Skip to main content

चाळीशी ……… गद्धे पंचविशी

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 25/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात अनेक वाढ दिवस साजरे झाले . चाळीशीत गेलेल्या सोबत्यांचे अभीनंदन सार्वजन मिळून करत आहेत.खरच चाळीशी झाली की आपला या जगाकडे बघायचा नजरियाच बदलतो नाही ! जन्माला आल्या पासून ते शाळेत जायला लागे पर्यंत आपण तसे सर्व दृष्टीने तसे परावलंबीच असतो. शाळेत जरा इतर मुलां मध्ये मिसळल्यावर आपल्याला थोडीशी मतांची शिंगे फुटायला लागतात . मैत्री भांडण राग लोभ अशी भावनांची आंदोलने याच वयात सुरु होतात ती अगदी कॉलेज मध्ये जाई पर्यंत पुरतात. साधारणतः शाळेत असताना आपले आयडॉल्स क्रिकेटपटू सैनिक , लेखक होते. चार्ली चाप्लीन , लॉरेल हार्डी , मिकी माउस , आपल्या आवडी होत्या . आपण झोपेत सुद्धा सोलोमन चा खजिना किंवा रॉबिन्सन क्रुसो किंवा टारझन वैगेरे ची स्वप्ने पाहायचो. क्वचित इतर ही स्वप्नं पडत असतील पण अपवादात्मक खेळ आणि अभ्यास या मधेच सर्व जन साधारणपणे गढलेले असायचो . पुढे कॉलेज मध्ये गेल्या वर इतर आवडी वाढिस लागल्या .लेक्चर बँक करून मित्र मैत्रिणीन बरोबर चकत्या पिटणे चोरून पाहिलेले सिनेमे हॉटेलिंग . त्यावेळी ते सिनेमांचे जग हिरो हिरोईन ची स्टाईल त्यांची केशभूषा, त्यांचे कपडे, नट्यांचे सौंदर्य वैगेरे जरा जरा कळायला लागले ...आपल्या आजुबाजूला वावरणाऱ्या मुलींमध्ये त्यांचे प्रतिबिंब शोधायचा प्रयत्न आपले मन कळत नकळत करायला लागले .....अरे हि कशी चीकणी दिसते ..पासून ते अरे ती तर अगदी डीटटो माधुरी दिसते वैगेरे चर्चा कॉलेज कट्ट्या वर रंगू लागल्या . आपल्याला आवडणाऱ्या या मुलीला " प्रपोज मारणे" ....न जमल्यास होणारे .दु:ख विसरण्य करिता मारलेला सीगारेट चा पहिलावहिला कश......पहिल्यांदा बियर पिताना उडालेली तारांबळ ,कडू चव लागली तरी चेहरा नीट ठेवायचा अट्टाहास करत असतांना आपली उडणारी फजिती ,दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये आपण कशी डायलुशन न करता RAW बियर मारली याचे किस्से . ए.टी.के.टी. च्या सहारे पुढे सरकणारा अभ्यास क्रमाची वर्षे ,मनाच्या फुलपाखरांना पंख फुटले. कधी प्रेम प्रकाराने जुळली ..कधी मोडली ...कधी परत नवी जुळली .....काही लग्नाच्या गाठीपर्यंत पोहोचली . पुढे नोकरी धंदा ...लग्न ...मुलेबाळे ....असा नवीनच अध्याय आयुष्यात सुरु झाला .सुरवातीची काही वर्षे हनिमून च्या दिवसासारखी मजेत गेली ......अगदी सत्य नारायणाला बसल्या सारखे सर्व ठिकाणी जोडीनी जायचा,मिळून शहाळे प्यायचा, कुडकुडत्या थंडीत सुद्धा आईसक्रीम फालुदा खायचा,विनाकारण भटकत राहायचा काळ मागे पडला . " पाहिलं मुल " त्या वेळेला आठवत नाही कितीतरी तास च्या तास ते नाजुकसे हात ,हातात बोटे गुंतवून बसलो होतो.कोड कौतुक करण्यात अशी अनेक सुंदर वर्षे पाखरासारखी उडून गेली .चिमुकल्या पावलान बरोबर आपली पावले जुळवत आपण पुन्हा एकदा बालपण जगलो.... इतका सर्व काळ म्हणता म्हणता निघून गेला आणि चालू झाले ताण तणाव, वाढलेल्या अपेक्षांचे ओझे ,त्यातून उदभवणाऱ्या दररोजच्या या कटकटी ,तडजोडी आणि तुटे पर्यंत ताणले जाणारे वाद. मुले पण आता शाळेत जावू लागली मागण्या वाढल्या हट्ट वाढले. परिस्थितीने आपण हतबल झालेलो. मग या सर्वाचा राग मग आपल्या जोडीदारा वर कधी मुलांवर काढला जावू लागला .....कॉलेज मध्ये मारलेला सिगरेट चा कश आताशी दिवसाला 10 सिगरेट च्या पुढे जावून पोहोचला....बियरचा ग्लास मागे पडून दिवसा गणिक " पेग " नी " क्वार्टर " चा हिशोब होवू लागला. जोडीदारा वरचे प्रेम कमी झाले नसेल पण संवाद मात्र कमी कमी होवू लागला ......आणि तो दिवस आला.... वर्षातून एकदाच येणारा दिवस ,पण या वेळी मात्र वेगळा वाटू लागला होता " आता चाळीशी आली " ची जाणीव मनाला नकळत होवू लागली. अशी ही चाळीशी, आपल्या आयुष्याच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा, जणू आयुष्याचा मध्य बिंदू च्या जवळ पोहोचत असण्याचा सिग्नल. आपण ज्याला तारुण्याची वर्षे म्हणतो त्याच्या उत्तरार्ध ची सुरवात म्हणजे चाळीशी .पण ही चाळीशी आपल्याला काही वेगळे सांगत तर नाही आहे ना ?.नीट विचार केला तर हो .......".मासूम " सिनेमात सईद जाफरी च्या तोंडी डायलॉग आहे की " बेटे को जवान होता देखने मे जो मजा है वो खुद जवान होने मे नाही " हा डायलॉगचं खूप काही शिकवून गेला. मित्रानो ! चाळीशी म्हणजे निसर्गाने आपल्याला " टीनेज " पुन्हा जगायला दिलेली पर्वणी,पुन्हा नव्याने आयुष्याकडे बघायचा चष्मा ,आपल्या जोडीदाराच्या नव्याने प्रेमात पडायचा चान्स ........ नवीन स्वप्ने बघायचे परमिट, पुन्हा एकदा हातात हात गुंफून अनवट वाटांवरून भटकायची संधी.......सूर्यास्त नव्या ने आवडायचे वय, पक्षांची किलबिल ,वाऱ्याची सळसळ कानात भरून घ्यायची ओढ........आपल्या सुंदर आयुष्याला नव्याने बघायची धुंदी . उगीच नाही चाळीशीला गद्धे पंचविशी म्हणतात ...काय खरे आहे की नाही ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4308
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त! मस्त! मस्त! लिखाण

