स्वैपाकघरातून पत्रे १
अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)
अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)
चन्द्रगुप्त विक्रमादित्याच्या विष्णुभक्तीचा आणखी स्पष्ट पुरावा पाहण्यासाठी आपणास सध्याच्या मध्य प्रदेशातील विदिशा गावाच्या (२३० ३१' ७९.९" उत्तर, ७७० ४८' ३५.३" पूर्व) जवळच पश्चिम दिशेकडे २-३ कि.मी. वर असलेल्या ’उदयगिरि’ नामक छोटया टेकडीकडे जावे लागेल. हा पुरावा पाहण्यापूर्वी ’उदयगिरी’चा परिचय करून घेऊ.
दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी .
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न :
===================
बेलाग कातळ कड्याची कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
घाटाचे वेटोळे माळती डोंगर
माडा पोफळीशी खेळतो सागर
पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर
घामाच्या खताने फुलते शिवार
शेताच्या बांधाशी चटणी भाकर
कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर
खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार
भारूडा भुलवी लावणी शृंगार
ओवीच्या अंतरी शांतीचा सागर
अभंग झंकारे झेलून प्रहार
भक्तीने भिजतो चंद्रभागातीर
दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर
सत्वर ये तू निघोनी आता
निबीड अरण्यी कंटक वाटा
हे अंतर आता पाश म्हणू कि
नाश जीवाचा करिल ऐसा
तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा
जन्मजान्हवी, श्वास मिटावा
नकोच आता वियोग असा कि
दो तीरांचे वा हिमालयाचे
बंध तोडूनी पाश टाकूनी
माझे उरले संचित आता
तुझ्या रुपाशी मिळून जावे
जिथून आले हासत खेळत
तिथेच माझे असणे नसणे...
इतकेच होवो पुण्यसलीले,
तुझ्या तटाशी भंजन व्हावे
भस्मचिता अन् बंधमोक्षही
उरू नये ते काही काही....
सत्वर ये तू निघोनी आता
निबीड अरण्यी कंटक वाटा....
शिवकन्या
इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले.
फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !