते व अन्य ) व्यवस्थापनावर मुळीच विश्वास नाही असे वाटते. हे होण्यास कारण काय तर तुमचा विनोद संकलनाचा धागा उडवला ?

आय मिन कमॉन - तुम्ही पब्लिक फोरम चालवता, सदस्य ही तुमची सगळ्यात मोठी अर्निंग आहे, त्यांच्याशी असे डिल करुन कसे चालेल ? उगाच मला वाटले, मला अधिकार आहेत, म्हणुन मी विनोदांचे धागे नाही चालु देणार, मला वाटले म्हणुन मी लोकांना नाही भांडु देणार, असेच जर होणार असेल तर मग सुधारणेला भरपुर वाव आहे.

- सदस्यं ही मिपाची सर्वात मोठी अर्निंग आहे - यु सेड इट ! - १००% सहमत. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देण्यास कारण हे वाक्य होय. या एका वाक्यात आपण एका पानावर आहोत असे वाटले. सदस्यांशी चुकीचे नाही वागत. उलट सदस्यांना सोईचे व्हावे. त्यांचा मिसळपाववरील वावर सुखद व्हावा. त्यांना परत परत मिपावर यावंसं वाटावं. मिसळपाव हे सुध्दा आपल्या जगण्याचा एक भाग आहे असं वाटावं हीच प्रेरणा मिसळपाव उभे करण्यामागे व आज ते सतत उत्तम व्हावं यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमागे आहे. मी किंवा संपादक मंडळ आताचे नवीन साहित्य संपादक एवढेच नाही तर असे अनेक लोक पडद्यामागे आहेत जे मिसळपाव वर येणार्‍या लोकांना येथील वावर सुखद व्हावा म्हणून प्रयत्नरत आहेत. हे सर्व केवळ एकाच विचाराने की सदस्यं आपली सर्वात मोठी अर्निंग आहे.

कंपुबाजीबद्दल मला अजुन वैयक्तिकरित्या त्रास झाला नाही, पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. अनाहिता असे वेगळे का चालवले जाते समजले नाही. लोक जसे सुशिक्षित होतायेत तश्या, फेमिनिझम, रिझर्वेशन अश्या गोश्टी मागे पडतायेत, आणि मिसळ्पाव वर चक्क त्यचे समर्थन होतेय ?

- अनाहिता हा एक प्रयोग म्हणून मिसळपावने करून पाहिलाय. त्याचे निकाल उत्तम आहेत. त्याचा पुढचा विकास कसा होईल हे काळ ठरवेल. सध्या तरी अनाहिता म्हणजे मिपाचा फेमिनिझम नाहीये एवढेच सांगेन. सोबतच अनेक लोक अनाहितांचा उल्लेख चुकीचा करताहेत त्यांना सुध्दा तुमच्या याच प्रतिसादात स्पष्ट शब्दांत एवढे सांगेन की असे करू नका. त्यावर कारवाई होऊ शकते.

(हा प्रतिसाद डिलीट केला तर किमान पोच द्यावी ही भाबडी आशा)

- हा प्रतिसाद चुकीच्या जागी आहे हे नक्की. कारण यापुर्वीच्या घोषणेच्या पानावर मी अनेकदा बोललो आहे की त्या त्या संदर्भात चर्चा व्हावी. तरी सुध्दा या धाग्यावर कुठलीच प्रतिक्रिया डिलीट न करता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. मी वाट बघतोय लोकांचा फोकस बदलायची. तुम्हाला उत्तरच दिलेय. वेगळी पोच देण्याचे आता कारण नाही.

- नीलकांत

वॉल्टर व्हाईट's picture

12 Jun 2015 - 1:16 am | वॉल्टर व्हाईट

अनेक धन्यवाद नीलकांत. अगदी ऑनेस्ट्ली सांगतो, प्रतिसादाला उत्तर येईल असे अजिबात वाटले नव्हते, खरे तर असे वाटले होते की प्रतिसाद उडेल. पण उडाला नाही आणि साक्षात तुमचे उत्तर आले, यातच सगळे आले.

