बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)
लेखनप्रकार (Writing Type)
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.
२)चौघात डाविकडून अनुक्रमे:-नाखरे,दिवेकर(मी),नाटेकर,आराध्ये*...
हा आराध्ये आहे ना..त्याच्याच मुळे हे# व्हिडिओ शुट घडलेले आहेत..(कामात नविन आहे पोर..पण लै क्रीएटिव्ह आहे लेकाचं! ;) )
फोटो काढत (एकमेकांचेही ;) ) आंम्ही वरती आलो...
आणि मग तिथून मी त्यांना पहिलं दर्शन घडवलं..ते खास माझ्या श्टाइलनी...शेवटाच्या ४ पायर्या अलिकडे मी त्यांना डोळे बंद करायला लावले. आणि तिथून माझ्या खास कॉमेंट्रीसह त्यांना आतल्या लोखंडी अडसरापर्यंत तसच ऐकवत..ऐकवत आणलं.मग आता डोळे उघडा!!!!!!!! अशी स्वसंमोहन उपचारात वापरतात तश्या आवाजात.. शेवटची सूचना दिली... आणि मग डोळे उघडताच............................काय झालं!!!!?????
तिघे जण आतला नजारा..विशेष करून वरची खांबांवरची शिल्प...सगळी आखिवरेखिव कोरीव लेणी अक्षरशः विस्फारलेल्या ..आश्चर्यचकित डोळ्यांनी बघत राहिली!
बास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!इथेच माझं काम संपलं! .मग त्या 'प्रथम-दर्शना' नंतर त्यांना तिथून बाहेर आणून (मनात एकदा वल्ली..लेखःस्मरण करून ;) ..) मी त्यांना समग्र लेणी आधी - दाखवली! आणि नंतर आत चैत्यगृहात सगळे जाऊन स्थिरावलो. मग थोडी त्यांना चैत्यगृहातल्या खांबावरच्या चिन्हांची..त्याच्या जुनेपणाची अठवेल तशी माहिती सांगितली..आणि अचानक एक कल्पना आली डोक्यात..मनात म्हटलं, आपली "समाधि" कविता "इथलिच"...ती यांना इथेच वाचून दाखवली तर?????????? पटकन आमच्या मित्राचा फोन घेऊन नेट-लावलं (माझं नेट-भारत संचा..र अवस्थेत गेलेलं होतं! )..आणि माझी "समाधी" हुडकुन काढली! ती वाचून पूर्ण होते तोच तिचा इथेच व्हिडिओ शुट काढावा अशी दुसरी कल्पना डोक्यात आली.आणि मग एका छोट्या प्रस्तावनेसह आधी "समाधी" आणि नंतर "बेडसे लेणी-एक गूढानुभव" चं तिथे एक त्यावेळी जमलं तसं छोटेखानी व्हिडिओ शुट काढलं. (या दोन्ही कविता मि.पा.वर आहेत) खरच सांगतो...त्या दोन्ही कविता लिहिल्या गेल्या ती वेळ आणि ही वेळ मला एकच वाटावी..अशी एक निराळीच अनुभूती मला त्याठिकाणी आली. त्यामुळे..आता फार काहि अधिक न बोलता हा सगळा अनुभव तुम्हा सर्वांसमोर ठेवतो... तुंम्ही अनुभवा आणि योगायोगानी झालेला हा प्रयत्न कसा वाटला? .. ते सांगाही! :)
१)#प्रस्तावना...(ही प्रस्तावना आणि पुढे तिच्यासह पहिली कविता "समाधी" असं आधी ठरल होतं.पण त्याच्या फोनवरून मी २ वेळा स्क्रीन धरून ठेवायला चुकलो..आणि प्रस्तावना संपल्यावर कविता वाचायला गेलो तर फोन लॉक...बॅटरीही कमी उरलि होती..म्हणून मग प्रस्तावना वेगळी आणि पुढे कविता वेगळी असे नाइलाजानी करावे लागले)
२)#समाधी
३)#बेडसे लेणी-एक गूढानूभव!
============================
तर....अश्या या गूढ आणि तितक्याच रम्य बेडसे लेण्यांना मी जितक्या वेळा जाइन..त्यापेक्षा माझं मन पुन्हःपुन्हा तिथे अधिक जाइल..जात राहिल..हेच अखेर खरं आहे. आज या लेखना निमित्तानी मी तिथे गेलेलो आहेच..आणि ते जिवंत काव्य आज पुन्हा माझ्याशी परत येता येता काहि बोलू पहातय... तो संवाद तुमच्या समोर मांडून,तूर्तास मी आपली रजा घेतो..................भेटू तिथेच...
................पुन्हा...!................
जाइन पुन्हा मी तेथे
घडवीन पुन्हा मी काही
फिरता माघारी...पुन्हा
वाटेल राहिले..काही!
हे कैसे गूढ तरिही???
किती उकलत जाऊ मी ही
लागताच हाती इतुके
मन म्हणते 'तितुके'..नाही
किती काव्य लिहु मी आता?
