योग्य शब्दपेरणी..भीम-बकासुर कथेचा सुरेख प्रोलोग..
आणि अली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यामधल्या लढतीचे थरारक वर्णन..
अप्रतिम लेखमालेतील अजुन एक अप्रतिम लेख.. !
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
जबरदस्त लेख्..अलीच्या पंच एवढाच ताकदीचा.
तुमच्या लेखणीत जादु आहे मालक.
अली आणि फोरमनच्या लढतीच पुर्ण सजिव चित्र डोळ्यासमोर उभ केलत.
आपल्या पुढील लेखास शुभेच्छा.
(आता फुट्बॉल वल्ड्कप चालु होतोय्..एखाद्या फुट्बॉल पटु बद्दल लिहाल काय?)
छान
***************************************************
There are 3 kinds of people in this world...those you want things to happen, those that make things happen, and those who just wonder what the hell happened!
लेख मस्त झालाय
'फ्लोट लाइक अ बटरफ्लाय'
हे वाचुन मला प्रथम वाटलं की मायकल फ्लेप्स्वर लेख आहे की कोणा एयर ग्लायडींग / कार रेसिंग करणार्यावर.
चेतन
अवांतर: मला बॉक्सिंगमधलं काहीच कळत नाही पण डब्लुडब्लुफ् मात्र जाम आवडतं
वाईल्ड वाईल्ड वेस्ट !!
मॉर्गन मॉर्गन बेस्ट !!
बॉक्सिंगचे सामने पहाताना हाताच्या मुठी ऑटोमॅटीक आवळल्या जातात , अंगात एक स्फुर्ती चढते , एकदा तर मी म्याच बघताना भावालाच ठोसा लगावला होता .... असेच काहीसे रोमांच लेख वाचताना आले .
- या आलि (रेहेम आली... या आली )
मी इतके दिवस याला पाकिस्तानचा बॉक्सर समजत होतो. :O
याची मुलगी- लैला अलिसुद्धा बॉक्सर होती ना?
एक मात्र नक्की झालंय,
मॉर्गनरावांच्या प्रत्येक लेखावर वाचनखूण ठेवावी लागते.
जियो मॉर्गन.
(महम्मद अलिने इस्लाम का बरे स्वीकारला असावा, असा प्रश्न पडला ! हाच प्रश्न मायकल जॅक्सनच्या बाबतही पडला होता. असो.
एकदमसे क आणि ड आणि क लेख रे जेप्या!!
>>Relax - you are fighting डोक्यात विचारांच काहूर उठलेलं असताना तुम्ही तुमच्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला मारूच शकत नाही.
लाख लाख वेळा सहमत! कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग सारखे कॉन्टॅक्ट स्पोर्टसच काय, प्रत्येक खेळाचं हेच सूत्र असतं! प्रत्येक खेळात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिकताही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते! आपल्या क्रिकेटसारख्या खेळात तर मानसिक क्षमताच जास्त महत्त्वाची असं माझं ठाम मत आहे! तुझ्या वर उल्लेखलेल्या वाक्याचं क्रिकेटमधील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद-सोहेल चा चॅप्टर! कोणत्याही संघासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि खासकरून त्या दौर्यावरील कसोट्या म्हणजे त्यांच्या मानसिकतेचीच कसोटी असते नाही का? मुळात कसोटी सामने खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमतेचेही कसोटी पाहतातच! कणखर मानसिक क्षमतेचे खेळाडूच यशाची सर्वोच्च शिखरे पार करतात, नाही का! याच कणखर मानसिक क्षमतेच्या बळावर आपला सचिन शारीरिक क्षमतेच्या सर्व मर्यादा ओलांडत २०० धावा काढू शकला, आपला अनिल जबडा फाटलेला असतानाही सलग १४ ओव्हर्स टाकून लाराची विकेट काढू शकला! याच कणखर मानसिकतेच्या आधारावर लान्स आर्मस्ट्राँग सात सात वेळा 'टूर' जिंकू शकला, दोन्ही कानांचे टायसनने तुकडे काढले असूनसुद्धा होलिफील्ड परत रिंगणात लढायला उतरला तो याच कणखर मानसिकतेच्या बळावर!
असो. तुझ्या वर उल्लेखलेल्या वाक्यातून विचारांचं चक्र सुरू झालं! धन्यवाद रे जेपी. असेच उत्तमोत्तम लेख येऊदेत!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
तू दिलेल्या प्रत्येक उदाहरणाशी सहमत. सगळ्याच खेळात शांत राहाणं महत्त्वाचं असतं. पण बॉक्सिंगसारख्या रानटी खेळात, जिथे येवढा adrenaline rush असतो, असं थंड डोकं ठेवणं महाकठीण आहे रे! थंड डोक्यानी समोरच्याला हाण हाण हाणायचं म्हणजे विकृती आहे राव! पण त्या निमित्तानी "टेंपरामेंट" चा विषय काढलास.... वोइच तो फर्क होता है अच्छे और महान खिलाडी में !! खरं ना?
