Skip to main content

समाज

सौंदर्याचा बाजार

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 09/08/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.

चांदणपक्षी

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 07/08/2011 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक होतो जागा चांदणपक्षी झेलीत विस्फारल्या नजरा भुभुक्षी विरलेले होते घाव सारे. थिजलेले होते डाव कोरे. घन तिमीर दाटे काय कोसळत्या जलधारांचा प्रकोप पाखरांचा होता आक्रंदत दिवस रात तो कोण होता कैसा चाखेन म्हणे मुक्त ऐसा मोकाट होतो वारा गात्री पिसासुन घे भरारी जळ काय झाकोळले कर्दमात पारवे बुडाले क्षितीजाच्या पलीकडले एक झाड जळाले. ते स्वप्न कोणी माळले वक्षी जेंजारूनी भाळले भात्यांच्या नशीबी शेवटी रीकामेच प्राक्तन आले. घे एक भरारी काय आभाळाला फुटती पाय कोण कोण मागे पडती ते सारे बैल आणि गाय सरीसृप सारेच होते राजे आपापल्या बिळात वणवा पेटवी रान तोडून तंद्री बेभान प्राशूनी रक्त सारे सुरे तेजाळ
काव्यरस

लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

लेखक प्रदीप यांनी रविवार, 07/08/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे. अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे.

महिमा अंगठीचा

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी शुक्रवार, 05/08/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय. त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय.

हानाबी (花火)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/08/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी 'कांजी' हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात. हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ - आगीची फुले.

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 02/08/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी ..

मिपा कट्टा - ३० जुलै

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 01/08/2011 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

लेखक सुकामेवा यांनी सोमवार, 01/08/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस