पारंपरिक पाककृती

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
15 Feb 2019 - 7:46 pm

महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला.

पारंपरिक पाककृतीआस्वाद

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
19 Aug 2018 - 10:15 pm

बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.

त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.

संस्कृतीपाकक्रियापारंपरिक पाककृतीआस्वादसमीक्षाअनुभवशिफारस

हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in पाककृती
1 Jun 2018 - 9:13 pm

साहित्य-
2 चमचे तेल
7-8 छोटे हिरवे टोमॅटो
4 चमचे तीळ भाजून
3 चमचे शेंगदाणे भाजून
2 लसूण पाकळ्या
1 चमचा मीठ
2 चमचे गुळ पावडर
2-3 तिखट हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग

पारंपरिक पाककृती

मेथी पिठले

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in पाककृती
29 Apr 2018 - 8:47 pm

साहित्य -
१वाटी बेसन
२मीरची चीरून
१०-१२ लसूण ठेचुन
१०-१२ पाने कढीपत्ता
२ चमचे कांदा लसूण मसाला
मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे
साहित्य
बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा

फोडणी
आता त्यात मेथीची पाने घालावी

मेथी घाला

पारंपरिक पाककृती

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
9 Dec 2017 - 1:44 am

प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514

अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.

बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….

भू नकाशा लांघणारे चित्र आहे
टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे
तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे
सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे
कवळी शाबीत गळती नेत्र आहे
शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे
अंत ना आदि असे अजस्त्र आहे
प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे

कविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीभयानकअद्भुतरसकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थमराठी पाककृती

!! बालदीन !!

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
14 Nov 2017 - 11:53 am

!!बालदीन !!

असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार
कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे
लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून
मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून

किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज
मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन
छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची
नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची

शिलकीच्या तबल्यासम बालतळावर
स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू
अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू
उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू

-झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार )
२२ जून २०१७

prayogvidambanइशाराकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलरतीबाच्या कविताभयानकहास्यबालकथाविडंबनकालवणपारंपरिक पाककृतीऔषधोपचार

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 12:28 pm

डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.

वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळा

तहान लाडू

मितान's picture
मितान in पाककृती
14 Apr 2017 - 6:51 pm

तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत !

लाडूपौष्टिक पदार्थउपाहारऔषधी पाककृतीपारंपरिक पाककृती