ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे
दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे
थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे
बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे
ते म्हणले भेटण्या देवा, गरीबांची कर सेवा.
भेटले. भेटले अनेक सन्धीसाधू बगळे
पुढ्यात वाढलेले झटक्यात मटकावर
बाजुच्या भुकेल्यांचा घास हिरावणारे
ते म्हणले, अरे देव म्हणजे निसर्ग!
डोंगर दर्या नद्या सौन्दर्य चाखल्यावर
कडाडले भुकंप लाखो घरे उध्वस्त करणारे
पेटले वणवे मुक्या श्वापदाना भाजणारे
ते म्हणले, वेड्या देव तुझ्यातच आहे!
मन एकाग्र करुन आत डोकावल्यावर
दिसले लहान मूल, साधनेत द्ंगा करणारे
त्यानेच मुखवटे चढविले असणार, सैतानी दिसणारे
ते म्हणले, हे म्हणले, जे जे काही म्हणले,
ते म्हणले, हे म्हणले, जे जे काही म्हणले!
सगळेच बुलशिट, नक्की कोणास माहित नव्हते!
सगळे सन्धीसाधूच, देवावर तिजोर्या भरणारे!
श्रद्धेच्या अन्धारात तीर मारून भक्ष्य शोधणारे!
आणि दुर्गम गुहेतले कृपण ऋषी, ज्ञानी म्हणविणारे?
भले त्याना अर्थ कळो, जगाला न सांगणारे!
कंटाळलोय मी तुला शोधून शोधून,
आता हे देखील माहीत नाही मला,
तू सापडल्यास काही फरक पडेल किंवा नाही.
तरीही, कुतुहल शमत नाही म्हणून,
एकदा तरी सांग तुझे घर कुठे आहे.....
एकदा तरी सांग तुझे घर कुठे आहे.....
वाचने
2735
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ?
+१
म्हणले की म्हणाले?
देवा तुला शोधु कुटं
धन्यवाद. तुमच्या मित्राची
In reply to देवा तुला शोधु कुटं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव..
अरुण मनोहर सर , कविता उत्तम आहे.
अंशतः सहमत
In reply to अरुण मनोहर सर , कविता उत्तम आहे. by निश
सर्व रसिकाना धन्यवाद. हे
बुच मारले
In reply to सर्व रसिकाना धन्यवाद. हे by अरुण मनोहर
चांगले लेखन.
नेहमीप्रमाणेच!