विचार

Primary tabs

कुमाऊचा नरभक्षक's picture
कुमाऊचा नरभक्षक in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 12:52 am

99%, विचारांचा व कृतीचा उगम हा आपल्या मनाच्या अस्वस्थतेमधे असतो हे निरीक्षण केले आहे का ?

मुळात विचार म्हणजे काय तर मनाची अस्वस्थता वा प्रश्न वा अडचणी बाहय परिस्थितीमुळे आहे असे गृहीत धरून त्यास्थिती तुन मार्ग काढायला बाहय गोष्टींची सांगड लावण्यासाठी मनाने मनातच निर्माण केलेली कृत्रिम व्यवस्था म्हणजेच विचार.

म्हणूनच विचार हे नेहमी भाषेतच केले जातात अगदी स्वतःशी सुद्धा आपण ,(बाहय) दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याप्रमाणे शब्दांचा वापर करतो पण आपली मातृभाषाही आपले मन उपजत शिकून आलेले नाही तर ती आपल्या मनाने विविधी शारीरिक व मानसिक कारणातून निर्माण होणारी चित्ताची अस्वस्थता जावी यासाठी बाहेरून स्वीकारलेली म्हणूनच एक परकीय व बाहय प्रणाली आहे. तर ती आतली अस्वस्थता संपवायला का उपयोगी पडेल ? विचारातून ग्लानी येईल पण स्वस्थता हा निर्विचारतेचा गुण आहे.

सो... विविध विचारांचा व कृतींचा मूळ उद्देशच अंतिमत: विविध कारणातून तयार होणारी मनाची अस्वस्थता गमावणे हाच एकमेव असतो. मग ती अस्वस्थता तहान लागली म्हणून असो की मी दुसर्यापेक्षा कशाततरी कमी म्हणजे अंतिमतः सर्वाईव्ह व्हायला अनफिट हा अंत:भाव निर्माण होऊन तयार होणारी भावना असो(इगो याचेच पुष्ट व स्थूल रूप)

पण खरा विरोधाभास हा आहे की मनाची अस्वस्थता ही नैसर्गिकरित्या अंतरिक आहे ,ती अस्तित्वात आहे, आणी आपले भाषिक विचार हे मुळातच बाहय (गोष्टींच्या ज्ञानावर अवलंबून आहेत) घुसडलेतर त्यामुळे ते आंतरिक अस्वस्थता कायमस्वरूपी कसे घालवू शकतील ? ते फक्त एक बेहोशी निर्माण करतात तात्पुरती... मूळ अस्वस्थता विसरण्यापूर्ती मग त्यासाठी चित्रपट, मिपा व अनेक साधने आहेत जी आपली तत्कालीन अस्वस्थता लपवतात पण संपवू शकत नाहीत

तुम्ही समाधानी असता तेंव्हा फक्त समाधानी असता पण विचार वा कृती करायला करायला मात्र हलकीशी का असेना चित्तमध्ये अस्वस्थता हवीच... फार विचार करु नये हे उगाच म्हटले जात नाही कारण जेवढा विचार जास्त तितकी अस्वस्थता तीव्र, जेवढि अस्वस्थता कमी तितके विचार व आचार कमी पण मुळात विचारच करणंही थांबवता येईल हे मात्र लक्षात कोणीही घेत नाही..

जसे तहानेची अस्वस्थता घालवायला पाणी लागते, भुकेची अस्वस्थता संपवायला जेवण लागते तसेच मनाची fear, anger, pain, pleasure, sex, sorrow, hope या भावनात पुन्हा पुन्हा(तात्पुरतं) रमून जायच्या गुलामीतून निर्माण होणारी अस्वस्थता संपवायला विविध विचारांची व कृतींची गरज लागते. म्हणूनच जे मन अस्वस्थ नाही ते कसलाही विचार व कृती करायला असमर्थ आहे... तरीही ते मृत अथवा निरस अजिबात न्हवे

निर्विचार बनायला मार्ग उपलब्ध आहेत ज्याला ध्यान म्हणतात, ते केले जाऊ शकत नाही तो आपल्या मेंदूचा स्वभाव नाही . त्यावर योग्य वेळ येईल तेंव्हा आपले आयुष्य प्रकाशही नक्की टाकेलही पण मग आता जर तुम्ही विविध बाह्य विचार व आचारात ज्यावर तुमचा विश्वास असेल ते अध्यात्म साकार करत असाल तर नेमकं काय साध्य करताय ? बाहय कृतीने मनाची अस्वस्थता झाकायला निर्माण केलेली तात्पुरती बेहोशी, की आंतरिक स्थिरता व समाधान हे तुमचे तुम्हीच प्रामाणिकपणे ठरवा बुआ.

