रेखाटन

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 4:58 pm

प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत.

नाट्यसंगीतइतिहासवाङ्मयऔषधोपचारगुंतवणूकराजकारणरेखाटनआस्वादशिफारसमदतप्रतिभा

चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
11 Dec 2013 - 10:38 pm

यापूर्वीच्या लेखात आपण हिंदु देवादिकांच्या 'सपाट' रंगलेपन पद्धतीच्या चित्रातून हळूहळू पाश्चात्त्य पद्धतीच्या 'खोली' ‘घनता’ आणि 'छायाप्रकाश' दर्शवणार्‍या चित्रांकन पद्धतीकडे झालेली भारतीय चित्रकलेची वाटचाल, आणि त्याच सुमारास तिकडे फ्रांस मध्ये बरोबर याउलट दिशेने होणारी चित्रकलेची वाटचाल बघितली.
या लेखात आता आपण पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य पद्धतीच्या काही चित्रांद्वारे या दोन्ही चित्रपद्धतींमधील फरक बघूया.

मांडवाखालून !!

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 1:09 am

हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला...
तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस."
पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर."
"झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय."
"बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?"
"म्हणजे?"
"म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?"
"अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते"

मौजमजारेखाटनप्रकटन

टबुडी टबुडी जसवंती

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 6:46 pm

गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.

कथामुक्तकरेखाटनप्रकटनअनुभव

स्वप्नातला सचिन

पेस्तन काका's picture
पेस्तन काका in जनातलं, मनातलं
30 Oct 2013 - 4:35 pm

संध्याकाळची वेळ असते. सगळीकडे धावपळ चाललेली असते. कुणीतरी "खास" देवमाणूस घरी येणार असतं. अगदी मोजकीच लोकांना आमंत्रण दिलेला असत मी. सगळी तयारी जोरात सुरु असते. कुणी फुलांची सजावट करतंय कुणी पायघड्या टाकतंय. सगळे जण आतुरतेने वाट बघताय कि निमंत्रित व्यक्ती कधी येतेय. वेळ जाता जात नसतो. आम्ही आपले गच्चीवर जाउन कुणी येतंय का ह्याची चाहूल घेत असतो. आणि शेवटी । शेवटी म्हणण्यापेक्षा नेहमीसारखा PUNCTUALLY ती व्यक्ती वेळेपेक्षा आधी उपस्थित होते. बरोबर हर्षा (भोगल्यान्चा) पण असतो. गप्पा होतात. बाकी सगळी लोक फोटो काढता, सही घेतात.

रेखाटन

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
8 Oct 2013 - 10:11 pm

२ ऑक्टोबर २०१३
.
.

मुक्तकरेखाटनप्रकटनविचारआस्वादलेखअनुभव

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
23 Sep 2013 - 2:27 pm

मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो.

पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती.

माझ्या नजरेत विखार होता.

तिला मी रोज पहायचो.

आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता.

रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती.

एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली.

ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली.

तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो,

तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली.

गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि

चवताळून त्या दिशेने झेप टाकली.

कथासमाजजीवनमानरेखाटनअनुभवप्रतिभा

गृहिणी

kalpana joshi's picture
kalpana joshi in जनातलं, मनातलं
7 Sep 2013 - 12:41 pm

गृहिणी
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्याबाळालातीट लावू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळ झोपवू दे.
चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल!
कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते.

रेखाटनलेख

अर्धांग

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
5 Sep 2013 - 8:11 pm

नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !

अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!

तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!

मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!

मुक्तकजीवनमानरेखाटन