Skip to main content

बायकांचे करिअर !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 04/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो. व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली. काही वर्षांनी जाणवण्या इतका फरक दिसायला लागला. " स्कोर काय झालाय ? सचिनच्या किती ? किती मतांनी आपला उमेदवार पुढे आहे ? शुक्रवारी कुठे 'बसायचे' ? पक्याची "लाईन" लाऊन देण्यासाठी खलबत कधी करायची ? ........वगैरे असल्या भानगडी मुलींच्या बाबतीत नव्हत्या. हे जाणवायला लागलं. हेही जाणवायला लागलं की अवलंबून किंवा विसंबून राहू शकू अशा कंपनीतल्या व्यक्तिंमध्ये मुली अग्रक्रमाने पुढे आहेत. माझ्या डोक्यात आजवर नसलेला लिंगभेद असा घुसला. आणि काही पदांसाठी फक्त मुलीच घ्यायच्या असा निर्णय कंपनीच्या फायद्या साठी घेतला गेला. त्यामुळे आज करोडो रुपयांची खरेदी, करोडो रुपयांचा हिशोब, करोडो रुपयांच्या प्रकल्पांची तांत्रिक बाजू तपासून त्यांचे विक्रीच्या किमती ठरविणे, आलेल्या अश्या ऑंर्डेर्सचे अचूक अंदाज पत्रक तयार करून प्रकल्प संपेतो पर्यंत त्यातल्या नफ्याकडे बारीक लक्ष्य ठेऊन नफा मिळविणे - खरेतर अंदाजापेक्ष्या ज्यास्त नफा कंपनीला मिळवून देणे अशी अनेक म्हंजे तंत्रज्ञान आणि अर्थ या सारख्या सर्वात महत्वाच्या खात्यांमध्ये माझ्या कंपनीत बायका नेतृत्व करतात. सर्वात महत्वाचे सत्य असे की माझा वारू बेफाम अन्यान्य ठिकाणी उधळलेला असतो, उदाहरणार्थ असे लेख वगैरे लिहायला मला वेळ मिळतो कारण माझ्या कंपनीची दुसरी संचालक माझी बायको आहे. कॉस्ट अकौंटंट आहे. त्यामुळे व्यवसायाची आर्थिक बाजू प्रचंड क्षमतेने आणि अचूक ती सांभाळते. त्यामुळे मला व्यावसाईक टेन्शन गेले अनेक वर्षे अक्षरश: शून्य. व्यवसायातल्या अनेक घडामोडीविषयी आवश्यक असणारा आर्थिक सल्ला मला आयता मिळतो, हवे तेव्हा. शेवटी व्यवसाय म्हणजे फक्त अर्थ, बाकी सगळे अर्थ उभारणी साठी !! त्यामुळे अर्थ खातेच जर पराकोटीच्या जबाबदारीने सांभाळले जात असेल तर माझा वारू उधळण्या व्यतिरिक्त करू काय शकतो ? कार्यस्थळी अफाट क्षमता असलेल्या बायकांच्या बाबतीत काही वेळा मात्र कधी कधी विचित्र खरे तर मला भीषण चीड आणणारा अनुभव येतो आणि मी बायकांनाच त्या साठी जबाबदार धरतो. गेल्या वर्षी मला माझ्या व्यवसायातल्या एका विभागासाठी 'General Manager' पदासाठी उमेदवार हवा होता. महिला उमेदवार असावा अशी अट नव्हती. पण ज्या कंपनीने आमच्यासाठी काही उमेदवार निवडले त्यात दोन पुरुष आणि दोन महिला उमेदवार होत्या. त्यातल्या दोन महिला आणि एक पुरुष उमेदवारांशी मी प्रत्यक्ष्य अर्धा अर्धा तास फोन वर बोलून मुलाखत घेतली. त्यातून एक महिला आणि एक पुरुष निवडले. दुसऱ्या फेरीच्या मुलाखतीनंतर ती महिलाच पास झाली. तिच्याशी आणखी एक प्रदीर्घ गप्पा मारण्याचा निर्णय मी घेतला. एका आठवड्याने बाई आल्या. उत्तम प्रोफाईल होते. दणदणित शिक्षण. इंग्रजी वर प्रभुत्व. वय सुमारे पंचेचाळीस. इंडस्ट्रीमध्ये मला आवश्यक असणा-या क्षेत्रात प्रदीर्घ आणि प्रचंड अनुभव. कामाच्या ठिकाणी नेतृत्व केल्याच्या खुणा. वगैरे. मी खुष. कारण मला हवा तसा उमेदवार मिळाला. सर्वात शेवटी मी त्या बाईंच्या पगारा विषयी अपेक्षा विचारल्या. त्यांनी मला जो आकडा सांगितला तो माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होता. त्यामुळे मी तीन मिनिटात मान्यता देऊन विषय संपविला. दोनेक दिवसात नेमणूकी संदर्भातील पत्र कंपनी कडून बाईना गेले. बाईंचा चार दिवसांनी फोन. भेटायला यायचे आहे. मला वाटले. पगाराविषयी त्यांचा अंदाज चुकला असणार. त्यामुळे पुन्हा बोलायचे असेल. बाई आल्या. केबिन मध्ये आल्या. बसायच्या आत त्यांनी मला सांगितलं मिस्टर आलेत आणि त्याना काही तुमच्या सोबत बोलायचे आहे. त्याना आधी मी बसायला सांगितलं. मग विचारलं. " काय बोलायचं आहे त्याना ?" त्या म्हणाल्या हेच कामाविषयी !!! मी जबरी ओशाळलो. म्हटलं मला कामा विषयी जे बोलायचे आहे "ते गेल्या तीन भेटीत तुमच्याशी बोललो आहे, त्याचा तुमच्या नव-याशी काय संबंध ?" " नाई सर. सगळं मान्य आहे. पण प्लीज. पाच मिनिटं वेळ द्या. मी नाईलाजानं हो म्हटलं. तो बाबा आला. नमस्कार चमत्कार झाला. तो काय करतो हे त्याने सांगितलं. कंपनी काय काय करते हे विचारलं. बाबा सल्लागार आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना गुणवत्ते विषयी सल्ला देतो. पुढे तो बोलू लागला " मला हिने सांगितले हिच्यावर मोठी जबाबदारी द्यायचे तुम्ही ठरविले आहे. आम्हाला आनंद आहे. पण मला काही बोलावे असे वाटले म्हणुन मी आलो. आमची ही जरा तापट आहे. शीघ्रकोपी आहे.........." मी कानाला खोटा खोटा मोबाईल लावला आणि माझ्याच केबिन मधून त्याची बडबड चालू असताना सटकलो. केबिन बाहेर बसलेल्या मदतनीसाने मी सांगितलेला निरोप त्याना दिला. " साहेबांना तातडीचा फोन आलाय आणि दुस-या युनिटवर जावे लागले. तुम्हाला पुन्हा बोलावू. " त्याच दिवशी बाईंची नेमणूक रद्द केल्याचे पत्र बाईना पाठवून दिलं. गेल्या आठवड्यात मी एका पोर्टलवर एक आयटी संबधित वरिष्ठ उमेदवार शोधत होतो. नाशिकमध्ये नोकरीसाठी "आयटी" मधला कुणी उमेदवार ज्याला किमान पंधरा वर्षाचा अनुभव आहे असा मिळणं जरा अवघडच. पण मिळाला. बाई आहेत. सतरा वर्षे TCS मध्ये कामाचा अनुभव. सध्या वास्तव्य नाशिकमध्ये. नोकरी नुकतीच सोडलेली. जबरदस्त अनुभव. एकच मोबाईल नंबर होता, बायोडाटावर. लगेच मोबाईल वर फोन लावला. तो मोबाईल नंबर होता, बाबाचा. बाईंच्या नवरोबाचा. त्याला मी माझी ओळख करून दिली. फोन करण्याचे कारण सांगितले. बाईंचा बायोडाटा नेटवर पाहिल्याचे सांगितलं. त्याने मलाच दहा प्रश्न विचारले. तो फोन नंबर बाईंचा नव्हता. बाबाचा होता !! म्हणजे आधी हा सर्व ठीकठाक आहे का पाहणार आणि मग ठरविणार बायकोला तिकडे पाठवायचे की नाही ते! अहो त्या बाई आयटी इंजिनियर ! सतरा वर्षे इंडस्ट्री मध्ये काम केल्याचा अनुभव. त्याना कुठे नोकरी करायची याचा डायरेक्ट निर्णय घेता येत नाही ? बायका असे वागतात ? मला इथे येणारे म्हंजे अंगावर धावून येणारे उत्तर माहिती आहे. " त्या नाई अश्या वागत. त्यांचे नवरे, पुरुष त्यांना धाकात ठेवतात !!, वगैरे वगैरे तत्सम ....मला चीड याच उत्तरांची आहे. एव्हढं त्या नवऱ्याला घाबरण्यासारखं किंवा धाकात राहण्यासारखं त्यांच्यात म्हणजे नव-यात -काय असतं ? इतक्या शिकलेल्या, अनुभव असलेल्या, कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? करिअरच्या बाबतीत त्याना स्वत:चे स्वातंत्र्य का अबाधित ठेवता येत नाही? शैक्षणिक, वैचारिक आणि आर्थिक क्षमता असणा-या बायका नव-या वर इतक्या अवलंबून का असतात ? सगळ्या नसतील. पण खूप संख्येने असतात. बायकांची करिअरची संकल्पना कुटुंबाला आधार अशीच असते का ? म्हणजे ज्याला आधार द्यायचा त्यालाच पहिली प्रायोरिटी असेच का असते ? असे असायला हरकत नाही पण कुटुंब अनेक जणांचे बनते ना ? " रजा पाहिजे. मुलाची तब्येत ठीक नाही. पुन्हा सहा महिन्यांनी त्याच कारणासाठी पुन्हा हीच रजा घेते. या खेपी नवरा का नाही? परवा पुणे आकाशवाणीवर विविध भारती मध्ये कुणीतरी डॉ संजय उपाध्ये गळा काढून एक अनुभव सांगत होते. एक आई मुलीला पाळणा घरात सोडून जात होती. मुलीचा केवीलवाणा चेहरा पाळणा घराच्या खिडकीतून यांना दिसला. जो ते कित्येक दिवस म्हणे विसरू शकले नाहीत. मुलीला आई पाहिजे होती. पण आई नोकरी करणारी. म्हणजे आई मुळे पोर केविलवाणी होते. पण यांनी बापाचा उल्लेख भाषणात नाही केला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत! २०१२ साला मध्ये पुण्या सारख्या ठिकाणी आकाशवाणीवर अशी भाषणे लावतात कशी ? बरे त्यांच्या भाषणा आधी निवेदन एका बाईने केले होते, म्हणजे निवेदिकेने !!! घरी प्रसंगी बंड करायचे धाडस कार्यालयात वाघीण असणा-या बायकां कडे नसते का? काही ठिकाणी तर नव-या पेक्षा ही ज्यास्त कमविते. पण तरी म्याव असते. माझी एक मैत्रीण आर्कीटेक्ट आहे. स्वत:चा व्यवसाय करते. यांचा व्यवसाय असा असतो की त्याना संध्याकाळी किमान आठ वाजे पर्यंत कार्यालयात चर्चे साठी थांबावेच लागते. संध्याकाळी कंत्राटदार रिपोर्टिंग करायला येतात किंवा नोकरदार गि-हाइके सल्ले मागायला येतात वगैरे. हिची कमाई नव-या पेक्षा बक्कळ ज्यास्त आहे. नवरा नोकरी करतो. तो सात वाजता घरी येतो. ही साडे सहाला घरी. कारण नव-याला तव्या वरची गरम पोळी लागते !!! कमाईपेक्षा कौटुंबिक आनंद महत्वाचा, नाती महत्वाची, तो तिचा निर्णय आहे वगैरे अशा टिपिकल चर्चा मला फडतूस वाटतात. त्यात किती खरे पणा असतो याची मला शंका आहे. बायकांनी करिअर विषयीची संकल्पना आता तरी बदलली पाहिजे असे वाटते.जमेल तितकी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी किंवा घरी बसुन वेळ जात नाही म्हणुन टाइमपास करण्या साठी नोकरी याच्या पलीकडे जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, त्याला झळाळी देण्यासाठी, निर्मितीचा धोधो आनंद मिळविण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वत:च्या क्षमतेची ओळख होण्यासाठी ........ का नाई ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24777
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

