झुक आयी बदरिया सावन की
झुक आयी बदरिया सावन की
झुक आयी बदरिया सावन की
फुटलेल्या अंगठ्यावर तिनं चिरगुट बांधल.
"ठणका मारतुय का?"
"लय दुखतय"
"आसूदी आता, घरी गेल्यावर हाळद लावू"
"हू.." डबडबलेल्या डोळ्यांनी तो मागोमाग चालत राहिला.
"आयं, सरकार लय मोटं आसतं का ग?"
"हू.. लय मोटं आसतं"
"मजी आपल्या रामनाना पेक्शाबी उच्ची?"
"हू.. लय उच्ची आसतं, आता गप चाल"
तांबूरस्त्यानं चालत गेल्यावर रुकड्यायचं बारकं देवाळ लागलं. त्याच्या जरासं म्होरं कटावर वाट बघत बसलेल्या बाया दिसल्या. पाठीमागे हिरव्यागार गवतात खळाळून चारी वाहत होती
आज जेल मध्ये पोचल्या पोचल्या एक वेगळीच केस हाताळावी लागली. एक चाळीशी उलटून गेलेला माणूस समोर अपराधी म्हणून बसला होता. त्याचा अपराध म्हणजे चोरी आणि लबाडी.
भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. दिवसभर रानावनात उंडारल्यावर तळ्याकाठी येऊन शांत पडण्याचा त्याचा दिनक्रमच होता. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या याला विशेष दाद देत नसत.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे!
'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा.
एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं.
हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं.
" हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच.
"कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय?
गुलछबू रातीचा गाभारा भादवातल्या कुत्र्यासारखा लवलवत होता. गोठ्याच्या शेजारी थोडी जागा करुन गजड्या त्यावर झोपला होता. वारा कितीही थंडगार वाहत असला तरी तो आतुन धुसमुसत होता. पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तो तडफडत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता. आजची रात त्याला बोडक्या बाईच्या अंधाऱ्या खोलीसारखी भकास वाटत होती. जिच्या नैराश्याचे भाले त्याच्या शरीरात भळ्ळकन घुसले होते. वर्षानुवर्षे उभा असलेला एखादा वटवृक्ष एखाद्या जोरदार वादळात उन्मळून पडावा तसा तो अशक्त होऊन अंधरुणावर पडला होता. डोक्यात ना ना विचांरांची शकले चौफेर उधळली गेली आणि तो उठून बसला.