की.."थांब!" म्हणू मी मजला?
मन देत इशारा तरिही
फिरुनी म्हण'ते मज..नाही
मग मी ही सोडून देतो
वारूला-माझ्या इतुका
पण खुंटी त्याची 'तेथे'
तेथूनच-सुटका..नाही!!!
आता या गूढापाशी
किती काळ पुन्हा थबकेन???
हा 'थांग" कसा मी लाऊ?
मन पुन्हा म्हणते...नाही!
==============================
पुन्हा..........
हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात. एकच अर्थ देतात..तो म्हणजे पुन्हा!!! ..खरं तर तिथे पुन्हा जाणं,ही घटना..म्हटली तर माझ्या हतातली,म्हटली तर नाही! अत्ता गेल्या महिन्यात माझ्या एका यजमानाच्या बंगल्याची वास्तुशांत करायला गेलो होतो,तेंव्हाचा हा प्रसंग आहे. त्यांचा बंगला(फार्म हाऊस) बेडश्याच्याच रस्त्यावर आत एके ठिकाणी. काम अवरलं..आणि जेवायला बसल्यावर आमच्या सहकार्यांकडे विषय काढला.तसा तो काम ठरलं तेंव्हापासूनच मनात होता.पण एकदा काम म्हटलं,की मग काम प्रथम,मग नंतर इतर..बाकिचं..या व्यावसायिक तत्वाला अनुसरून,शेवट..जेवणं होता होता सहकारी-मित्रांना म्हणालो, "आज तुंम्हाला एका अद्भुताची भेट घडवली तर चालेल का?" माझ्या ह्या अनपेक्षित समाधिस्थ वाक्यानी ;) त्यांचे कान एकदम टवकारले..आणि उत्तरादाखल, तिघांचा (डोळ्यांनीच)एकत्रित प्रश्न आला-"का........य?????" मी:- "अरे..इथुन ५ कि.मि.वर बेडसे लेणी नावाचा एक खरच भारी चमत्कार आहे. तुंम्ही पहाल,तर या आजच्या दिवसाला कामापेक्षा जास्त अठवाल." माझ्या या प्रस्तावनेचा तिघांवर अपेक्षित परिणाम झाला.आणि मग तिथून बाहेर पडल्यावर आमचा मोर्चा बेडश्याकडे निघाला. बेडश्याच्या पायर्यांजवळ गेलो,आणि त्यांना किती उंचीवर ..कुठे आहे ते जेवतानाच सांगितलेलं असल्यामुळे,आमच्या त्या तिघांमधला एक नामी-वीर* म्हणालाच, "गुर्जी...उतरल्या-नंतरचं दुसरं जेवण तुमच्याकडे लागलं बरं का!" :D पण वरच्या वाक्यातला विनोद त्यादिवशी सर्वार्थानं खरा ठरला,एक तर सकाळी ८ ते १२ हा "बंगल्याच्या" वास्तुशांतिमुळे झालेला नेहमीपेक्षा जास्तीचा वर्कआउट..आणि त्यावर छान जोर्रात झालेलं जेवण. ह्याच्या नंतर मस्त "पडी-लावण्याच्या" त्यांचा(माझ्या-सह ;) ) दैंनंदिन सुखाला मी हे असं माझ्या हौसेपोटी आडमार्गाला आणून ठेवलं होतं! त्यामुळे नाराजीनी नाही..पण हौसेनिही नाही..अश्या अवस्थेत मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात.. १)हाशहुश्श करत..थांबत बसत वर'ती आली!
२)चौघात डाविकडून अनुक्रमे:-नाखरे,दिवेकर(मी),नाटेकर,आराध्ये*...
हा आराध्ये आहे ना..त्याच्याच मुळे हे# व्हिडिओ शुट घडलेले आहेत..(कामात नविन आहे पोर..पण लै क्रीएटिव्ह आहे लेकाचं! ;) )
फोटो काढत (एकमेकांचेही ;) ) आंम्ही वरती आलो...
आणि मग तिथून मी त्यांना पहिलं दर्शन घडवलं..ते खास माझ्या श्टाइलनी...शेवटाच्या ४ पायर्या अलिकडे मी त्यांना डोळे बंद करायला लावले. आणि तिथून माझ्या खास कॉमेंट्रीसह त्यांना आतल्या लोखंडी अडसरापर्यंत तसच ऐकवत..ऐकवत आणलं.मग आता डोळे उघडा!!!!!!!! अशी स्वसंमोहन उपचारात वापरतात तश्या आवाजात.. शेवटची सूचना दिली... आणि मग डोळे उघडताच............................काय झालं!!!!?????
तिघे जण आतला नजारा..विशेष करून वरची खांबांवरची शिल्प...सगळी आखिवरेखिव कोरीव लेणी अक्षरशः विस्फारलेल्या ..आश्चर्यचकित डोळ्यांनी बघत राहिली!
