Skip to main content

साहित्यिक

डोमिसाईल हवंय.... ? ?

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 23/06/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

पाहिला पाऊस…

लेखक bharatm यांनी शनिवार, 13/06/2015 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिला पाऊस… रखरखत्या उन्हाच्या झळांनी लाही-लाही झालेल्या जीवांना गारव्याची अनुभूती देत असते. जसं- जसे एप्रिल-मे महिन्याचे दिवस संपत येतात. तस-तसा तापमानाचा पारा वाढतच चाललेला असतो… हे तापमान शरीराला असहाय्य करून सोडत असते. कधी एकदा पावसाच्या सरी या पृथ्वीतलावर कोसळतात आणि या हवामानामध्ये थंडावा, गारव्यातील नाजूकता पसरते असंच झालेलं असतं… अशावेळी कमी दाबाचा पट्टा… मोसमी वारे… काही दिवसातच केरळमध्ये पावसाचे आगमन… अशा बातम्या वृत्तपत्र, टेलिव्हिजन वर झळकू लागतात.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

लेखक ganeshpavale यांनी गुरुवार, 28/05/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.

पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

लेखक पारुबाई यांनी शुक्रवार, 08/05/2015 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 05/05/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

१० एप्रिल आणि खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 10/04/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
१० एप्रिल आणि खलील जिब्रान ‘You are my brother and I love you. I love you when you bow in your mosque, and kneel in your church and pray in your synagogue. You and I are sons of one faith – the Spirit.’ असे सहृद विश्वबंधुत्व साध्यासोप्या शब्दांत मांडणाऱ्या खलिल जिब्रानचा १० एप्रिल हा स्मृतिदिन! शाळकरी वयात कुठल्यातरी रूपक कथेतून समोर आलेला हा कलावंत, जन्मभराचा सोबती झाला. साधारण पाऊणेकशे वर्षांपूर्वी लिहिलेले त्याचे अभिजात लेखन जगभरात आजही वाचले जाते. स्मरले जाते.