लेखकचित्रगुप्तयांनी शनिवार, 10/09/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
....... तसे या लेखाचे पूर्ण शीर्षक - "गॅलिलिओचा बाप, चित्रकला, संमोहनशास्त्र, संगीत, गवंडीकाम, होमियोपाथी, ज्योतिषविद्या, न्यूटन, ताजमहाल आणि (ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंसाठी उपयुक्त -) एक वजनदार धागा" असे आहे. ... गोंधळलात ?
अहो,या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, तोही एक वजनदार धागा.
लेखकविकासयांनी शुक्रवार, 09/09/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी पुण्यातील शाश्वत फाउंडेशनच्या सौ. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संवाद झाला त्यातून त्यांच्या "पर्यावरणपूरक गणपती मुर्तीच्या" प्रकल्पाबाबत समजले. त्यांन या संदर्भात मिपाकरांसाठी माहिती देण्याची विनंती केली होती. ती खाली त्यांच्याच शब्दात देत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
सकळ गुणांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या पूजनाने सर्व कार्याचा शुभारंभ आपण करीत असतो.
लेखकअन्या दातारयांनी मंगळवार, 06/09/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी पावसाळ्यात घरी असल्याने भारी वाटत होतं. त्यातच श्रावणाची चाहूल लागलेली. अशी संधी असताना फक्त घरी बसणे शिक्षेसारखे वाटायला लागले होते. यंदाचा श्रावण कुठेतरी जाऊन कामी आणायचा असं मनोमन ठरवलं होतं. :) श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारी सांगली जवळ हरिपूर येथील जत्रेला जाण्याचे निश्चित केले. सकाळी लवकरच घराबाहेर पडलो, जेणेकरून जत्रेची पूर्वतयारी वगैरे बघता येईल.
जातना वाटेत इतका जोरदार पाऊस लागला की बीच रास्ते से ही परत फिरावे का असा प्रश्न पडला. पण उम्मीद ठेवून मी पुढेच निघालो. तासाभराच्या रस्त्याला दीड तास लागला, पण पोचलो एकदाचा सांगलीत.
लेखकमुक्तसुनीतयांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
लेखकसुनिल पाटकरयांनी शुक्रवार, 02/09/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची काळानुसार पडझड होत आहे.परंतु तरिही या किल्ल्यांचा इतिहास प्रत्येकाच्या मनामनात आहे. किल्ल्यांचा प्रतिकृतीतून इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचे काम पोलादपूर येथील तरुणांनी हाती घेतले आहे. ट्रेकिंग आणि भटकंतीच्या हौसेतून या तरुणांमध्ये किल्ल्यांविषयी निर्माण झालेली आवड दुर्गसृष्टीच्या रूपाने मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे साकारत आहे.
लेखकविनीत संखेयांनी बुधवार, 31/08/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी?
एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...