हे ठिकाणमुक्तकसमाजजीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

बंधो, तुमचा माग काढत जिम कॉर्बेट ह्या धाग्यावर येणार, बघाच तुम्ही. ==))

अस्वस्थता ही सुद्धा एक ऊर्जा आहे, व अक्षयतेच्या नियमानुसार ती आत्मस्वरूप जाणण्यात वापरली जात नाही तेंव्हा ती तिच्या तिव्रतेनुसार इतर विविध विचार वा कृतीमध्ये रूपांतरित होऊन बाहेर पडलीच असती त्यामुळे इतर कोणामध्ये अशी ऊर्जा तयार होत असेल व ती इथे व्यक्त होण्यात बाहेर पडत असेल तर स्वागतच आहे की...

मागे वन लायनर्स लिहिले होते.. त्यातीलच हे वाक्य..

"मन आणि विचार यात काहीच फरक नसतो, आपल्या विचारांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले.. पण आता माणुसच विचार करतोय मनाचे स्थान कोठे आहे? .. पण तो विसरलाय विचार हाच मनाचा जन्मदाता आहे "

तुम्ही छान लिहिले आहे..
त्यावरच विचार करतोय.. पण माझ्या लाईन्स आणि आणि तुमचे विचार जुळत नाही असेच मनाला वाटत आहे..

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 8:40 am | कुमाऊचा नरभक्षक

आपल्या विचारांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले

मनाचे अस्तित्व आधीच आहे त्यानेच शब्दांना उभे केले. आणी ही सवय इतकी जुनी (बालपण) आहे की शब्द वा मनाचे अस्तित्व विचारांशिवाय असते हेच विसरलो आहोत. पण प्रॉब्लेम हा आहे की शब्द ही बाहय बाब आहे... तिथून ती उचलली आहे म्हणून मनाच्या सखोल अंतर्गत व्यवहारात दखल ते देऊ शकत नाहीत.

कॉम्पुटर ला 0 व 1 दोनच आकडे कळतात पण तरीही त्याची फार मोठी संख्या समजून घेण्याची पध्द्त तयार केली गेली मनही तसेच करते हलकीशी अस्वस्थता आली रे आली के त्याचा मग काढायला ते स्वतःची प्रणाली विकसित करते त्याला असे समजावले जाते की जीवनात ज्या ज्या अस्वस्थता निर्माण करणाऱ्या बाबी आहेत त्या बाहय आहेत म्हणून बाहय स्थिती बदलणे सुधारणे यावर उपाय हुडकायला पाहिजे व ते तसेच करायला शिकते इतके की ते आपल्या शरीराने इतर शरीराचे अनुकरण केल्यास प्रश्न संपतील अस्वस्थता संपेल असे मानते म्हणूनच ते दुसऱ्या शरीराप्रमाणे सुंदर, सामर्थ्यवान, प्रसिद्ध वगैरे बनायचाही अखंड प्रयत्न करत राहते

पण मनाची अस्वस्थता ही पूर्णपणे त्याची अंतर्गत बाब असल्याने तुम्ही त्याच्या बाहय स्थितीत कोणतेही बदल केले, ज्ञानार्जन केले तर ते प्रयोग तात्पुरते ठरतात मग तुम्ही अस्वस्थतेमुळे क्रांती करा, सत्ता बदल करा, विविध करिअर घडवा की सिनेमा बघा, कामसुखात रममाण व्हा, या सर्व बाबी तत्कालीक बेहोशी तयार करून मूळ अस्वस्थतेकडे थोडा वेळ दुर्लक्ष करायला कामी येतात पण मनाची ती अस्वस्थता जात नाही तइ फक्त झाकली जाते म्हणूनच ते समाधानी रहात नाही हाच अनुभव उरतो. मग निराशेने ते हे जग म्हणजे फक्त माया आहे मिथ्या आहे ही अर्धवट बाब पूर्ण सत्य मानते यालाच बरेचदा व्यक्तिमध्ये प्रौढत्व आले असेही म्हणतात