- 'अधिकार' आणि 'सुविधा' शब्दशः सहमत आहे. संपादन असेच असावे असे अपेक्षीत आहे व संपादक मंडळ तसेच काम करते. मात्र अनेकदा आपला प्रतिसाद संपादित झाला हे धरून ठेवल्या जातं आणि मग संपादकांचा राग येतो असे दिसते.

संपादक मंडळ 'अधिकार' आणि 'सुविधा' याची जाणीव ठेउन काम करते असे तुम्ही म्हणताय, ते तसे असेल तर प्रश्नच मिटला. अर्थात आपण या मुद्द्यासाठी ७०% रिअल लाईफ अक्युरसी ग्राह्य धरु.
मग लोकांना संपादकांचा राग का येतो ? मला माझ्या लहानश्या अन एकमेव अनुभवावरुन वाटते की, हा राग प्रतिसाद्/लेख संपादित झाला यापेक्षा १. का झाला हे न कळल्याने अन २. फॉलोअप घेउनही उत्तर न दिल्याने येतो. या दोन गोष्टींमुळे सदस्याच्या मनात आपण दुर्लक्षित आहोत आणि आपल्याला अपमानास्पद वागणुक मिळते आहे असा भाव ठाण मांडतो, आणि त्याचे पर्यावसान संपादकांवरच्या रागात होते. थोड्याश्या सुसंवादाने हे टाळता येईल असे वाटते. संपादनाला पोलिसी चेहरा देण्यापेक्षा मित्राचा चेहरा दिला तर फार बरे होइल.

कित्येक चर्चांत भाषा केवळ असांसदीय नाही म्हणून प्रतिसाद ठेवलेत व चर्चा भरकटत गेलीये असे दिसते. त्यावर काही उपाय सुचवता येईल का?

कोणत्याही पब्लिक फोरमवर 'चर्चा भरकटली आहे' हा मुळात अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा कन्सर्नच नसावा असे माझे वैयक्तिक मत आहे. तो प्रॉब्लेम चर्चा ज्याने घडवुन आणली आहे त्या लेखकाचा आहे. अर्थात शिविगाळ वैगेरे होत, प्लेजरिज्मची तक्रार असेल किंवा अगदी पोर्नोग्राफिक कंटेट टाकले जात असेल तर अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने हस्तक्षेप करावाच, याबाबत दुमत नाही. बाकी हा मुद्दा तुम्हाला पटेपर्यंत तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे.

काही लोक वर्षानुवर्षे बदललेलेच नाहीत. ते मुख्य प्रवाहात नसतीलही मात्र त्यांचे प्रतिसाद प्रवाहात अडथळा निर्माण करतात. अश्या वेळी व्यवस्थापनाने हस्तक्षेप केलाच पाहिजे.

मान्य, यावर आक्षेप नाही. वर्षानुवर्षे हा कळीचा शब्द आहे.

तुम्हाला संपादकीय हस्तक्षेप नसलेले आणि उत्तम चाललेले सामाजिक संकेतस्थळ माहिती आहे का?

फेसबुक आहे, मिसळपाव होउ शकते.

तुम्हा दोन चार लोकांचा (तुमचा प्रतिसाद ज्यांच्या प्रतिसादाला उप आहे ते व अन्य ) व्यवस्थापनावर मुळीच विश्वास नाही असे वाटते. हे होण्यास कारण काय तर तुमचा विनोद संकलनाचा धागा उडवला ?

हो माझ्याबाबत ते खरे आहे. तुमच्या सर्व ध्येयधोरणात बसणारे माझे लेखन होते, ते उडवले, परत अवाक्षरानेही त्याचे कारण सांगितले नाही. विचारपूस केली तर त्यालाही उत्तर नाही. वर एक्प्लेन केले आहे तसे, कंटेंट उडवण्यापेक्षा अपमानास्पद वागणुकीमुळे वैतागुन सदस्यांचा विश्वास उडतो. तुम्ही म्हणताय लोकाभिमुख व्हायचे, तसे खरेच व्हायचे असेल तर 'गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट' ला पर्याय नाही. संवाद साधला गेला पाहिजे, व्यग्र असणे या कारणाने, सरसकट "we dont owe an explanation" अशी पॉलिसी करणे लोकाभिमुख होण्याचा विरुद्ध आहे असेही वाटते.