जे पी
वोइच तो फर्क होता है अच्छे और महान खिलाडी में !!
अरे एकदम लाख मोलाची बात! 'चांगले' खेळाडू पुष्कळ येतात आणि जातात पण एखादा सचिन, आर्मस्ट्राँग, शूमाकर, सॅम्प्रसच कायम स्मरणात राहतो!
>> सगळ्याच खेळात शांत राहाणं महत्त्वाचं असतं.
खरंय. एफ वन सारख्या खेळात तर जरा डोक्यावरचा ताबा सुटला तर परिणाम जीवघेणे ठरू शकतात! असा एक गुणी पण आततायी ड्रायव्हर मला आठवतो तो तुझा अभिधानबंधू ;) 'जेपी मोन्टोया'! किती तरी वेळा 'ओव्हर अॅग्रेशन' मुळे अॅक्सिडंट्स झाले होते त्याचे! तसंच गोरान इव्हानिसेविचचं. एक अत्यंत गुणी खेळाडू पण एकदम गरम डोक्याचा! त्यामुळेच जास्त ग्रँड स्लॅम्स नाही जिंकू शकला!
बाकी बॉक्सिंगसारख्या खेळात डोकं थंड ठेवून समोरच्याला हाणणं कर्मकठीण आहे हे पटलं!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
जेपी जी.... तुमच्या या इतक्या सुंदर, सचित्र आणि माहितीपूर्ण लिखाणाला सलाम करून "अली" च्या जीवनातील फक्त एकच बाब यात "अॅड" कराविशी वाटते... जी तुम्हाला निश्चितच माहित असेल, पण अन्य सदस्यांनादेखील ती माहित व्हावी म्हणून इथे देत आहे.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी "रोम ऑलिम्पिक" मध्ये "गोल्ड मेडल" चा बहुमान मिळवून अमेरिकेला आल्यानंतर त्याचे कौतुक प्रामुख्याने झाले ते निग्रो लोकांच्याकडून आणि "बॉक्सिंग" या खेळाकडे "पैशाचे कुरण" म्हणून पाहणार्या गोर्या धंदेवाइकांकडून. १८ वर्षाच्या अलीला आपण आता "हिरो" झालो असे वाटणे नैसर्गिकच होते, पण त्याला "रंगभेदा"चा फटका बसला तो काही गोर्यांनी त्याला एका हॉटेलमधून हाकलून लावल्यानंतर. त्यांच्या व्याख्येत "अली" हा प्रथम "काळा" व नंतर "बॉक्सिंग विजेता" असल्याने ते हॉटेल केवळ गोर्यासाठी राखीव होते. काऊंवरमागील वेटरने तर त्यांना पेय देण्याचेही नाकारले होते. अलीने त्या गोर्या धटींगणांशी चार हात केले, पण त्यावेळी तेथील पोलीस फोर्सदेखील "आपल्या" लोकांची बाजू घेण्यात पटाईत होता (पाहा : "मिसिसिपी बर्निंग").
अपमान आणि संतापाने फणफणत बाहेर आलेल्या अलीला त्याच्या बरोबरीच्या काही मित्रांनी गावात असलेल्या "काळ्या-गोर्यांच्या" भेदभावाबाबत चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला..... गाडीतून ते ओहिओ नदी जवळ आले.... अलीने गाडी थांबविली आणि मित्रांच्याकडे पाहत म्हणाला, "कशासाठी मी हे सुवर्ण पदक कमावले? जर हा देश आम्हाला अशी हीन दर्जाची वागणूक देतो तर या देशासाठी मिळवलेले हे मेडल का गळ्यात घालून फिरू....". (त्यावेळी तो जाईल तिथे गळ्यात मेडल घालूनच फिरे....) असे म्हणत एका झटक्यात अलीने ते मेडल काढले आणि ओहिओ नदीच्या पात्रात भिरकावून दिले.
१९९६ पर्यंत या भेदाची तीव्रता फारच कमी झाली होती.... आणि त्या वर्षीच्या "अटलांटा ऑलिम्पिक" मध्ये श्री. मोहमद अली यांना समितीने पुनश्च १९६० चे सुवर्णपदक एका खास कार्यक्रमात प्रदान केले ते त्यांनी आभारपूर्वक स्वीकारले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
पवारसाहेब ! (नको.... दुसरं नाव तुम्हीच सुचवा बुवा.. पवारसाहेब अगदीच कॉपीराइटेड वाटतं)... हा किस्सा माहिती होता.. विल स्मिथचा "अलि" बघितला होता. पण मिसिसिपी बर्निंग बद्दल ठाऊक नव्हतं.... बघायलाच हवा !
खूप खूप धन्यवाद.
जे पी
"....पवारसाहेब अगदीच कॉपीराइटेड वाटतं...."
नक्कीच ! त्यामुळे पुन्हा टाईप करायचा प्रसंग कधी आलाच तर साधे स्वच्छ "इन्द्र".... ऑलवेज वेलकम...!
......आणि हो मी मूळ प्रतिक्रियेतच लिहिले होते की, "सुवर्णपदक" ओहिवो नदीत फेकून देण्याचा किस्सा व कारण तुम्हाला माहित असणारच... पण मी त्याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, आपल्या वाचकांना अलीच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा निर्णय ठाऊक असणे गरजेचे आहे... सर्वसाधारणपणे 'अली म्हणजे एक जगज्जेता मुष्ठीयोध्दा' अशीच सर्वांची कल्पना असते, पण आपल्या रंगामुळे स्वतःवर आणि आपल्या जमातीवर होणार्या अन्यायाबद्दल चीड व्यक्त करण्यासाठी त्याने अंगीकारलेला मार्ग काय होता हे देखील माहित होणे आवश्यक आहे.
("मिसिसिपी बर्निंग" चुकवू नका.... तुमच्या सारख्या अभ्यासकाने असे चित्रपट पाहिलेच पाहिजेत असा हा "रंगभेदा"वरील ज्वलंत चित्रपट आहे.... मात्र बघायचा असेल तर तो रात्रीच्या नि:शब्द वातावरणातच पहा.... तोही मोबाईल बंद करून !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
"मिसिसिपी बर्निंग" बद्दल एक मुद्दा राहिला..... हा चित्रपव सत्य घटनेवर आणि "केकेके" या संघटनेच्या "अमेरिका ओन्ली फॉर व्हाईट्स...." या चळवळीवर आधारित आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
सु रे ख ले ख . . . :)
या निमित्त्याने बॉक्सिंग प्रमोटर डॉन किंग आणि त्याची हेयर स्टाईल सुद्धा आठवली !!! ;)
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
जब्राट लिवलंय. पण तरी नॉक आउट लेख मात्र पहिलाच होता असं वाटलं. तो लिअँडर पेस वाला. ही लेखमालिकाच सॉलिड आहे. सकाळी खेळायला जाण्याआधी वाचलं पाहिजे. दोन - चार स्मॅश खटाखट बसतील. कोण म्हणतं बॉ की ह्यो खेळ रानटी आहे ?
स्मोकिन् जो फ्रेजर च्या निधनाच्या बातम्यात सारख सारख सान्गत होते ते ऐकुन त्या लोकांची 'थ्रिला इन मनिला' डाउनलोड करुन बघितली.. ती बघुन आपली तर साइड पक्की झाली.
"जो फ्रेझर" >> "मुहम्मद अली"
जरूर पहावी ही डोक्युमेंट्रि...
ज्यो फ्रेझियर ग्रेट होता ह्यात वादच नाही रे मित्रा... पण अश्या दोन महान बॉक्सर्समध्ये तुलना कशाला करायची? लताबाई भारी की आशाताई ह्या प्रश्नाचं आपल्याला करायचंय काय? फ्रेझियर फ्रेझियर होता आणि अली अली होता.... ह्यो बी भारी न त्यो बी भारी.... हाय काय न नाय काय !
जे.पी.
अतिशय उत्कृष्ट वर्णन... खरी श्रद्धांजली आहे हा लेख... पोरांना वाचून दाखवला.. rumble in the jungle ची तुम्ही दिलेली लिंक चालत नाही आहे... मग चार भागात विभागलेली फाईट सापडली..तुम्हाला मनापासून धन्यवाद...RIP for the boxing genius... आणि हो, धर्म आणि नाव बदलानंतर एका ठिकाणी क्ले नाव राहिलंय... उगाच त्या बॉक्सरचा आत्मा चवताळायच्या आधी संपादित करून घ्या...
प्रतिक्रिया
सुंदर
योग्य
सुरेख!
ल्येख मस्त
एक
मस्त
जबरदस्त
जबरदस्त
युद्धाला
एक नंबर
'फ्लोट लाइक अ बटरफ्लाय'
१ नंबरी
आय लव्ह अलि !!
जबरी
झक्कास
खेळ रानटी
वरील
क्लास !
एकदमसे क
सहमत
वोइच तो
१९६० चे सुवर्ण पदक....!!
मिसिसिपी बर्निंग
अली.... मिसिसिपी बर्निंग....!!
मिसिसिपी बर्निंग....!!
सु रे ख ले ख
ज-ब-र-द-स्त!!!!
जबरदस्त
(जबरदस्त) सहमत आहे
नॉक औट लेख!
लेख मस्त
जे.प्या.
लै भा हा री ही
जब्राट
नामन्जूर..
ज्यो फ्रेझियर
अतिशय उत्कृष्ट वर्णन... खरी
आज पुन्हा एकदा हा लेख वाचला.
अप्रतिम लेख...
जबरदस्त लेख!
जबरदस्त लिहिलेय.