वस्तुतः अंतर्गत अस्वस्थता दूर करायला बाहय बाबतीत बदल करणे म्हणजेच स्वप्नात लॉटरी लागून आपण प्रत्यक्षात श्रीमंत होऊ असे मानणे होय पण वस्तुतः जर स्वप्न संपले बेहोशी उतरली की परत कंगालपणच हाती उरते तोच प्रकार बाहय बदल करून सुखी होऊन जाऊ असा प्रयत्न करताना अनुभवास येतो

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 8:38 am | मन्या ऽ

निर्विचार बनायला मार्ग आहेत ज्याला धयान म्हणतात,>>> इथे ध्यानधारणेच्या मेन कंसेप्टमधेच लोचा झालाय. (माझ प्रामाणिक मत)

मनात सुरु असलेल्या विचारांवर बुद्धी सतत लक्ष ठेवुन असते. (आठवा. शाळेत काय चुक काय बरोबर हे ठरवता येण्यासाठी एक चांगल आणि दुसर वाईट असे मनाचे 2भाग आहेत. अस घरातले-शाळेतले शिक्षक सांगत असायचे.)
आणि ध्यान करण्यासाठी कुठेतरी जाऊन मनाला "तु शांत बस." हे सांगत बसायची गरज नसते. तर एखादा सुरु असलेल्या विचाराच मुळ शोधण/ आजुबाजूच्या लोकांच बारीक निरीक्षण करण. हे मला समजलेल ध्यान आहे.(किंवा मी या प्रोसेसवर लक्ष ठेवण्याला ध्यान म्हणते)

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 8:50 am | कुमाऊचा नरभक्षक

तुम्ही तुमचा मार्ग हुडकतात हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यापासून मी परावृत्त नक्कीच करणार नाही किप गोइंग....

एक गंम्मत सांगतो

सदैव भानावर येणे/असणे आपले विचार बघणे याची आपल्याला सवय नसण्याचे प्रमुख कारण आपल्या बालपणात दडलेले आहे. जी गोष्ट अखंड करत जगण्याची जिथे खरी गरज व कुवत मानवी देह व मनात आहे तिथे या क्रियेची ओळख आपल्याला नेहमी नकारात्मकतेने व मनावर ओझे अथवा ताण निर्माण करताना झाली आहे.

बघ तू कसा वागतो आहेस, अरे काय अवतार तुझा, तुझा अभ्यास झाला का ? अजून किती खेळणार ? आणी बरीच उदाहरणे घेता येतील व लक्षात येईल की आपल्याला आपल्याकडे बघायचे वळणच मुळात आपण( आपल्यावर हक्क दाखवणाऱ्या लोकानी त्यांच्या नजरेत आपण) काहीतरी चूक केल्यानंतरच बघायचे लावले गेले आहे परिणामी आपल्या अंतर्मनात बालपणीच स्वतःकडे बघणं, आत्मभान राखून जगणे या क्रिया कमालीच्या नकारात्मक व बोजड झाल्या आहेत आणी वाढत्या वयातही ही बाब बदलायला हवी याची सक्षम जाणीव करून देणारेही कोणी उपलब्ध नसल्याने मुळातच आपल्याला स्वतःकडे तटस्थपणे बघत जगणे ही गोष्ट अत्यन्त कंटाळवाणी ओढून ताणून करायची बाब बनली आहे. म्हणून लोकही भानावर येण्यापेक्षा भान विसरावणार्या बाबींकडे उत्तरोत्तर जास्ती जास्त आकृष्ट होत राहतात व आचरणातही आणतात मग ते देवाचे नाव घेणे असो वा अमली पदार्थांच्या आहारी जाणे असो.

आपल्या पालकांच्या वा भोवताली असलेल्या लोकांच्या आत्मिक अज्ञानामुळेच दुर्दैवाने आत्मभानात स्थिर व्हायच्या पहिल्या पायरीवरच आपला बळी जवळपास कायमचा घेतला जातो... मग पुढील आनंदी प्रवास घडेलच कशाला ?

तूर्तास इतकेच म्हणेन स्वतःचे तटस्थ निरीक्षण ही बोजड, नकारात्मक, लादलेली, अनावश्यक, मनाला दमवणारी वा कंटाळवाणी बाब अजिबात नसून मनाला अखंड आल्हाददायक अवस्थेत स्थिर करणारी व उत्तरोत्तर कमालीचा आंनद व समाधान निर्माण करणारी, मनाची सर्व ओझी हलकी करणारी प्रत्यक्ष वास्तव क्रिया आहे.

