कला
'छूकर मेरे मन को'
प्रेषक, हर्षद खुस्पे, Sat, 18/05/2013 - 13:55परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे.
रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले. पुढे रविंन्द्रनाथ टागोर यांना नोबेल पुर्स्कार जाहिर झाला ...त्यादिवशी सकाळी पुन्हा तो वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणाला..."आज काहीतरी मिळाले".....
कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.
प्रेषक, चित्रगुप्त, Wed, 15/05/2013 - 13:45माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.
'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).
साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?
पाईनॅपल टेबल रनर
प्रेषक, जयवी, Tue, 14/05/2013 - 13:04हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं 
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही 
हे मूळ चित्र नेटवरचं.

आणि हे मी केलेलं.

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?
प्रेषक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Mon, 13/05/2013 - 10:36नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे.
केकचे फोटो
प्रेषक, चेरी, Sat, 11/05/2013 - 22:14नमस्कार मिपाकर,
मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.
चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन.
आशा करते की आपणास आवडतील.


जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता.... :)
प्रेषक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Thu, 09/05/2013 - 06:56हादडाया दाही डिश्या
प्रेषक, बॅटमॅन, Wed, 08/05/2013 - 02:30णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती.
चित्र-रंगावली प्रदर्शन
प्रेषक, अत्रुप्त आत्मा, Mon, 06/05/2013 - 17:01श्री.जगदीश चव्हाण सर,
वेलीचा स्कार्फ आणि बटवा
प्रेषक, जयवी, Sun, 21/04/2013 - 15:59हे नाजुक आणि सुरेख डिझाईन मला मिळालं पिंटरेस्ट.कॉम वर. अनायसे हिरवा दोरा होताच.......लगेच करायला घेतला. दोरा बारीक असल्यामुळे थोडा वेळ लागला. पण झाल्यावर खूप समाधान सुद्धा मिळालं 

आणि हा बटवा
कधी वाटतं..
प्रेषक, विसोबा खेचर, Wed, 10/04/2013 - 19:07कधी वाटतं..
नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या
घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं..
तर कधी वाटतं...
भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी
संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या..
कधी वाटतं..
बाबूजींच्या पायाशी बसून
'झाला महार पंढरीनाथ..' किंवा
'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं..
तर कधी वाटतं..
थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं..
आणि तिच्या पायांना मिठी मारावी..
कधी वाटतं...