मलई
महामार्गाला लागूनच असलेल्या त्या मोठ्या झोपडपट्टीत सगळं एकदम शांत होतं. हायवेवर धावणार्या जडशीळ ट्रेलरचा दणदणाट आणि त्या दिशेने भुंकणारी कुत्री यांचा आवाज सोडला तर बाकी सगळं सुमसाम. रघ्याच्या पत्र्याच्या झोपडीत मात्र रात्रीचे एक वाजले तरी साठचा बल्ब जळत होता. बाकीच्या झोपड्यातून लोकांची बत्ती केव्हाच गुल झालेली.
दहा दिवसांपूर्वीच सेन्ट्रल जेलमधून बाहेर पडलेला रघ्या.! या दहा दिवसात कुठंतरी नक्कीच नजर लावून होता. कायतरी साॅल्लीड प्लान रघ्याच्या उजाड खोपडीत नक्कीच घुमत असल्याशिवाय त्याने बाकीच्या चौघांना भेटायला बोलवलेच नसते.