- सदस्यं ही मिपाची सर्वात मोठी अर्निंग आहे - यु सेड इट ! - १००% सहमत. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देण्यास कारण हे वाक्य होय. या एका वाक्यात आपण एका पानावर आहोत असे वाटले.

निंदकांची घरं पाडु नका एव्हडेच फक्त म्हणेन.

पिलीयन रायडर's picture

12 Jun 2015 - 5:38 pm | पिलीयन रायडर

नमस्कार,

तुम्ही नीलकांतला विचारत आहात पण उगाच रहावलं नाही म्हणुन मध्येच बोलतेय.

कोणत्याही पब्लिक फोरमवर 'चर्चा भरकटली आहे' हा मुळात अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा कन्सर्नच नसावा असे माझे वैयक्तिक मत आहे. तो प्रॉब्लेम चर्चा ज्याने घडवुन आणली आहे त्या लेखकाचा आहे. अर्थात शिविगाळ वैगेरे होत, प्लेजरिज्मची तक्रार असेल किंवा अगदी पोर्नोग्राफिक कंटेट टाकले जात असेल तर अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने हस्तक्षेप करावाच, याबाबत दुमत नाही. बाकी हा मुद्दा तुम्हाला पटेपर्यंत तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे.

काही प्रश्न
१. मुळ लेखाच्या विरुद्ध भलत्याच प्रतिक्रिया आल्या आणि चर्चा भरकटली तर त्याला मुळ लेखक जबाबदार कसा?
२. चर्चा भरकटली की वाद होतात किंवा टवाळी, मग असांसदीय भाषा वापरली जाते, आणि मग अर्थातच संपादकीय हस्तक्षेप होतो. असे असताना संपादकांनी चर्चा भरकटण्याकडे दुर्लक्ष करावे हे कसे मान्य करता येईल? (बर्‍याचदा ते नुसती नजर ठेवुन असतात, फार वावगं काही वाटलं तर हस्तक्षेप होतो असं माझं मत आहे)
३. तुमचा मुद्दा पटलाच पाहिजे हा आग्रह का? चर्चेअंती कदाचित तुम्हाला नीलकांतचे म्हणणे पटेल. किंवा कदाचित दोघंही काहीतरी तिसर्‍याच कन्क्लुजनवर याल.. शक्यता अनेक आहेत..

फेसबुक आहे, मिसळपाव होउ शकते.

फेसबुक आणि मिपाची तुलना कशी होऊ शकते? फेसबुकवर लेखकाला कुणाला लेखन दिसावे, कोण कमेंट करु शकतं, केलेली कमेंट ठेवावी की उडवावी, कमेंट करणार्‍याला फ्रेंड / अनफ्रेंड की ब्लॉक करावे असे नानाविविध पर्याय उपलब्ध आहेत. मुळात फेसबुकचा मुख्य कटेंट हा लेखन नसुन सोशल नेटवर्किंग असतो. शिवाय फेसबुक हे सर्वांना खुले आहे. मिपा हे खास मराठी लेखनासाठी चे संस्थळ आहे.

असे असताना मिपा आणि फेसबुकची तुलना होऊ शकत नाही. (पुन्हा एकदा ह्याही मुद्द्यावर नीलकांतशीच सहमत आहे)

पिलीयन रायडर's picture

12 Jun 2015 - 5:41 pm | पिलीयन रायडर

अजुन एकच मुद्दा..

इथले संपादक हे कोणत्याही मानधनाशिवाय, स्वतःचे काम सांभाळुन इथे संपादन करत असतात. अशावेळी त्यांच्या कडुन किती अपेक्षा ठेवाव्यात ह्याचा विचार व्हायला हवा.

