लेख

खर तर मीच द्वाड :)

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 3:50 pm

रात्रीचे आठ - साडे आठ तरी वाजले असतील. आमचं अवाढव्य शिप पोर्ट मध्ये उभ होत पण आजूबाजूच्या शांततेमुळे धडकी भरत होती. आजूबाजूच्या पाण्यावर काळोख तर होताच पण पाण्याचा डुबुक डुबुक असा अधून मधून येणारा आवाज चांगलाच अस्वस्थ करत होता. एक प्रकारची वातावरणात निरव शांतता होती आणि त्या अपुर्या प्रकाशात आम्ही शिप ला लावलेल्या तात्पुरत्या जिन्यावरून आमची दिवस भरात केलेली खरेदी ( दोन अवाढव्य ब्यागा ) शिप वर चढवत होतो. एक प्रकारे खूप मुश्किल काम आणि घाम काढणार काम होत ते. पण नेटाने आम्हाला करण भागच होत.

मुक्तकलेख

पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 10:13 am

माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते.

कथाविनोदसमाजkathaaप्रवासविचारलेखअनुभवविरंगुळा

कहे कबीर (३)- उड जायेगा हंस अकेला

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 4:25 pm

उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।

संगीतविचारआस्वादलेख

स्टालिनग्राड भाग - ४ ..शेवटचा...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 9:35 am
इतिहासलेख

कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
22 Apr 2016 - 6:04 pm

सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।

नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?

संगीतवाङ्मयआस्वादलेख

वेगानी पसार

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
21 Apr 2016 - 1:05 am

"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का?

मुक्तकलेख

असा ही एक क्लायंट

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
20 Apr 2016 - 8:06 pm

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

कथासमाजkathaaविचारलेखअनुभवविरंगुळा

स्टालिनग्राड भाग -२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 10:45 am

==================================================================

स्टालिनग्राड : भाग - १...

==================================================================

इतिहासलेख