बास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!इथेच माझं काम संपलं! .मग त्या 'प्रथम-दर्शना' नंतर त्यांना तिथून बाहेर आणून (मनात एकदा वल्ली..लेखःस्मरण करून ;) ..) मी त्यांना समग्र लेणी आधी - दाखवली! आणि नंतर आत चैत्यगृहात सगळे जाऊन स्थिरावलो. मग थोडी त्यांना चैत्यगृहातल्या खांबावरच्या चिन्हांची..त्याच्या जुनेपणाची अठवेल तशी माहिती सांगितली..आणि अचानक एक कल्पना आली डोक्यात..मनात म्हटलं, आपली "समाधि" कविता "इथलिच"...ती यांना इथेच वाचून दाखवली तर?????????? पटकन आमच्या मित्राचा फोन घेऊन नेट-लावलं (माझं नेट-भारत संचा..र अवस्थेत गेलेलं होतं! )..आणि माझी "समाधी" हुडकुन काढली! ती वाचून पूर्ण होते तोच तिचा इथेच व्हिडिओ शुट काढावा अशी दुसरी कल्पना डोक्यात आली.आणि मग एका छोट्या प्रस्तावनेसह आधी "समाधी" आणि नंतर "बेडसे लेणी-एक गूढानुभव" चं तिथे एक त्यावेळी जमलं तसं छोटेखानी व्हिडिओ शुट काढलं. (या दोन्ही कविता मि.पा.वर आहेत) खरच सांगतो...त्या दोन्ही कविता लिहिल्या गेल्या ती वेळ आणि ही वेळ मला एकच वाटावी..अशी एक निराळीच अनुभूती मला त्याठिकाणी आली. त्यामुळे..आता फार काहि अधिक न बोलता हा सगळा अनुभव तुम्हा सर्वांसमोर ठेवतो... तुंम्ही अनुभवा आणि योगायोगानी झालेला हा प्रयत्न कसा वाटला? .. ते सांगाही! :)
१)#प्रस्तावना...(ही प्रस्तावना आणि पुढे तिच्यासह पहिली कविता "समाधी" असं आधी ठरल होतं.पण त्याच्या फोनवरून मी २ वेळा स्क्रीन धरून ठेवायला चुकलो..आणि प्रस्तावना संपल्यावर कविता वाचायला गेलो तर फोन लॉक...बॅटरीही कमी उरलि होती..म्हणून मग प्रस्तावना वेगळी आणि पुढे कविता वेगळी असे नाइलाजानी करावे लागले)
२)#समाधी
३)#बेडसे लेणी-एक गूढानूभव!
============================
तर....अश्या या गूढ आणि तितक्याच रम्य बेडसे लेण्यांना मी जितक्या वेळा जाइन..त्यापेक्षा माझं मन पुन्हःपुन्हा तिथे अधिक जाइल..जात राहिल..हेच अखेर खरं आहे. आज या लेखना निमित्तानी मी तिथे गेलेलो आहेच..आणि ते जिवंत काव्य आज पुन्हा माझ्याशी परत येता येता काहि बोलू पहातय... तो संवाद तुमच्या समोर मांडून,तूर्तास मी आपली रजा घेतो..................भेटू तिथेच...
................पुन्हा...!................
जाइन पुन्हा मी तेथे
घडवीन पुन्हा मी काही
फिरता माघारी...पुन्हा
वाटेल राहिले..काही!
हे कैसे गूढ तरिही???
किती उकलत जाऊ मी ही
लागताच हाती इतुके
मन म्हणते 'तितुके'..नाही
किती काव्य लिहु मी आता?
की.."थांब!" म्हणू मी मजला?
मन देत इशारा तरिही
फिरुनी म्हण'ते मज..नाही
मग मी ही सोडून देतो
वारूला-माझ्या इतुका
पण खुंटी त्याची 'तेथे'
तेथूनच-सुटका..नाही!!!
आता या गूढापाशी
किती काळ पुन्हा थबकेन???
हा 'थांग" कसा मी लाऊ?
मन पुन्हा म्हणते...नाही!
==============================
प्रतिक्रिया
पुन्हा बेडसे लेणी??????
@ 'वरती' जाणार्यात मी एकटाच
मिसळपाव.
दुपारचे जागरण = टोचणार्या
+१११
बुवा,
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची
बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची
@रॉयल्टी कोणत्या हाटेलात
लोक्स...
आपला नम्र... खवचट म्हातारा
आपला नम्र... खवचट म्हातारासंदर्भासह स्पष्टीकरण करा (५ गुण)... ही, ही, ही SSSSS (संदर्भ माहित असलेला) इएपुन्हा मस्त लिहिलंय.
वाह
वा
आत्मा साहेबांचा फक्त कविता
हळव्या की
@बुवाकडे लय प्रकारचा "ष्टॉक"
(No subject)
हायला बुवा... अता बेडसे
तू पण का आता 'अता'च?
@ सोयिस्कररित्या विसरलेले
छान.
तो दुसय्राचा मोबॉइल.. नेमका
ह्म्म !!
सर्वेषां धण्यवादम्॥॥॥॥ :)