बायकांनी करिअर विषयीची संकल्पना आता तरी बदलली पाहिजे असे वाटते.जमेल तितकी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी किंवा घरी बसुन वेळ जात नाही म्हणुन टाइमपास करण्या साठी नोकरी याच्या पलीकडे जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, त्याला झळाळी देण्यासाठी, निर्मितीचा धोधो आनंद मिळविण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वत:च्या क्षमतेची ओळख होण्यासाठी ........ का नाई ? __________________ हे सगळं ठिकेय .पण ते ' का नाई? ' हे कळलं नाई :(

छानच विचार. अनुभवाचे बोल असल्याने लगेच मनाला स्पर्शुन गेले... थोडसं अवांतरात बोलतो :- तुम्ही अजुन एक निरीक्षण केलं आहे का ? ते म्हणजे ओफीस कामाच्या बाबतीत पुरुषांची कार्यक्षमता स्त्रियांपेक्षा किती तरी अधिक असते. किंम्बहुना जिथे जिथे डोक्यावर बसायची संधी इम्युनीटीसकट मिळेल तिथे तिथे कोणतीही व्यक्ती लिंगभेदाशिवाय सुरेख कार्यक्षमता दाखवते. भारतीय कुटुंबात स्त्रियांना कधी डोक्यावर बसवले जात नाही म्हणुनच त्या बाहेर कार्यक्षमता दाखवत आपले काम आनंदाने व व्यवस्थित करुन दाखवण्यात तत्पर असतात, ज्यातुन त्या शक्यतो घरातील व्यापाच्या वैतागातुन सुरेख विरंगुळा निर्माण करतील . पण ज्या स्त्रियांना कुटुंबात डोक्यावर बसवले जाते त्यांना हे जमत नाही (जर उद्योग घरचा नसेल अथवा सेल्फ एम्प्लोयमेंट नसेल तर). नेमकं हेच कारणं आहे की घरी प्रसंगी बंड करायचे धाडस कार्यालयात वाघीण असणा-या बायकां कडे नसते. शेवटी घरं आपलं असत, कार्यालय परकं, (जर का घरचाच व्यवसाय नसेल तर). हे मत लिंगभेदाशिवाय लागु होतं. तसच जॉब करणारी स्त्रि नवराही काम करतोय या समाधानानेही जास्त उत्साही असते. तु जॉब कर मी घर सांभाळतो म्हणनारे नवरे जॉबकरी स्त्रियांना आवडत नाहीत. नेमकं या उलट पुरुषांना घरी डोक्यावर बसता येतं पण ऑफीसमधे तसं वागणं शक्य नसतं, म्हणुनच त्यांच्या ऑफीसमधील कार्यक्षमतेवर फार विपरीत परीणाम होतो. पण मुख्य मुद्दा पुरुषांच्या कार्यक्षमतेबरोबर त्यांच्या डोक्यावर बसता येणे याविशयी असलेल्या पराकोटीच्या कल्पना हे आहे. स्त्रिया फुटकळ गोश्टीत डोक्यावर बसुन घेण्याला समाधान नैसर्गीक रित्याच मानतात, तर पुरुषी अहंकार हा फार विचीत्र असतो. फुटकळ गोश्टीला तो डोक्यावर बसता येणे समजुच शकत नाही... स्त्रियांना नेमक्या याच गोश्टीची जाणीव जेनेटीकली असते म्हणून त्या घरात पुरुषांना क्रॉस करत नाहीत कारण त्यातुन फक्त्त विभक्ती निर्माण होउ शकते कुटूंब नाही... शाहरुख खान त्याच्या पत्नीबाबत बोलताना एक मस्त गोश्ट म्हणाला It doesnt matter with who you romance on the set but by the end of the day you love to get back at the home for woman like her.... सुज्ञ नोकरदार स्त्रियांना ही जाणीव फार नैसर्गीक असते की करीअर पैसा, सामर्थ्य व क्रिएटीव्हीटीचा आनंद काही प्रमाणात नक्किच देतं पण देउ शकत नाही ते एक माणुस म्हणुन हवं सुख टिकवण्याचं समाधान. Woman understand very well that to make an happy ending... they really need to know where to stop the story. जर स्त्रियांना मरुन रोबचं सत्य (की प्रकृती अन पुरुष वेगवेगळे नाहीत ते) इतक्या सहजतेने माहीत असतं तर उगाच आता स्त्रियांवर आगपाखड करण्यात काय अर्थ आहे ? हलके घ्यावे ;)

"एक आई मुलीला पाळणा घरात सोडून जात होती. मुलीचा केवीलवाणा चेहरा पाळणा घराच्या खिडकीतून यांना दिसला. जो ते कित्येक दिवस म्हणे विसरू शकले नाहीत. मुलीला आई पाहिजे होती. पण आई नोकरी करणारी. म्हणजे आई मुळे पोर केविलवाणी होते. पण यांनी बापाचा उल्लेख भाषणात नाही केला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत!" हे पटलं नाही. सरसकट आकाशवाणी आणि कोण ते उपाध्ये यांना दोष देताना यात काही गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत. १. कितीही बापाचा लळा असला, काहीही झालं तरी मुलांना शेवटी आई'च' हवी असते हे सत्य आहे. २. बापाने नोकरी करायची हे अध्यहृत असतं (कमीतकमी आपल्या देशात) याचं कारण आपल्या लग्नसंस्थेत आहे. साधारणपणे मुलगा हा मुलीपेक्षा मोठा असतो. मुलांचं आणि मुलींचं शिक्षण एकाचवेळी पूर्ण होत असल्याने लग्नाच्या वेळेस मुलगा नोकरीत स्थिरस्थावर झालेला असतो पण मुलीच्या नोकरीची सुरूवात असते किंवा तिला नोकरी लागायची असते किंवा काहीवेळा शिक्षणही पूर्ण व्हायचे असते. माझ्याकडे अगदी अचूक विदा नसला तरी बहुतेक वेळा असंच असतं हे कुणालाही मान्य व्हावं. तेव्हां बापाने नोकरी करायची हे अध्यहृत मानलं तर त्यात काही वावगं नसावं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या घरी कुणी जेवायला येतात तेव्हां "स्वयंपाक चांगला झाला आहे" हे घरातल्या स्त्रीलाच सांगतात, पुरूषाला नव्हे (अर्थात स्वयंपाक पुरूषानं केलाय हे माहीत नसेल तर :))

कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? बऱ्याच घरात बाईला तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही असं सतत ऐकवला जातं. नवर्याने त्याच चुका केल्या तरी तो स्वतः आणि घरचे इतर लोक पण त्यावर पांघरून घालायला बसलेले असतात, पण बाईने चूक केली तर बरेचदा ऐकायला लागतं. कदाचित त्याचा मानसिक परिणाम म्हणून तिला सुद्द्धा वाटू लागतं कि आपल्याला जमणार नाही, पण कामाच्या ठिकाणी असं कोणी बोलू शकत नसल्याने तिचा आत्मविश्वास वाढतो. कारण नव-याला तव्या वरची गरम पोळी लागते !!! हा एक मजेशीर प्रकार आहे. माझ्या माहितीच्या घरांमध्ये यात त्या बाईची ८०-९०% चूक असते. त्यांना आपण नवर्याला-मुलांना गरम पोळ्या खाऊ घालतो याच खूप कौतुक असत. एक वेळ नवर्याच्या वाईट सवयी नाईलाजाने चालवून घेणं समजू शकतो पण मुलांना पण वाईट सवयी लावणं ह्यात आईचीच चूक १००% असते. सगळं अन्न हातात आणून देणं, माझं मुलगा/मुलगी एकपण काम करत नाहीत घरात हि तक्रार करताना अभिमानाचा सूर असणं हि त्या बाईचीच चूक. कितीही बापाचा लळा असला, काहीही झालं तरी मुलांना शेवटी आई'च' हवी असते हे सत्य आहे. हे फक्त पहिले ६ महिने ते वर्ष समजू शकतं. त्या नंतर बरेचदा ती चक्क बाबा लोकांची टाळाटाळ किंवा आई बाळा बाबत possessive असणं असू शकतं. साधारणपणे दुसऱ्या लोकांकडे राहायला जाताना पालक आपल्या पाल्यासाठी do's आणि dont'ts ची यादी तयार करतात, मग तो मुलगा असो कि मुलगी. आपल्याकडे मुलगी सासरी म्हंजे दुसर्यांकडे राहायला जाते, म्हणून तिला पण हि यादी दिली जाते. पण बऱ्याच बायका आयुष्यभर दुसर्याकडे राहतो अश्याच वागतात आणि त्यालाच संस्कार समजतात. म्हणून सासरी मतप्रदर्शन न करणं हा आयुष्यभर एक संस्कार आहे असाच समजतात. राहिला प्रश्न नवर्याला कंट्रोल घेऊ देण्याचा, जर सासू सासरे बरोबर राहत असतील तर बरेचदा सगळे विरुद्द्ध एकटी असं सामना असतो आणि तो सगळ्यांना जमतोच असं नाही. एखादीला जमला तर भांडकुदळ आहे, शिस्त नाही, संस्कार नाही हे ऐकवलं जातं. आणि बरेचदा यात तिच्या माहेरच्यांना पण मनस्ताप होऊ शकतो. हे सगळं टाळण्यासाठी गप्पा बसणं, घराला प्राधान्य देणं हे करावं लागतं. आणि काही वर्षांनी त्याची सवय होते.

In reply to by वीणा३

त्यांना आपण नवर्याला-मुलांना गरम पोळ्या खाऊ घालतो याच खूप कौतुक असत. एक वेळ नवर्याच्या वाईट सवयी नाईलाजाने चालवून घेणं समजू शकतो पण मुलांना पण वाईट सवयी लावणं ह्यात आईचीच चूक १००% असते. 'गरम पोळ्या' खाणं म्हणजे वाईट सवय? हे काही पटलं नाही. नवराबायको दोघेही नोकरी करीत असतील तर एखादा/दी स्वयंपाकी ठेवून कुटुंतील सर्वांनीच गरम अन्न (नुसत्याच पोळ्या नाही) खावं. गरम अन्न पचायला सोपं आणि आरोग्यदायी असतं असं ऐकलं आहे.

