कविता माझी

नको वाटते..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 Jan 2016 - 10:06 am

नको जीव लाऊ,
नको वाट पाहू,
अता श्वास घेणे
नको वाटते..

कधी आस होती
तुझ्या कौतुकाची,
अता शब्दलेणे
नको वाटते..

कशी चूक झाली,
कुणी चूक केली,
पुन्हा जाब देणे
नको वाटते..

इच्छा निमाल्या.
मनी शांतताहे.
तिला छेद देणे
नको वाटते.

मला साद घाली
खुला पैलतीर,
इथे बंदी होणे
नको वाटते..

कविता माझीभावकविताविराणीशांतरसकविता

पहिले विडंबन

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
13 Jan 2016 - 5:57 pm

तिच्या मनात याच्याविषयी रागंच होता
तरी ह्यो पठ्ठया तिच्या मागंच होता

सेंडलकडं नजर टाकत तिने सहज पाहिले
तेवढयावरंच महाशयांनी तिला र्हदय वाहिले

महाशय गेले विचारात घरी
जाऊन पडले पत्रांच्या अरी

खिशात पैसे नसताना एसटीडी कॉल केला
फोनवर तिच्याऎवजी तिचा बापंच आला

हिंमत धरून घरी गेला पैलवान बापाने काळानिळा केला

जीभ चावत म्हणाला चूकला बेत
वाटेत दिसले तिरडीवर प्रेत

प्रेतावर पूष्प टाकून याने मोठ्याने गळा काढला
प्रेत म्हणाले गप्प मूर्खा मी तर या नादात जीव सोडला

कविता माझीकविता

Mobile

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
13 Jan 2016 - 1:33 pm

तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस
तू माझ्या mobileवर call करायचीस ,
मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस

माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा ,
अर्थ त्याचा फक्त एकच असायचा
तुझा देह माझं प्रेम मागायचं
आवाजही मझा देहाला तुझ्या शांत करायचा

जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं ,
तू बरंच नावलौकीक मिळवलं
सर्वांना माहितेय , तू मला रिकामं सोडलं
प्रिये ,जिंदगीला माझ्या तू वाळवांट केलं

कविता माझीकविता

मी

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
8 Jan 2016 - 6:10 pm

मी नशिले फुलपाखरु,
जे वार्यावर भिरभिरते...
मी शितल जल मृगजळीचे वाळुत ही खळखळते...
ढगाळलेल्या आभाळागत आसमात गडगडते...
कळ्या कळ्यातुन फुलांबरोबर अशीच मी बडबडते...

मी अबोली पाऊलवाट रानावनांतुन भिरभिरते.
मी नवेली एक पहाट फुलाफुलांतुन उलघडते..
कधी धुंद धुंद या पावसात मी चिंबचिंब भिजुनी जाते...
कधी मंद मंद ही चांदरात मी स्वप्नगंध देऊन जाते...
तार्यांसवे लखलखते मी
मोत्यांसवे चमचमते मी
कधी अडखळते मी, धडपडते मी
तरी पुन्हा पुन्हा सावरते मी

कविता माझीकविता

बायको गेली माहेरी..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
7 Jan 2016 - 10:26 am

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी
परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे.

कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा
मारून एक खिळा, ती गेली आहे

दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे

अभंगआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढफ्री स्टाइलहास्यधोरणनाट्यपाकक्रियाबालगीतशुद्धलेखनफलज्योतिषमौजमजा

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
5 Jan 2016 - 1:06 pm

प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...

dive aagarvidambanअनर्थशास्त्रअनुवादअभंगआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनचौरागढछावाजिलबीनागद्वारप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनाशृंगारहिरवाईहास्यशांतरसकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडारेखाटन

लढा

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
4 Jan 2016 - 5:32 pm

ते आले आणि वार केले
मी धडपडलो पण भ्यालो नाही
अपमान पचवु कसा म्हणत
उगा मद्य प्यालो नाही

केली त्यांनी अफाट निंदा
मी मुळीच बधलो नाही
दिखाव्याच्या प्रतिष्ठेसाठी
दिखाऊपणे वदलो नाही

उष्ण झळा येत गेल्या
कोमेजलो पण हरलो नाही
मनाला चटके बसले तरी
काळजामधे झुरलो नाही

सोसुन सारा ऊन-वारा
नियतीशीही झुंजत राहीन
खंबीरपणे उभा राहुन
पहाडाशीही टक्कर घेईन

आघात तर होतच राहतील
लोक हसुन मजा पाहतील
पाहणाऱ्यांना पाहु द्यावे
आपण पुढे चालत राहावे

कविता माझीकविता

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
4 Jan 2016 - 4:00 pm

प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं

ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!

कविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइललावणीहास्यसंस्कृतीकलानृत्यसंगीतकविताविडंबनविनोदमौजमजा

माझी मस्तानी

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जे न देखे रवी...
3 Jan 2016 - 9:04 am

‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमा पाहताना
ही मुसमुसत होती, मस्तानी जगताना.
ठरवले ह्याच क्षणी सांगावे हिला मनोगत
सहज पूर्ण होईल जीवनाचे मनोरथ.

“मी पण आणू म्हणतो मस्तानी आपल्या आयुष्यात”
फक्त पुढचे काही क्षण गेले मौनात, मा‍झ्या जीवनात.
डोळे बरसू लागले तोफ गोळे आणि जिव्हा, तप्त लाव्हा
‘मुलुख मैदानी’च्या वर्षावात सर्व झाले स्वाहा.

बाळगा जरा मनाची, असलं काही बोलायला,
पोरीचे हात पिवळे करायचे, तर निघाले तोंड काळे करायला.
कोण आहे तुमची मस्तानी, आणा तर खरं समोर,
उपटते झिंज्या आणि करते कपड्यांच्या चिंध्या.

कविता माझीभावकवितामुक्त कविताकविता

याद

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
2 Jan 2016 - 1:55 pm

तुझी याद अशी ,
अमावसेच्या रातीला येते
अन रातीसारखच माझ मन
अंधारागत करून जाते

डोळ्यावरची झोप ,
रुसून जाते अन
बेचैन हृद्यायला
खवळत सुटते

सुटलेले क्षण ,
Chat History मध्ये शोधते
हरवलेले मन ,
तुझ्या प्रतीमात हरवते

डोळे असेच screen समोर ,
मग हळूच ओले होतात
अन सकाळची सूर्यकिरणे ,
ऑफिसला जाण्याची साद देतात ........

कविता माझीकविता