वॉल्टर व्हाईट's picture

12 Jun 2015 - 10:13 pm | वॉल्टर व्हाईट

नमस्कार,

तुमचे प्रश्न रास्त आहेत आणि नीलकांतबरोबर इतर सदस्यांचे विचार ऐकायलाही आवडतील, इनफॅक्ट ते जास्त प्रॉडक्टिव होईल. या धाग्यानुसार तुम्ही सध्या अ‍ॅडमिन नाही आहात, तेव्हा तुम्ही याआधी अ‍ॅडमिन होता असे गृहित धरतोय. (तुमचे मुद्दे संपादनाच्या अनुभवातुन आलेत या अर्थी)

आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे-

१. मुळ लेखाच्या विरुद्ध भलत्याच प्रतिक्रिया आल्या आणि चर्चा भरकटली तर त्याला मुळ लेखक जबाबदार कसा?

नाही लेखक जबाबदार नाही, तसे प्रतिसाद येणे हा त्या लेखकाचा प्रॉब्लेम आहे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा नाही, फक्त एव्हडेच म्हणायचे आहे. आता तुमचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे शेवटी माणसांनी बनलेले आहे, माणसे म्हटली की त्यांची मते येणार. आता प्रतिसाद किंवा लेख उडवणार्‍या 'क्ष' अ‍ॅडमिनच्या मतांनुसार 'भलती' असलेली प्रतिक्रिया ही प्रतिसाद देणार्‍या सदस्याचे मते भलती नसेल, कदाचित चर्चा करवणार्‍या लेखकाच्या मतेही नसेल आणि कदाचित कदाचित अश्या रेअर पॉसिबिलिटीने तुमच्याच अ‍ॅडमिन टीम मधल्या फेलो अ‍ॅडमिनच्या मतेही नसेल. तरीही क्षला वाटले, त्याच्या मते असलेल्या भलतेपणाने त्याने ती प्रतिक्रिया उडवली, जे काम करण्याची गरजच नाही त्यात उर्जा घालवली आणि एक सदस्यही दुखावला. जो प्रॉब्लेम तुमचा नाही तो तुम्ही सॉल्व करायचा मुळातच प्रयत्न का करताय ?
आता राहिला मुद्दा कंटेंट क्वालिटीचा. चर्चा सुरु करणारा लेखकाला काही माहिती हवी आहे, किंवा त्याच्या माहितीच्या कक्षा त्याला रुंदावायच्या आहेत म्हणुन तो चर्चा सुरु करतो. तोच त्या चर्चेचा प्रायमरी बेनेफिशरी आहे, चर्चेत भाग घेणारे सेकंडरी आणि मिसळपाव अ‍ॅज अ वेब्साईट टर्शरी. प्रायमरी बेनेफिशरीने जबाबदारी घेउन चर्चा योग्य वळणावर ठेवली पाहिजे, जर तो ठेउ शकत नसेल तर त्याला त्याचा तोटा सहन करावा लागेल. अ‍ॅड्मिनिस्ट्रेशनने त्यांना चर्चेतुन होणारा फायदा म्हणजे 'तयार झालेले कंटेंट' मिळवावेच, पण त्यांच्या प्रतिमेला घातक असे काही होत असेल (प्लेजरिज्म,पोर्नोग्राफि ई) तर जरुर हस्तक्षेप करावा. रिअल लाईफ मध्ये असेच्या असे होणे शक्य नाही हे जाणतो, अपवादात्मक परिस्थितीत त्यांची हत्यारे त्यांनी जरुर वापरावीत.

२. चर्चा भरकटली की वाद होतात किंवा टवाळी, मग असांसदीय भाषा वापरली जाते, आणि मग अर्थातच संपादकीय हस्तक्षेप होतो. असे असताना संपादकांनी चर्चा भरकटण्याकडे दुर्लक्ष करावे हे कसे मान्य करता येईल? (बर्‍याचदा ते नुसती नजर ठेवुन असतात, फार वावगं काही वाटलं तर हस्तक्षेप होतो असं माझं मत आहे)

अगदी असे असते तर, एवढ्या तक्रारी आल्या नसत्या, एवढी चर्चा झाली नसती.