याची अनेक उत्तरं असू शकतात. पुरुषसत्ताक पद्धतीमुळे वर्षानुवर्षे मुलग्यांचे (मुलगा असल्याने झालेले) 'फाजील' लाड (त्यामुळे बनलेली मतं). आजकाल मुलींचेही (समानतेच्या नावाखाली) तसेच लाड झाल्यावर घराघरात संसार हा प्रकार कितपत होतोय ते दिसतच आहे. एक शास्त्रज्ञ मैत्रिण म्हणते की शनिवार, रविवार घरी कामांचे ढीग दिसत असताना माझा नवरा हातात बीयर घेऊन टिव्हीपुढं बसूच कसा शकतो? पण जाऊ दे! मीच करते सगळं. (त्याची लहानपणापासून असलेली मतं बदलण्यात वेळ घालवण्यापेक्षा कामं उरकलेली बरी असे वाटत असे बिचारीला.)

In reply to by रेवती

एक शास्त्रज्ञ मैत्रिण म्हणते की शनिवार, रविवार घरी कामांचे ढीग दिसत असताना माझा नवरा हातात बीयर घेऊन टिव्हीपुढं बसूच कसा शकतो? हे नक्कीच चुकीचे आहे. पण कांही अंशी ह्या मानसिकतेत आता बदल होतानाही दिसत आहे. अनेक पुरूष हौशीखातर का होईना स्वयंपाक करतात, नाईलाजाने का होईना झाडलोट करतात. पत्नीने नोकरी करून संसाराला हातभार लावावा असे वाटत असेल तर पतीने घरकामात मदत केलीच पाहिजे. पण जाऊ दे! मीच करते सगळं. इथे पत्नीचे चुकते आहे. तिने नवर्‍याला चुकीच्या सवयी लावायच्या किंवा खपवून घ्यायच्या आणि नंतर तक्रार करायची हे योग्य नाही. तिने त्याला ठणकाऊन सांगून कामाला लावले पाहिजे. अन्यथा, 'मी नोकरी सोडून घरी बसते' हे ठासून सांगायला पाहिजे. नोकरी संबंधी दोघांमध्ये चर्चा आणि एकमत लग्नाआधीच व्हायला पाहिजे. (एकमत झालं तरच, लग्नाचा विचार करावा).

In reply to by प्रभाकर पेठकर

"एकमत होणे" , "सहकार्यास तयार होणे" ही घटना/event नाही. ती प्रक्रिया/process आहे. खूप सार्‍या लहान लहान घटाना घडातात, परिणाम दिसतात. काही संभाव्यता लक्षात येतात. सोबत राहून दुसर्‍याची भूमिका (पटली नाही तरी )समजू लागते. हे सगळं आधीच अगदि कट टू कट लिखित कराराप्रमाणं आधीच ठरवून घ्यायचं असेल तर निदान चाळिशीपर्यंत वाट पहावी लागेल. आधीच एकमत झालेले चांगलेच, पण तसे होणार्‍या केसेस अत्यल्प आहेत. कित्येकदा एकमत झालेले वाटणे हे फसवेच निघते. माणूस अनुभवानी नि वयोमानानी बदलत असतो. जुने एकमत कदाचित पुढे रहातही नाही. फक्त नवरा -बायको ह्या अर्थाने नाही, कुठेही सामंजस्य येणे ही प्रोसेस आहे असे म्हणतो.

In reply to by मन१

हे सगळं आधीच अगदि कट टू कट लिखित कराराप्रमाणं आधीच ठरवून घ्यायचं असेल तर निदान चाळिशीपर्यंत वाट पहावी लागेल. माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे. एखाद्या कराराप्रमाणे प्रत्येक गोष्ट लग्नाआधीच ठरविता येत नाही हे मलाही माहित आहे. परंतु, ज्याला, लग्ना नंतर, आपल्या बायकोने नोकरी करायला नको असेल (कोणत्याही कारणासाठी) त्याने आपल्या होणार्‍या बायकोला आपल्या ह्या मता बद्दल लग्नाआधीच कल्पना दिली पाहिजे. जर तिला ते मान्य असेल, तिची सहमती असेल तरच लग्न करावे म्हणजे नंतर मतभेद होत नाहीत. स्वतःच्या मतांबदल दोघांनीही एकमेकांना ढोबळ कल्पना दिली पाहिजे. बाकी बारकावे परिस्थितीनुरुप तडजोड करून ठरविता येतात. मी स्वतः माझ्या पत्नीला तिने नोकरी करू नये (कांही कारणाने) असे माझे मत असल्याचे लग्ना आधीच सांगितले होते. तिलाही ते मान्य होते. स्त्रियांनी नोकरी करण्याच्या विरोधात मी नाही पण तेंव्हा आर्थिक गरज नव्हती आणि मुलांचे संगोपन जास्त महत्त्वाचे होते. पुढे, दुर्दैवाने, गरज भासल्यास तिच्या नोकरीबाबत माझा काहीच आक्षेप नाही हेही आमचे बोलणे झाले होते. आधीच ह्या मुद्द्यावर चर्चा झाल्याने पुढे कधी समस्या निर्माण झाली नाही. तसेच, आई-वडीलांना सोडून वेगळे राहणे कोणाला पसंत नसेल तर तशी कल्पनाही मुलाने मुलीला लग्ना आधीच द्यावी. माझ्या भाच्याच्या बाबतीत असे घडले. मुलगी पाहिल्या नंतर त्या मुलीने सासू-सासर्‍यांबरोबर न राहता वेगळा संसार थाटायचा आग्रह धरला. माझ्या भाच्याला ते पसंत पडले नाही त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा पर्याय स्विकारला. पुढे त्याला हवी तशी मुलगी (त्याच्या आईची योगा शिक्षिका) मिळाली. आता तो, त्याची पत्नी आणि त्याचे आई-वडील आनंदात एकत्र राहात आहेत. दोघांच्याही सहजीवनांत अगदी ३-४ महत्त्वाचे मुद्दे असतात त्यावर एकमत होणे, भविष्यातील विसंवाद टाळण्यासाठी, आवश्यक असते. तसेच, पुढील वैवाहिक आयुष्यातही,दोघांनाही, तडजोड ही स्विकारावीच लागते. आधी सहमती झालेली मतेही, परिस्थितीनुरुप, बदलावी लागली तर परस्परसहमतीने बदलावी. त्यातच वैचारिक परिपक्वता दिसून येते.

गरम पोळ्या खाणं हि वाईट सवय नक्कीच नाहीये पण आई/बायको दमून कामावरून आलेली असताना गरम पोळ्या हव्यात असं हट्ट धरणं हि नक्कीच वाईट सवय आहे. हा जर त्या घरात सगळ्यांनाच पोळ्या करता येत असतील आणि रोज जो लवकर येईल तो गरम पोळ्या करत असेल तर गोष्ट वेगळी. राहिला स्वयंपाकी ठेवण्याचा प्रश्न. आजकाल कामाच्या वेळा इतक्या विचित्र असतात कि ठराविक वेळी घरी यायला जमत नाही, स्वयंपाकी त्या वेळेला येऊ शकेलच असं नाही. आणि नीट ओळख नसल्यामुळे स्वयंपाकी पण इतका विश्वासाचा पण नसतो कि त्याच्याकडे घराची किल्ली ठेवून गेलं तरी चालेल. माणसं कमी असल्यामुळे सगळेच प्रोब्लेम्स असतात. जर आई/ बैको कडून गरम पोळ्या हव्या असतील तर भाजी चिरणे, ओटा आवरणे, केर काढणे इ कामा करण्याची सवय घरात सगळ्यांनाच असली पाहिजे.

In reply to by वीणा३

जर आई/ बैको (बायको) कडून गरम पोळ्या हव्या असतील तर भाजी चिरणे, ओटा आवरणे, केर काढणे इ कामा (कामं) करण्याची सवय घरात सगळ्यांनाच असली पाहिजे. ह्या बद्दल दुमत नाही. पण असे न करणार्‍या नवर्‍यांनी बायको कडून नोकरीची/अर्थार्जनाची अपेक्षा करणे हेही चुकीचे आहे. नवर्‍यांच्या अशा चुकांना खतपाणी घालू नये.

शिकल्या सवरलेल्या/ नोकरी करणार्‍या मुली, लग्न होऊन सुना म्हनून गेल्यावर त्यांच्या तोंडून ही वाक्य ऐकली की डोक्यात जातं. १) "मला पण केस छोटे ठेवायचे आहेत. पण आमच्याकडे (सासरी किंवा नवर्‍याला) चालत नाही. म्हणून मग मी केस छोटे करत नाही" २) आमच्याकडे (सासरी) पुरूषांनी घरी कामं केलेलं आवडतं नाही. (बहुतेक वेळा पुरूषांनी घरी काम करण्याला सासूचा विरोध असतो. तर काही ठिकाणी असा विरोध नसला तरी पुरूष घरी काम करत नाहीत. काही जण तर स्वत:च ताट वाढून घेणार नाहीत की जेवल्यावर ताट सिंकमध्ये टाकणार नाहीत.) टीपः सगळेच पुरूष असे नसतात. बरेच ठिकाणी बायकोला, आईला मदत करणारे पुरूष पाहिले आहेत. अगदी तान्ह्या ४-५ महिन्याच्या (स्वत:च्या) बाळाला आंघोळ घालणे पण काही बाबांनी केले आहे हे पाहिले आहे. पण हेही तितकेच खरे की अशा पुरूषांचे प्रमाण अगदी कमी आहे. (माझ्या मते ८-१०%च असावे.) ३) हमारे यहा तो ममी-पापा आ गये तो जनरली बेटी के घर नही रहते. ओर अगर बेटी के घर खाना खाया तो खाना खाने के बाद प्लेट के बाजू मे पैसा रखते है. ४) सकाळी ८ वाजताच्या ऑफिससाठी घरून ७ ला निघायचं आणि परत घरी ७ ल पोचायचं इतकं व्यस्त शेड्यूल असल्यावरही सकाळी सातच्या आत पोळ्या-भाजी करून निघायचं. पोळीवाली बाई लावायची नाही. का तर म्हणे घरच्याना पोळीवाली बाई लावलेली चालत नाही. अरे पोळीवाली बाई चालत नाही म्हणजे काय. हा काय माज आहे. आता एवढी नोकरी करत असू तर लावायची ना पोळ्याला बाई बिनधास्त. आणि ज्यांना घरच्या पोळ्या हव्या आहेत. त्यांनी घरी करून खाव्यात. नीट शोधले की नक्की चांगल्या बाई मिळतात. २-३ पोळीवाल्या बायका बदलून पाहिल्या, त्यांना नीट ट्रेन केले की झकास पोळ्या करतात या पोळीवाल्या मावशी. ५) माझी एक मैत्रिण आहे. ती डॉक्टर आहे. एकत्र कुटूंबात रहाते. तर सांगायची की कधी कधी इमर्जन्सी ला जायला लागले आणि त्याच वेळी घरी कोणी (सासरकडचे) नातेवाईक आले की मग त्यांच्याशी बोलून, त्यांची सरबराई करून जावे लागते नाहीतर रूसवे-फुगवे होतात. हेच जर नवरा डॉक्टर असता आणि त्याला इमर्जन्सी ला जायला लागले आणि त्याच वेळी घरी कोणी (त्याच्या सासरकडचे) नातेवाईक आले असते तर नवरा तर वेळ न घालवता इमर्जन्सी गेलाच असता आणि वर त्याचे कौतूक पण झाले असते. की किती कर्तव्यपरायण नाही, लगेच गेला. आणि सगळ्या पेशंटना हेच डॉक्टर हवे असतात इ.इ.

