Skip to main content

आय.आय.टी. व एन. आय.टी.---प्रवेश

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 03/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खाजगी अभियांत्रिकी कॉलेजचा दर्जा बराच घसरला असला तरी आय.आय.टी व एन.आय.टी यांचा दर्जा अजूनही चांगला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ८ नवीन आय.आय.टी.ना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात आता १५ आय.आय.टी व २० एन.आय.टी आहेत. आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी बारावीनंतर IIT-JEE ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच बनारस हिंदू विद्यालय(IT-BHU)/ आय.एस.एम.धनाबादमध्ये याच प्रकियेतून प्रवेश दिला जातो.एन.आय.टी.मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी AIEEE हि परीक्षा द्यावी लागते. २०१३ पासून या दोन्ही परीक्षाऐवजी एकाच परीक्षा घेण्यात येणार आहे. १. प्रवेश परीक्षा व एकंदरीत स्वरूप : या परीक्षेसाठी देशभरातून जवळपास ५ लाख विद्यार्थी बसतात. पूर्वी हि परीक्षा prelimanary व main अशा दोन टप्प्यात विभागली होती. prelimanary मधील पहिल्या २०००० जणांना main परीक्षेसाठी प्रवेश दिला जायचा. २००६पासून prelimanary बंद करण्यात आली व एकच मुख्य परीक्षा सुरु करण्यात आली . मुख्य परीक्षेसाठी तीन तासांचे, objective स्वरूपाचे दोन पेपर असतात. दोन्ही पेपरमध्ये physics, chemistry व maths असे तीन seperate section असतात. पहिला पेपर २४० गुणांचा असून त्या प्रत्येक विषयाचे २३ असे एकूण ६९ प्रश्न असतात. दुसरा पेपर २४० गुणांचा असून त्या प्रत्येक विषयाचे २० असे एकूण ६० प्रश्न असतात.दोन्ही पेपरसाठी negative marking असते. या परीक्षांसाठी CBSE व ISC या बोर्ड परीक्षांचा अभ्यासक्रम असतो. २. पात्रता : बारावीमध्ये कोणत्याही अधिकृत केंद्रातून ६०% हून (५५% आरक्षण) अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. जे विद्यार्थी बारावीस आहेत व ज्यांचा निकाल ३० सप्टेंबर पूर्वी कळू शकतो असे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र आहेत. किमान तीन वर्षाचा DIPLOMA पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हि परीक्षा पास होऊन आय.आय.टी/बनारस हिंदू विद्यालय(IT-BHU)/ आय.एस.एम. धनाबादमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा एकदा प्रवेश घेऊन परत तो रद्द केला असेल तर हे विद्यार्थी या परीक्षेस पुन्हा पात्र नाहीत. ३. वयाची अट व attempts : या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे (आरक्षित-३० वर्षे ) असून हि परीक्षा फक्त २ वेळा देऊ शकतो. ४. निकाल यादी: प्रत्येक विषयात १०% पेक्षा अधिक व सरासरी ३५% हून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय यादी केली जाते. आरक्षित विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र यादी असते. OBC : प्रत्येक विषयात ९ % पेक्षा अधिक व सरासरी ३१.५ % हून अधिक SC ST : प्रत्येक विषयात ५ % पेक्षा अधिक व सरासरी १७.५ % हून अधिक PD(अपंग ) : प्रत्येक विषयात ५ % पेक्षा अधिक व सरासरी १७.५ % हून अधिक PREPATORY COURSE : प्रत्येक विषयात 2.५ % पेक्षा अधिक व सरासरी ८.७५ % हून अधिक या यादीतील क्रमांक व कौन्सिलिंग वेळी कॉलेजचा दिलेला क्रम यावर प्रवेश अवलंबून असतो. एखाद्या आरक्षित कोट्यातील काही जागा शिल्लक असल्यास त्याच कोट्यातील ठराविक विद्यार्थ्यांना PREPATORY COURSE प्रवेश दिला जातो. हा कोर्स एक वर्षाचा असून तो पूर्ण केल्यास त्यांना पुढील वर्षी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. ५ . संभाव्य तारखा व प्रवेश फी : या परीक्षेसाठी ONLINE व OFFLINE अर्ज भरण्याची सोय असून प्रवेश अर्ज राष्ट्रीयकृत बँकेत मिळू शकतो. ONLINE: ३१ ऑक्टोंबर (सुरु) -- १० डिसेंबर (बंद) OFFLINE : 11 नोव्हेंबर (सुरु) -- १५ डिसेंबर (बंद) परीक्षेचा दिवस : ८ एप्रिल निकाल : १८ मे COLLEGE CHOICE FILLING: १९ मे (सुरु) -- १० जून (बंद) RELEASE OF RESULT : १४ जून, २५ जून व ६ जुलै प्रवेश फी-- मुले : १८०० रु., आरक्षित: १००० रु. व मुलींसाठी २०० रु. आहे. ६. आरक्षण : प्रत्येक कॉलेजमधील प्रत्येक शाखेसाठी असणारे आरक्षण खालीलप्रमाणे : SC : 15%, ST : 7.5%, OBC : 27%, PD : 3% सैनिकांची मुले, युद्धात शहीद किंवा गंभीर जखमी झालेल्या सैनिकांच्या मुलांसाठी प्रत्येकी २ जागा आरक्षित आहेत. ७. प्रमुख परीक्षा केंद्रे : अकोला, ओरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर व ठाणे. steam, descargar ares, ares steam, descargar ares, ares
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12254
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

होतकरुंसाठी उपयुक्त माहिती.

मराठी मुलांमधे आता या परिक्षांबद्दल ब र्‍यापैकी जागृ तता येत आहे ही समाधानाची बाब आहे. मराठीशाळांनी जर याबाबत ७ / ८ वी पासून या स्पर्धापरिक्षाबाबत तयारी करुन घेतली तर बरेच होईल. यावर्षापासून परिक्षाच्या मुल्यांकनाबाबत आणि एकच परिक्षा होण्याबाबत शासकिय आदेश अपेक्षित आहे.