३. तुमचा मुद्दा पटलाच पाहिजे हा आग्रह का? चर्चेअंती कदाचित तुम्हाला नीलकांतचे म्हणणे पटेल. किंवा कदाचित दोघंही काहीतरी तिसर्‍याच कन्क्लुजनवर याल.. शक्यता अनेक आहेत..

माझा आग्रह आहे कारण थर्ड पर्सन म्हणुन मला असे दिसते की, पब्लिक साईट म्हणुन मिसळपाववर ज्या एक्स्टेंसिव लेवलचे मॉडरेशन चालते त्याची गरज नाही. तुम्ही सध्या मिपाकडे कुटंबप्रमुख म्हणुन बघताय, त्या ऐवजी शहरप्रमुख म्हणुन बघा. तुमच्या शहरात सगळ्या प्रकारचे लोक असणार, भांडणारे, वेगवेगळ्या प्रकारचा आहार करणारे, विनोद आवडणारे, चित्रपट आवडणारे, मद्य आवडणारे, तत्वज्ञान आवडणारे ईई. कुटुंबप्रमुख जसे म्हणु शकतो की माझ्या घरात मद्य आणलेले चालणार नाही, किंवा जोरजोरात गाणी लावलेली चालणार नाहीत, तसे तुम्हाला म्हणुन चालणार नाही. सपोज माझे वय ५० आहे, आणि मारियुआना लिगल होणे मला माझ्या मुलच्या भवितव्याला हानिकारक वाटते, म्हणुन, एक अ‍ॅडमिन म्हणुन मी मिसळपावच्या मारियुआना लिगल करण्याला सपोर्ट करणार्‍या सदस्याचा प्रतिसाद उडवु शकत नाही, अर्थात माझे मत लादु शकत नाही. हे जर अ‍ॅडमिन टिमने स्विकारले तर मिसळपावला सध्या फुकट होणारे नुकसान थांबेल, सदस्यांचा इथल्या वावराच्या ऑपॉर्च्युनिटीज वाया जाणार नाहीत (मी चिकटुन आहे, माझ्यासारखे कैक दुखाउन निघुन गेले असतील त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज )

इथले संपादक हे कोणत्याही मानधनाशिवाय, स्वतःचे काम सांभाळुन इथे संपादन करत असतात. अशावेळी त्यांच्या कडुन किती अपेक्षा ठेवाव्यात ह्याचा विचार व्हायला हवा.

याचे उत्तर देउन निष्कारण कटुता ओढाउन घेउ इच्छित नाही. अननेसेसरी मॉडरेशन थांबवले तर अ‍ॅडमिन्सना भरपुर बँडविड्थ उपलब्ध होईल असे थर्ड पर्सन निरिक्षण पुन्हा एकदा नोंदवतो, बास एवढेच.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांबद्दल धन्यवाद, त्यामुळे माझी मते मला स्पष्टपणे मांडता आली.

पिलीयन रायडर's picture

12 Jun 2015 - 11:05 pm | पिलीयन रायडर

मी कधीही कोणत्याही प्रकारचे संपादनाचे काम कुठेही केलेले नाही. त्यामुळे माझीही निरीक्षणे तुमच्या सारखीच सदस्य म्हणुन आहेत. संपादकांच्या भुमिकेतुन मी सांगु शकत नाही पण सध्या मिपा जे काही आहे त्याला संपादक आणि सदस्य दोघेही जबाबदार आहेत. केवळ संपादकांमुळे लोक दुखावुन गेले असं म्हणता येणार नाही. गेले त्या लोकांचे इतरही मुद्दे असतील शिवाय मिपाचेही त्यांच्या विषयी काही तरी म्हणणे असेलच.
संपादक माणसं आहेत.. चुकु शकतातच.. पण सदस्य नेहमीच बरोबरच असतात असं नाही. डोक्याला शॉट करणारे भरपुर लोक आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली की ते इथे तिथे बोलत फिरत रहातात. त्यांचंही पुष्कळ चुकत असतं हे ही खरं आहे.