आणी हो हे वाचून लगेच अथवा काही वेळाने किमान अतिशय हलकासा असा टोचलेपणा मनास जाणवला काय पकवतोय असे वाटले तर मी आत्ता वर जे म्हटले त्याचे आपण 100% बळी आहेत कारण मी आत्ताच तुम्हाला अप्रत्यक्षपणे तुम्ही कसे आहात याचे आत्मचिंतन करावयास भाग पाडले जे करणे अनेक वर्षांपासूनच्या आत्मभानाकडे लक्षदेण्याबाबतच्या नकारात्मक तेमुळे आपल्या अंतर्मनास आजिबात मान्य नाही, यात आपल्या मनाच्या अहंकाराचा सामावेश आजिबात नाही ते फक्त लागलेले वळण आहे :)

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 9:13 am | मन्या ऽ

उत्तम प्रतिसाद!
एक सांगावस वाटत आहे. वर मी दिलेला प्रतिसाद मी अगदी रोजच्या रोज करायचा प्रयत्न करते. पण ही मला माझ्या आजीने नकळतपणे लावलेली सवय आहे.
जेव्हा कधी माझी छोट्या छोट्या कारणांवरुन चिडचिड व्हायची. तेव्हा ती प्रश्न विचारुन हैराण करायची. तोपर्यत चिडचिड करायच कारण मलुल होऊन नाहीस व्हायच. आता ती नाही पण तिने लावलेल्या सवयींचा अशाप्रकारे फायदा च होतोय. :)

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 10:07 am | कुमाऊचा नरभक्षक

जप करा, नर्मदा परिक्रमा करा, सर्वच नाकारा, योग अनुसरा, एखादा कल्ट जवळ करा, ईश्वरभक्तीत लिन व्हा विरोधाभासाला सामोरे जा वा भौतिकसुखात रमून जा... अभ्यासाचे सातत्य व अनुभवाधारीत सुधारणा हा प्रगतीचा एकमेव मार्ग आहे आणी हे सोडून इतर कोणताही गुरू ठरवूनही बनवता येत नाही.तुमच्या यशाचे हजारो वाटेकरी होतील अपयशासाठी लाखो तोंडे उठतील ध्येयाप्रति तीव्र आत्मीयता हा गुण सोडला तर इतर कोणतीही गोष्ट तुमची साधना, साधन व साध्य होऊ शकत नाही

विजुभाऊ's picture

23 May 2020 - 9:24 am | विजुभाऊ

ठार मेलोय

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 9:45 am | कुमाऊचा नरभक्षक

अथवा ठार झालो म्हटले तरी पुरेसे होते... पण अस्वस्थतेची तीव्रता जशी कमी ज्यास्त त्यानुसार तिचे प्रगटीकरणं व कृतीही वैविध्यपूर्ण... त्यामुळे रोचक विधान इतकेच म्हणता येईल

संजय क्षीरसागर's picture

23 May 2020 - 9:40 pm | संजय क्षीरसागर

१. > 99%, विचारांचा व कृतीचा उगम हा आपल्या मनाच्या अस्वस्थतेमधे असतो हे निरीक्षण केले आहे का ?

अस्वस्थतेतून केलेली प्रत्येक कृती अस्वस्थताच निर्माण करेल आणि त्यातून सगळं जीवन अस्ताव्यस्त होईल. कारण सामान्यांच्या जीवनात कृत्य हे विचारांचंच प्रकट रुप आहे.

२. > अस्वस्थता ही सुद्धा एक ऊर्जा आहे, व अक्षयतेच्या नियमानुसार ती आत्मस्वरूप जाणण्यात वापरली जात नाही तेंव्हा ती तिच्या तिव्रतेनुसार इतर विविध विचार वा कृतीमध्ये रूपांतरित होऊन बाहेर पडलीच असती.

अस्वस्थता हे उर्जेचं निगेटिवीटीमधे झालेलं रुपांतरण आहे. उर्जा कायम न्यूट्रल आहे.

३. > विविध विचारांचा व कृतींचा मूळ उद्देशच अंतिमत: विविध कारणातून तयार होणारी मनाची अस्वस्थता गमावणे हाच एकमेव असतो?

सर्व सृजनाचा स्त्रोत हा आनंदी चित्तदशा आहे. उत्तम संगीत, मानवतेला उपकारक ठरेलेलं संशोधन, उत्तम साहित्य, सगळे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स परफॉरमन्सेस ...... हे उर्जेचं विधायक रुपांतरण आहे.

