ज्ञान आणि मनोरंजन : चित्रखेळ

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 Mar 2020 - 7:01 pm

प्रत्येक चित्रातील म्हण ओळखा.
चित्र व शब्दांचा क्रम जुळला पाहिजे.

ok

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 7:51 pm | इन्दुसुता

१. हातच्या कंकणाला आरसा कशाला?
२. एका हाताने टाळी वाजात नाही

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 7:55 pm | इन्दुसुता

६. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
७. उंटावरून शेळ्या हाकणे
८. गोगलगाय पोटात पाय

९. ?? गाढवाला गुळाची चव काय ?

कुमार१'s picture

29 Mar 2020 - 8:44 pm | कुमार१

बरोबर

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 7:58 pm | इन्दुसुता

११. कुत्र्याचे शेपूट वाकडेच
१३. शेरास सव्वा शेर
१८. खाली मुंडी पाताळ धुंडी

कुमार१'s picture

29 Mar 2020 - 8:46 pm | कुमार१

चूक.
उत्तर वेगळे आहे.

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 8:00 pm | इन्दुसुता

२१. दुरून डोंगर साजरे
२३. नाचता येईना, अंगण वाकडे

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 8:04 pm | इन्दुसुता

१५. चार दिवस सासूचे, ४ दिवस सुनेचे
२२. आयत्या बिळावर नागोबा

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 8:13 pm | इन्दुसुता

४. पाण्यात राहून माश्याशी वैर

चौकटराजा's picture

29 Mar 2020 - 9:55 pm | चौकटराजा

भित्या पाठी ब्रह्म राक्षस ...?

कुमार१'s picture

29 Mar 2020 - 9:56 pm | कुमार१

नाही !

चौकटराजा's picture

29 Mar 2020 - 9:57 pm | चौकटराजा

रात्र थोडी सोन्गे फार ( बाण वर् )

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 10:32 pm | इन्दुसुता

१६. दुष्काळात तेरावा महिना

इन्दुसुता's picture

29 Mar 2020 - 10:37 pm | इन्दुसुता

२५. एक घाव २ तुकडे

ऋतुराज चित्रे's picture

29 Mar 2020 - 11:44 pm | ऋतुराज चित्रे

३) आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.
५) डोंगर पोखरून उंदीर काढणे.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

30 Mar 2020 - 12:16 am | सौ मृदुला धनंजय...

12. शितावरून भाताची परीक्षा.
14. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
18. रात्र थोडी सोंगे फार

कुमार१'s picture

30 Mar 2020 - 7:45 am | कुमार१

१२ चूक,
बाकी सर्व बरोबर.

१९ व २४ हे आव्हान आहे. त्याचे उत्तर अद्याप एकमताने मिळालेले नाहे नाही.

चांदणे संदीप's picture

13 Apr 2020 - 1:08 pm | चांदणे संदीप

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

सं - दी - प

कुमार१'s picture

13 Apr 2020 - 1:38 pm | कुमार१

उत्तर चित्रांच्या क्रमानुसार योग्य वाटत नाही.
काही वेगळे सुचले तर बघू

कुमार१'s picture

12 Apr 2020 - 10:04 am | कुमार१

मित्रहो,
घरात बसायचा काळ वाढला आहे.
ज्यांचा वरील खेळ झालाय, त्यांच्यासाठी हा नवा.
..........

एकूण ५ म्हणी ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही.

१. दौड, नकार, शरीर

२. भंग, अवयव, प्राणी

३. वाढ, बोट, पहाड

४. सम्राट, दाम, कप्पा

५. ईश्वर, आपली , ती