लेख

संस्कारनगरी वडोदरा

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
16 Mar 2014 - 7:40 pm

काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख.
संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं.

संस्कृतीइतिहाससाहित्यिकलेखमाहिती

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 1:16 am

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला .

बालकथालेख

चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
8 Mar 2014 - 9:54 am

मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचा चाहता आहे.अगदी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. त्यांच्याकडे असलेलं विषयांच वैविध्य मला खूप आकर्षित करतं.नेहमीचे हाणामारी आणि विनोदपट तर बघतोच, पण शक्यतो थोडे वेगळे सिनेमे बघायला आवडतं. शिवाय यासारखे सिनेमे आपल्याकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्याने बघायला मिळत नाहीत, पणते कुठल्यातरी वाहिनीवर किंवा डी.व्ही.डी.वर सहज बघायला मिळतात. अशाच काही मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहीण्याचा मानस आहे. सुरुवात २००८ साली आलेल्या पॅथोलोजी या सिनेमापासून करतोय. हे चित्रपटांचे परिक्षण मात्र नाही हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलं असेलच.

चित्रपटसमीक्षालेख

डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 12:58 pm

काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.

मुक्तकलेख

अजंठा ...........भाग-३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 8:59 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
अजंठा ...........भाग-१
अजंठा ...........भाग-२

या भागात आपण अजंठाची चित्रे कशी केली असतील व त्या चित्रांच्या संवर्धनासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले गेले, त्यात मूळ रंग कसे बरबाद झाले इत्यादि घटनांची माहिती घेऊ....

इतिहासलेख

गणपत आणी कोंबड्या

मनोजकुमार's picture
मनोजकुमार in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 3:12 am

गणपत आणी कोंबड्या
गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे.

कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या
कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.

बालकथालेख

मराठी भाषा दिन : दोन संकल्प

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
27 Feb 2014 - 7:22 pm

                   

मराठी भाषा दिन : दोन संकल्प

नमस्कार मित्रहो,

साहित्यिकविचारलेख

माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ ( दुपार ते संध्याकाळ)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2014 - 10:27 am

माझं कोकणातलं गांव :- भाग-१

माझं कोकणातलं गांव :- भाग-२

मागील भागात>>>
कितीही पाऊस असो, ऊन असो वर्षाचे ३६५ दिवस कारावीच लागते. या गणपतीला नैवेद्य दाखवल्या शिवाय घरी कोणीही जेवत नाही. पण त्या विषयी पुढिल लेखात ..

तिथुन पुढे >>>

वावरकथालेखअनुभव