लेख

परंपरा

rakhee's picture
rakhee in काथ्याकूट
20 Sep 2013 - 9:14 pm

आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल.

http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/

एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
17 Sep 2013 - 11:10 am
धोरणसंस्कृतीसमाजजीवनमानविचारलेखअनुभवमाहिती

मोनार्क - १

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
17 Sep 2013 - 9:48 am

कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला.

विज्ञानलेख

निर्भया

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
13 Sep 2013 - 9:01 pm

TV वर बातमी पाहिली . निर्भया ला न्याय मिळाला
PIFF मध्ये पाहिलेला 38 WITNESSESसिनेमाची आठवण झाली
एका CRIME चा उपयोग करून घेऊन , एका महान सत्याची प्रचीती शेवटच्या एका दृश्याने घडवणे,एका थ्रिलर सिनेमाचे रुपांतर एका वैचारिक सिनेमात करणे स्तिमित करून जाते .

कथालेख

सिरीया (contains some disturbing images)

मालोजीराव's picture
मालोजीराव in जनातलं, मनातलं
13 Sep 2013 - 6:39 pm

सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे.

सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे

सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती
map

असद समर्थक - दमास्कस मध्ये
map

राजकारणछायाचित्रणलेखबातमीमाहिती

माध्यमे आणि मोदीविरोध

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in काथ्याकूट
12 Sep 2013 - 1:55 pm

मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात.

पुस्तकवेडा (लघुकथा)

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
10 Sep 2013 - 8:41 pm

सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या ह्या मुलाचा वाचन व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडतफारच, मग कुठलाही विषय असो. घराजवळच्या पुस्तकाच्या दुकानातून शेकड्यानं पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं). एकदा त्या दुकानात पुस्तकं चाळताना त्याला जाणवलं की त्या दुकानातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं त्यानं वाचून संपवली होती. अचानकच त्याला फार रिकामं वाटू लागलं. ते एवढं मोठ्ठं दुकानही त्याला खूप लहान वाटू लागलं.

कथालेख

गुडबाय मि. चिप्स

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
9 Sep 2013 - 4:27 pm

नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल.

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानशिक्षणमौजमजाआस्वादसमीक्षालेखशिफारसमाहितीविरंगुळा

एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
9 Sep 2013 - 1:01 am
मांडणीसमाजजीवनमानतंत्रशिक्षणविचारलेखअनुभव

झगमगाटात हरवलेले . . . . .

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
7 Sep 2013 - 1:29 pm

गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे.

.......................................................................................

परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता.. मी मंदीराच्या आत येणार नाही बाहेरच थांबेन एवढ्यावर काय ती मांडवली केली.

धर्ममुक्तकप्रकटनविचारलेखअनुभवमतशिफारससल्लामाहिती