कविता माझी

नदितिरी

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
19 Dec 2015 - 1:04 pm

माझिया मनासी कधी तरी
वाटते फिरावे नदितिरी ||
हळूच घेउन हाती
हिरव्या गवताची
कुरवाळावी पाती ||
नाजुक.... गुजगोष्टी
सांगाव्यात तयाशी
भेटून त्याना लोटले
दिस आज किती तरी - ||

सांगावे नाते जलदाचे
नदीच्या संथ जळाशी
संबध ऐलतीराचा
आणि पैलतीराशी
तसाच सरितेचा
सांगावा सागराशी
जन्म गिरिकुंदरमाहेरी
सार्थक अर्णवी पद सासरी ||

वाटते मना परोपरी
नित्य फिरावे नदितिरी ||

कविता माझीकविता

तुझी आठवण

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
14 Dec 2015 - 7:39 pm

आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।

रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे
पाहताना मी तुला चांदणे ही बावरे
का असे भास होती वेड्या मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।

रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध
प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग
नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।

आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।

कविता माझीकविता

घरट्याची ओढ

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2015 - 1:10 pm

वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
        सांगे जा तू घरट्याला

वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
        गळा भर, पाखराला

पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
        पाऊस घरचा ओला

जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
        बळ नाजूक पंखाला

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकविता

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 3:50 pm

घरात माणसे कमी
अन लोक वाढतात
तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते!

घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!

घरात वाचणारे कमी
अन वाचाळ जास्त होतात
तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो!

घरात आवाज कमी
अन गोंगाट जास्त होतो
तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो!

घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते!

घरात दिवस कमी
अन रात्री जास्त होतात
तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?)

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीवावरकविताविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीराहती जागा

तगमग....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 2:28 pm

खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही
ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही
ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर
इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर

पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय
बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय
तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ??
आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ?

तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत ….
उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत ….
मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना….
मग बाकीच्यांना काहीही करू देत ….

कविता माझीमुक्तक

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 9:42 am

अस्सल (आणि उच्चही)

शिवकन्या यांची माफी मागून..

============================

कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात?
थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!

नाचर्या पावसात, कोण रस्त्यात?
थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही!

चेहरा मनात, कोण आरश्यात?
अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही!

गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत?
लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही!

तपत्या उन्हात, कोण उरात?
गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही!

vidambanअनर्थशास्त्रकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितामुक्तकविडंबनमौजमजा

आत्मबंध..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Dec 2015 - 12:02 pm

होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.

अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.

आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.

मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.

कविता माझीशांतरसकविता

थांग या आयुष्याचा

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जे न देखे रवी...
8 Dec 2015 - 2:56 pm

थांग या आयुष्याचा शोधते आहे

नशीबाचे कोडे सोडवते आहे

पालवतात आशा आणि गळतातही

तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन

जीवनाची आस बांधते आहे

आपलेच करतात आपल्याला घायाळ

सत्याला सामोरे जाते आहे

सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून

कालांतराने हळुहळु गळून गेली

रोज नवनवीन मैत्र जोडून

नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे

कविता माझीकविता

सावली

संतोष तादंळे's picture
संतोष तादंळे in जे न देखे रवी...
8 Dec 2015 - 11:13 am

पोटा पेक्षा मोठा
कसलाच नाही
गुन्हा
चिपाटा सारखी
छाति
त्यात कसला पान्हा।

भेगाळलेल्या
भुईच्या खुणा
अंगभर् वाहते
अल्बम मधली
हसरी ,लाजरी
माय कुठ राहते?

लव्हाळा सारखा
तरणा बाप
पराठी सारखा
खंजर होतो
निधड्या छातीत
आग घेऊन
डोळ्यांत डोह
दाटूंन राहतो।

नदी काठचे
अटले झरे
शिवार मरणासन्न झाले
पाहणी साठी
राजे आले
हिरवे कुरन
चरुंण गेले

कविता माझीकविता

तुझ्या माझ्या वाटेवर.....

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
8 Dec 2015 - 12:19 am

तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू
कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू

नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ
तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू

नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई
तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही

तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी
रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी

मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी
माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी

आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान
तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान

कविता माझीप्रेमकाव्य