In reply to by Pearl

३) हमारे यहा तो ममी-पापा आ गये तो जनरली बेटी के घर नही रहते. ओर अगर बेटी के घर खाना खाया तो खाना खाने के बाद प्लेट के बाजू मे पैसा रखते है. अगदी योग्य पद्धत. ही पद्धत नष्ट झाली आणि अनेक संसारांचे वाटॉळे झाले. बायकांमुळे होणारे दुष्परिणाम याला बायो- हझार्ड म्हणावे का? :)

In reply to by Pearl

@pearl. तुमच्या विचारांची किव येते. कुठल्या जमान्यात वावरता आहात. माझ्या ३ मैत्रिणी आहेत. २ जणी इंजिनियर एक डॉक्टर. त्यापैकी दोघींचे सासू सासरे बँकेत नोकरीला. तिघींच्या पण आई बाबांना घरी यायला परवानगी नाही. कारण एकीला मुलगा झाला नाही, एकीच्या लग्नात तिच्या सख्या बहिणीपेक्षा कमी खर्च केला. आणि एकीच्या लहान भावाने आंतरजातीय लग्न केला. तिघीही मराठी, शहरी भागात राहणाऱ्या. एकीचा नवर्याने ऑफिसच्या सगळ्या कलीग्सना फोन करून सांगितलं कि तिला फोन करत जाऊ नका म्हणून, ३ मोबाईल बदलायला लावले. मी सहसा तिला फोन करत नाही, तीच मला करते, तरी जर चुकून कधी केला तर नवरा आधी बोलतो, खात्री करून घेतो कि कुठला दुसरा पुरुष बोलत नाहीये ना आणि मगच तिला देतो. लग्नाला ४ वर्ष झाली तरी अजून नवर्याचा पगार माहिती नाही. ऑफिसला जायची तेंव्हा लेडीस रूम मध्ये दर २-४ दिवसांनी एकतरी मुलगी आई/बहिण/मैत्रिणीला फोन करून रडत असायची. वरची सगळी उदाहरण तथाकथित शिक्षित (सुशिक्षित नाही म्हणवत :( ) समाजातली आहेत. अजून बरेच लोक जुन्याच काळात वावरतात (ते हि अभिमानाने :( )

In reply to by वीणा३

ऑफिसला जायची तेंव्हा लेडीस रूम मध्ये दर २-४ दिवसांनी एकतरी मुलगी आई/बहिण/मैत्रिणीला फोन करून रडत असायची.
हॅरास्मेंट व स्वखुषीने संसारातील जबाबदार्‍या उचलणे यात खुप फरक आहे. तुमच्या मैत्रीणी बद्दल वाइट वाटतेच पण ती योग्य ती पावले उचलत नाही म्हणुन दुखःही आहे. अर्थात उंटावरुन शेळ्या हाकण्यात अर्थ नाहीच. फारच सरळ गोश्ट आहे तिचा पती तिला आधी एकटे पाडुन निर्माण होणार्‍या असहायतेचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे या प्रकरणात तिच्या सासरच्या अथवा माहेरच्या आर्थीकद्रुश्ट्या अतिशय संपन्न व वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्ती(स्त्रि असो वा पुरुष) जर स्त्रिच्या बाजुने खंबीरपणे उभी राहीली अथवा ती सातत्याने (आइ-वडील सोडुन) कलीग्ज/मित्र/ इतर नातेवाइक यांच्या संपर्कात राहीली तरच हा प्रश्न सुटेल. तिला इतरांपासुन कटॉफ करण्याला नवरा प्राधान्य देतोय. तिच्या नवर्‍यावर बॉसींग अथवा रॅगींग नक्किच झाले असणार. पण ही गोश्ट करीअर न करणार्‍या बायकांच्या बाबतही घडणे सहज असल्याने सदरील प्रतीसादाचे प्रयोजन या धाग्यावर लक्शात आले नाही.

In reply to by आत्मशून्य

पण ही गोश्ट करीअर न करणार्‍या बायकांच्या बाबतही घडणे सहज असल्याने सदरील प्रतीसादाचे प्रयोजन या धाग्यावर लक्शात आले नाही. मी एकतर वरच्या एका प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना हि उदाहरण दिलीयेत. या लेखात हा प्रतिसाद देण्याचा कारण मी खाली एका ठिकाणी संगील्या प्रमाणे: "कुठलीही व्यक्ती जर आपल्या दृष्टीने विचित्र वागत असेल तर त्याचं ८०/९० % कारण त्याच्या घरचे, आजूबाजूचे आणि तो ज्या समाजात राहतो तिथल्या लोकांचे विचार, वागायच्या पद्धती यात असतं. लेखकाला त्या बायकांच्या वागण्याची चीड आली म्हणून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलं एवढंच." वरील लेखात उत्तम करियर असणार्या बायका नवर्याच्या कंट्रोल मध्ये असतात हि गोष्ट लेखकाला समजायला कठीण वाटते, त्यांचं राग येतो, इतका कि एखाद्या लायकी असलेल्या महिलेला पण कामावर घेऊ नका असं सांगण्यात येतं. समाजात नक्कीच अश्या बऱ्याच मुली आहेत ज्या घरी सगळं सहन करूनसुद्धा ऑफिस मध्ये उत्तम काम करतात. जर हे समजलं तर किमान त्यांना नोकरीसाठी नाही म्हणताना विचार करतील.

In reply to by वीणा३

वरील लेखात उत्तम करियर असणार्या बायका नवर्याच्या कंट्रोल मध्ये असतात हि गोष्ट लेखकाला समजायला कठीण वाटते, त्यांचं राग येतो, इतका कि एखाद्या लायकी असलेल्या महिलेला पण कामावर घेऊ नका असं सांगण्यात येतं. समाजात नक्कीच अश्या बऱ्याच मुली आहेत ज्या घरी सगळं सहन करूनसुद्धा ऑफिस मध्ये उत्तम काम करतात. जर हे समजलं तर किमान त्यांना नोकरीसाठी नाही म्हणताना विचार करतील.
अतिशय सहमत.

In reply to by वीणा३

अरे बापरे!! त्या शिकल्या सवरलेल्या मुली विरोध का करत नाहीत? विरोध होत नाही म्हंटल्यावरच अब्युस करणं वाढतं. आपल्याकडे डोमेस्टीक व्हायलंस मोठ्या प्रमाणावर आहे...लोकं काय म्हणतील असल्या गोष्टींना अजिबात भीक घालायची नाही...काही झालं तर लोकं येणार आहेत का?

In reply to by वीणा३

तुम्ही सांगत आहात त्या विशिष्ट केस मधला माणूस हा ओवर पझेसिव्ह वाटतो आहे. अशा मुली पण असतात. माझ्या माहितीत एका जोडप्यामधील बायको एकदम अशीच वागते. नवऱ्याला मैत्रिणींना भेटता तर येणे दूर, फोन वर पण बोलता येत नाही. बोलले तर स्पीकर वर फोन ठेवावा लागतो. अशाने त्याच्या ग्रुप मधील मैत्रिणींनी संबंध कमी करत नेले. पझेसिव्हनेस हा जेन्डर स्पेसिफिक नसतो . त्यामुळे टोकाच्या केसेस बाजूला ठेवू आणि नॉर्मल मुद्द्यांवर बोलूया. मुळात मुतालीकांचा मूळ मुद्दाच थोडा वेगळा आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की नवऱ्याचे असे वागणे बाहेर इतक्या कर्तृत्ववान असलेल्या स्त्रिया चालवून कशा घेतात. तुम्ही लिहिलेल्या केसेस मध्ये अशा स्त्रिया आहेत हे अधोरेखित होते, पण त्या मागचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही.
ऑफिसला जायची तेंव्हा लेडीस रूम मध्ये दर २-४ दिवसांनी एकतरी मुलगी आई/बहिण/मैत्रिणीला फोन करून रडत असायची.
पुरुष असे जेन्ट्स रूम मध्ये रडत नाहीत, एकतर मनात ठेवतात किंवा अत्यंत खाजगीत बोलतात किंवा दारू पिऊन सेंटी होतात. जगातील सगळी दुखे: बायकांच्या वाट्याला आली आहेत आणि पुरुष मज्जेत असतात अशा भ्रमात कुणीही कृपया राहू नये. अवांतर :- आमच्या किचेन ताई कुठे गेल्या. लवकरच त्यांची गरज भासणार आहे इथे !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जगातील सगळी दुखे: बायकांच्या वाट्याला आली आहेत आणि पुरुष मज्जेत असतात अशा भ्रमात कुणीही कृपया राहू नये. पुरुषांच्या बाबतीतही विचित्र केसेस नक्कीच असतात, त्यांचेही हाल होतात. पण त्यांच्या खासगी आयुष्यातिल प्रोब्लेम्समुळे (विशेषत बायको / गर्लफ्रेंड यांचा ओवर पझेसिव्हनेस किंवा त्यांचा त्या पुरुषाच्या आयुष्यावर असलेला कंट्रोल) नोकरी नाकारली जाईल असे वाटत नाही (किमान माझ्या माहितीत तरी अश्या केसेस नाहीत). नवऱ्याचे असे वागणे बाहेर इतक्या कर्तृत्ववान असलेल्या स्त्रिया चालवून कशा घेतात माझ्या मैत्रिणीच्या गोष्टी ऐकून मला पहिल्यांदी खूप राग यायचा, पण आजकाल वाटू लागलाय कि कुठलाही नात तोडून टाकणं सोपं नसावं. समाज काय म्हणेल, लहान भाऊ बहिणीला त्रास होईल का, मुलांचा काय, आपल्या आयुष्याचं पुढे काय, इ कितीतरी प्रश्न असावेत. तसंच चांगलं करियर असणं वेगळं आणि प्रतिकार करायची हिम्मत असणं वेगळं. तुम्ही सांगितलेल्या केसेस मध्ये पुरुषसुद्धा बायकांचा विचित्र वागणं चालवून घेत असतीलच कि. लेखात दिलेल्या उदाहरणामध्ये कदाचित नवर्याची सततची कटकट एकदाच टळली कि निदान पुढे आपल्याला आवडीचा काम करता येईल असाही विचार असू शकेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@वि.मे. >>जगातील सगळी दुखे: बायकांच्या वाट्याला आली आहेत आणि पुरुष मज्जेत असतात अशा भ्रमात कुणीही कृपया राहू नये. >> मला वाटत नाही असं कधी कोणी म्हंटल आहे. १) पण % चा विचार करा. स्त्रियांवर होणारे अन्याय आणि पुरूषांवर होणारे अन्याय. २) आणि बायकांना त्या केवळ 'बायका' आहेत म्हणून घरी आणि घराबाहेर सोसावे लागणारे त्रास/अन्याय. याचा विचार करावा असं वाटतं. चांगले पुरूष जगात नाही असं कोणीच म्हणालं नाही आहे. पण चुकीच्या विचारसारणीचे पुरूषच जास्त आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. आणि हे नाकारणं म्हणजे त्या बाबतीतली आपली जबाबदारी झटकून टाकण्यासारख आहे.

