Skip to main content

कला

रानातल्या फुलांचा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त
काव्यरस

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १.

गाणारं वायोलिन!!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 12/12/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली. सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.

महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 01/12/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या 'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

गोटीपुअ

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 01/12/2011 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.