महिला दिन

पेपर फ्लॉवर..डच गुलाब

इशा१२३'s picture
इशा१२३ in विशेष
8 Mar 2015 - 2:07 am
महिला दिन

.
नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो. अशाच एका वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी बनवला कागदी गुलाबांचा पुष्पगुच्छ.
.

बालमानस जपणे.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in विशेष
8 Mar 2015 - 2:06 am
महिला दिन

कितीही सुधारलं तरी आमचं शहर अजून रेल्वेशी ईमान राखून आहे. त्यामुळे ट्रेन आली की रस्त्यांचे पाय अधिक जलद् गतीने वेगवेगळ्या घरांच्या दिशेने जायला लागतात. उशीराची वेळ असली की त्या पायांना पोळीभाजी केंद्राचा एक थांबा मिळतो. अश्याच एक पोळीभाजी केंद्राशी गर्दीतलं एक कुटुंब. नवरा-बायको आणि चार-पाच वर्षांची मुलगी. कुठली भाजी, किती पोळ्या याचा उहापोह करत केंद्रावरच्या काकांना ऑर्डर सांगत होते. ते काकाही एकटेच दोघाचौघांच्या प्रश्नांना उत्तरं देणे, हिशेब करणे, पैसे घेणे ही कामं करतच होते. त्या छोटीचं लक्ष गेलं बरणीतल्या वड्यांकडे.
"मला ते हवयं"-- छोटी.

जुळ्यांचं दुखणं

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in विशेष
8 Mar 2015 - 2:05 am
महिला दिन

विषय थोडासा वेगळा आहे, खरंय, पण यच्चयावत जुळ्या भावा बहिणींच्या मनातला आहे. विशेषतः IDENTICAL TWINS! माझ्या नवऱ्याला आणि दिराला (पूर्वी रोज आणि हल्ली कधीकधी) या प्रश्नोत्तरांच्या फैरीला सामोरं जावं लागतं. तुम्ही सुद्धा आठवून बघा , जेव्हा जेव्हा जुळ्या व्यक्ती एकत्र समोर येतात तेव्हा संभाषण या रुळांवरून चालते.

वास्तूतील प्रदूषण आणि नैसर्गिक उपाय

मोक्षदा's picture
मोक्षदा in विशेष
8 Mar 2015 - 2:04 am
महिला दिन

परवा टीव्हीवर बातमी बघितली की गावाकडे थंडीच्या हुरडा पार्ट्या चालू झाल्या आहेत, अलोट गर्दी आहे. शहरातील लोक भरभरून गावाकडे येताना दिसतात, त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण शहरातील माणसे गावाकडच्या शुद्ध हवेला, मोकळ्या वातावरणाला, निसर्गातील आनंदाला मुकलेलो आहोत. शहरात खूपच प्रदूषण वाढले आहे. त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. आपल्या घरातही तितकेच प्रदूषण आहे, हे मात्र आपल्याला माहीतही नसते. तुम्ही म्हणाल, आम्ही तर घरे रोज स्वच्छ करतो, मग आमच्या घरात कसले प्रदूषण?

लखलख चंदेरी

आनन्दिता's picture
आनन्दिता in विशेष
8 Mar 2015 - 2:03 am
महिला दिन

माझ्या आठवणीतल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या हे मी आणि माझी छोटी भावंड यांचं मिळून एक गुळपीठ आहे. आम्ही तिघी बहिणी. मोठी बहिण माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी, छोटी बहिण अंकिता माझ्याहून दोन वर्षांनी लहान. दीदीच्या आणि आमच्या वयात बरंच अंतर, त्यामुळे आम्ही खेळत्या वयाचे होई पर्यंत तिचं अभ्यासाचं वय सुरु झालं होतं. तिचं विश्व आमच्या पेक्षा वेगळं होतं. ती आमच्यात खेळायला वगैरे कधी नसे. शिवाय तिला खेळण्यापेक्षा स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात पहिले येणे, निबंध, भाषण स्पर्धात दणकुन यश मिळवणे, मोत्यासारखं सुंदर अक्षर काढणं अशा अघोरी गोष्टी करायला आवडे. याच्या अगदी उलट मी आणि अंकिता.!!

आंघोळ

मितान's picture
मितान in विशेष
8 Mar 2015 - 2:02 am
महिला दिन

आज सकाळी सकाळी व्हाट्सॅप वर एक विनोद वाचला. म्हणे, आरशासमोर एक ग्लास पाणी घेऊन उभे रहा, बचकन पाणी आरशावर फेका. म्हणा," झाली बाबा आंघोळ एकदाची !" काय झकास कल्पना ! मला फार आवडला हा विनोद. मी पण पुढे ढकलला. ( आपण कशाला सोडायचं!)