In reply to by Pearl

चांगले पुरूष जगात नाही असं कोणीच म्हणालं नाही आहे. पण चुकीच्या विचारसारणीचे पुरूषच जास्त आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. आणि हे नाकारणं म्हणजे त्या बाबतीतली आपली जबाबदारी झटकून टाकण्यासारख आहे.
अशा विधानांचा या धाग्यावर परत प्रतिवाद करायची इच्छा नाही. पाषाणावर जलाचा अभिषेक करून काय फायदा? (सौजन्य. श्रीयुत व्यास, लेखक महाभारत) त्यामुळे चालू द्या.. :-) निदान त्या निमित्ताने जालावर व्यक्त होत आहात हे महत्त्वाचे ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@वि.मे. मलाही असचं वाटतं आहे की पाषाणावर जलाचा अभिषेक करून काय फायदा? आणि झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं नाही करता येत. >>निदान त्या निमित्ताने जालावर व्यक्त होत आहात हे महत्त्वाचे>> आमच्या जालावर व्यक्त होण्याची तुम्ही काळजी नका करू :-P

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>>पुरुष असे जेन्ट्स रूम मध्ये रडत नाहीत, एकतर मनात ठेवतात किंवा अत्यंत खाजगीत बोलतात किंवा दारू पिऊन सेंटी होतात. जगातील सगळी दुखे: बायकांच्या वाट्याला आली आहेत आणि पुरुष मज्जेत असतात अशा भ्रमात कुणीही कृपया राहू नये. १०० % सहमत.

In reply to by वीणा३

@वीणा३, तुम्ही नमूद केलेल्या घटनांसारख्या घटना होत नाहीत असं माझं म्हणणं नाही. अशा प्रकारच्या अन्यायकारक घटना आजही होत आहेत हे माहिती आहेच. पण म्हणून त्याला पाठिंबा देणं योग्य नाही. माझा विरोध आहे तो यासारख्या घटनांमध्ये जे झाले तेच बरोबर आहे असं मानण्याच्या विचारसारणीला. म्हणून मी 'तुमच्या विचारांची किव येते. कुठल्या जमान्यात वावरता आहात.' असं म्हंटल आहे.

In reply to by Pearl

हमारे यहा तो ममी-पापा आ गये तो जनरली बेटी के घर नही रहते. ओर अगर बेटी के घर खाना खाया तो खाना खाने के बाद प्लेट के बाजू मे पैसा रखते है. किती मराठी लोकांच्या घरात ही परिस्थीती आहे हो? बाकी इतर नॉन-मराठी लोकांशी आपल्याला काय करायचंय? ते इतरही बर्‍याच बाबतीत मागासलेले आहेत......

In reply to by पिवळा डांबिस

किती मराठी लोकांच्या घरात ही परिस्थीती आहे हो? बाकी इतर नॉन-मराठी लोकांशी आपल्याला काय करायचंय? ते इतरही बर्‍याच बाबतीत मागासलेले आहेत...... बास बास. अगदी. आपल्या कडे कमीत कमी आमच्या कडे अगदी उलटी परिस्थिती आहे. आमच्या वहीनीचे आईवडील पुण्यात आल्यावर आमच्याकडे न राहता दुसर्‍या नातेवाईकांकडे रहायला गेले म्हणून आमची आई जाम चिडली होती. "स्वतःच्या पोटच्या मुलीपेक्षा याना इतर नातेवाईक प्रिय असतील तर पुढच्या वेळपासून त्याना पुण्यात आल्यावर आपल्याकडे येण्याचा आग्रहही करू नये" इति, आमची आई.

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस >>किती मराठी लोकांच्या घरात ही परिस्थीती आहे हो?>> अगदी एवढी टोकाची असेलच असं नाही. पण मराठी लोकांमध्येही खूप उदाहरण पाहिली आहेत. खेड्यातली आणि शहरातली दोन्ही ठिकाणची. १) सून प्रेग्नंट असतानाही तिला घरातली सगळी कामं प्लस घरच्या बांधकामावर जड जड बादल्या उचलून पाणी घालायला लावताना पाहिले आहे. (लहान गाव) २) एक पोळ्यावाल्या मावशींचा नवरा काम धाम (ना घरातले ना बाहेरचे) करत नाही. नुसता बसून खातो. ४-४ दिवस गायब असतो. घरी आला की त्यांना मारहाण करतो. चेहरा सुजून काळा-निळा झाला असतो आणि या सांगतात बाथरूममध्ये पाय घसरून पडले. (चार दिवसानी खरे कारण सांगतात.) (शहर) ३) एकांकडे नवरा-बायकोने घरात बोललेले-भेटलेले सासू-सासर्‍यांना आवडत नाही. या कारणास्तव दोघांनाही (कामाचा ५ दिवसांचा आठवडा) असतानाही ६ दिवसांचा आठवडा आहे असं सांगून (एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी) शनिवारी बाहेर भेटावं लागायचं. (शहर) ४) दोन खोल्यात भाड्यानं रहाणारं कुटूंब आहे. नवरा (छोट्या कंपनीतून कमी पगारावर रिटायर), बायको काही आजाराने चालू-फिरू शकत नाही. (दोघं साठीतले) आणि तरूण मुलगा. मुलीच लग्न झालं आहे आणि मुलीला १ अपत्य आहे. जावई मुलीला प्रचंड मारहाण करतो असं त्या बाई सांगतात. खूप चिडतात. दु:ख व्यक्त करतात. पण त्या काही करू शकत नाहित असं म्हणतात. (लहान गाव) इ.इ. अशी ढीगभर उदाहरणं सांगता येतील. >>बाकी इतर नॉन-मराठी लोकांशी आपल्याला काय करायचंय? ते इतरही बर्‍याच बाबतीत मागासलेले आहेत......>> हे पटत नाही. आपल्या भारताच्याच एका भागात रहाणारे हे लोक आहेत. त्यांचं मागासलेपण एकूण समाजाच्या आरोग्यासाठी घातक आहे असं वाटतं. त्यातल्या पिळवणूक होणार्‍या घटकांबद्दल सहानुभूती वाटते. आणि वाईट वाटते. उद्या काश्मिरात दहशतवाद वाढला आहे, पण आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून चालणार आहे का. किंवा गुजरातमध्ये भूकंप झाला आहे, पण ते पडले नॉन-मराठी. आपल्याला काय करायचे आहे, असं आपण म्हणू का. मग परवा गुवाहाटी-बागपत घटना झाली तेव्हा आपण मराठी माणसांना संताप का आला. खरं तर अफगाणिस्तान/ सौदीतल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दलही वाईट वाटते. ( त्या स्त्रिया आपल्या देशाच्या नसतानाही.)

In reply to by Pearl

पहिला मुद्दा. स्त्रियांचं शोषण होतं, अगदी जगभर आणि आपल्या समाजातही, याबद्दल शंका नाहीये हो. मान्यच आहे ते.... माझी असहमती अशासाठी होती की मुलीच्या घरी जेवायला गेलं की ताटाशेजारी लगेच पैसे काढून ठेवायचे ही सरसकट पद्धत म्हणून मलातरी मराठी मंडळींमध्ये कुठे आढळली नाही. उलट व्याही जेवायला आले तर कशाचीही कमतरता दिसू द्यायची नाही (मग ते स्वतःची खरी आर्थिक परिस्थीती लपवण्यासाठीही असेल) ही परिस्थीती आपल्यात जास्त दिसते. आपल्याकडे जर असे पैसे कुणी काढून ठेवले तर त्यावरून उलटं मानापमानाचं महाभारत होईल..... दुसरा मुद्दा. इतर नॉन्-मराठी लोकांमध्ये काही वाईट घडलं की आपल्याला सहानुभूती वाटणं, वाईट वाटणं योग्यच आहे हो. किंबहुना जगात कुणावरही अन्याय झाला, मग तो स्त्रीवर असो वा पुरुषावर, त्याबद्द्ल वाईट वाटणं, संताप येणं यात काहीच चूक नाही. माणुसकीचं लक्षण आहे ते. पण त्यांच्यामधल्या काही इन्फिरियर चाली आपल्यातही असल्यासारखं समजणं हे मला पटत नाही. राजस्थानात अजूनही काही ठिकाणी सती गेल्याच्या बातम्या येत असतात, म्हणून ती प्रथा आजच्या मराठी समाजाशी सरसकट जोडणं कितपत योग्य आहे? काही गुजराती समाजात मुलगी लग्न होऊन गेली तरी तिला लागणारा कपडालत्ता आजीवन तिच्या माहेरून पोचवावा लागतो (असे एक निरिक्षण आहे, चुकीचे असू शकेल). मुंबईतल्या काही गुजराती लोकांत मी हे निरिक्षण केलं आहे आणि मुंबई तर महाराष्ट्रात आहे पण म्हणून सरसकट आपल्या समाजात ही पद्धत आहे असं म्हणणं योग्य ठरेल का? आपल्या मराठी समाजात अजूनही खूप अनिष्ट प्रथा आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न केले पाहिजेत. त्यात आणखी आपल्यात नसलेल्या प्रथा घालून आत्मताडन करण्यात काय मतलब आहे, असं मला वाटतं.... तात्पर्य, माझी असहमती त्या विशिष्ट विधानाबद्द्ल होती. बाकीच्या तुमच्या जनरल भावनेशी मी सहमत आहे

लेख आवडला... पण प्रतिसादांवरून लेखाचं वळण आणि अंतिम स्थान आत्ताच दिसायला लागलंय आता बाई- बुवा वाद सुरु होईल. परवाच वाघ्या कुत्र्या वाद आटोपला आता बाई- बुवा. उद्या शाकाहार- मांसाहार परवा निवासी - अनिवासी .. चालुद्या ... आनंद आहे .

In reply to by स्पा

स्पा भाऊ, मूळात हा 'बाई- बुवा' असा वाद नाहीयेच. या वादाला असं म्हणणं ह्यानेच उलटं धागा भरकटायला हातभार लागतो. समाजात चाललेल्या ज्या गोष्टी पटत नाहीत, अन्याय्य वाटतात, चुकीच्या वाटतात त्यांना चुकीचे म्हणणे हे 'बाई- बुवा' सगळ्यांनी केलं पाहिजे. तिथे जेंडर मध्ये आणायचे कशाला. आणि हा निव्वळ 'बाई- बुवा' असा वाद असता तर हा धागा एका पुरूषाने काढलाच नसता.

बाई बुवा वाद असं नाही हो, पण कुठलाही माणूस एखाद्या प्रकारे वागतो ते का याला नक्कीच कारण असत. कुठलीही व्यक्ती जर आपल्या दृष्टीने विचित्र वागत असेल तर त्याचं ८०/९० % कारण त्याच्या घरचे, आजूबाजूचे आणि तो ज्या समाजात राहतो तिथल्या लोकांचे विचार, वागायच्या पद्धती यात असतं. लेखकाला त्या बायकांच्या वागण्याची चीड आली म्हणून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलं एवढंच.

In reply to by स्पा

कधीही मस्त जोरदार वादावादी झाली, एक प्रतिवादी जोरदार बोलू लागला की लागलिच समन्वयवादी उपटतात. तू ही थोडा बरोबर. हा ही थोडा बरोबर . अशी समजूतदार (आणि पर्यायाने रटाळ) भूमिका घेत वादाला फुलस्टॉप देउ पाहतात. ह्यांच्या येण्यानं त्या ठिकाणी जी जोरजोरात भांडायची खाज शिल्लक असते ती तशीच राहते आणि पुढील वादात, पुढील धाग्यावर निघते.भांडू द्यात की थकेस्तोवर. थकल्याशिवाय खरी शांतता येणार नाही. गप्प बसवून तर नाहीच नाही.