असो.. मी मला सदस्य म्हणुन जे दिसतं त्यावर बोलत आहे. माझ्यावर कधी कारवाई झालेली नाही किंवा माझा संपादकांशी ह्याबाबतीत काही संबंध आलेला नाही. त्यामुळे माझा अनुभव तोकडा आहे. म्हणुन इथेच थांबते.

नीलकांत आणि संपादक तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतीलच.

धन्यवाद. चर्चा करुन आनंद झाला!

आता हा प्रतिसाद जरा मराठीत परत लिहाल काय?

नीलकांत's picture

11 Jun 2015 - 1:26 pm | नीलकांत

नमस्कार प्रगो आणि बॅटमन,

आपण सर्वच लोक मिपावर नवीन येतो आणि हळूहळू रूळत जातो. मिपावरच नाही तर सर्वत्र आपण असेच असतो. हळूहळू वाढत गेलेले. त्यामुळे वेळेच्या एका टप्प्यावर मी तसा होतो म्हणून, मी आताही त्याच फ्रेममध्ये घट्ट बसण्याचा प्रयत्न करणे हे चुकच आहे. जस जसा वेळ जातो, आपण अधिक विकसीत होत असतो. त्यामुळे मागे काय झालं होतं हे घट्ट धरून बसलं की आपली वर्तमानासोबत गती तुटते... आपले संदर्भ अचुक असतीलही मात्र आपली जागा चुकते.

एक मिपाकर आणि व्यवस्थापनाचा घटक म्हणून मी कायम एक सल्ला देत असतो की मिसळपाववर आपला फोकस बदला. संपादक हे मिपाकरांतूनच निवडल्या जातात. ते संपादक बनायच्या अगोदर तुमच्या आमच्या सारखेच सदस्यं असतात. आपल्याला आवडेल तसे सक्रिय असतात. जेव्हा त्यांना संपादक म्हणून घेतले जाते तेव्हा त्यांचेसाठी एक आखीव भूमिका असते. काही नियम आहेत, एक ठराविक पध्दत आहे. त्यात त्यांना काम करावे लागते. कुणीही मनात येईल तशी कार्यवाही करण्यास मोकळा नाही. त्यांना अन्य संपादकांसमोर तसे सांगावे लागते. अर्थात ह्या गोष्टी व्यवस्थेच्या असल्यामुळे जाहीर होत नाहीत. एक कल्पना असावी म्हणून बोललो. तर विषय हा आहे की मागच्या गोष्टी कितपत पुढे नेणार? मी विनंती करतो की आपला फोकस बदला. तो तसा बदलावा कारण चर्चेच्या वेळी एकवेळ ठिक मात्र नवीन रचनेच्या घोषणेतही जर नकारत्मकताच निघत असेल तर मात्र कठीण आहे असे वाटते.

- नीलकांत

पिलीयन रायडर's picture

11 Jun 2015 - 3:38 pm | पिलीयन रायडर

नीलकांत,

आपल्या सर्व प्रतिसादांशी आणि एकंदरितच आपण योजलेल्या मिपाच्या कार्यपद्धतीशी सहमत.

मिपावर संपादकांविरुद्ध एक मतप्रवाह नेहमीच असतो. त्याविषयी असे सुचवावे वाटते की एखाद गोष्ट पटली नाही तर ती व्यनि ने संपादक / नीलकांतला कळवावी. स्वतःची बाजु मांडावी. उत्तर नक्की मिळेलच.
सतत संपादकांविषयी नकारात्मकच बोलुन काही उपयोग नाही. नक्की कोणत्या संदर्भात, कोणत्या घटने विषयी बोलत आहेत हे कळत नाही आणि वाचणार्‍याचे मत अकारण दुषित होते. त्यापेक्षा काय त्या तक्रारी सविस्तर मांडुन नीलकांतला (उदाहरणांसकट) पाठवल्या तर जास्त फायदा होईल.