मग आंघोळीला गेले. कढत कढत पाणी. वाफा येणारं. बाथरूम भरून गेली वाफांनी. आरशावर वाफ जमा झाली. दोन बादल्या अशा कढत पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. मग गरम चहा करून प्यायले. आणि पांघरुण घेऊन गुडुप ! एकदम लहान बाळ झाल्यासारखं वाटलं. शांत, निवांत, निर्मळ !

झेप

विभावरी's picture
विभावरी in विशेष
8 Mar 2015 - 2:01 am
महिला दिन

आता सरला काळोख
उजाडला दिवस
सूर्यकिरणांची नक्षी
खेळेल दारात

नाही वळून पहायचे
सखे मागे आता
तुझ्यासाठी आहेत
चहुदिशांनी वाटा

चाललीस वाट तू
खाचाखळग्यांची
विसर सर्व सारे
आणि झेप घे गरुडाची

झाले मोकळे आकाश
आज तुझ्या माझ्यासाठी
स्वप्न पाखरांचा थवा
घाले गगना गवसणी

- विभावरी

ही वाट दूर जाते

सुचेता's picture
सुचेता in विशेष
8 Mar 2015 - 2:00 am
महिला दिन

“ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा”
खरेतर खूपदा कानावर येणारं, ऐकून- ऐकून सवयीनं लक्षात राहिलेलं हे गाणं, पण आज का कोण जाणे त्यातील आर्तता माझ्या अगदी-अगदी अंगावर येत गेली. केव्हा न कळे माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाण्याचा सागर भरून गेला नकळत माझ्या, माझीच मी अशी उरली नाही, गालावरून सरीवरून सरी ओघळत राहिल्या, त्या लडिवाळ स्वरांच्या मागून माझं मन कुठल्या कुठे-कुठेतरी प्रवासाला जात राहिले. एक-एक पाऊल मागे-मागे जात असताना मनातील कितीतरी अलवार क्षणांना जागवत गेले. किती हळुवार कप्प्यांना, जागांना जागवून मला पुरतं घायाळ करून सोडलं त्यानं.

खानदेशी खाद्यसंस्कृती

आरोही's picture
आरोही in विशेष
8 Mar 2015 - 1:57 am
महिला दिन

खानदेश... नाव उच्चारताच सर्व प्रथम आठवते आपली बहिणाबाई आणि तिच्या साध्या सहज पण अत्यंत भावस्पर्शी कविता. बहिणाबाईंच्या कविता आणि ओव्या लहानपणीच कानावर पडायला लागलेल्या, पण तेव्हा त्याचा मथितार्थ म्हणावा तसा कळला नव्हता. जेव्हा स्वयंपाकघरात लुडबुड सुरू केली तेव्हा आजीच्या तोंडी ऐकले, "आधी हाताले चटके तेव्हा मियते भाकर".. तेव्हा गमतीत घेतलेले हे वाक्य, नंतर त्याचा अर्थ लागला प्रत्यक्षात स्वयंपाक घरात जेव्हा काम करण्याचा प्रसंग आला तेव्हा! प्रत्येक वेळी आजीचे हे वाक्य आठवते.

मुक्काम पोस्ट स्लोव्हाकिया

Mrunalini's picture
Mrunalini in विशेष
8 Mar 2015 - 1:56 am
महिला दिन

परदेशात जायचं म्हणजे अमेरिका! इंग्लंड! किमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तरी..? आपल्यापैकी बहुतेकांसाठी परदेश हा साधारण एवढ्याच देशांपुरता असतो. पण यातली कोणतीही नावं न घेता आम्ही पोचलो ते स्लोव्हाकिया या युरोपियन देशात. आता सांगायला हरकत नाही.. पण माझे लग्न ठरेपर्यंत मलाही स्लोव्हाकिया या नावाचा एखादा देश आहे हे माहीतच नव्हते. :P इतकंच नाही, तर आमच्या लग्नानंतर व्हिसासाठी प्रोसेस सुरू केली होती; व्हिसासाठी काही पेपर आणायला जेव्हा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जायचो, तेव्हा तिथले लोकही असा कुठला देश आहे?? असे त्यांच्या नजरेनेच आम्हाला विचारायचे.