लेख छान. खुद्द एका व्यावसायिकाच्या प्रदीर्घ अनुभवातून, निरिक्षणातून आल्यानं गोष्टी प्रत्य्क्षातल्या आहेत. प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक. बादवे, इतक्या शिकलेल्या, अनुभव असलेल्या, कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? आमी तर ब्वा घरात जाउन "म्याव" करणारेच नवरे पाहिलेत. बायकोला घाबरत नाही असा नवरा सापडणे मुश्किल . "बाहेर सरदार अन् घरात पिंजार".

In reply to by मन१

कुठल्या अनुभवावरुन आपण हे प्रतिपादन केले आहे ? (सरदार आणी पिंजार )

मस्त लेख. पुरुषप्रधान समाजयवस्थेचे अवशेष , दुसरे काय? पण अशा बायका पाहिल्या की खरंच लै ऑड वाटतं. एकदा पुण्याहून मिरजेला जात असताना बसमध्ये एक फ्यामिली भेटली, गप्पा सुरू झाल्या. आई, बाबा अन मुलगा. मुलगा तिशीचा, ऐ-बाबा पंचावन्न वैग्रे वयाचे. सुखवस्तू, सौदी अरेबियात वैग्रे कैक वर्षे राहिलेले. आई स्वतः पुणे युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट क्लास फर्स्ट एमेस्सी बायोमध्ये. आणि त्या अभिमानाने सांगत होत्या की मी कुटुंबासाठी करिअरला तिलांजली दिली, मुलं वाढवली, इ.इ. मुले वाढवणे काही वाईट गोष्ट नाही, पण नोकरदार महिलांबाबत त्यांची मते ऐकून कीव आली. जास्त कीव येण्याचे कारण म्हणजे उच्चशिक्षित महिला इतक्या हिरीरीने करिअरला दुय्यम महत्व देण्याचा पुरस्कार करत होती. असो.

In reply to by बॅटमॅन

कारकीर्द ऐन उमलु लागली असतानाच , पहिला सुप्परहिट पिक्चर करुन लगेच दहा -बारा चित्रपट सृष्टी(करिअर) पासून दूर राहणार्‍या डिम्पल बद्दल पब्लिकचं काय मत असेले? लग्नानंतर करिअर अचानक थांबवणार्‍या जया भादुरी बद्दल स्त्रीने करिअरचेही भान ठेवले पाहिजे म्हणणारे काय मत ठेवून असतील?

In reply to by मन१

मनोबा, कोणी मॅरीड स्त्री करिअर थांबवूदे अथवा नको- तो तिचा/फ्यामिलीचा चॉईस. पण बायकांनी होममेकर होणे कसे हितावह वैग्रे प्रतिपादन चूक नाहीये का? माझा आक्षेप त्या प्रतिपादनाला होता.

In reply to by बॅटमॅन

जास्त कीव येण्याचे कारण म्हणजे उच्चशिक्षित महिला इतक्या हिरीरीने करिअरला दुय्यम महत्व देण्याचा पुरस्कार करत होती. असो. पण बायकांनी होममेकर होणेच कसे हितावह वैग्रे प्रतिपादन चूक नाहीये का? माझा आक्षेप त्या प्रतिपादनाला होता. म्हणजे एखाद्याने आपले प्रामाणिक मत प्रतिपादन करणेही चूक, कीव करण्यासारखे आहे का? हे मॉरल पोलिसिंग नाही वाटतं?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुपे साहेब, प्रतिसादात कदाचित नीट मांडणी झाली नसेल, पण मी नंतर स्पष्ट केले आहेच : माझा आक्षेप त्या "च" ला आहे. बाकी कशालाच नाही. त्यांच्या मताचे आधी आश्चर्य वाटले होते आणि त्या आग्रहीपणाची कीव-इतकेच.

In reply to by बॅटमॅन

>> पण बायकांनी होममेकर होणेच कसे हितावह वैग्रे प्रतिपादन चूक नाहीये का? माझा आक्षेप त्या प्रतिपादनाला होता. >> +१

In reply to by बॅटमॅन

डॉ अनिल अवचटांचा अनुभव.बर्‍याच वर्षापूर्वी वाचलेले आठवते आहे. अनिल अवचटांनी चांगले डॉक्टर असताना आपला व्यवसाय सोडून घरी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पन्ती डॉक्टरच त्या नोकरी करत आणि अनिल स्वतः घरची सर्व कामे करत असत. आता नक्की संदर्भ आठवत नाही पण वाचलेले नक्की स्मरते. आता एका पुरूषाने असा निर्णय घेणे हे समाजाला मान्य असणार्‍या पध्दती पेक्षा वेगळे असेल पण त्यांचा जो निर्णय होता ज्याच्यामध्ये एकाने मिळवावे आणि एकाने घरकाम करावे असे डिव्हीजन ऑफ लेबर होतेच की. जर असाच निर्णय एखाद्या स्त्रीने घेतला तर त्यात चूक ते काय? की केवळ तिचा स्त्रीपणा आड येतो? अर्थात असा डिसिजन हा दोघांनी मिळून घेतला आहे असे गृहीत धरले आहे.

In reply to by कापूसकोन्ड्या

अनिल अवचट 'चांगले डॉक्टर' म्हणुन कधीच प्रसिद्ध नव्हते. त्यांनी मेडीकल प्रॅक्टीस केली नाही. त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळण्या आधीच त्यांनी प्रॅक्टीस न करण्याचा निर्णय घेतला होता. रेसिडन्सी पुर्ण न केल्यामुळे त्यांना डॉक्टर ही पदवीसुद्धा अगदी काठावरच मिळाली आहे.

In reply to by नेत्रेश

ते घरी राहून घर काम करत असत हा मुद्दा आहे. ते निष्णात डॉक्टर नव्हते म्हणून घरात बसले नव्हते तर त्यांनी तो विचारपूर्वक घेतलेला तो निर्णय होता. असो.

In reply to by कापूसकोन्ड्या

रेसिडेन्सि हा प्रकार डॉक्टर झाल्या नंतर करायचा असतो हेही यांना ठाऊक नाहिये. लक्ष देऊ नका. डॉ. (रेसिडेन्सी करून आनंदी) गोपाळ.

In reply to by नेत्रेश

बघा या डॉक्टरांनासुद्द्धा (जे माझ्या माहितीप्रमाणे समाजकार्याला वाहून घेतलेले कलंदर व्यक्ती आहेत) घरी बसल्यावर लगेच त्यांच्या शिक्षणाला कमी लेखलं गेलं. तर ज्या बायका स्वताहून पूर्णवेळ गृहिणी व्हायचा स्वीकारतात त्यांना किती कमी लेखात असतील लोक. खाली कोणीतरी केलीयचं कॉम्मेंत रांधा वाढा उष्टी काढा म्हणून.

In reply to by वीणा३

कुणीही त्यांना कमी लेखलेले नाही . अवचटांनी त्यांच्या "स्वत:विषयी" या पुस्तकात अत्यंत प्रांजळपणे लिहिले आहे की ते स्वत: चांगले डॉक्टर होऊ शकले नसते कारण त्यांचा ओढा तिकडे नव्हता. त्यांनी जे क्षेत्र निवडले ते त्यांच्या आवडीचे होते. नेत्रेश यांनी लिहिलेल्या गोष्टी त्याच पुस्तकात अवचटांनी स्वत: लिहिल्या आहेत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अनिल अवचट 'चांगले डॉक्टर' म्हणुन कधीच प्रसिद्ध नव्हते. अन अवचटांनी त्यांच्या "स्वत:विषयी" या पुस्तकात अत्यंत प्रांजळपणे लिहिले आहे की ते स्वत: चांगले डॉक्टर होऊ शकले नसते काही फरक आहे की नाही ?

In reply to by शिल्पा ब

मुळात त्यांनी कधी डॉक्टरकी केलीच नाही, तर चांगले डॉक्टर म्हणुन प्रसिद्ध कसे होतील? देवा माझ्या वाचव रे बाबा..... असो, बेसिक लॉजिक या विषयावर लवकरच क्लासेस सुरु करीत आहोत. मिपाकरांना सवलत. "स्त्रि/स्त्रिसदृश्य आयडीँ (?) "असतील तर खास सवलत. ही सवलत कुठेलेही वैयक्तिक प्रश्न न विचारता दिली जाईल बरे का !!! असो, अवचट आणि डॉक्टरकी हा विषय इथे संपूर्ण अवांतर असल्याने हा त्यावर माझा शेवटचा प्रतिसाद .

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आपल्या बुद्धीबद्दलचा आदर एकदम खुपच वाढला. मुळात त्यांनी कधी डॉक्टरकी केलीच नाही, तर चांगले डॉक्टर म्हणुन प्रसिद्ध कसे होतील? म्हणजे ते वाईट डॉक्टर होते? कशावरुन? जर त्यांनी डॉक्टरकी केलीच नाही (अन एक सीट वाया घालवली) तर लगेच ते चांगले डॉ. नाहीत? वा !! डॉक्टर असुन डॉक्टरकी केली नाही असं म्हणता येईल फक्त...हेच इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीतसुद्दा. असो..तुमचे मुद्दे संपलेत हे पुढच्या प्रतिक्रीयेवरुन दिसतंच आहे.

ग्रॅज्युएशन किंवा त्यापुढे शिक्षण झालेल्या नवर्‍याचं शेपूट होउन परदेशी स्थाईक झाल्यामुळे करीयर न करू शकणार्‍या बायका पण या मध्येच मोडतात का? :)

In reply to by दादा कोंडके

आणि हो विशेषतः इथे नोकरी असताना नवर्‍याबरोबर परदेशात स्थाईक होण्यासाठी जाणार्‍या आणि तिथे डिपेंडन्ट व्हिसा वर नोकरी करता येत नाही म्हणून नोकरी न करणार्‍या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

वर आणि मग रांधा वाढून-उष्टी काढून थोडी सवड मिळाली की काही तरी क्लासेस वगैरे करून स्वतःचीच समजूत घालायची!

In reply to by दादा कोंडके

अगदी अगदी!! त्यापेक्षा सरळ वेगळं राहीलेलं बरं नै का? नसेल वेगळं रहायचं तर घरी सासुसारखी प्रेमळ बाई असताना उगाच नवर्‍याच्या मागे कशाला जायचं म्हणते मी ! (फक्त स्वत:च्या घरातील बायकांबाबत दृष्टीकोन वेगळा ठेवला की झालं !)

In reply to by शिल्पा ब

म्हणजे नवर्‍यामागे परदेशात जाणे- याबाबतही अ‍ॅडजस्टमेंट स्त्रीलाच करावी लागते मुख्यत:. म्हणजे, बायकोला कंपनीकडून ऑनसाईट जायची संधी मिळाली म्हणून नवरा तिच्याबरोबर गेलाय असं उदाहरण पाहण्यात नाही आणि ऐकिवातही नाही. पण उद्या एखादा नवरा झालाच तयार असा बायकोबरोबर परदेशी जायला तर ते त्या बाईला चालेल का? हाही एक प्रश्नच आहे. असो, चर्चा छान चालली आहे. अनेक बाजूंनी एखादा मुद्दा कसा हाताळला जाऊ शकतो, लोक कसा विचार करतात्/करू शकतात याबद्दल बरीच माहिती मिळते. सर्वांचे मनापासून आभार मानतो.