सासं मंडळाचे अभिनंदन!!

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2015 - 3:26 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

कंजूस's picture

10 Jun 2015 - 4:12 pm | कंजूस

मागच्या महिन्यातल्या टारगटपणामुळे एक दागिना हरवला खरा.

सानिकास्वप्निल's picture

10 Jun 2015 - 4:19 pm | सानिकास्वप्निल

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!

सर्व नव सा.संपादक मंडळींचे अभिनंदन...

जेपी's picture

10 Jun 2015 - 5:31 pm | जेपी

मामोऑ-अभिनंदन रे..चांगल काम करताय पोरांनो/पोरींनो.अस आमचे हे म्हणतात.आता सत्कारात छान सा पुष्पगुच्छ देते.- मामोऑ.

साधा मुलगा's picture

10 Jun 2015 - 5:37 pm | साधा मुलगा

नविन साहित्य संपादकांचे अभिनंदन अाणि शुभेच्छा !!!

प्रीत-मोहर's picture

10 Jun 2015 - 8:51 pm | प्रीत-मोहर

अभिनण्दन आणि शुभेच्छा!!!

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 10:52 pm | श्रीगुरुजी

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

रुपी's picture

10 Jun 2015 - 11:52 pm | रुपी

सर्वांचे अभिनंदन!

नवीन साहित्य संपादक मंडळाचे अभिनंदन !!!

श्रीरंग_जोशी's picture

11 Jun 2015 - 7:00 am | श्रीरंग_जोशी

आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

या चमूतील सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन.
मला विशेष भावलेली बाब म्हणजे या मंडळावर मिपावरच्या युवा आयडींना मिळालेले प्रतिनिधित्व.

मिपावरील लेखनाच्या सादरीकरणात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. या कार्यात सर्व मिपाकरांचे सहकार्य मिळावे ही प्रार्थना.

खटपट्या's picture

11 Jun 2015 - 7:29 am | खटपट्या

या प्रतिसादातून मुळ संपादकांना वयस्कर म्हणल्याबद्दल णीशेध...

स्रुजा's picture

12 Jun 2015 - 1:40 am | स्रुजा

कसं बरोबर पकडलं. :)

श्रीरंग_जोशी's picture

12 Jun 2015 - 2:28 am | श्रीरंग_जोशी

आयडींना युवा म्हंटले आहे.
आयडींच्या मागच्या व्यक्तिंच्या वयाचा संदर्भ इथे नाहीये.

अजया's picture

11 Jun 2015 - 8:02 am | अजया

=))=))

इशा१२३'s picture

11 Jun 2015 - 12:49 pm | इशा१२३

अभिनंदन आणि शुभेच्छा!

जालाबाहेरच्या लेखकांना किंवा इतर उल्लेखनीय लोकांना जालावर लिहिते केलं तर आवडेल नव्या सा.सं नी.

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2015 - 2:39 pm | टवाळ कार्टा

सासं...मदत हवी आहे

मी ऑडियो फाईल्ची लिंक दिली तर मला तेच टंकून द्याल का :)

नीलकांत's picture

11 Jun 2015 - 2:47 pm | नीलकांत

तुम्ही लिहीलेल्या साहित्यात काही चुका असतील तर ते दुरूस्त करून देतील. लिहावं तुमचं तुम्हीच.

कवितानागेश's picture

11 Jun 2015 - 3:53 pm | कवितानागेश

सर्व साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

अनन्त अवधुत's picture

12 Jun 2015 - 2:31 am | अनन्त अवधुत

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

अनामिक२४१०'s picture

12 Jun 2015 - 10:39 pm | अनामिक२४१०

नव्या चमूचे अभिनंदन आणि कार्यासाठी शुभेच्छा …!!!

पाषाणभेद's picture

12 Jun 2015 - 11:39 pm | पाषाणभेद

सर्वांचे अभिनंदन.
ती authored असलेली लिंक चालू करावी. खुप काही महत्वाचे लेख मिळू शकतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jun 2015 - 10:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्यांचे मुद्दे आणि गुद्दे वाचले,

आधी एक सामान्य सदस्य म्हणुन असलेलं मत सांगतो.