धु॑दी नव्हे, स॑धी. चाळीशी म्हणजे नव्याने जगायची (अखेरची) स॑धी म्हणायला हरकत नाही. आतापर्य॑नच्या सार्या बर्यावाईट अनुभवा॑चा आढावा घेऊन चुका सुधारून पुन्हा ए॑जॉय करण्याची सुरुवात. मात्र यावेळी स्वात्॑त्र्य मर्यादित्..खाण्यापिण्यावर ब॑धने, जागरणावर ब॑धने, मुला॑ची व कुटु॑बियाची मने दुखावू नयेत हे पाहणे..वगैरे वगैरे. ....बाकी इथे मिपावर चाळीशीच्या पुढचे फार लोक असतीलसे वाटत नाही..त्यामुळे या छान वाचनीय धाग्याला किती प्रतिसाद मिळतात, श॑का आहे.

मिसळपाव या नावातच सगळे रस व संस्कृति आल्या. गांभीर्य ,टवाळी, कौतुक माहिती, समज गैर समज सारं च काही. हा लेख तर अप्रतिम आहे.@ यशोधन राव ,खास. असेच प्रसंगी अखंडित लिहीत जावे. माझ्या बाबतील म्हणाल तर मी आता वरीसभरात साठीला येईन. बाकी सर्व गाढवपणा मागे टाकला आहे पण...... ( देवकीताईची आठवण आली) डोळा काही शहाणा व्हायला तयार नाही. ( इथे एक डोळा बारीक केलेली स्माईली आहे असे समजा) .

पण तुम्हाला "नॉटी फॉर्टी"म्हणायचं आहे का?कारण गद्धे पंचविशी हा वेगळाच प्रकार आहे! :D

आता चाळीशी आली " ची जाणीव मनाला नकळत होवू लागली. अशी ही चाळीशी, आपल्या आयुष्याच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा, जणू आयुष्याचा मध्य बिंदू च्या जवळ पोहोचत असण्याचा सिग्नल. आपण ज्याला तारुण्याची वर्षे म्हणतो त्याच्या उत्तरार्ध ची सुरवात म्हणजे चाळीशी . धन्यवाद आता नवीन आयुश्याला सुरवात करतो पण " बेटे को जवान होता देखने मे जो मजा है वो खुद जवान होने मे नाही " हे थोडं बाजुला कारण ठेवा तो मोठा होईल आपोआप फक्त तुमची संस्कार वजा नजर त्याच्यावरं राहू द्या. पण तुम्ही जगा तुमच्या तालावर कारण २५ ते ३९ वर् मेहनत केली आहे त्याची फळे चाखा.