भिजून झाले आपले चिंब चिंब,'
की होतील कधीतरी श्वास थंड,
मग आवरून घेऊ...
बाजूला सारलेलं सगळं..
परत तसंच आळीपाळीने !!
एकेक दगड रचत राहू..
सगळं सावरून मग येऊ,
त्या 'खोलातून' 'जमिनीवर'.
एकमेकांकडे पाहून किंचित हसत!
रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी,
जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी'
निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर,
कादाचित वेगळ्या,हातातला हात सोडून,
एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता..
मी मात्र पाहीन वाट,
कधीतरी वळणं घेतील वाटा,
छेदतील एकमेकांना, 'चूकून.'.
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!!
harShadaa..
www.karadyaachhata.blogspot.com
प्रतिक्रिया
सुंदर कल्पना
धन्यवाद
In reply to सुंदर कल्पना by अरुण मनोहर
ओंजळ्भर पाणी भाग २..
वाहवा!
कल्पना सुन्दर
धन्यवाद
भिजून झाले आपले चिंब चिंब,'…