मी जेव्हा इथे नवीन होतो तेव्हा मीसुधा काड्यासारु प्रतिसाद, अदृष्य कंपुबाजी वगैरे प्रकारांचा अनुभव घेतलेला आहे. पण असे प्रकार फाट्यावर मारायची सवय असल्यानी टिकलो आणि आज इथे माझाही मित्रपरिवार आहे आणि मी स्वतःही मजबुत धुडगुस घालतो हेही तितकचं खरं आहे. कदाचित बाहेरच्याचा आतला झाल्याचा परिणाम असावा. नव्या मिपाकरांनीही नेटानी प्रयत्न करुन मिपावर तग धरावा अशी विनंती. १००० क्षेत्रामधली १००० मंडळी त्यांची हजार मतं घेउन येणार तिथे मतभिन्नता, वाद आणि मुद्देगुद्दे असणारचं. पण हे वादविवादसुद्धा हेल्दी असावेत अशीचं एक अपेक्षा.
नव्या सदस्यांनीही सुरुवातीचा काही काळ (१ आठवडातरी) वाचनमात्र राहुन नंतर लिहितं व्हावं. काही नवे सदस्य अगदी अति करतात त्यावेळेला त्यांच्यावर पडी होते असा अनुभव आहे. (उदा. कोल्हे, ऐलवणी, यल्लप्पा, हितेशभॉय वगैरे वगैरे नमुने). त्यामुळे असे प्रकार टाळले जावेत हिचं सदिच्छा.

आता नवसंपादकिय दृष्टीकोन.

माझं काम मी नीट करेनचं. कोणाला काही सुचना करायच्या असतील तर मला व्यनि करु शकता. काही मित्र परिवाराला वाटतयं मी आता वेगळा झालोय त्यांच्यासाठी: एक सामान्य सदस्य म्हणुन धमालमस्ती करणं मात्र बंद करणार नाही हे नक्की.

लिहित रहा. :)

-अनिरुद्ध दातार-

पद्मावति's picture

14 Jun 2015 - 11:24 pm | पद्मावति

सर्व सहित्य- संपादक मंडळाचे अभिनंदन.

कंजूस's picture

15 Jun 2015 - 6:57 am | कंजूस

माझा बागकाम एक छंद हा धागा फोटो खूप झाल्याने मोबाइलात लवकर लोड होत नाही तरी त्याचे "सदाहरित धागा -भाग १ " २,३ वगैरे तुकडे केल्यास बरे होईल. सर्वच वाचक त्यात फोटो डकवत जातील.
धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jun 2015 - 4:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे वा नव्या कंपनी ला शुभेच्छा!

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

26 Jun 2015 - 9:06 pm | अरवीन्द नरहर जोशि.

वा वा

pradnya deshpande's picture

18 Sep 2015 - 12:38 pm | pradnya deshpande

गणेश लेखमालेसाठी आता लेख देता येईल का सांगणे. करण मी मिपा ची सदस्य होऊन १५ दिवसच झाले आहेत. लेख द्यायला मला आवडेल.

प्यारे१'s picture

18 Sep 2015 - 12:49 pm | प्यारे१

संपादक देतील च प्रतिसाद पण...
आत्ताच सदस्य झाला आहात ना तै?
ज़रा घ्या वाचनाचा लाभ.
दुसऱ्यांना द्या प्रतिसाद थोड़े.
नंतर आहेच की लिहायचं.

कपिलमुनी's picture

18 Sep 2015 - 3:34 pm | कपिलमुनी

पदार्पणातच सेंच्युरी मारू द्याकी !

मी-सौरभ's picture

18 Sep 2015 - 3:50 pm | मी-सौरभ

तुम्ही जुने आहात म्हणुन तुम्ही नविन लेखकांना असे नाऊमेद करु शकत नाही.

णिषेध!!

नाखुंच्याबिनाब्रेक्सहीचाफॅन
सौरभ