लेख

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
7 May 2013 - 1:52 pm

नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

मौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 May 2013 - 8:00 pm
इतिहासलेख

पानिपतची पहिली लढाई

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
5 May 2013 - 8:32 pm

बाबराचा बाप उमर शेख मिर्झा याला परंपरागत पद्धतीने काबुल चे राज्य मिळाले होते. काही कारणाने ते त्याच्याकडून जाऊन त्याला फरहाना (सध्याचे उझबेकिस्तान) (सिर्दार्या नदीच्या उगमाजवळचा प्रांत-राजधानी आदिजान) प्रांत मिळाला.बाबराला बापाकडून हे राज्य मिळाले. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ आहे. हे राज्य स्थिर राज्य नसून मुख्यतः लुटमारी हाच यांचा मुख्य धंदा होता.
एकंदरीत अंदाज यावा म्हणून एक नकाशा
एकंदरीत अंदाज यावा म्हणून एक नकाशा

इतिहासलेख

आज हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
2 May 2013 - 1:44 pm

आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन.

प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख हो‌ऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते.

इतिहासलेखमाहिती

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
1 May 2013 - 11:38 am

इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

इतिहासलेख

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 May 2013 - 8:12 am

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-२

इतिहासकथालेख

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Apr 2013 - 4:35 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे ठिकाणलेख

एक सिगारेट पिणारी मुलगी

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
28 Apr 2013 - 7:04 pm

आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..

ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..

हे ठिकाणप्रकटनविचारप्रतिसादआस्वादलेखअनुभव