४. > निर्विचार बनायला मार्ग उपलब्ध आहेत ज्याला ध्यान म्हणतात, ते केले जाऊ शकत नाही तो आपल्या मेंदूचा स्वभाव नाही.

ध्यान याचा अर्थ जाणिवेचा रोख स्वत:कडे वळवणं. एकदा आपण सत्य आहोत हा उलगडा झाला की चित्तदशा कायम आनंदी रहाते. या आनंदी चित्तदशेतून सृजनात्मक कामं होतात आणि जीवनाच्या रथाचा लगाम मनाच्या हातातून आपल्याकडे येतो.
________________________________________________

वस्तुस्थिती अशी आहे >

मन हा माणसाला निसर्गानं दिलेला अपूर्व बायोकंप्युटर आहे . जर त्याची कार्यप्रणाली कळली तर तो व्यवस्थित वापरता येतो.

आजपर्यंत सर्व अध्यात्मिक दिग्गजांनी मनाला वैरी ठरवून स्वतःच्या आणि त्यांच्या उपदेशाचं किंवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचं अनुसरण करणार्‍या सर्व साधकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे.

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 9:44 pm | कुमाऊचा नरभक्षक

अजून येउदे अपूर्ण वाटतो

जव्हेरगंज's picture

23 May 2020 - 10:05 pm | जव्हेरगंज

संक्षी आणि तुमच्या शैलीमध्ये कमालीचे साम्य आहे. 🤔

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 10:06 pm | कुमाऊचा नरभक्षक

मला एकुन 420 गुरू आहेत

वामन देशमुख's picture

24 May 2020 - 5:04 am | वामन देशमुख

आदरणीय कुमाऊचा नरभक्षक,
ही फिलॉसॉफी, टर्बोचार्ज्ड् म्हणावी की झपाटलेली?
;)

हघ्याहेवेसांन.

टरबो चार्जड, झपाटलेली आणी त्याहूनही इंटेन्स असू शकते आणी त्यानुसारच रीऍक्शन व्यक्त होते....

यातूनच व्यक्तीची वैचारिक ज्ञानभाषा तयार होत असते, ज्ञानभाषा म्हणजे अशी भाषा ज्यात व्यक्ती प्रत्यक्ष विचार करायची सवय बनवतो. जी व्यक्ती ज्या अनुभवातून जात असते त्यातून ही भाषा तयार होत असते म्हणूनच प्रत्येकाची ज्ञानभाषा वेगळी असते...दोन मराठी भाषिक याच मुळे एकच विचार वेगळ्या शब्दात मांडतात... जसे की एखाद्याला बोलावयाचे असेल तर एखादा म्हणेल जरा इकडे येता का, तर दुसरा म्हणेल इकडे ये रे भावा... उद्देश कृती एकच असतो तरी ज्ञानभाषेत फरक पडतो

ज्ञान भाषेतील हाच फरक विविध संतांची शिकवण एकच असूनही त्यामध्ये फरक असल्याचा भास निर्माण होण्यास कारणीभूत होतो

तसेच ही साम्यता एक आयडी दुसराच आयडी आहे असा भास निर्माण करण्यासही पुरेसा असतो पण वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 11:57 am | सुबोध खरे

बाप रे!

लोक एवढा गहन आणि गंभीर विचार करतात?

मला याच्या एक दशांश विचार केला तरी ग्लानी येईल.

पुलं च्या भाषेत - आपली पट्टी काळी एक पांढरी पाच मध्ये कसं गाणार?

कुमाऊचा नरभक्षक's picture

24 May 2020 - 12:06 pm | कुमाऊचा नरभक्षक

आपण सर्वज्ञानी आहोत हा भाव निर्माण होऊ न देता केला की तो फक्त सुक्ष्म व नेमका बनू शकतो, चुकीचा अथवा बरोबरही असू शकतो फक्त तो काहीवेळा गहन वाटतो कारण गहनता ही रिलॅटिव्ह संकल्पना असते.

म्हणूनच तुम्हाला विचार गहन आहे याची पुष्टी करायला तुलनात्मक आधार घ्यावा लागला स्वतःचा, स्वतःच्या ग्लानीचा

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 11:57 am | सुबोध खरे

बाप रे!

लोक एवढा गहन आणि गंभीर विचार करतात?

मला याच्या एक दशांश विचार केला तरी ग्लानी येईल.

पुलं च्या भाषेत - आपली पट्टी काळी एक पांढरी पाच मध्ये कसं गाणार?