In reply to by चैतन्य दीक्षित

वर शिल्पातैंनी दिलेल्या काहीशा उपरोधिक मतानंतर तशी केस नसलेल्या असंख्य मुली डोळ्यासमोर आल्या. म्हणजे लग्नानंतर नवरा तिकडे चालला आहे आणि त्याच्या सोबत राहण्यासाठी नोकरी सोडणं अशी केस नसून लग्नाआधीच तो प्रॉस्पेक्टिव्ह नवरा "तिकडे स्थायिक" किंवा "लाँग टर्म प्रोजेक्टवर आणि पुन्हापुन्हा जाण्याची खात्री" असलेलाच पाहिजे अशी नवरा शोधतानाची पूर्वअट असलेल्या मुली नुसत्याच पाहिल्या आहेत असं म्हणत नाही तर विमेने म्हटल्याप्रमाणे कोणतंही आघाडीचं वधुवरसूचक नियतकालिक कोणीही पहावं. माझा एक मित्र अमेरिकेत होता आणि परत येऊन लग्न ठरवायचा प्रयत्न करत होता. तो अजूनही अमेरिकेतच असतो आणि परत जाणार आहे अशा समजुतीने मुली आल्या. त्यातल्या काही मुली याला पसंत पडलेल्या असूनही मुलीच्या बाजूने कळीचा मुद्दा/ प्रश्न हा होता की पुन्हा अमेरिकेत जाणार का? तसा निश्चित प्लॅन नाही आणि आता भारतातच राहणार आहे असं सांगितल्यावर मात्र त्याच मुलींचे धडाधड नकार आले. मित्राला खूप वाईट वाटलं. सुंदर आहात तर खण्ण वाजवून अमेरिकेचा नवरा अशा मोठ्या वर्गात कसली आलीय स्त्री आणि पुरुषाची व्यावसायिक / करियर समानता? परदेशस्थ म्हणजे चिक्कार श्रीमंत आणि मुलगी अत्यंत उच्च सुखात राहील अशा अटकळीने तसाच नवरामुलगा शोधणं यात काही वाईट आहे का हा मुद्दा वादाचा होईल.. कदाचित एक स्पष्ट मागणी /विचारातली स्पष्टता म्हणून ती योग्य आहे असं म्हणता येईल. पण मग मुळात प्रचंड असमानतेच्या शोधात असलेल्यांना कुठून मिळणार इक्वालिटी? अर्थात परदेशातले प्रॉस्पेक्टिव्ह ग्रूम्स हा या धाग्याचा विषय नव्हता. अन्य कोणत्यातरी प्रतिसादाने हा विषय आला. मूळ धाग्याविषयी: धागाकर्त्याने एका स्त्रीचा पती भेटीस आला म्हणून त्या स्त्रीला नोकरी नाकारुन खेदजनक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तिच्याशी बोलून अधिक समजून घ्यायला हवं होतं. जर व्यक्तिगत पातळीवर उतरुन विश्वासाने त्या स्त्रीची घरातली स्थिती समजावून घ्यायला वेळ नसेल किंवा ते व्यावसायिक नियमावलीत बसत नसेल तर मग असे प्रश्न पडण्याइतका जिव्हाळा येतो हे रोचक आहे. हेही नसे थोडके...

In reply to by चैतन्य दीक्षित

बायकोला कंपनीकडून ऑनसाईट जायची संधी मिळाली म्हणून नवरा तिच्याबरोबर गेलाय इथं चार पाच तरी तश्या माहितीतल्या आहेत म्हणजे माहित नसलेल्या किती असतील ते बघा.

In reply to by दादा कोंडके

अहो बऱ्याच बायका मोडतात याच्यात. नवर्याचा शेपूट धरून सासरी आलेल्या, गाणी, विणकाम, चित्रकला अश्या असंख्य आवडी असलेल्या पण संसाराच्या सततच्या अपेक्षामुळे त्याकडे दुर्लक्ष्य केलेल्या. त्याबद्दल अधून मधून खांतावणाऱ्या, पण तरीही उत्साहात असलेल्या. कदाचित अतिकामाने वयाच्या चाळीशीतच कंबर मोडलेल्या. दिवसात तासभर सुद्द्धा स्वतासाठी देऊ न शकणार्या. बऱ्याच असतात. नवर्याचा शेपूट धरून सासरी जाताना सासरच्यांना नोकरी करणार हे आधी सांगितलेल्या. पण नंतर सासरच्या मंडळींच्या हट्टाखातर, मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून, लग्न तुटू नये म्हणून नोकरी सोडलेल्या. आणि इंजिनेर असताना सुद्द्धा रांधा वाढा उष्टी काढा करणाऱ्या. बऱ्याच असतात.

विचार खूप छान मांडले आहेत. लेख आवडला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत! हे सोशल कंडिशनिंग आहे. हे विचार बदलायचा आपण प्रयत्न करायला हवा, आणि मुख्य म्हणजे तेवढा वेळही द्यायला हवा. एका झटक्यात समाजाच्या सर्व स्तरांत बदल घडणार नाहीत, हे हळूहळूच होईल.

In reply to by हसरी

तुम्ही स्त्री आहात असे गृहीत धरून विचारतो, कोणा एखाद्या स्त्रीला चांगल्या प्रकारची नोकरी असेल तर (किंवा असती तर), तिला नोकरी न करणारा पण घर सांभाळणारा नवरा चालेल/चालला असता का? स्वतःशी १००% प्रामाणिक राहून उत्तर द्या. काही वेळा "मला चालेल पण समाज काय म्हणेल" छाप उत्तर येते, त्याचा अर्थ"मला चालणार नाही" असा असतो. एक सहज मज्जा म्हणून कुठल्याही matrimoniyal संस्थळावर चक्कर टाका, मुलींची प्रोफाईल्स बघा. किती जणींना आपल्यापेक्षा कमी पगाराचा नवरा चालेल याचा शोध घ्या. त्यानंतर आजूबाजूच्या मुलींना हाच प्रश्न विचार. मिपावर यावर मागे एकदा चर्चा झाली होती तेव्हा इथल्याच स्त्रियांनी "त्यात काय चूक आहे" असा stand घेतला होता. संपूर्ण समाजाचे सोडा, निदान स्वतःला पुढारलेल्या म्हणवणाऱ्या स्त्रियांनी तरी असा दांभिक पणा सोडायची गरज आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एक सहज मज्जा म्हणून कुठल्याही matrimoniyal संस्थळावर चक्कर टाका, मुलींची प्रोफाईल्स बघा. किती जणींना आपल्यापेक्षा कमी पगाराचा नवरा चालेल याचा शोध घ्या. त्यानंतर आजूबाजूच्या मुलींना हाच प्रश्न विचार. मिपावर यावर मागे एकदा चर्चा झाली होती तेव्हा इथल्याच स्त्रियांनी "त्यात काय चूक आहे" असा stand घेतला होता. संपूर्ण समाजाचे सोडा, निदान स्वतःला पुढारलेल्या म्हणवणाऱ्या स्त्रियांनी तरी असा दांभिक पणा सोडायची गरज आहे.
और ये लगा सिक्सर!!!!!!!!!!! अगदी मनातले बोललास विमे. "त्यात काय चूक आहे" असा stand घेतला असेल तर तो १००% दांभिकपणा आहे. या दांभिकपणाचा सर्वथा निषेध असो. असले डबल स्टँडर्ड लै डोक्यात जाते.

In reply to by बॅटमॅन

आणि मुलाचा पगार मुलीच्या पगारापेक्शा कितीने जास्त हवा याचा काही फॉर्मुला आहे का?...का मनात येइल तो आकडा टाकायचा ;)

In reply to by शिल्पा ब

खोडसोळ प्रतिक्र्या देउ? मुलगी कीती सुंदर आहे यावर या गोष्टी अवलंबुन असतात. आणि मुलगी किती सुंदर आहे हे तिच्या वयावर अवलंबून असते. ;) प्राप्ते तु षोडशे वर्षे गर्दभिss पितु अप्सरायते . म्हणूनच स्त्रिया वय लपवतात. सदर प्रतिसाद निवाळ थट्टा मस्करी म्हणून केलेला आहे. मी माझे तसे मत नाही. मी वयाकडे पहात नाही. (पैशाकडे पाहतो ; ))

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हा प्रतिसाद तुम्ही माझ्या प्रतिक्रियेला उद्देशून लिहिला आहे असे समजून उत्तर द्यायचा प्रयत्न करतेय. जवळजवळ वीस - बावीस वर्षापुर्वीची गोष्ट असेल ही. आम्ही दादरला बॉम्बे ग्लास वर्क्समधे राहत होतो, तिथे 'घासकडवी' नावाचे कुटुंब राहत होते. सौ. घासकडवी रीझर्व्ह बँकेत नोकरीला होत्या. श्री. घासकडवींची फॅक्टरी बंद झाली किंवा अश्याच काही कारणामुळे नोकरी गेली. त्यानंतर ते स्वेच्छेने आणि अतिशय उत्तमरीत्या घर सांभाळू लागले. अतिशय सुरेख संसार चालू होता त्यांचा. दोन्ही मुले अतिशय हुशार. त्यांचा मोठा मुलगा त्यावेळी एस. एस.सी. बोर्डात पहिला आला होता. ह्या कुटुंबाच्या त्याकाळी टिव्हीवर वगैरेही मुलाखती झाल्या होत्या. म्हणजे स्त्रीने अर्थार्जन करणे आणि पुरुषाने घर सांभाळणे ही काही आत्ताची गोष्ट नाहीये. ह्याची सुरुवात कधीच झालेली आहे. आजही कित्येक स्त्रिया असतील ज्या घासकडवींप्रमाणे अर्थार्जन करून कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत असतील. अशी उदाहरणं आपल्याला दिसत नाहीत म्हणून अश्या घटना जगात घडतच नाहीत असे कधीच नसते. मिसळपावावरच्या स्त्रिया किंवा मॅट्रिमोनियल साईटवर दिसणार्‍या स्त्रिया हा काही जगभरातील स्त्रियांचा सॅम्पल साइज नव्हे.

In reply to by हसरी

श्री. घासकडवींची फॅक्टरी बंद झाली किंवा अश्याच काही कारणामुळे नोकरी गेली.
लग्न झाल्यानंतर अशा घटनेमुळे स्त्रीने कमाईची जबाबदारी सांभाळणे आणि लग्न करतानाच 'माझ्यापेक्षा कमी कमाई असलेला किंवा कमाई नसलेला नवरा चालेल' असे स्वतःहून म्हणणे वेगळे आहे असे वाटते. तसे एखादे उदाहरण दिल्यास जास्त योग्य होईल. बाकी लीमाउजेट यांच्या मताशी सहमत. बर्‍याच स्त्रियांना करिअर पेक्षा घर महत्त्वाचे वाटते आणि काही स्त्रियांना सगळंच पाहिजे असतं. करिअरपुढे घरसंसार दुय्यम मानणार्‍या मराठी स्त्रिया फारच विरळा.

In reply to by नगरीनिरंजन

बहुतेक स्त्रीयांना स्वत:च घर, नवरा, मुलं हे हव असतं. ते नैसर्गीक आहे. ज्यांना करीअरची आवड असेल - अन करीअर म्हणजे कुठेतरी कारकुनी करणे नाही- त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम ठरवुन पुढची पावलं उचलली तर फारसं अवघड नाही / नसावं. एक उदा. एक सायंटीस्ट मुलगी आता ४० (+)ची असेल...करीअरमुळे लग्न वगैरे केलं नाही किंवा वेळ झाला नाही...आता लग्नासाठी जोडीदार शोधतेय.

In reply to by हसरी

तुम्ही ज्या घासकडवींविषयी लिहिलं आहे त्यांचा मी मुलगा. माझ्या वडिलांची नोकरी गेली म्हणून त्यांनी घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली असं नसून माझ्या आईवडिलांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय होता.
दोन्ही मुले अतिशय हुशार.
कसचं कसचं... :) पण बोर्डात पहिला आला तो माझा धाकटा भाऊ. :)
अशी उदाहरणं आपल्याला दिसत नाहीत म्हणून अश्या घटना जगात घडतच नाहीत असे कधीच नसते.
हे बहुतांशी बरोबर आहे. आमचं घर त्याकाळी अत्यंत टोकाचं अपवाद होतं, आजच्या काळात ते थोडं कमी टोकाचं अपवाद ठरेल हे खरं आहे. परिस्थिती सुधारत असली तरी हे चित्र दुर्दैवाने अपवादात्मकच आहे. आईवडील दोघेही नोकरी करतात अशा एकदोन पूर्ण पिढ्या गेल्यानंतर नोकरी कोणी करायची हा सामाजिक प्रथेपेक्षा सोयीचा प्रश्न होऊ शकेल.

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद राजेश. आता हे उदाहरण 'फ्रॉम हॉर्सेस माऊथ' सिद्ध झालं. तुमच्या आईवडिलांनी विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक तसा निर्णय घेतला असेल तर ते अधिक कौतुकास्पद आहे. मला दोघांचाही अभिमान वाटतो. आणि हो, गूड टू सी यू हिअर :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमेच्या सर्व प्रतिसादांना सहमत. फक्त अर्थाजन करणे म्हणजेच करियर का? आपल्याला जे आवडेल ते मन लावुन काम करणे करियर मध्ये येत नाही का? येत असेल तर पुर्णवेळ गृहीणी हे पण करियरच झाले आणी इतरांपेक्षा जरा जास्त जबाबदारीचे, कारण ह्यातले नुकसान फक्त पैश्यामंधे होत नाही. काही मोजके अपवाद सोडले तर व्यावसायीक काम करणार्‍या स्त्रियांचे नवरे पण कामाला असतातच आणी बायको कामाला आहे म्हणुन त्यांच करियर/काम दुय्यम होत नाही आणि त्यांच्या बायकांना पण हेच हव असत कि नवर्‍याने अजुन पुढे जाव, आपल्यापेक्षा जास्त यश मिळवाव पण कामधंदा सोडुन घरी बसु नये. किती काम करण्यार्‍या बायकांना फक्त घर सांभाळणारा नवरा आवडेल? आणी याऊलट परिस्थिती नवर्‍याची बायकोसाठी असते. --टुकुल

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@वि.मे. >>एक सहज मज्जा म्हणून कुठल्याही matrimoniyal संस्थळावर चक्कर टाका, मुलींची प्रोफाईल्स बघा. >> धन्यवाद वि.मे. हा (लग्न जुळवा-जुळवीचा) मुद्दा काढल्याबद्दल. ह्या मुद्द्याला एकदा चांगले झोडपायचे होतेच. तुम्ही म्हणता तशीच एक प्रश्नावली माझ्याकडे आहे. - किती मुलं लग्नाचा (कार्यालय, बँडबाजा, जेवणावळी) खर्च निम्मा-निम्मा करायला तयार असतात. - किती मुलं बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार असतात. - किती मुलं अजिबात हुंडा घेत नाहीत / हुंड्याची मागणी करत नाहीत. (इतर वेळी बाकी सर्व ठिकाणी वाघ असणारी, कामाच्या ठिकाणी किंवा एरवी रोजच्या जीवनातही आत्मविश्वासाने सर्व निर्णय घेणारी हीच मुलं या बाबतीत मात्र 'ते देण्याघेण्यातलं(हुंड्याच) आपल्याला काही कळत नाही बुवा. ते मोठी लोकं ठरवतील तसं.' असा स्टँड का घेतात. एरवी स्वत:ला पटतं म्हणून घरच्यांच न ऐकता स्वतःला हवं तसं वागतील. ) - किती मुलं आपल्या सासू-सासर्‍यांना आपल्या कुटूंबाचा घटक मानतात. - किती मुलं आपल्या कमावत्या बायकोला, तिच्या आई-वडिलांना त्यांना गरज पडली असताना आर्थिक किंवा अन्य कोणतीही मदत करू देतील/आडकाठी आणणार नाहीत. - किती घरांमध्ये मुलाइतका/जावयाइतका सुनेला मान असतो. (अगदी मुलाइतकी शिकलेली, कमावती सून असली तरी तिला घरात त्या मुलाइतका मान असतो का. तीही नोकरी करून थकून आल्यावर तिचीही मुलाइतकी सरबराई केली जाते का) -किती घरांमध्ये बायको नवर्‍याइतकीच मिळवत असताना, घरामधली कामं करण्यात नवर्‍याचा पूर्णपणे सहभाग असतो. - बायकोने आपल्या आई-वडिलांच हवं नको पहायची अपेक्षा असणारे किती जण आपल्या सासू-सासर्‍यांची कमीत कमी ख्याली-खुशाली मुद्दामून स्वत:हून त्यांचा संपर्क साधून विचारतात. इ.इ. - किती मुलं फक्त गोरी बायको हवी यासाठी बाकी सर्व दृष्टीने अनुरूप असलेली मुलगी (फक्त काळी/सावळी) आहे म्हणून नाकारतात. - किती मुलं 'मुलीची घरची (आर्थिक) परिस्थिती फारशी चांगली नाही.' या कारणास्तव (बाकी सर्व दृष्टीने अनुरूप असलेली) मुलगी नाकारतात. - किती मुलं 'मुलीवर आई-वडिलांची जबाबदारी आहे' या कारणास्तव (बाकी सर्व दृष्टीने अनुरूप असलेली) मुलगी नाकारतात. आणि तेही स्वत:ची उत्तम परिस्थिती असताना.

In reply to by Pearl

हुंड्याचा मुद्दा गैरलागू आहे बर्‍याच लोकांबाबतीत. हुंडा पाहिजेच ही मागणी आधीच्यापेक्षा बरीच कमी झालेली आहे. अपवाद असले तरि असे सरसकटीकरण करून काय मिळते काय माहिती. असो. बाकी काळेगोरेपणाचा मुद्दा तर कैच्याकै आहे. "मुलीचे रूप आणि मुलाचा पैसा" हाच इन जनरल पाहिला जातो ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे असे होते. नैतर मुलाच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करणारे आणि स्वभावाला प्राधान्य देणारे एक तरी मुलीचे स्थळ पाहिलेत का हो कधी? ते आधी सांगा. मुलींना निव्वळ त्यांच्या सेक्स अपीलवरून जोखणे हे त्यांचे जसे ऑब्जेक्टिफिकेशन आहे तसेच मुलांना निव्वळ आर्थिक स्थितीवरून जोखणे हेदेखील त्यांचे ऑब्जेक्टिफिकेशनच आहे. दुर्दैवाने पुरुषांच्या ह्या ऑब्जेक्टिफिकेशनचा धिक्कार तथाकथित स्त्रीपुरुषसमानतावाद्यांकडून का होत नाही ते माहिती नाही. तुमच्या बाकीच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे, पण हे दोन मुद्दे कैच्याकै आहेत.

In reply to by बॅटमॅन

"मुलीचे रूप आणि मुलाचा पैसा" हाच इन जनरल पाहिला जातो ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे असे होते. हुंडा पाहिजेच ही मागणी आधीच्यापेक्षा बरीच कमी झालेली आहे. डायरेक्ट मागणी कमी झालीये एवढंच. बाकी उच्चशिक्षीत मुलींनी कमी शिकलेल्या अन आर्थिक परीस्थीती उत्तम नसलेल्या मुलाशी लग्न केल्याचे उदा. माझ्या पाहण्यात तरी आहे. अन मुली तुलनेने सुस्थीतीतल्या घरातला मुलगा पाहतात कारण जगायला पैसा हवाच. त्याशिवाय जन्मापासुन अग्नीदेण्यापर्यंत पानही हलत नाही.

In reply to by शिल्पा ब

बाकी उच्चशिक्षीत मुलींनी कमी शिकलेल्या अन आर्थिक परीस्थीती उत्तम नसलेल्या मुलाशी लग्न केल्याचे उदा. माझ्या पाहण्यात तरी आहे.
एखादे असेलही, पण सरसहा होत नै असे आजिबात याबद्दल दुमत नसावे.
अन मुली तुलनेने सुस्थीतीतल्या घरातला मुलगा पाहतात कारण जगायला पैसा हवाच. त्याशिवाय जन्मापासुन अग्नीदेण्यापर्यंत पानही हलत नाही.
बरं मग पैशाची अपेक्षा न करता निव्वळ रूपाची + पाककौशल्याची साधी सोपी अपेक्षा गरीब बिचार्‍या पुरुषांनी केली तर का इतके मोहोळ उठवावे मग? हा निव्वळ तर्कदुष्टपणा आहे.बाईकडून पैसे कमवण्याची अपेक्षा नसेल तर प्रश्नच मिटला. लैच उदार म्हटले पाहिजेत मग पुरुष. असे औदार्य असेल तर मग त्याच्या कंडिशन्स अप्प्लाय होतातच. आणि नोकरिवाली मुलगी असेल तर त्या अटी शिथिल होतातही. पण नोकरी वैग्रे नसेल त्या केसमध्ये त्या कंडिशन्स कायमच राहतील. पुरुषांकडून तो ऑप्शन ओपन असतो. बाईकडे नोकरी किंवा या ना त्या प्रकारे पैसा कमवण्याचे कौशल्य असेल तर ठीक, नपेक्षा घरेलू बै पण चालेल, असा ऑप्शन पुरुष बायकांच्या निवडीत ठेवतात. पण हा ऑप्शन बायका का ठेवत नाहीत मग?????? पुरुषांना जगायला पैसा लागत नाही की काय? की बायकांना स्वतःच्या हिंमतीवर पैसा कमवून निव्वळ त्याच्या बळावर घर चालविता येणार नाही असे वाटते ? वरील वाक्य हे खरेच अशा तार्किक खोडसाळपणाचा उत्तम नमुना आहे. पुरुष हाच ब्रेडविनर या मानसिकतेचेच ते अप्रत्यक्ष उदाहरण आहे.

In reply to by बॅटमॅन

बायकांना स्वतःच्या हिंमतीवर पैसा कमवून निव्वळ त्याच्या बळावर घर चालविता येणार नाही असे वाटते ? असं कोण म्हणतंय अन कुठे? मी तरी कुठेही म्हंटलेलं नाही. बायका एकट्याच कमावणार्‍या बसुन खाणारे नवरेही काही कमी नाहीत. जरा डोळे उघडुन पाहीलंत तर दिसेल. बाकी मी तुलनेने आर्थिक सुस्थीती असा उल्लेख केला होता. त्यामुळे फक्त पैसे देउन रुप अन कामवाली बाइ हवी असेल तर बाजारात कमी नाहीत...त्यासाठी लग्न करुन कोणाला वेठीला धरायची गरज नाही. मुलांनासुद्धा कमीतकमी आपल्याइतकी शिकलेली अन नोकरी करणारीच बायको हवी असते हे बरोब्बर विसरलात याचं आश्चर्य नाही.